गृहस्थांनो, ... लागा घरकामाला!

Submitted by अश्विनीमामी on 17 December, 2017 - 01:05

शिक्षण आणि ऑफिसातले काम जमायला लागल्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला. तो म्हणजे पैसे कमावून घर चालवणारे बाप्ये ही जी जागतिक जमात आहे जे ऑफिसचे काम , तिथे करावे लागणारे कष्ट, तिथले टुकार राजकारण व त्यात अनेक क्लिष्ट खेळ्या करून आपण जिंकलेली मात व बॉसचे विश्वासू आदमी असणे, आपण कमविलेल्या पैशातून घर चालले आहे नाहीतर," तुम्ही रस्त्यावरच पडले असता, भीक मागायला लागली असती, तुझ्या आईची अक्कल काय चूल अन मूल, बायकांनी स्वयंपाक घराच्या बाहेर तोंड उघडायचे नाही अन हात चालवाय्चे नाहीत. त्यांची लायकीच नाही. मी आहे म्हणून तुझ्या आईबरोबर संसार केला. नाहीतर मला रेखाने मागणी घातली होती. मी तुझ्या फोटोग्राफी क्लासची फी भरणार नाही. पैसे काय झाडावर लागले आहेत? तीस दिवस खर्डेघाशी करावी तेव्हा एक दिवस पगार मिळतो!!!" अशी मुक्ता फळे रोज आईने केलेले चहा पोहे खाताना फेकणार्‍या घरोघरीच्या बाप व नवरेवर्गा बद्दल उगीचच माजलेला आदर माझ्या डोक्यातून कायमचा नष्ट झाला.

ही वाक्ये व ती येता जाता फेकणारे कळकट पायजमा व पिवळा बनियन घालून मुलींकडे नजरा टाकत अंग खाजवत फिर णारे पुरुषोत्तम हळूहळू कमी झाले. दोघांनी नोकर्‍या करून घराचे/ गाडीचे लोन भरायचा जमाना पण य येउन जुना झाला. संपलाच. आता प्रीनप व टीटीएम एम चालते.

मी पण एंट्री लेव्हलच्या नोकर्‍या करता करता अनुभव, छोटी छोटी ट्रेनिंगे घेउन कामात एक एक लेव्हल पुढे गेले. सहि ष्णू, आत्मविश्वासाने स्त्रियांच्या हाती काम सोपवणारे, ती करेल नीट असे इतरांना ठमकावून सांगणारे
खमके अनुभवी व संयमी पुरुष बॉस भेटल्याने माझी प्रगती होतच गेली आणि आई नोकरी करते पैसे वाचवते
बारीक सारीक खर्च पण करते ह्या पुढे जाउन मी करिअरिस्ट व आर्थिक दृ ष्ट्या स्वतंत्र की हो झाले.

पैसे मिळ्वायचे बाप्यांचे ऑफिसातले काम तुम्हाला शिक्षण व अनुभव ह्यांच्या जोरावर येउ लागले कि त्यांच्याबद्दल
वाटणारा भययुक्त आदर गळून जातो. स्वप्नातला राजकुमार पांढर्‍या शुभ्र घोड्यावरून येतो. व आपल्याला
एका स्मूथ जेस्चर मध्ये उचलून घेतो. सो फार सो गुड.

मग त्याच्या मागे त्याच्या घराचे, कुटुंबाचे, घरातल्या सतराशे साठ प्रथांचे, वाण व्रते : ऑमच्या इथे अस्स्संच लागतं, फोडणी तश्शीच लागते असे तोंड घोळ्वून सांग णा र्‍या आजे आते सासवा, चुलत नणंदा, हे सर्व लटांबर मागून बैलगाडीतून येते. आपल्या स्वप्नांचा लग्नाच्या वेदीवर बळी जातो. सर्जनशीलता, मॅनेजमेंट स्किलस, कोडिंग डिझायनीं ग अ‍ॅबिलिटीज, प्रेझेंटेशन स्किल्स पीपल स्किल्स ह्याचेलटांबराला देणे घेणे नसते. सर्वांची बोळवण फक्त " ती लग्नानंतर पण जॉब करते!! " ह्या एका वाक्या त होते. व नंतर तुच्छ कटाक्ष!! घरचे सांभाळून काय कराय्चे ते करा. पगार एक तारखेला माझ्या हातात पाहिजे. तुला कश्याला लागतात खर्चाला पैसे!! अय्या वहिनी तुला रांगोळी नाही येत? अश्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो.

तुम्हाला तुमचे काम समजले ते नीट करता येउ लागले व त्याचा रास्त मोबदला बँकेत जमा होउ लागला की तुमचे
आयुष्यातल्या पुरुषांबद्दलचे भाव् निक समीकरण बदलते. सर्व पत्ते त्यांच्या हातात असलेली निर्णय प्रक्रिया आता तुम्ही तुमच्या हातात घेउ शकता व परिस्थितीनुसार मान न तुकवता मना प्रमाणे व तुमच्या मते योग्य निर्णय घेउ शकता. शिकिवनारा बाबा लागत नाही.

