शिक्षण आणि ऑफिसातले काम जमायला लागल्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला. तो म्हणजे पैसे कमावून घर चालवणारे बाप्ये ही जी जागतिक जमात आहे जे ऑफिसचे काम , तिथे करावे लागणारे कष्ट, तिथले टुकार राजकारण व त्यात अनेक क्लिष्ट खेळ्या करून आपण जिंकलेली मात व बॉसचे विश्वासू आदमी असणे, आपण कमविलेल्या पैशातून घर चालले आहे नाहीतर," तुम्ही रस्त्यावरच पडले असता, भीक मागायला लागली असती, तुझ्या आईची अक्कल काय चूल अन मूल, बायकांनी स्वयंपाक घराच्या बाहेर तोंड उघडायचे नाही अन हात चालवाय्चे नाहीत. त्यांची लायकीच नाही. मी आहे म्हणून तुझ्या आईबरोबर संसार केला. नाहीतर मला रेखाने मागणी घातली होती. मी तुझ्या फोटोग्राफी क्लासची फी भरणार नाही. पैसे काय झाडावर लागले आहेत? तीस दिवस खर्डेघाशी करावी तेव्हा एक दिवस पगार मिळतो!!!" अशी मुक्ता फळे रोज आईने केलेले चहा पोहे खाताना फेकणार्या घरोघरीच्या बाप व नवरेवर्गा बद्दल उगीचच माजलेला आदर माझ्या डोक्यातून कायमचा नष्ट झाला.
ही वाक्ये व ती येता जाता फेकणारे कळकट पायजमा व पिवळा बनियन घालून मुलींकडे नजरा टाकत अंग खाजवत फिर णारे पुरुषोत्तम हळूहळू कमी झाले. दोघांनी नोकर्या करून घराचे/ गाडीचे लोन भरायचा जमाना पण य येउन जुना झाला. संपलाच. आता प्रीनप व टीटीएम एम चालते.
मी पण एंट्री लेव्हलच्या नोकर्या करता करता अनुभव, छोटी छोटी ट्रेनिंगे घेउन कामात एक एक लेव्हल पुढे गेले. सहि ष्णू, आत्मविश्वासाने स्त्रियांच्या हाती काम सोपवणारे, ती करेल नीट असे इतरांना ठमकावून सांगणारे
खमके अनुभवी व संयमी पुरुष बॉस भेटल्याने माझी प्रगती होतच गेली आणि आई नोकरी करते पैसे वाचवते
बारीक सारीक खर्च पण करते ह्या पुढे जाउन मी करिअरिस्ट व आर्थिक दृ ष्ट्या स्वतंत्र की हो झाले.
पैसे मिळ्वायचे बाप्यांचे ऑफिसातले काम तुम्हाला शिक्षण व अनुभव ह्यांच्या जोरावर येउ लागले कि त्यांच्याबद्दल
वाटणारा भययुक्त आदर गळून जातो. स्वप्नातला राजकुमार पांढर्या शुभ्र घोड्यावरून येतो. व आपल्याला
एका स्मूथ जेस्चर मध्ये उचलून घेतो. सो फार सो गुड.
मग त्याच्या मागे त्याच्या घराचे, कुटुंबाचे, घरातल्या सतराशे साठ प्रथांचे, वाण व्रते : ऑमच्या इथे अस्स्संच लागतं, फोडणी तश्शीच लागते असे तोंड घोळ्वून सांग णा र्या आजे आते सासवा, चुलत नणंदा, हे सर्व लटांबर मागून बैलगाडीतून येते. आपल्या स्वप्नांचा लग्नाच्या वेदीवर बळी जातो. सर्जनशीलता, मॅनेजमेंट स्किलस, कोडिंग डिझायनीं ग अॅबिलिटीज, प्रेझेंटेशन स्किल्स पीपल स्किल्स ह्याचेलटांबराला देणे घेणे नसते. सर्वांची बोळवण फक्त " ती लग्नानंतर पण जॉब करते!! " ह्या एका वाक्या त होते. व नंतर तुच्छ कटाक्ष!! घरचे सांभाळून काय कराय्चे ते करा. पगार एक तारखेला माझ्या हातात पाहिजे. तुला कश्याला लागतात खर्चाला पैसे!! अय्या वहिनी तुला रांगोळी नाही येत? अश्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो.
