डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Hit ची डासांची रॅकेट चांगली टिकते. फक्त बार्बेक्यू डास वास येतो त्याकडे कठोर मनाने दुर्लक्ष करावं लागतं. डासांचा मागोवा घेताना शिवाय आपसूकच एकटीने बॅडमिंटन (टप्पाटप्पा खेळावं तसं) सुद्धा खेळून होतं, जरा नजर सूक्ष्मदर्शी होते आणि चापल्य (पाल मारण्यापेक्षा जरा कमीच) वाढतं, इ. फायदे पाचशे रुपये खर्चून मिळतात.
इति रॅकेट माहात्म्य समाप्त. (रॅकेट चालवणे ही जबाबदारी माझी असल्याने जरा जिव्हाळ्याचा विषय आहे. लेकाला हातात रॅकेट दिली तर तो घराबाहेर जाऊन डास मारायची सुरुवात करतो त्यामुळे मीच ही जबाबदारी घेणं परवडतं) Proud Proud :फिदी

मी_अनु Lol मस्त झालाय पालोलॉग. पाली फक्त खराट्याने मरतात अस स्वानुभव आहे. आईकडे दारच्या नारळाचे हीर काढून लांबच्यालांब खराटे तयार करून घेण्यात येतात. मग पाल घरात आली की एका हातात हिट आणि दुसर्‍या हातात खराटा अशी मोहिम काढली जाते. पाल दिसली की लांबूनच ती झिंगेपर्यंत तिच्यावर हिटचा मारा करायचा आणि आपल्या खराट्याच्या टप्प्यात आली की एकाच फटक्यात विषय संपवायचा. मी फार लहानपणीच माझ्या बाबांकडून याचं प्रशिक्षण घेतलं आहे Proud आधी आधी फक्त हिट मारून पाल मारायचे प्रयोग करून पाहिले होते. पण पाली परफ्युमचा स्प्रे असावा तसं हिट मारून घेतात असं एक निरीक्षण आहे. शिवाय त्यानंतर त्या एखाद्या दारूड्यासारख्या कुठेही पडायला किंवा पळायला लागतात आणि मग अजूनच प्रॉब्लेम होतो.

भाग्यश्री 123, मांजर पाळा. ते शिकार करतात पालीची>>>> धन्यवाद धनवन्ती. पण एक ब्याद घालवण्यासाठी दुसरी नकोय. पेस्ट कंट्रोल ने जातात का? कुणी केले आहे का पालींसाठी ? सध्या कोरोनामुळे तेही रिस्की च वाटतंय लोकांना घरी बोलावणे.

मांजरीला ब्याद म्हणल्यामुळे तुमचा निषेध>>>yesss अशा त्रासदायक मांजरीना कुत्री म्हणायचं असतं इतकं पण ठावूक नाही याचा निषेध Lol

अनु, मस्त Biggrin >>>
आमच्याकडेही दोन पाली घरात घुसल्या आहेत त्यातली एक नवरोबाने चोपून बाहेर हाकलून लावली पण एक छोटी अजून आहे तर काल रात्री अचानक पाणी पिण्यासाठी जागी झाले तेव्हा ती शिशुपाल चक्क नवऱ्याने सिंक खाली ठेवलेल्या बियरचा बाटलीत स्वतःचे प्रतिबिंब पाहून त्या प्रतिबिंबाबरोबर लपाछपी खेळत होती मला तिचा तो खेळ फारच गंमतीशीर वाटला मी तिला डिस्टर्ब नाही केले (सहसा कोणी प्राणि/पक्षी पाणी किंवा अन्न खात पीत असतील आणि आपल्या अचानक तिथे गेल्याने ते जर उडून जाणार असतील किंवा पळून जाणार असतील तर मी सहसा त्यांना डिस्टर्ब करत नाही मांजर जरी आडवी जात असली तरी तिला आधी जाऊ देते)

<< मला तिचा तो खेळ फारच गंमतीशीर वाटला मी तिला डिस्टर्ब नाही केले >>

Ajnabi तुम्ही फारच धाडसी आहात. .

अनु, भारीच ग. Biggrin

डासांसाठी रात्री झोपताना मच्छरदाणी लावणे यासारखा सुरक्षित आणि बिनकटकटीचा उपाय दुसरा नाही. Happy

डासांसाठी रात्री झोपताना मच्छरदाणी लावणे यासारखा सुरक्षित आणि बिनकटकटीचा उपाय दुसरा नाही. >>> पार्शली असहमत. कारणं दोन - एक म्हणजे डास हुशार असतात आणि ते मच्छरदाणीच्या दाराच्या फटीतून आत घुसतात. दुसरं म्हणजे चुकून शरीराचा कुठलाही भाग जाळीला टेकलाच तर डास त्या भागाची युद्धभूमी करतात.
आम्ही लहान असताना आईने त्या मच्छरदाणीच्या दारांना मधून कापड लावून पहिला प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न केला होता. पण त्यातून पडायलाच व्हायचं जास्त वेळा Proud

Rmd, अगं मच्छरदाणी लावताना अजिबात फट राहून चालतच नाही. डास हुशार असतात याबाबत सहमत. एक डास आत आला की पाठोपाठ बाकीचे पण येतातच. Happy
जाळीला शरीराचा कुठलाही भाग टेकला जाणार नाही ही काळजी मात्र घ्यावी लागते. माझा मुलगा लहान आहे तर मी कडेला जास्तीच्या उशा आणि लोड लावून ठेवते.