आम्ही बायका स्वभावाने पुरु ष द्वेष्ट्या नसतो. अनुभवाने त्यांच्या बद्दल प्रेम, आनंद, किळस, राग अश्या भावना वाटतात त्याही अनेक वेळा दाबूनच ठेवल्या जातात. पण एकेक् पुरुष आयुष्यात चालवून घेणे कधी कधी फार वैतागवाणे होते. नोट .मी जनरलजायझेशन केलेले नाही त्यामुळे असा प्रतिसाद देउ नये. त्यांचे ते फ्रॅजाइल इगोज, सारखा सारखा येणारा राग, कंट्रोल मध्ये न राहणारी लैंगिक भावना, नकार समजू न शकणे, मारहाण करणे व्हरबल अब्युज ह्याला ते फक्त पुरूष आहेत म्हणून जीवनात काही स्थान द्यावे असे मात्र मला आता वाटत नाही. अनेक उदारमतवादी, व कंट्रोल मध्ये असलेल्या सॉर्टेड बाप्यां बरोबर युजफुल इंटर अ‍ॅक्षन आहे माझी. पण
माझी सुपि रिऑरिटी चाल्वूनच घेतलीच पाहिजे अश्या मानसिकतेतून जगावर स्वारी ़ करणारे घरोघरीचे राजाबेटा,
पतिपरमेश्वर, भाउ रायाज ह्यांना माझे एक आवाहन आहे. खालील कामे लिंग निरपेक्ष आहेत. बाई किंवा बाप्या
कोणी ही करू शकतात असे जालावरील एका पोरगेल्या काकांनी नुकतेच वर्तवले आहे.
१) घर स्वच्छ करणे व आवरणे
२) स्वयंपाक ( चहा व खाणे जेवण ) घरातील सर्वां साठी करणे रोज तीन वेळा.
३) पाळणाघरातील व शाळेतील मुलाना आणणे सोड णे, मुले आजारी पडल्यास रजा घेउन घरी त्यांच्या बरोबर
थांबणे औषधपाणी करणे.
४) बाजारहाट, बागकाम करणे
५) वॉशिंग मशीन, डिशवॉशर लो ड करणे व कपडे घडी करून भांडी सुकवून जाग्याला ठेवणे
६) घरातील ज्ये ष्ठांची देख भाल
७) पडेल ते!!
घर दोघांचे असते व कामही. हे आता रिसर्च करून प्रूव झालेले आहे. त्यामुळे घरोघरीच्या गृहस्थांनो उचला झाडू व झारा, लागा कामाला. आय होप द जर्नी इज अ हॅपी वन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो. त्यांनी दखल घेणे हे 'मला' दंगा करण्यासारखं वाटलं. इतर कुणाला ते काय नॉर्मल वगैरे वाटत असेल तर त्यांच्या मताचाही आदर आहेच.

ज्यांना ते लिहिणं आवडणार नाही ते आपलं मत मांडणारच. स्वाभाविक आहे ते.
नॉर्मल हे आलेल्या प्रतिक्रियांना (सिव्हिलाईज्ड)अशा अर्थी म्हटलंय. त्यावरुन फाटे फुटायला नकोत म्हणून हा खुलासा.

तुम्ही काय केलंत ह्याबद्दल मी बोललेले नाही किंवा तुम्ही असं कसं म्हणता वगैरेही विचारलेले नाही. तुम्ही दंगा हा शब्द वापरलंत त्याबद्दल बोलले आहे.

अमा, उत्तम जमला आहे लेख.
ते स्वप्नातला राजकुमार पांढर्‍या शुभ्र घोड्यावरून आणि मागनं बैलगाडीतुन लटांबर तर भारीच. Lol
आणि त्या लटांबराला जॉब करते ह्यापलीकडे काही देणेघेणे नसते हे पर्फेक्ट Happy
विडंबन आहे हे प्रतिसादातुन कळलं. पण मला स्वतंत्र लेख म्हणुन आवडला.
आता जरा वेळ मिळाला की कुंडलकर काय लिहितात ते वाचेन.

सचिन च्या दोन्ही लेखांत प्रचंड विरोधाभास आहे. ते लेख उपरोधात्मक वगैरे अजिबात वाटत नाहीत.

एक उदाहरणः लेख-१
आमच्या लहानपणी खूप गृहिणी असत. आता पूर्णवेळ गृहिणी हा प्रकार तसा कमी होत जातो आहे. आमच्या लहानपणी गृहिणी हा प्रकार मोठय़ा शहरांत मराठी समाजात पुष्कळ होता. >>>

लेख-२
मी निर्णय न घेणाऱ्या आणि दुसऱ्याच्या कष्टांवर किंवा नुसतेच नवऱ्याच्या कमाईवर आयुष्य काढणाऱ्या बायका घरीही पाहिल्या नाहीत आणि आजूबाजूच्या समाजातही नाही. मी ज्या वातावरणात आणि आर्थिक व सामाजिक संस्कृतीत वाढलो त्यात बायका पैसे कमवायला घराबाहेर पडत होत्या. .....पूर्णवेळ गृहिणी म्हणून घरी बसून स्वत:च्या सुखाची किंवा दु:खाची अंडी उबवत बसणाऱ्या बायका प्राणिसंग्रहालयात पाहायला जावे तशा दुर्मीळ असत.