तुम्हाला तुमचे काम समजले ते नीट करता येउ लागले व त्याचा रास्त मोबदला बँकेत जमा होउ लागला की तुमचे
आयुष्यातल्या पुरुषांबद्दलचे भाव् निक समीकरण बदलते. सर्व पत्ते त्यांच्या हातात असलेली निर्णय प्रक्रिया आता तुम्ही तुमच्या हातात घेउ शकता व परिस्थितीनुसार मान न तुकवता मना प्रमाणे व तुमच्या मते योग्य निर्णय घेउ शकता. शिकिवनारा बाबा लागत नाही.
आम्ही बायका स्वभावाने पुरु ष द्वेष्ट्या नसतो. अनुभवाने त्यांच्या बद्दल प्रेम, आनंद, किळस, राग अश्या भावना वाटतात त्याही अनेक वेळा दाबूनच ठेवल्या जातात. पण एकेक् पुरुष आयुष्यात चालवून घेणे कधी कधी फार वैतागवाणे होते. नोट .मी जनरलजायझेशन केलेले नाही त्यामुळे असा प्रतिसाद देउ नये. त्यांचे ते फ्रॅजाइल इगोज, सारखा सारखा येणारा राग, कंट्रोल मध्ये न राहणारी लैंगिक भावना, नकार समजू न शकणे, मारहाण करणे व्हरबल अब्युज ह्याला ते फक्त पुरूष आहेत म्हणून जीवनात काही स्थान द्यावे असे मात्र मला आता वाटत नाही. अनेक उदारमतवादी, व कंट्रोल मध्ये असलेल्या सॉर्टेड बाप्यां बरोबर युजफुल इंटर अॅक्षन आहे माझी. पण
माझी सुपि रिऑरिटी चाल्वूनच घेतलीच पाहिजे अश्या मानसिकतेतून जगावर स्वारी ़ करणारे घरोघरीचे राजाबेटा,
पतिपरमेश्वर, भाउ रायाज ह्यांना माझे एक आवाहन आहे. खालील कामे लिंग निरपेक्ष आहेत. बाई किंवा बाप्या
कोणी ही करू शकतात असे जालावरील एका पोरगेल्या काकांनी नुकतेच वर्तवले आहे.
१) घर स्वच्छ करणे व आवरणे
२) स्वयंपाक ( चहा व खाणे जेवण ) घरातील सर्वां साठी करणे रोज तीन वेळा.
३) पाळणाघरातील व शाळेतील मुलाना आणणे सोड णे, मुले आजारी पडल्यास रजा घेउन घरी त्यांच्या बरोबर
थांबणे औषधपाणी करणे.
४) बाजारहाट, बागकाम करणे
५) वॉशिंग मशीन, डिशवॉशर लो ड करणे व कपडे घडी करून भांडी सुकवून जाग्याला ठेवणे
६) घरातील ज्ये ष्ठांची देख भाल
७) पडेल ते!!
घर दोघांचे असते व कामही. हे आता रिसर्च करून प्रूव झालेले आहे. त्यामुळे घरोघरीच्या गृहस्थांनो उचला झाडू व झारा, लागा कामाला. आय होप द जर्नी इज अ हॅपी वन.
>>> कुंडलकरांनी पुरुष कसे
>>> कुंडलकरांनी पुरुष कसे पिरपिर करतात हा मुद्दा घेतला नाही म्हणून पुरुष कधीच पिरपिर करत नाहीत असं थोडीच आहे? तो ह्या लेखाचा विषय नाही येवढच.
मग माणूस सहज 'मला पिरपीर करणारी माणसं आवडत नाहीत' असं म्हणेल - स्पेसिफिकली 'मी कसा स्त्रीद्वेष्टा आहे, तो या पिरपिरीमुळेच कसा झालो' असे उल्लेख कशाला?
हा माणूस घरबशा होता म्हणून बायकांची 'पिरपीर' ऐकत वाढला - किंवा नाही वाढला - किंवा कोण जाणे - एकदा म्हणतो अशाच बायका पाहिल्या, एकदा म्हणतो माझ्या वर्तुळात असल्या बायका नव्हत्या - नक्की काय त्यालाच माहीत - तर घरबशा नसता तर पुरुषांची पिरपीर ऐकत वाढला असता असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.
