शिक्षण आणि ऑफिसातले काम जमायला लागल्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला. तो म्हणजे पैसे कमावून घर चालवणारे बाप्ये ही जी जागतिक जमात आहे जे ऑफिसचे काम , तिथे करावे लागणारे कष्ट, तिथले टुकार राजकारण व त्यात अनेक क्लिष्ट खेळ्या करून आपण जिंकलेली मात व बॉसचे विश्वासू आदमी असणे, आपण कमविलेल्या पैशातून घर चालले आहे नाहीतर," तुम्ही रस्त्यावरच पडले असता, भीक मागायला लागली असती, तुझ्या आईची अक्कल काय चूल अन मूल, बायकांनी स्वयंपाक घराच्या बाहेर तोंड उघडायचे नाही अन हात चालवाय्चे नाहीत. त्यांची लायकीच नाही. मी आहे म्हणून तुझ्या आईबरोबर संसार केला. नाहीतर मला रेखाने मागणी घातली होती. मी तुझ्या फोटोग्राफी क्लासची फी भरणार नाही. पैसे काय झाडावर लागले आहेत? तीस दिवस खर्डेघाशी करावी तेव्हा एक दिवस पगार मिळतो!!!" अशी मुक्ता फळे रोज आईने केलेले चहा पोहे खाताना फेकणार्या घरोघरीच्या बाप व नवरेवर्गा बद्दल उगीचच माजलेला आदर माझ्या डोक्यातून कायमचा नष्ट झाला.
ही वाक्ये व ती येता जाता फेकणारे कळकट पायजमा व पिवळा बनियन घालून मुलींकडे नजरा टाकत अंग खाजवत फिर णारे पुरुषोत्तम हळूहळू कमी झाले. दोघांनी नोकर्या करून घराचे/ गाडीचे लोन भरायचा जमाना पण य येउन जुना झाला. संपलाच. आता प्रीनप व टीटीएम एम चालते.
मी पण एंट्री लेव्हलच्या नोकर्या करता करता अनुभव, छोटी छोटी ट्रेनिंगे घेउन कामात एक एक लेव्हल पुढे गेले. सहि ष्णू, आत्मविश्वासाने स्त्रियांच्या हाती काम सोपवणारे, ती करेल नीट असे इतरांना ठमकावून सांगणारे
खमके अनुभवी व संयमी पुरुष बॉस भेटल्याने माझी प्रगती होतच गेली आणि आई नोकरी करते पैसे वाचवते
बारीक सारीक खर्च पण करते ह्या पुढे जाउन मी करिअरिस्ट व आर्थिक दृ ष्ट्या स्वतंत्र की हो झाले.
पैसे मिळ्वायचे बाप्यांचे ऑफिसातले काम तुम्हाला शिक्षण व अनुभव ह्यांच्या जोरावर येउ लागले कि त्यांच्याबद्दल
वाटणारा भययुक्त आदर गळून जातो. स्वप्नातला राजकुमार पांढर्या शुभ्र घोड्यावरून येतो. व आपल्याला
एका स्मूथ जेस्चर मध्ये उचलून घेतो. सो फार सो गुड.
मग त्याच्या मागे त्याच्या घराचे, कुटुंबाचे, घरातल्या सतराशे साठ प्रथांचे, वाण व्रते : ऑमच्या इथे अस्स्संच लागतं, फोडणी तश्शीच लागते असे तोंड घोळ्वून सांग णा र्या आजे आते सासवा, चुलत नणंदा, हे सर्व लटांबर मागून बैलगाडीतून येते. आपल्या स्वप्नांचा लग्नाच्या वेदीवर बळी जातो. सर्जनशीलता, मॅनेजमेंट स्किलस, कोडिंग डिझायनीं ग अॅबिलिटीज, प्रेझेंटेशन स्किल्स पीपल स्किल्स ह्याचेलटांबराला देणे घेणे नसते. सर्वांची बोळवण फक्त " ती लग्नानंतर पण जॉब करते!! " ह्या एका वाक्या त होते. व नंतर तुच्छ कटाक्ष!! घरचे सांभाळून काय कराय्चे ते करा. पगार एक तारखेला माझ्या हातात पाहिजे. तुला कश्याला लागतात खर्चाला पैसे!! अय्या वहिनी तुला रांगोळी नाही येत? अश्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो.
तुम्हाला तुमचे काम समजले ते नीट करता येउ लागले व त्याचा रास्त मोबदला बँकेत जमा होउ लागला की तुमचे
आयुष्यातल्या पुरुषांबद्दलचे भाव् निक समीकरण बदलते. सर्व पत्ते त्यांच्या हातात असलेली निर्णय प्रक्रिया आता तुम्ही तुमच्या हातात घेउ शकता व परिस्थितीनुसार मान न तुकवता मना प्रमाणे व तुमच्या मते योग्य निर्णय घेउ शकता. शिकिवनारा बाबा लागत नाही.