त्याच्या डोक्यात आलेले विचार फारसे प्रोसेस बिसेस न करता लिहीले आहेत असे वाटते हे दोन्ही लेख वाचून. मला हे लेख बरेचसे पटले नाहीत.

निदान पहिला लेख त्याने ७०-८० च्या दशकातील बर्‍यापैकी गरिबीत सुरूवात करून नंतर सुधारलेल्या परिस्थितीत आलेल्या पण घरची सर्व जबाबदारी घेणार्‍या स्त्रियांबद्दल लिहीलेला आहे. मुळात त्याने तो एकांगी पद्धतीने लिहीलेला आहे. यातल्या अनेकांनी सुरूवात घरची सगळी कामे करण्यापासून केली. माहेरच्या व सासरच्या अनेक जबाबदार्‍या घेतल्या. बर्‍याच जणींच्या बाबतीत The buck stops here अशी परिस्थिती होती. मग बहुतेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती पुढे सुधारत गेली. घरी कपडे धुणे व भांडी घासणे या कामाला मोलकरणी वगैरे ठेवता येउ लागल्या. ९० च्या दशकात एखादे वॉशिंग मशीन वगैरे आले. पण सरासरी काढली तर घरची सगळी जबाबदारी या स्त्रियाच बघत होत्या. तो वर्ग आता जुना झाला. पण आमच्या लहानपणी सर्वत्र बघितलेला आहे.

बाकी मला स्वयंपाक आणि घरकाम करता येउ लागले म्हणून मला या स्त्रियांबद्दल आदर वाटत नाही म्हणणे म्हणजे मी रोज माझ्या घरापुढचे अंगण झाडू शकतो म्हणून मला सफाई कामगारांचे प्रश्न हे प्रश्नच वाटत नाहीत म्हंटल्यासारखे आहे. कायच्या काय. अमांनी हाच पॅटर्न परफेक्ट पिक अप केला आहे, म्हणून मला हे विडंबन आवडले.

यातील बहुसंख्य स्त्रिया नक्की काय मिरवत होत्या कल्पना नाही. तसेच अशा गृहिणींचे वरती प्रतिक्रियांमधे अकारण हिणवल्यासारखे उल्लेख का केले आहेत ते समजले नाही. त्याकाळच्या समाजातील हा एक वर्ग आहे. त्यांच्यापेक्षा वाईट अवस्थेत अनेक स्त्रिया असतील पण ते लॉजिक लावले तर जगातील ९०% लोकांबद्दल काही लिहीताच येणार नाही.

फारेंड एकदम स्पॉट ऑन.
मुळात आता मला या माणसावर टिका करुन त्याला ओव्हर पब्लिसिटि दिल्यासारखे वाटतेय.त्याच्या डोक्यात आले ते त्याने लिहीले.
अशी अनेक सँपल ऑफिसात किंवा बाहेरच्या जगात पण भेटतात.त्यांना आपल्या जगात जगू द्यावे.

मुळात आता मला या माणसावर टिका करुन त्याला ओव्हर पब्लिसिटि दिल्यासारखे वाटतेय.त्याच्या डोक्यात आले ते त्याने लिहीले.
अशी अनेक सँपल ऑफिसात किंवा बाहेरच्या जगात पण भेटतात.त्यांना आपल्या जगात जगू द्यावे

>> अगदी अगदी, हेच मला म्हणायचे होते. पण असो! Wink

बाकी मला स्वयंपाक आणि घरकाम करता येउ लागले म्हणून मला या स्त्रियांबद्दल आदर वाटत नाही म्हणणे म्हणजे मी रोज माझ्या घरापुढचे अंगण झाडू शकतो म्हणून मला सफाई कामगारांचे प्रश्न हे प्रश्नच वाटत नाहीत म्हंटल्यासारखे आहे. >> तुलना पटली नाही. गृहिणी काही 'सार्वजनीक कामे' करत असतात का?

===
मलापण काही सॅम्पल भेटतात:

दिनूचे बिल कथा ऐकत ऐकत वाढलेले,

ज्यांना आपली उच्च/ मध्यम वर्गातली गृहिणी आई, आजी, मावशी, काकी, पणजी फार काम करते +तिला त्याचा काहीच मोबदला मिळत नाही असे 'उगाच' वाटत असते,

मग ते जालावर येऊन 'भाकऱ्या बनवण्याची किंमत तुम क्या जाणो' आणि 'मन लावून चकल्या विरघळवणे हे मन लावून सर्जरी करण्याइतकेच महत्वाचे आहे' असले काहीतरी बडबडत फिरतात.

हॉइंग् करायचं आणि सोडून द्यायच....

फा चे पोस्ट पर्फेक्ट! नानाकळा, तुम्ही कुंडलकर ला 'सचिन' वगैरे प्रेमाने म्हटल्यामुळे माझा तसा समज झाला असावा Happy असो आले आता लक्षात.