आणि त्या पिढीतील बहुतेक
आणि त्या पिढीतील बहुतेक स्त्रियांना त्या काळच्या सामाजिक परिस्थितीत काडीचेही स्वातंत्र्य नव्हते यापेक्षा वेगळे निर्णय घ्यायला.
मुळात माझे ऑब्जेक्शन या स्त्रिया ते फ्रस्ट्रेशन घरात सापडतील त्यांच्यासमोर व्यक्त करायच्या या मुद्द्याला नाहीच (तसे होतच असे, आणि तेच एक व्हेण्टिंग होते त्यांना तेव्हा). ऑब्जेक्शन आहे ते त्यांचे फ्रस्ट्रेशन उगाचच होते असे चित्र उभे करण्याला,===
हे सर्व पटत आहे.
पण मुळात या बायका स्वतन्त्र नव्हत्या व frustrated होत्या हेच deny करून त्या फार सुखी समाधानी होत्या (कारण त्या घरच्यांसाठी राबायच्या व त्याग करायच्या) असा जो प्रचार केला जातो त्यावर माझं objection आहे. ह आणि मग आताच्या बायका स्वार्थी आहेत, त्याग करायला तयार नाहीत , शिक्षण नोकरी मुळे त्यांची डोकी फिरली आहेत हे सर्व थेट त्या रामतीर्थकर काकूंच्या विचारांच्या लाईनवर जातं. एका बाईने वर्षानुवर्षे आयुष्य स्वयंपाक, धुणी भांडी हेच करण्यात घालवायचं याचं 'त्यागमूर्ती' म्हणून उदात्तीकरण नको.
बुवा, तुम्हाला कुंडलकरांनी
बुवा, तुम्हाला कुंडलकरांनी ग्रोस जनरलायजेशन केले ते मान्य आहे, गृहिणी ही कॅटेगरी तयार करुन त्यावर शेरे मारले आहेत हेही मान्य, त्यांच्या लेखात विरोधाभास आहे हेही मान्य आहे.
मग त्या लेखात उरले काय "पॉईंट लक्षात " यायला असा मला प्रश्न पडला आहे
कुंडलकरसारख्या टिनपाट माणसाचे
कुंडलकरसारख्या टिनपाट माणसाचे विचार ऐकून /वाचून रक्तबिक्त खवळून घेणाऱ्या बायका आहेत यावरुन त्याचा मुद्दा सिद्ध होतोय असे वाटायला लागले आहे.
सकुंच्या दुस-या लेखातील
सकुंच्या दुस-या लेखातील शेवटचा परिच्छेद सगळं स्पष्ट करतो. घरातल्या कामांसाठी नोकर, काही छंद नाहीत, भिशी, महिला मंडळ हे सगळं करूनही हाताशी भरपूर वेळ आणि करायला काहीच नाही म्हणून मुलांच्या करियर आणि लग्नासारख्या महत्वाच्या टप्प्यावर नको ते निर्णय घ्यायल्या भाग पाडणा-या, स्वत:च्या मनासारखे झाले नाही तर घरातल्या लोकांना मेंटली टाॅर्चर करणा-या, स्वत:च्या गरीब भावाबहिणींना पैशाची मदत करून माहेरी स्वत:चे प्रस्थ निर्माण करून तिकडेही स्वत:चे निर्णय लादू पाहणा-या बायकांसाठी हा लेख आहे असे मला वाटते. अशी उदाहरणे पाहण्यात आहेत.
मग माणूस सहज 'मला पिरपीर
मग माणूस सहज 'मला पिरपीर करणारी माणसं आवडत नाहीत' असं म्हणेल - स्पेसिफिकली 'मी कसा स्त्रीद्वेष्टा आहे, तो या पिरपिरीमुळेच कसा झालो' असे उल्लेख कशाला?>>>>> ते इंडिपेंडंटली ट्रु असू शकतं ना? त्या करता पुरुष पण पिरपिर करतात हे कशाला हाताळायला पाहिजे लेखकानी?
मग त्या लेखात उरले काय "पॉईंट लक्षात " यायला असा मला प्रश्न पडला आहे>>>>> क्या मै, बास का?
