आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)
मुखपृष्ठ :
“आरण्यक” हि एक निवांत करणारी, ताण तणाव घालवणारी, चिंता/ काळज्या मिटवणारी, निसर्गाच्या जवळ नेणारी जागा आहे.
एक छोटंसं घर आणि त्यासभोवती बऱ्यापैकी जागा असलेलं एक खाजगी फार्महाउस म्हणा ना . . . . .
पाण्याच्या प्रचंड कमतरतेमुळे आधी उजाड असणारी हि जागा आता हळूहळू हिरवी होतेय आणि हिरवं होताना ती निसर्गाच्या सोबत्यांना पण स्वतःबरोबर बोलावतेय, जगवतेय,वाढवतेय.
इथे अधूनमधून जायची संधी मिळते आणि जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा तेव्हा तिथले सान्निध्य अतिशय निवांत सुखकारक, स्वतःला उलगडणारं (unwinding) आणि शरीराला, मनाला, पुनरुज्जीवित करणारं (rejuvenating), तरोंताजा करणारं झालेलं आहे.
इथले घराच्या आजूबाजूचे, झाडांवर रहाणारे/येणारे , मातीत रहाणारे, पाण्यात रहाणारे काही शेजारी तुमच्या सोबत शेअर करतोय.
ह्यांची विविधता पहिली कि एक मात्र जाणवतं, कि एकेकाळी जेसीबी, बुलडोझरने माती खणून, झाडे उखडून वैराण आणि जवळ जवळ निर्वृक्ष झालेली हि जमीन आता जैव विविधतेने फुलतेय, बहरतेय आणि त्याची साक्ष म्हणजे हे शेजारी जे कधी सहज दिसतात तर कधी शोधक नजरेने पाहिल्यासच सापडतात.
प्रचि १: Lime Butterfly...
प्रचि २: Common Mormon Female...
प्रचि ३: Common Emigrant...
प्रचि ४: Common Baron...
प्रचि ५: Great Eggfly Male...
प्रचि ६: Blue Mormon : महाराष्ट्रातील सर्वात मोठे फुलपाखरु तसेच महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू...
प्रचि ७: आरण्यक मधून एक छोटासा पावसाळी पाण्याचा
ओहोळ जातो. त्याच्या काठावरच्या Lea Plant
वरील Common Leopard Butterfly....
प्रचि ८: Common Crow Butterfly...
प्रचि ९: पावसाळ्याची चाहूल लागताच बाहेर पडणारे इंद्रगोप....
(Velvet Mite.... Trombidium Holosericeum )
प्रचि १०: जराही संकटाची चाहुल लागताच घेतलेला संरक्षक पवित्रा..
प्रचि ११: Limacodid Moth Caterpillar...
प्रचि १२: Hooded Grass Hopper...
प्रचि १३: Red Silk Cotton Bugs ... हे किडे सिल्क कॉटन ट्री म्हणजे काटेसावरीच्या बिया खातात त्यामुळे जिथे ही झाडे आहेत तिथे हे जास्त करून दिसतात. नावही त्यावरूनच पडले आहे.
प्रचि १४: Spotted Dove..
प्रचि १५: हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' आहे.
याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे...
प्रचि १६: Jewel Beetle...
प्रचि १७: Six Spotted Tiger beetle...
प्रचि १८: आरण्यकच्या विहिरीतील कासव...
प्रचि १९: Giant Wood Spider Female...
प्रचि २०: Giant Wood Spider Female : Close Up
प्रचि २१: Sheet Web Spider...
प्रचि २२: जमिनीला पडलेल्या छिद्रावरती जाळे विणलेला कोळी...
नांवही समर्पक... : Funnel Web Spider..
प्रचि २३: Close Up...
प्रचि २४: Cat Snake : मांजर्या साप...
प्रचि २५: Buff Striped Keelback : नानेटी...
प्रचि २६: Garden Lizard : सरडा
प्रचि २७: Fan Throated Lizard...
प्रचि २८: विंचू इंगळी...
प्रचि २९: Shield Bug...
प्रचि ३०: लिंबाच्या झाडावरील... Death's Head Hawk Moth....
प्रचि ३१: Unidentified Moth..
प्रचि ३२: Unidentified Moth..
प्रचि ३३: Unidentified Moth..
प्रचि ३४: Unidentified Moth..
प्रचि ३५: White Ants Or Termites : वाळवी
प्रचि ३६: Centipade Babies...
प्रचि ३७: Scale Insects...
प्रचि ३८: Fungoid Frog...
यातील काही प्रचि मायबोली- निसर्गाच्या गप्पा यावर पूर्वप्रकाशित...
“आरण्यक” हि एक निवांत करणारी,
“आरण्यक” हि एक निवांत करणारी, ताण तणाव घालवणारी, चिंता/ काळज्या मिटवणारी, निसर्गाच्या जवळ नेणारी जागा आहे.>> सौ टके कि बात..
मस्त प्रचि निरु...