फा, पोस्ट आवडली!
कुंडलकरांना बडबड कंटाळावाणी वाटते, सहानुभुती वाटत नाही ठीक आहे. पण त्याचे कारण मला स्वयंपाक आणि घरकाम येवू लागले हे जे ते देतात ते प्रचंड बालीश!
स्वयंपाक आणि घरकाम येणे ते स्वतः पुरते करणे आणि गृहिणी असणे ही दोन वेगळी प्रकरणे आहेत. पूर्णवेळ गृहिणी असो किंवा नोकरी करुन घर संभाळणारी स्त्री असो किंवा घरकाम आउटसोर्स करुन करीयर करणारी स्त्री असो. लग्न झालेली स्त्री म्ह्टले की तुम्हाला हवे असो वा नको लटांबर आलेच. काही वेळा ते डोळ्याला स्पष्ट दिसते पण बरेचदा त्यातला काही भाग हा फक्त त्या व्यक्तीलाच जाणवत रहातो. अगदी टिव्ही चॅनलवाले देखील घर संभाळून तुम्ही हे कसे जमवलेत हा प्रश्न लग्न झालेल्या स्त्रीला - गृहिणीला विचारतात, गृहस्थाला नाही.
कुंडलकर जी लेखाच्या सुरवातीला गृहिणी करत असलेल्या बडबडीचे उदाहरण देतात ती बडबड वाट्याला आलेल्या कुचंबणेपोटी, निर्णय स्वातंत्र्याच्या अभावापोटी आहे. भारतीय स्त्रीच्या आयुष्यात सासुरवास नावाचे एक अ‍ॅब्युझचे सायकल आहे त्यातून होणारे जे पॅसिव अ‍ॅग्रेसिव वर्तन असते ते कुंडलकरांना लहान पणी समजले नसेल पण चाळीशीतही कळले नाही ? अगदी घरी घरकामाला माणसे असलेली उच्च मध्यमवर्गिय गृहिणी असली तरी बंद दारा आडचे तिचे आयुष्य कसे आहे ते फक्त तिलाच माहित असते! स्वयंपाक आणि घरकाम या स्वतःला आवडतात म्हणून शिकून घेतलेल्या, स्वतःच्या मर्जीने केल्या जाणार्‍या गोष्टींची तुलना दिवसभरात गृहिणी ज्या भूमिका निभावते त्याच्याशी करणेच अयोग्य! प्रत्येक जण स्वतःच्या निर्णयाला जबाबदार असतो हे म्हणताना तो निर्णय घ्यायचा मुलभूत अधिकारच बहुसंख्य स्त्रीयांना नव्हता/ नाही याचा कुंडलकरांना सोईस्कर विसर पडावा? बंगाली वगैरे गृहिणींबद्दलची आत्यंतिक उथळ विधाने वाचुन तर Uhoh असे झाले.
पब्लिसिटीसाठी मुद्दाम असा लेख लिहिला की दर आठवड्यला रतिब घालायचा तेव्हा डेडलाईन पाळायला घाईघाईने काहीतरी खरडले ते त्यांनाच माहित! मी फसलेले लेखन म्हणून सोडून दिले होते.

त्याच्या डोक्यात आलेले विचार फारसे प्रोसेस बिसेस न करता लिहीले आहेत असे वाटते हे दोन्ही लेख वाचून. >> +१००००
अतिशय संकुचित लेख आहेत. सरकारी आकडेवारीनुसार आजही दिल्ली-पंजाब सारख्या राज्यात केवळ १०-१५% महिला अर्थार्जन करतात. महाराष्ट्रातही हा आकडा ३० -३५% इतकाच आहे. प्रत्यक्षात कदाचित हे आकडे अजूनही कमी असण्याची शक्यता आहे. स्त्री-पुरूष भेद न राहता केवळ मनुष्यबळ समाज हे अतिशय दूरचे स्वप्न आहे. त्याकडे होणारा प्रवासही मुंगीच्या गतीने आहे. अमांचा लेख चांगला आहे . पण मूळात असा लेख लिहावा लागतो ह्यात समाज म्हणून आपले अपयश दिसून येते.

नानाकळा, तुम्ही कुंडलकर ला 'सचिन' वगैरे प्रेमाने म्हटल्यामुळे माझा तसा समज झाला असावा Happy असो आले आता लक्षात.
>> हा हा हा... खरोखर मनापासून जाम हसू फुटले बरं... Rofl
त्यांचे आडनाव इतके कोण टायपत बसेल हो. किंबहुना त्या व्यक्तीबद्दल बोलावे असे काहीच नाही, त्यामुळे माझा पहिला प्रतिसाद त्रोटक होता. असो. लक्षात आले हे उत्तम झाले. Happy Happy

फारेन्ड आणि स्वाती२, मी_अनु यांनी इथे काही नेमक्या पोस्टी लिहिल्या आहेत. फेसबुकवर बर्‍याच जणांनी या लेखानिमित्त आघाड्या उघडलेल्या दिसल्या, त्यातले कुणी तुमचे फ्रेन्ड्स असतील तर तिथे जाऊन लिहाल का याच पोस्टी?