१) तुम्हा सगळ्यांची मतं वाचून नवीन चित्र डोक्यात तयार होतय असं मी वर लिहिलच आहे. म्हणजे इतरांना ग्रोस जनरलायजेशन कसं वाटू शकतं हे माझ्या लक्षात येतय आणि म्हणूनच ते अनफेअर वाटू शकतं असं लिहिलय.
२) मी त्या लेखात तृटी आहेत म्हणालोच आहे आणि तरीही माझ्यामते बाकी उर्वरित लिखाणात त्यांनी काही नोंदवलेली ऑब्जर्वेशन्स मला अचूक वाटतात. दुसर्या भागामधले शेवटचे तीन पॅरॅग्राफ्स ज्यात पुढच्या/आत्ताच्या पिढीचे आणि त्या आधीच्या पिढीचे सूर कसे आणि कोणत्या कारणांवरुन जुळणार नाहीये ह्या बाबतीत लिहिलय ते फारच अचूक आहेत.
थोडक्यात मी काही तृटी मान्य केल्या आणि तुम्हा सरवांचे काही मुद्दे मान्य केले म्हणजे मी लगेच त्या लेखाला पुर्णपण पॉईंटलेस म्हणणं शक्य नाही. त्यात अजून बरच काही आहे जे मला आवडलं. त्यांचे सगळे लेख तर मी वाचले नाही पण ह्या आधी दोन वाचले होते आणि आता हे दोन.
मी आधीही लिहिलय आणि परत म्हणेन की कुंडलकर is a very good observer of things and along that he has a good way of putting those observations in words.
>>> मुलांच्या करियर आणि
>>> मुलांच्या करियर आणि लग्नासारख्या महत्वाच्या टप्प्यावर नको ते निर्णय घ्यायल्या भाग पाडणा-या, स्वत:च्या मनासारखे झाले नाही तर घरातल्या लोकांना मेंटली टाॅर्चर करणा-या,
हे 'काही करायला असणारी' लोकं करत नव्हती का गेल्या पिढ्यांमध्ये? की ते बाकी काही करत होते म्हणून हे माफ होतं?
चंपा, तुम्ही जे म्हणताय ती एक
चंपा, तुम्ही जे म्हणताय ती एक वृत्ती किंवा स्वभाव आहे. त्यात पुरुष किंवा बायका असं काही वर्गीकरण करायची गरज नाही. (आता लोकं म्हणतील लेख बायकांवर आहे तर पुरुषांना कशाला मधे आणायचं?)
हे 'काही करायला असणारी' लोकं
हे 'काही करायला असणारी' लोकं करत नव्हती का गेल्या पिढ्यांमध्ये? की ते बाकी काही करत होते म्हणून हे माफ होतं?>>>> परत तोच मुद्दा आला. समजा असं गृहित धरु की बाकी ते करत होते. पण कुंडलकरांनी ह्या गोष्टीबद्द्ल लिहायचं ठरवलं. काय प्रॉबलेम आहे?
बेसिकली मला वाटतं दुमत इथेच आहे, तुमचं म्हणणं आहे की हे बिहेबियर युनिवर्सल आहे आणि कुंडलकरांनी फार काही विचार न करता ग्रोस जनरलायजेशन केलेलं आहे. तसं इतरांना वाटत नाही कारण त्यांनी हा पॅटर्न त्या टाईपच्या स्त्रियांमध्ये बघितलेला आहे आणि त्यांना मुद्दे पटत आहेत.
बेसिकली मला वाटतं दुमत इथेच
बेसिकली मला वाटतं दुमत इथेच आहे, तुमचं म्हणणं आहे की हे बिहेबियर युनिवर्सल आहे आणि कुंडलकरांनी फार काही विचार न करता ग्रोस जनरलायजेशन केलेलं आहे. तसं इतरांना वाटत नाही कारण त्यांनी हा पॅटर्न त्या टाईपच्या स्त्रियांमध्ये बघितलेला आहे आणि त्यांना मुद्दे पटत आहेत.>> + १०००
मला असे म्हणायचे आहे की स.
मला असे म्हणायचे आहे की स. कुं. ला नक्की काय म्हणायचे आहे हे दोन्ही लेख वाचूनही क्लिअर होत नाही. कारण दोन्हीमधे खूप परस्पर विरोधी वाक्ये आहेत. आता चंपा यांनी लिहीलेल्या पॅरा मधे तर आणखी तिसराच गट आहे. त्या कॅटेगरीतील बायका अशा किती असणार तेव्हा, विशेषतः ८०ज मधे.