काही काही बघुन अंगावर काटे आले पण छानच..
फुलपाखरं मस्तच पण किड्यांची मला भिती म्हणण्यापेक्षा किळस जास्ती वाटते त्यामुळे त्यांना इतक्या जवळून पाहायची सवय नाही.. हालाकी यातले अर्ध्यापेक्षा जास्त मी पाहिलेय एवढ्याच जवळून..
मॉथ फार मस्ताय हं एकएक..
आणि हरियाल सुद्धा भेट देऊन गेला म्हणजे भारीच..
Death's Head Hawk Moth.... खरच तसा दिसतो..
Sheet Web Spider...>> याचा क्लोज अप नाही का? ते पाण्यात न्हालेलं जाळं सुंदर दिसतय..
इंगळी खुप दिवसांनी पाहिली.. लगोलग पाय वर घेतले.. कसकाय मेली ती?
सापांचे एवढ्या जवळून प्रचि...
नानेटीचा प्रचि बघुन "जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात..नागिण सळसळली.." गाणं आठवल..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
निरु, फार सुंदर फोटो .
निरु, फार सुंदर फोटो .
पुढचा भाग लवकर येऊ दे.
सुंदर म्हणता म्हणता बापरे
सुंदर म्हणता म्हणता बापरे तोंडात आल...
जबरदस्त... आणि Refreshing
जबरदस्त... आणि Refreshing
यातले एकूण एक प्रत्यक्ष अनुभवलेलं आणि कॅमेरात साठवलेलं असल्याने मन उडत उडत कोकणात घेऊन गेलं.... Eagerly waiting for next part…
सुंदर छायाचित्र आणि पूरक
सुंदर छायाचित्र आणि पूरक माहिती. फार आवडलं !
निरुदा खुप खुप सुंदर फोटो
निरुदा खुप खुप सुंदर फोटो आहेत. आरण्यकसाठी तुम्ही खुप मेहनत घेतली आहात.
आरण्यकमध्ये खुप प्रकारची अगदी रानटी झाडेही आहेत ज्याची निरुदांनी लागवड करुन जोपासली आहेत. आम्हा निगकरांचे ते हक्काचे निसर्गस्थान आहे.
नानेटी आणि मण्यार खुप
नानेटी आणि मण्यार खुप दिवसांनी दिसले. सुंदर म्हणता म्हणता वाळवी पाहून आई गं ..............................
अतिशय सुरेख फोटो. मस्तच!
अतिशय सुरेख फोटो. मस्तच!
फारच सुन्दर... डोळ्यान्ना
फारच सुन्दर... डोळ्यान्ना सुखावणारे प्रचि!
साप,विन्चुचे इतक्या जवळुन फोटो? थरकाप झाला हे बघुन! ३७ नम्बरच्या फोटोतील किडे बघुन धुळ्याच्या अॅग्रीकल्चरवरच्या क्वार्टरची आठवण झाली. गुलमोहराच्या झाडावर असे किडे असाय्चे. त्यान्ना काडी टोचलि कि पिवळा द्राव निघायचा. आता विचार करुनही याक्क वाटते!
अप्रतिम फोटो.
अप्रतिम फोटो.
फुलं, फुलपाखरं, मृगाचा किडा, बेडुक, सरडे, इंगळी, नानेटी पाहून कोकणची खूप आठवण आली.
फक्त १९ ते २३ बघून, अंगावर काटा आला.
आर्या, किती दुष्ट होतीस ग तू?
<<आर्या, किती दुष्ट होतीस ग
<<आर्या, किती दुष्ट होतीस ग तू? Sad<<< मी नाही ग! मी बरीच मोठी होते तेव्हा. ९वी-१०वीमधे.
लहान भावन्डे सान्गायची, दाखवायची एकेक...
सुंदर फोटो आहेत सगळे. मला
सुंदर फोटो आहेत सगळे. मला कोळ्याची प्रचंड भिती वाटते. त्यामुळे तेवढे सोडून बाकी आवडले.
आरण्यक काय आहे? रिसॉर्ट आहे का?
आरण्यक काय आहे? रिसॉर्ट आहे
आरण्यक काय आहे? रिसॉर्ट आहे का?>>>एक छोटंसं घर आणि त्यासभोवती बऱ्यापैकी जागा असलेलं एक खाजगी फार्महाउस म्हणा ना . . . . .
निरुदा खुप खुप सुंदर फोटो
निरुदा खुप खुप सुंदर फोटो आहेत. आरण्यकसाठी तुम्ही खुप मेहनत घेतली आहात.
आरण्यकमध्ये खुप प्रकारची अगदी रानटी झाडेही आहेत ज्याची निरुदांनी लागवड करुन जोपासली आहेत. आम्हा निगकरांचे ते हक्काचे निसर्गस्थान आहे. >> +१
निरु मस्तच
निरुदा खुप खुप सुंदर फोटो.
निरुदा खुप खुप सुंदर फोटो.