अ‍ॅमी परत एकदा अनुमोदन.
स्वतःच्या आई, आजी, मावश्या काकवांविषयी कौतूक असल्याविषयी काही म्हणणं नाही पण ओवरहाईप्ड समज डोक्यात घेऊन त्याची सतत पीरपीर लावायची हा मुद्दा आहे. म्हणजे असं आहे की त्याच जनरेशन मध्ये किंवा त्या आधीच्या जनरेशन मध्ये सुद्धा घरातली कामं करुन, त्यानंतर अर्थार्जन करणार्‍या सुद्धा स्त्रिया होत्या आणि त्यात मुख्य म्हणजे त्या स्त्रियांना इतक्या तक्रारी नसत. कारण त्यांना त्यांचा जो काही पर्सनल गोल होता, तो महत्वाचा वाटायचा. त्या स्त्रियांना कधी कधी घरातल्या पोरांच्या समोर बसून "आमचं काँट्रिब्युशन" ह्याचा पाढा वाचावा अशी गरज नाही पडली.
आया आज्यांचे काँट्रिब्युशन ह्याची जी अत्यंत चिवट अशी वैचारिक पिल्लं आहेत ते तरुण बाया बाप्यांच्या डोसक्यात ह्याच आया आज्यांनी वर्षानुवर्ष पीरपीर करुन बिंबवलेली असतात. ह्याच विचारांचे रुपांतर वर अमांनी दिलय त्या लटांबर संसकृतीत होतं.
कुंडलकरांच्या लेखात काही तृटी जरुर जाणवल्या. फा नी दिलाय तो विरोधाभास आणि खुप टोकाचं सरकॅझम ज्या खरं नीट मॅनेज करता आल्या असत्या पण ठीक आहे, ती त्यांची लिहायची स्टाईल आहे पण ओवरॉल he does have a point.

त्याच जनरेशन मध्ये किंवा त्या आधीच्या जनरेशन मध्ये सुद्धा घरातली कामं करुन, त्यानंतर अर्थार्जन करणार्‍या सुद्धा स्त्रिया होत्या आणि त्यात मुख्य म्हणजे त्या स्त्रियांना इतक्या तक्रारी नसत. कारण त्यांना त्यांचा जो काही पर्सनल गोल होता, तो महत्वाचा वाटायचा. त्या स्त्रियांना कधी कधी घरातल्या पोरांच्या समोर बसून "आमचं काँट्रिब्युशन" ह्याचा पाढा वाचावा अशी गरज नाही पडली. >>> हे फारच ओवरसिंपलीफिकेशन झालं बुवा. रिअ‍ॅलिटीमधे अशा स्पेसिफिक गोल वगैरे असलेल्या आणि इतका हाय सेल्फ एस्टीम असलेल्या स्त्रिया आधीच्या पिढीत किती असतील सांगा पाहू? घरातील कामं करून बाहेर अर्थार्जनाला जाणे हे स्वातंत्र्य नसून ती गरज अथवा मजबुरी असलेलाच वर्ग जास्त. कष्टाचे अप्रिसिएशन सोडाच उलट शेलकी हेटाळणी होत असेल तर ती बाई ते फ्रस्ट्रेशन कुठे तरी काढनारच ना. (ते तुम्ही म्हणता तसे " पिर पिर " वगैरे)

हे फारच ओवरसिंपलीफिकेशन झालं बुवा>>>>>> मला नाही वाटत. आधी एक गोष्ट क्लियर करतो, ती म्हणजे घरातून प्रेशर असल्यामुळे, मग ते नवर्‍याचे असो की सासू सासर्‍याचे असो, त्यामुळे इच्छा असून सुद्धा बाहेर न पडता आलेल्या गृहिणींबद्दल हे नाहीये. हे माझ्या अंडस्टँडिंगप्रमाणे (वर अ‍ॅमी ह्यांनी लिहिलय तसं) ज्यांना बर्‍यापैकी स्वातंत्र्य होतं तरीही त्यांनी थोडं इंडिपेंडंट न होता पुढे फक्त हा पाढा वाचायचा मार्ग पत्करला अशा गृहिणींबद्दल सुरु आहे. मग तुम्ही म्हणाल की तुम्हाला काय माहिती की स्वातंत्र्य होतं की नव्हतं तर मग मी म्हणेन की तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं असं ठामपणे म्हणता येणार नाही.
आपल्या आजूबाजूला लोकं असतात आणि त्यावरुनच आपण शेवटी आपलं कन्क्लुजन काढतो. माझ्या बघण्यात दोन्ही उदाहरणं आहेत आणि मी ह्या स्वातंत्र्य असलेल्या पण इंडिपेन्डन्सचा चॉईस न घेतलेल्या गृहिणी अशा अर्थानी तो लेख वाचला. कुंडलकरांचा अँगल पण तोच आहे पण त्या सर्काजम च्या नादात त्यांनी ग्रोस जनरलायझेशन वाटावेत अशी वाक्यं लिहिली आहेत.
ह्यात सुद्धा पुढे गृप पडतात.
इन्डिपेंडंट असून सुद्धा स्वतःच्या काँट्रिब्युशन चे पाढे वाचणार्‍या
इन्डीपेन्डंट नसून सुद्धा आहे त्याच्यात पाढे न वाचता, तक्रार न करता (म्हणजे जबरदस्तीने नाही तर आनंदाने) राहणार्‍या

सरतेशेवटी कोणी तक्रारच करु नये असंही नाही. If you have complaints about some things that's fine but if you are going to base your entire life on seeking validation for whatever you've done (or not done Happy is the question here.