आम्ही बायका स्वभावाने पुरु ष द्वेष्ट्या नसतो. अनुभवाने त्यांच्या बद्दल प्रेम, आनंद, किळस, राग अश्या भावना वाटतात त्याही अनेक वेळा दाबूनच ठेवल्या जातात. पण एकेक् पुरुष आयुष्यात चालवून घेणे कधी कधी फार वैतागवाणे होते. नोट .मी जनरलजायझेशन केलेले नाही त्यामुळे असा प्रतिसाद देउ नये. त्यांचे ते फ्रॅजाइल इगोज, सारखा सारखा येणारा राग, कंट्रोल मध्ये न राहणारी लैंगिक भावना, नकार समजू न शकणे, मारहाण करणे व्हरबल अब्युज ह्याला ते फक्त पुरूष आहेत म्हणून जीवनात काही स्थान द्यावे असे मात्र मला आता वाटत नाही. अनेक उदारमतवादी, व कंट्रोल मध्ये असलेल्या सॉर्टेड बाप्यां बरोबर युजफुल इंटर अॅक्षन आहे माझी. पण
माझी सुपि रिऑरिटी चाल्वूनच घेतलीच पाहिजे अश्या मानसिकतेतून जगावर स्वारी ़ करणारे घरोघरीचे राजाबेटा,
पतिपरमेश्वर, भाउ रायाज ह्यांना माझे एक आवाहन आहे. खालील कामे लिंग निरपेक्ष आहेत. बाई किंवा बाप्या
कोणी ही करू शकतात असे जालावरील एका पोरगेल्या काकांनी नुकतेच वर्तवले आहे.
१) घर स्वच्छ करणे व आवरणे
२) स्वयंपाक ( चहा व खाणे जेवण ) घरातील सर्वां साठी करणे रोज तीन वेळा.
३) पाळणाघरातील व शाळेतील मुलाना आणणे सोड णे, मुले आजारी पडल्यास रजा घेउन घरी त्यांच्या बरोबर
थांबणे औषधपाणी करणे.
४) बाजारहाट, बागकाम करणे
५) वॉशिंग मशीन, डिशवॉशर लो ड करणे व कपडे घडी करून भांडी सुकवून जाग्याला ठेवणे
६) घरातील ज्ये ष्ठांची देख भाल
७) पडेल ते!!
घर दोघांचे असते व कामही. हे आता रिसर्च करून प्रूव झालेले आहे. त्यामुळे घरोघरीच्या गृहस्थांनो उचला झाडू व झारा, लागा कामाला. आय होप द जर्नी इज अ हॅपी वन.
आई कुठे काय करते चे रोजचे
आई कुठे काय करते चे रोजचे परीक्षण येत राहू दे तुमचे! तुमच्या पेशन्सची कमाल आहे मात्र या बाबतीत __/\__
हा धागा काढून त्यावर विक्रमी
हा धागा काढून त्यावर विक्रमी चर्चा घडलेल्या दिसतात. अमा मात्र प्रतिसादात फिरकल्या देखिल नाहीत
मालक आपली आस्थेनि चौ़कशी करतोय आणि नवीन ग्लोव्ह मास्क आणून देतोय यात समाधान मानणं सफाई कामगाराचा मूर्खपणा आहे. भाऊ मी तुझ्यासारखा एसी हापिसात बसून काम करतोय आणि आपापल्या एरियाची सफाई आपण आपापली करतोय अशी वेळ कधी येणार? मला तुझे प्रश्न समजून घ्यायचे आहेत असं मी enabler च्या पोझिशनवरून तुला आस्थेने कधी विचारणार? मला तुझ्याइतका किंवा जास्त पगार कधी मिळणार- हे प्रश्न पडले पाहिजेत. >>> अगदी चुकीचं लॉजिक आहे हे. जो तो ज्याच्या त्याच्या कुवती नुसार काम करतो/करते. प्रत्येक जण ऑफिसात एसीत बसून काम करायची स्वप्नं बघायला लागला तर ज्याने त्याने त्या प्रमाणात शिक्षण्/कष्ट केले पाहिजेत.. नुसते आरक्षण, वशिला, इच्छा किंवा स्वप्नं बघून कामं होतात काय?
आमचे खूप आनंदात चालू आहे.
आमचे खूप आनंदात चालू आहे. बायकोने मला वॉशिंग मशीन घेऊ दिली आहे. त्यामुळे कपडे लवकर धुवून व वाळवून होतात. या वर्षी डिशवॉशर घेऊन देते म्हणाली पण मीच नको म्हटले. मग तिने किचन मधे गरम पाण्याचा छोटा गीझर मी नाही नाही म्हणत असताना बसवला. आता माझे हात थंड पाण्याने ठणकत नाहीत.
(धाग्याशी सहमत).
हा धागा काढून त्यावर विक्रमी
हा धागा काढून त्यावर विक्रमी चर्चा घडलेल्या दिसतात. अमा मात्र प्रतिसादात फिरकल्या देखिल नाहीत Uhoh>> अहो मला जे म्हणा यचे ते लेखातच म्हटले आहे. पोकळ बांबू शोधून आणायला गेले होते. अब बोलो.
>>>>>>>पोकळ बांबू शोधून
>>>>>>>पोकळ बांबू शोधून आणायला गेले होते. अब बोलो.

Pages