अतिशय सुंदर फोटो
अतिशय सुंदर फोटो
हा धागा इतके दिवस का नाही पाहिला असे झाले.
क्या बात है निरूदा. मस्त फोटो
क्या बात है निरूदा. मस्त फोटो सगळेच.
“आरण्यक” हि एक निवांत करणारी, ताण तणाव घालवणारी, चिंता/ काळज्या मिटवणारी, निसर्गाच्या जवळ नेणारी जागा आहे. >>>>>अगदी अगदी. दोनदा अनुभव घेतला आहे.
अतिशय उत्तम फोटो फक्त एक चूक
अतिशय उत्तम फोटो फक्त एक चूक आहे तेव्हडी सुधारा ...
Cat Snake : मण्यार या दोन वेगवेळ्या प्रजाती आहेत. त्यातील मण्यार हा अतिशय विषारी आहे ... त्यामानाने Cat Snake (मांजऱ्या) हा विषारी नसतो आणि मनुष्यास घातक पण नसतो ...
सुधारतो भुत्याभाउ..
सुधारतो भुत्याभाउ..
अभिप्रायाबद्दल आणि माहिती बद्दल धन्यवाद..
Cat Snake : मण्यार या दोन
Cat Snake : मण्यार या दोन वेगवेळ्या प्रजाती आहेत. त्यातील मण्यार हा अतिशय विषारी आहे ... त्यामानाने Cat Snake (मांजऱ्या) हा विषारी नसतो आणि मनुष्यास घातक पण नसतो ...>>+१ तो जरास्सा मण्यार सारखा दिसतो म्हणुन बरेचदा प्राणास मुकतो.. मी लिहायची राहून गेली हि चुक.. फोटो मस्तच बाकी..
अतिशय सुरेख फोटो!
अतिशय सुरेख फोटो!
फारच सुंदर फोटो सगळे!
फारच सुंदर फोटो सगळे!
एवढी लांबलचक नानेटी प्रथमच पाहिली.
अतिशय सुरेख.त्या कीटकांचे
अतिशय सुरेख.त्या कीटकांचे सौंदर्य तुमच्यामुळे कळले.कबुतरांचा राग येत असला तरी हरियाल्ची पोझ खासच.प्रचि.३४ पण मस्त.
खुप सुरेख प्र.ची...:)
खुप सुरेख प्र.ची...:)
पुढचा भाग पण लवकर येऊ द्या!!!
निव्वळ अप्रतिम सगळेच फोटो ,
निव्वळ अप्रतिम सगळेच फोटो , मस्त धागा
प्रचि १० बघुन तर अगदी अंगावर काटा आला.
कुठे आहे हे अरण्यक ???
VB धन्यवाद....
VB धन्यवाद....
<<<कुठे आहे हे आरण्यक ???>>>
बदलापूर...
माझ्या उशिरा प्रतिसादाबद्दल
माझ्या उशिरा प्रतिसादाबद्दल प्रथम क्षमस्व...
टीना, पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल तोही तपशीलवार आणि छान.. त्याबद्दल धन्यवाद..
मनीमोहोर, अदिती, उनाड पप्पू,
मनीमोहोर, अदिती, उनाड पप्पू, रैना, जागू, स्निग्धा, गजानन, मी_आर्या, शोभा१, चैत्रगंधा, इंद्रधनुष्य, सामी, mi_anu, जिप्सी, सचिन काळे, वावे, देवकी, सायु....
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ....
@ टीना...
@ टीना...
<<> याचा क्लोज अप नाही का? ते पाण्यात न्हालेलं जाळं सुंदर दिसतय..>>>
क्लोज अप नसावा बहुधा... तो कोळी मध्यभागापासून कडेला सरकलेला थोडा मोठा फोटो आहे बहुतेक.. तो बरा असेल तर देतो इथे...
ते जाळं आधी सुकं होतं. म्हटलं काढू जरा वेळाने फोटो. पण तेव्हढ्यात पाऊस आला.. आम्ही आडोशाला पळालो. आणि पाऊस संपल्यावर आलो तर हे दृष्य...
<<<इंगळी खुप दिवसांनी पाहिली.. लगोलग पाय वर घेतले.. कसकाय मेली ती?>>>
मी शक्यतो मारत नाही. माझा भाऊ तर उचलून बाहेर सोडून येतो....
पण जागेवरच्या केअरटेकरने आधीच हे मारुन मर्दुमकीचा पुरावा म्हणून मांडले होते..
“आरण्यक” हि एक निवांत करणारी,
“आरण्यक” हि एक निवांत करणारी, ताण तणाव घालवणारी, चिंता/ काळज्या मिटवणारी, निसर्गाच्या जवळ नेणारी जागा आहे.>>>>>>> *999999
फोटो लैच भारी आलेत. युवराज गुर्जरांनी काढले का विचारायचे अगदी तोंडावर आले होते, पण मार मिळेल या भीतीने आवरले.
विंचू शोध सुरू केलेला ना? त्यांचे फोटोही टाका ना.
Pages