शेवटी बुवाच मदतीस (नेहमीप्रमाणे) आले. एवढा सगळा गदारोळ वाचून मला काहीही समजलं नव्हतं नेमकं प्रकरण काय आहे. बुवांच्या ह्या शेवटच्या प्रतिसादामुळे टॉप टू बॉटम नीट कळलं. धन्यवाद बुवा.... Wink

आधी मला हा लेख दुसऱ्या लेखाचे विडंबन / प्रत्युत्तर आहे हे माहीत नव्हते, मूळ लेख समजून वाचला. यातिल उपरोध लोकांच्या टिपिकल कॉमेंट्स विचारसणीला प्रत्युत्तर आहे असे वाटले.

मूळ लेख पूर्ण वाचवल्या गेला नाही.

मी_अनु, फारेण्ड, स्वाती२ यांचे प्रतिसाद आवडले.

रिअ‍ॅलिटीमधे अशा स्पेसिफिक गोल वगैरे असलेल्या आणि इतका हाय सेल्फ एस्टीम असलेल्या स्त्रिया आधीच्या पिढीत किती असतील सांगा पाहू?>> आधीच्या पिढीत अशी स्पेसिफिक गोल वगैरे असलेल्या बायका हाताच्या बोटावर मोजण्याजोग्या असतील. पण आताच्या पिढीत त्या मोठ्या संख्येने आहेत. जेव्हा अशी काहीतरी स्पेसिफिक गोल आयुष्यात असतात तेव्हा kitchen politics मधून बाहेर पडणं सोप जातं. त्यात जर पुरुषांनी सुद्धा घरकामात पुरेसा वाटा उचलायला सुरुवात केली तर माझ्यावाचून घरातलं सगळं अडतं असं म्हणायची गरज बायकांना वाटेनाशी होते. कुंडलकरांना त्यांच्या लेखात हेच म्हणायचं असावं. म्हणजे मी तरी हाच अर्थ घेतला त्यांच्या लेखाचा.
धन्यवाद वैद्यबुवा. नीट उलगडून सांगितलत तुमचं म्हणणं. मला वाटतं होतं की इतक्या सगळ्या लोकांना हा लेख चुकीचा वाटतोय. मग मलाच का वेगळा अर्थ दिसतोय त्यात. Happy

नोकरी करणार्‍या स्त्रिया आणि न करता पूर्णवेळ गृहिणी असलेल्या स्त्रिया - स्वातंत्र्य दोघींनाही फारसे नव्हते. मैत्रेयी ने लिहीले आहे तसे फ्रस्ट्रेशन काढायच्या पद्धतींमधे ही काही फरक नव्हता. तीच पिढी. काहींच्या जबाबदार्‍यांमधे "नोकरी" ही आणखी एक थॅन्कलेस जबाबदारी होती. इतकेच. या दोन्ही म्हणजे काहीतरी दोन वेगळे गट असल्यासारखे चित्र स.कुं ने उभे केले आहे ते ही बरोबर नाही.

आणि त्या पिढीतील बहुतेक स्त्रियांना त्या काळच्या सामाजिक परिस्थितीत काडीचेही स्वातंत्र्य नव्हते यापेक्षा वेगळे निर्णय घ्यायला.

मुळात माझे ऑब्जेक्शन या स्त्रिया ते फ्रस्ट्रेशन घरात सापडतील त्यांच्यासमोर व्यक्त करायच्या या मुद्द्याला नाहीच (तसे होतच असे, आणि तेच एक व्हेण्टिंग होते त्यांना तेव्हा). ऑब्जेक्शन आहे ते त्यांचे फ्रस्ट्रेशन उगाचच होते असे चित्र उभे करण्याला, आणि त्यापेक्षा विनोदी म्हणजे घरकाम व स्वयंपाक करता येणे म्हणजे त्यांची ७० व ८० च्या दशकातील जबाबदारी आपल्याला समजली, घरातले त्यांचे स्थान समजले असे अतिसुलभ समीकरण तयार करण्याला.

फा, पुन्हा अनुमोदन.

>>> त्यापेक्षा विनोदी म्हणजे घरकाम व स्वयंपाक करता येणे म्हणजे त्यांची ७० व ८० च्या दशकातील जबाबदारी आपल्याला समजली, घरातले त्यांचे स्थान समजले असे अतिसुलभ समीकरण तयार करण्याला.