निधी Happy पण दारं व्यवस्थित लागतील अशी मच्छरदाणी मिळत नाही ना!!> हि घेवून बघा.
Classic Mosquito Net Double Bed King Size Polyester Foldable - Blue
Learn more: https://www.amazon.in/dp/B00JD8EA1U/ref=cm_sw_em_r_mt_dp_66F6RQB7FQRGK0S...
तीन वर्ष वापरते आहे.

आमच्या कडे बर्गे यामिनी आहे.मध्ये मध्ये लावायचो.पण ती लावून अगदी व्यवस्थित आतले डास बॅट ने मारावे लागतात. शिवाय सारखं रात्री उठून अमुक घे, तमुक पाणी पी, पुस्तक घेऊन ये अशी सवय असेल तर डास घुसतात आत.
सध्या आम्ही काळे सुगंधी किंवा सुगंधालय मध्ये मिळणारी होमाची गोवरी जाळून धूर करतोय झोपायच्या आधी.एक देवीप्रसाद सोहनी आहेत त्यांचे गोशाळेचे धूप घेतलंय काल ते पण लावतोय.गोवरी धुराने बराच फरक पडतो.
गुड नाईट ने डास अजिबात मरत पळत नाहीयेत.ती कवी कल्पना झाली आहे.डास म्यूटेट झालेत.

गुड नाईट ने डास अजिबात मरत पळत नाहीयेत>>>सहमत

मच्छरदाणी लावल्यावर डास मारायची बैट घेऊन झोपावे लागते. उन्हाळा सुरू झाला की खूप गरम होते मच्छरदाणीत.

इथे सगळे त्या हिट झुरळ इंजेक्शन ची इतकी स्तुती करतायत.मला काहीच जाणवलं नाही.अत्यंत घाणेरड्या रंगाचे चिकट मेणचट पिवळे डाग पडणे,त्यावर झाडू लागल्यास ते पसरून अजून घाण दिसणे सोडून.छोट्या झुरळांवर नेहमीचा पेस्ट कंट्रोल, खाणं सांडू न देणं आणि लाल हिट इतकेच उपाय कामी आले.लाल हिट अतिशय लवकर संपतं.
अधून मधून गोनील चे जरा स्ट्रॉंग द्रावण पण वापरतो.

त्या हिट किंवा इतर बाजारात मिळतात इंजेक्शन तसेच ड्रॉप पण पारदर्शक रंगाचे कुठे मिळत नाहीत का?त्या घाण पिवळ्या, किंवा गुलाबी रंगाने किचन झुरळं असल्या पेक्षा जास्त बेकार दिसतंय.

झुरळांसाठी लाल हीट प्रभावी हे मी डेफीनेटली सांगू शकते. फक्त नाकाला रुमाल, मास्क लाऊन फवारा (मी नाही लावत पण भावाला त्रास झालेला, म्हणून सांगते) .

Lemongrass oil किंवा peppermint oil dilute करून ते फवारा किंवा त्यातेलाचे छोटे बोळे कपाटात, कोपऱ्यात ठेवा. फरक पडेल.

<<<इथे सगळे त्या हिट झुरळ इंजेक्शन ची इतकी स्तुती करतायत.मला काहीच जाणवलं नाही.अत्यंत घाणेरड्या रंगाचे चिकट मेणचट पिवळे डाग पडणे,त्यावर झाडू लागल्यास ते पसरून अजून घाण दिसणे >>
कबूल कबूल कबूल...

तो चिकटा काढणे हे झुरळे काढण्यापेक्षा चिकट काम आहे.

या धाग्यावर मी डासां ना पळवून लावण्या)साठी गुडनाइटच्या मशीनमध्ये मॅट ऐवजी कापराच्या वड्या लावतो, असं लिहिलं होतं.
अन्य एका धाग्यावरही कापराचा वेगळ्या प्रकारे वापर काहींनी सुचवला आहे.
इथे तर त्या कापराच्या वाफांचा फोटोही आहे ( अतिथंड प्रदेशातला असावा)

आज फेसबुकवर CamPure Camphor Liquid Vaporiserची जाहिरात दिसली. (आता इथेपण सगळ्यांना दिसेल)

<तो चिकटा काढणे हे झुरळे काढण्यापेक्षा चिकट काम आहे. >>
Abro tape* आणुन जिथे ती पेस्ट लावायची तिथे आधी ती टेप चिकटवून त्यावर ती पेस्ट लावायची. काढताना टेप ओढून काढायची.

Abro tape म्हणजे सुतार लोक सनमाईका शीट बसवताना ती जागीच रहावी म्हणुन जी चिकट पट्टी लावून ठेवतात आणि दुसऱ्या दवशी काढतात ती. ही सेलो टेप पेक्षा अधिक चांगली चिकटते, हाताने चटकन फाडता येते आणि पृष्ठभाग गुळगुळीत नसल्याने त्यावर लावलेली पेस्ट घसरून पडत नाही
हार्डविअर आणि प्लायवूडच्या दुकानात मिळते.

Pages