दोन्ही लेखांवरून अनुमान काढायचे तर अशा बायका त्याच्या आसपास होत्याही, आणि नव्हत्याही
फा
फा

त्यांना श्रॉडिंजरच्या बायका म्हणावं का?
जोक्स अपार्ट, हे विरोधाभास खरोखरच आहेत आणि त्याला (तुच्छतेपलीकडे) नक्की काय व्यक्त करायचं आहे हे समजत नाही हेही खरं आहे.
दुसर्या लेखाततर तो 'आय हॅव अ ड्रीम' मोडमध्ये जाऊन पुढची पिढी उठल्यापासून निजेपर्यंत काय करेल याची काहीतरी चित्रं रंगवतो - ज्यात काहीही नवीन and/or रम्य नाही. असो.
त्यांना श्रॉडिंजरच्या बायका
त्यांना श्रॉडिंजरच्या बायका म्हणावं का? >>>
बाकी मला स्वयंपाक आणि घरकाम
बाकी मला स्वयंपाक आणि घरकाम करता येउ लागले म्हणून मला या स्त्रियांबद्दल आदर वाटत नाही म्हणणे म्हणजे मी रोज माझ्या घरापुढचे अंगण झाडू शकतो म्हणून मला सफाई कामगारांचे प्रश्न हे प्रश्नच वाटत नाहीत म्हंटल्यासारखे आहे. >> तुलना पटली नाही. गृहिणी काही 'सार्वजनीक कामे' करत असतात का? >>
अॅमी, आधी पटकन वाचताना हे निसटले होते. ती तुलना अशा अर्थाने आहे, की एखाद्या सामाजिक वर्गाचे काम जर आपण करू शकलो तर लगेच त्यांचे सगळे प्रश्न आपल्याला समजले असे होत नाही.
फा, स्वाती प्रतिसाद पटले.
फा, स्वाती प्रतिसाद पटले.
सकु ग्रोस जनरलायझेशन करतोय हे जर पटतय तर मग तो ज्या ग्रुप बद्दल लिहितोय ते एक अॅनेकडोटल निरिक्षण आहे बरोबर? मग तशी निरिक्षणं अनेक ठिकाणी पाहाण्यात आली असली तरी मुस्लिम लोक अतिरेकी असतात टाईप ते नाईव्ह आहे. शिळोप्याच्या गप्पात हातावर टाळी देऊन एकमेकांची निरिक्षणे जुळणे यापेक्षा फार काही महत्त्व आहे का त्याला?
ज्या ग्रुप बद्दल लिहितोय ते
ज्या ग्रुप बद्दल लिहितोय ते एक अॅनेकडोटल निरिक्षण आहे बरोबर? >> अमित - तो नक्की कोणत्या ग्रूप बद्दल लिहीतोय ते तरी क्लिअर होउ दे!
की (प्रोग्रॅमिंग सारखे) एक व्हेरिएबल धरायचे. ज्याने पाहिजे तो गट घ्यावा
आणि पुन्हा एकदा- त्याने त्यांचे प्रश्न त्याला कशामुळे कळले हे लिहीले आहे ते हास्यास्पद आहे हा मुख्य पॉईण्ट आहे.
त्यांना श्रॉडिंजरच्या बायका
त्यांना श्रॉडिंजरच्या बायका म्हणावं का?>>>>
सकु ग्रोस जनरलायझेशन करतोय हे
सकु ग्रोस जनरलायझेशन करतोय हे जर पटतय तर मग तो ज्या ग्रुप बद्दल लिहितोय ते एक अॅनेकडोटल निरिक्षण आहे बरोबर? >>>>> थांबा थांबा जरा.
तुम्हाला कसं जनरलायजेशन वाटू शकतं हे लक्षात येतय असं लिहिलय भाउ.
त्याने त्यांचे प्रश्न त्याला
त्याने त्यांचे प्रश्न त्याला कशामुळे कळले हे लिहीले आहे ते हास्यास्पद आहे हा मुख्य पॉईण्ट आहे. >> टोटली.