कालच एका मित्राशी हाच वाद घातला होता आणि हेच म्हटलं होतं. Proud

सोहा Happy

त्यापेक्षा विनोदी म्हणजे घरकाम व स्वयंपाक करता येणे म्हणजे त्यांची ७० व ८० च्या दशकातील जबाबदारी आपल्याला समजली, घरातले त्यांचे स्थान समजले असे अतिसुलभ समीकरण तयार करण्याला.>>>> Lol ह्याच त्या तृटी म्हणत होतो. किचन पॉलिटिक्स (साभारः सोहा) ह्या प्रकाराला कमी लेखायच्या नादात हे घडलं आहे माझ्यामते. वेल राऊंडेड होऊ शकला असता तो लेख.

स्वातीजी_आंबोळेजी Proud

इथे जितके मी इतरांची मतं वाचत आहे तसं डोक्यात नवं चित्र तयार होत आहे. मला वाटतं हा जो वॅलिडेशन शोधायचा प्रकार आहे, तो स्वतःचा मूळ स्वभाव, असलेल्या अडचणी, होत असलेल्या कुचंबणा, असलेले रोल मॉडेल्स आणि त्यांनी बिंबवलेल्या वॅल्युज ह्या सगळ्यांवर अवलंबून असावा. हे ह्या करता म्हणत आहे कारण, विचार करता करता (आणि वर तसं लिहिलं सुद्धा आहे) दोन्ही इंडिपेंडंट आणि डिपेंडंट अशा दोन्ही प्रकारच्या स्त्रियांमध्ये हे पॉलिटिक्स/वॅलिडेशन आहे/नाहीये असे वेगवेगळे कॉम्बिनेशन सापडत आहेत.
कित्येक घरात अडचणी असून सुद्धा, त्यातून काहीतरी मार्ग काढून, पुढे ह्या फुटकळ पॉलिटिक्स मध्ये न पडता समाधान मानणारी उदाहरणं पाहिली आहेत.
मग घराचा बोजा स्वत: एकहाती वाहून, पुढे त्याचा खुप गाजावाजा, प्रस्थ असलेली उदाहरणं पाहिली आहेत
मग कुंंडलकरांना अभिप्रेत आहेत तशी फक्त वॅलिडेशन वर आयुष्य काढणारी बघितली आहेत.
हे सगळं एकाच जनरेशनच्या स्त्रियांमध्ये बघितलेलं आहे आणि म्हणूनच प्रश्न असा आहे की ह्यात एक "कॅटेगरी" अशी तयार करता येण्याजोगे उदाहरणं आहेत का? कुंडलकरांनी निश्चितच गृहिणी ही कॅटेगरी तयार करुन त्यावर शेरे मारले आहेत जे आता थोडे अनफेअर पण वाटत आहेत. ज्यांनी नं २ ची कॅटेगरी बघितलेलीच नाही कधी त्यांना तर खुप ग्रोस जनरलायजेशन केलं गेलं आहे असं वाटणं अगदी सहाजिक आहे पण त्याच बरोबर इतर लोकं ज्यांनी हे पहिलं/अनुभवलं आहे, त्यांना पॉईंट लक्षात येतोय.

Mala tya lekhacha first part “Gruhini” namak pranyavar nibandh liha” type vatla. Check the references every time he says,”gruhini”.

स्वतःच्या आई, आजी, मावश्या काकवांविषयी कौतूक असल्याविषयी काही म्हणणं नाही पण ओवरहाईप्ड समज डोक्यात घेऊन त्याची सतत पीरपीर लावायची हा मुद्दा आहे. म्हणजे असं आहे की त्याच जनरेशन मध्ये किंवा त्या आधीच्या जनरेशन मध्ये सुद्धा घरातली कामं करुन, त्यानंतर अर्थार्जन करणार्‍या सुद्धा स्त्रिया होत्या आणि त्यात मुख्य म्हणजे त्या स्त्रियांना इतक्या तक्रारी नसत. कारण त्यांना त्यांचा जो काही पर्सनल गोल होता, तो महत्वाचा वाटायचा. त्या स्त्रियांना कधी कधी घरातल्या पोरांच्या समोर बसून "आमचं काँट्रिब्युशन" ह्याचा पाढा वाचावा अशी गरज नाही पडली.>>
वैद्यबुवा,
मलाही हे ओवरसिंप्लीफिकेशन वाटते. तक्रारी कानावर आल्या नाहित याची कारणे- तक्रार करायलाही परवानगी नाही, तक्रार करुन काय होणार आहे उगाच का तोंड वाजवा, मुलांसमोर काय बोलावे काय नाही याची समज असणे, नवराबायकोत खरोखरीचे सामजस्य आणि घरातील मंडळींना स्त्रीची खरोखर कदर असणे या स्पेक्ट्र्मवर कुठेही असतील. पगार झाला की तो सासूच्या किंवा नवर्‍याच्या हातात देवून त्यातून खर्चाला पैसे मागून घ्यावे लागत अशा काळात नोकरी ही बरेचदा आर्थिक गरज म्हणूनच असे. त्या पुढील काळातही इंजिनियर झालेल्या मुलाला पत्नी ही बँक्/एलआयसी अशा कर्ज मिळेल व ९ ते ५ काम अशा प्रकारच्या नोकरीतली, घर संभाळेल अशी हवी असायची. शिक्षिका, कॉलेज मधे प्रोफेसर म्हणजे सुट्ट्या, घरचे सगळे करुन नोकरी हा हिशोब व्हायचा. आर्थिक गरज नसेल तर नोकरी नकोच , असलेली नोकरी सोडायची तयारी हवी अशा अटी असायच्या. प्रमोशनवर बदली झाली तर आता सगळे स्थिरस्थावर झालेय, तुझ्या पगाराची तशी गरज नाही तेव्हा प्रमोशन नाकार असे सांगितले जायचे. गोल वगैरे नवरा आणि इतर मंडळी ठरवतील ते. स्वतःचे गोल्स, सेल्फ एस्टिम वाल्या तुरळक केसेस असायच्या. त्यांना घरच्यांच्या सहकार्यामुळेच वगैरे आभार प्रदर्शन कंपल्सरी असे, नाहीतर हेटाळणी होई.

