आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)

Submitted by अ'निरु'द्ध on 6 January, 2018 - 14:49

आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)

मुखपृष्ठ :

“आरण्यक” हि एक निवांत करणारी, ताण तणाव घालवणारी, चिंता/ काळज्या मिटवणारी, निसर्गाच्या जवळ नेणारी जागा आहे.

एक छोटंसं घर आणि त्यासभोवती बऱ्यापैकी जागा असलेलं एक खाजगी फार्महाउस म्हणा ना . . . . .

पाण्याच्या प्रचंड कमतरतेमुळे आधी उजाड असणारी हि जागा आता हळूहळू हिरवी होतेय आणि हिरवं होताना ती निसर्गाच्या सोबत्यांना पण स्वतःबरोबर बोलावतेय, जगवतेय,वाढवतेय.

इथे अधूनमधून जायची संधी मिळते आणि जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा तेव्हा तिथले सान्निध्य अतिशय निवांत सुखकारक, स्वतःला उलगडणारं (unwinding) आणि शरीराला, मनाला, पुनरुज्जीवित करणारं (rejuvenating), तरोंताजा करणारं झालेलं आहे.

इथले घराच्या आजूबाजूचे, झाडांवर रहाणारे/येणारे , मातीत रहाणारे, पाण्यात रहाणारे काही शेजारी तुमच्या सोबत शेअर करतोय.

ह्यांची विविधता पहिली कि एक मात्र जाणवतं, कि एकेकाळी जेसीबी, बुलडोझरने माती खणून, झाडे उखडून वैराण आणि जवळ जवळ निर्वृक्ष झालेली हि जमीन आता जैव विविधतेने फुलतेय, बहरतेय आणि त्याची साक्ष म्हणजे हे शेजारी जे कधी सहज दिसतात तर कधी शोधक नजरेने पाहिल्यासच सापडतात.

प्रचि १: Lime Butterfly...

प्रचि २: Common Mormon Female...

प्रचि ३: Common Emigrant...

प्रचि ४: Common Baron...

प्रचि ५: Great Eggfly Male...

प्रचि ६: Blue Mormon : महाराष्ट्रातील सर्वात मोठे फुलपाखरु तसेच महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू...

प्रचि ७: आरण्यक मधून एक छोटासा पावसाळी पाण्याचा
ओहोळ जातो. त्याच्या काठावरच्या Lea Plant
वरील Common Leopard Butterfly....

प्रचि ८: Common Crow Butterfly...

प्रचि ९: पावसाळ्याची चाहूल लागताच बाहेर पडणारे इंद्रगोप....
(Velvet Mite.... Trombidium Holosericeum )

प्रचि १०: जराही संकटाची चाहुल लागताच घेतलेला संरक्षक पवित्रा..

प्रचि ११: Limacodid Moth Caterpillar...

प्रचि १२: Hooded Grass Hopper...

प्रचि १३: Red Silk Cotton Bugs ... हे किडे सिल्क कॉटन ट्री म्हणजे काटेसावरीच्या बिया खातात त्यामुळे जिथे ही झाडे आहेत तिथे हे जास्त करून दिसतात. नावही त्यावरूनच पडले आहे.

प्रचि १४: Spotted Dove..

प्रचि १५: हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' आहे.
याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे...

प्रचि १६: Jewel Beetle...

प्रचि १७: Six Spotted Tiger beetle...

प्रचि १८: आरण्यकच्या विहिरीतील कासव...

प्रचि १९: Giant Wood Spider Female...

प्रचि २०: Giant Wood Spider Female : Close Up

प्रचि २१: Sheet Web Spider...

प्रचि २२: जमिनीला पडलेल्या छिद्रावरती जाळे विणलेला कोळी...
नांवही समर्पक... : Funnel Web Spider..

प्रचि २३: Close Up...

प्रचि २४: Cat Snake : मांजर्या साप...

प्रचि २५: Buff Striped Keelback : नानेटी...

प्रचि २६: Garden Lizard : सरडा

प्रचि २७: Fan Throated Lizard...

प्रचि २८: विंचू इंगळी...

प्रचि २९: Shield Bug...

प्रचि ३०: लिंबाच्या झाडावरील... Death's Head Hawk Moth....

प्रचि ३१: Unidentified Moth..

प्रचि ३२: Unidentified Moth..

प्रचि ३३: Unidentified Moth..

प्रचि ३४: Unidentified Moth..

प्रचि ३५: White Ants Or Termites : वाळवी

प्रचि ३६: Centipade Babies...

प्रचि ३७: Scale Insects...

प्रचि ३८: Fungoid Frog...

यातील काही प्रचि मायबोली- निसर्गाच्या गप्पा यावर पूर्वप्रकाशित...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरण्यक मधे सरड्याला खाताना सापडलेला हा डुरक्या घोणस.
(Common Sand Boa)
हा बिनविषारी साप उंदरांचा कर्दनकाळ समजला जातो.


Clytra-short-horned leaf beetles
समोरुन..


Clytra is a genus of short-horned leaf beetles...


आहा! सुंदर.
सध्या पक्षीनिरीक्षण जवळजवळ बंदच आहे. किंवा असं म्हणू की गच्चीवरून दिसणाऱ्या घारी, कबुतरं, कावळे, पोपट, साळुंक्या, फार फार तर कोतवाल यांच्यापुरतं मर्यादित आहे. Happy त्यामुळे मस्त वाटलं हा Tickell's blue flycatcher बघून. निळा रंग किती सुंदर आहे!

Pages