ऑब्जेक्शन आहे ते त्यांचे फ्रस्ट्रेशन उगाचच होते असे चित्र उभे करण्याला, आणि त्यापेक्षा विनोदी म्हणजे घरकाम व स्वयंपाक करता येणे म्हणजे त्यांची ७० व ८० च्या दशकातील जबाबदारी आपल्याला समजली, घरातले त्यांचे स्थान समजले असे अतिसुलभ समीकरण तयार करण्याला. >>+१

माझा तर 'किचन पॉलिटिक्स' या शब्दप्रयोगाला आणि तो हेटाळणीने उच्चारण्यालाही विरोध आहे. 'आपलं' समजलेल्या क्षेत्रात 'आपल्या' स्थानाला धक्का लागायची नुसती शक्यता जरी निर्माण झाली तर जगातली प्रत्येक व्यक्ती - यात लिंगभेद नाही - अग्गदी तस्सेच डावपेच लढवते.
यात जरा कोणी तप केलं की डळमळणार्‍या इंद्राच्या सिंहासनापासून चालू काळातील अदृष्य ग्लास सीलिंग्जपर्यंत सगळं आलं.

बायका घरात करतात ती पिरपिर आणि पुरुष 'ओव्हर द ड्रिंक्स' करतात ते 'मच नीडेड स्ट्रेसबस्टर्स'?

ज्या टेन्डन्सीज युनिव्हर्सल आहेत, त्यांबद्दल एका (भूतकाळातील!) ग्रूपला धरून बडवायचं कारण काय?

बायका घरात करतात ती पिरपिर आणि पुरुष 'ओव्हर द ड्रिंक्स' करतात ते 'मच नीडेड स्ट्रेसबस्टर्स'?>>> ह्या विषयी बोलण झालं आहे. पिरपिर आणि ओवर ड्रिंक्स दोन्ही शेवटी तेच कॅटेगरी आहे. आणि कुंडलकरांनी पुरुष कसे पिरपिर करतात हा मुद्दा घेतला नाही म्हणून पुरुष कधीच पिरपिर करत नाहीत असं थोडीच आहे? तो ह्या लेखाचा विषय नाही येवढच.
वर अमांनी लिहिलय तसं पुरुषांचे ऑब्जरवेशन दिल्यावर मग काय "बायका" काय करतात हे पण जरा लिहा किंवा त्या काय वेगळं करतात हा अर्ग्युमेट पॉईंटलेस आहे. तो विषय नाही.

स्वाती२, मुद्दा लक्षात आला आणि तुमची पोस्ट येत असतानाच मी माझी पोस्ट आणखिन पुढे लिहित होतो. Happy

ज्या टेन्डन्सीज युनिव्हर्सल आहेत, त्यांबद्दल एका (भूतकाळातील!) ग्रूपला धरून बडवायचं कारण काय?>>>>> तुम्ही त्या युनिवर्सल आहेत असं म्हणून उडवून लावत त्याचं ओवर सिंप्लिफिकेशन करत आहात असंही म्हणता येइल कारण इतर बर्याच लोकांना कुंडलकरांचा मुद्दा लक्षात आला.

स्वाती (दोन्ही) शी सहमत आहे. "मला संध्याकाळी ऑफिस मधून यायला ज्या दिवशी अर्धा तास लेट होणार असतो त्या दिवशी मी त्यांना (हे घरातले कोणीही असू शकतात) मुलांबरोबर जरा अर्धा तास थांबा म्हंटलं तर नेमके त्याच दिवशी ते/त्या सोसायटीच्या बागेत जाउन बसतात" - हे समवयस्क आणि समदु:खी मैत्रिणीला सांगणे, आणि
"साला तो मुथू त्या श्रीनिवासनलाच बरोबर सगळी सिंगापूरची कामं देतो" हे बियर बरोबर दर तीन चार महिन्यांनी कोणालातरी ऐकवणे - यात गुणात्मक फरक काहीच नाही Happy

Pages