आणि ग्रुप म्हणजे, त्याच्या आजुबाजुला त्याच्या लहानपणी पिर्पिर बोलणार्या बायका. आता अनेकडॉटल आहे त्यामुळे तो जनरलाईज करुन ग्रुप डिफाईन करायला गेला नाही. ह्यात त्याची काही चुक असेल असं वाटत नाही
शिळोप्याच्या गप्पात हातावर
शिळोप्याच्या गप्पात हातावर टाळी देऊन एकमेकांची निरिक्षणे जुळणे यापेक्षा फार काही महत्त्व आहे का त्याला?>>>> कसं आहे, आपण एखादी गोष्ट पाहिली नाही कधी की माणसाचा ठाम विश्वास बसायला लागतो की आपण बघतो तशीच दुनिया चालते. त्यामुळे जसं कुंडलकरांची मतं पटणार्यांना जसा पॅटर्न अगदी धडधडीत दिसतो, अनुभवलेला असतो त्यांनी उद्या एक मेकांच्या हातावर टाळ्या देऊन आपली निरिक्षणं जुळली म्हणणं काय अन विरोधी पार्टीनी काय अरे हे काय्च्या काई लिहितोय असं म्हणून एक मेकात टाळ्या देणं काय, सारखच आहे.
वि कॅन अग्री तु डिसग्री आय गेस.
श्रॉडिंजरच्या बायका >>>
श्रॉडिंजरच्या बायका >>>
मी ह्या विषयावर दुसर्या
मी ह्या विषयावर दुसर्या ठिकाणी बरंऽऽच लिहीले असल्याने आता कंटाळा आला तेच तेच लिहायचा. पण एकुणात मी_अनु, स्वाती२, स्वाती आंबोळे, फारेंड यांना अनुमोदन!!
तो नक्की कोणत्या ग्रूप बद्दल
तो नक्की कोणत्या ग्रूप बद्दल लिहीतोय ते तरी क्लिअर होउ दे! >> मी, वैद्यबुवा आणि आमच्याशी सहमत होणार्यांना तो ग्रुप अगदी व्यवस्थित कळला आहे.
• उच्च, मध्यम वर्ग.
• त्या त्या काळातील इतर स्त्रीपुरुषांशी तुलना केल्यास खूप म्हणता येईल असे+ अडचणी न येता मिळालेले शिक्षण (अडचणी म्हणजे शिकून काय दिवे लावणार असे मुळावरच घाव घालणार्या) उदा. आजी चवथी, पाचवी, सातवी शिकलेली असते, आई कमीतकमी बारावी/ ग्रॅज्युएट, आताच्या ४०- वयाच्या होममेकर तर उच्चशिक्षित असतात.
• यांना नोकरी, व्यवसाय करायचे नाहीच अशा धमक्या मिळालेल्या नसतात.
• अटलिस्ट घरच्याघरी छोटासा व्यवसाय, टिवशन, अगदीच नाही म्हणले तर मोलकर्णीच्या मुलांना फुकट शिकवणे ऐवढेतरी या करू शकल्याच असत्या.
• त्यांनी यातलं काहीही केलं नाही.
• या नुक्लीअर कुटुंबात, शहरात राहतात. त्यामुळे सासरचे लटाम्बर वगैरे प्रश्न नाहीत.
• यांना त्या त्या काळातील इतर स्त्रीयांपेक्षा कमी मुलं असतात. त्यामुळे ते लटाम्बरदेखील नाही.
बरं ठिकय ज्याचेत्याचे नशीब आणि निर्णय म्हणून सोडून द्यावं तर या बायका तेदेखील करू देत नाहीत.
• कुंडलकरच्या आईच्या पिढीत या जो दिसेल त्याला पकडून पिरपीर करत बसायच्या.
• आता जालावर येऊन आपण कसे प्रोफेशनल आहोत, आमचे कामदेखील कसे महत्वाच आहे सांगत बसतात.
• यात स्वतःच्या स्वस्त कामाच (चीप लेबर) उदात्तीकरण आणि दुसऱ्याच्या महागडया, जास्त स्किलची गरज असलेल्या, जास्त स्टेक्स असलेल्या कामाला कमी लेखण दोन्ही चालू असतं. उदा. भाकऱ्या बनवण्याची किंमत ५-१० ₹ असली तरी आईने बनवलेली भाकरी १०००₹ची बायकोने बनवलेली १००₹ची म्हणत फिरायचं. किंवा मन लावून केली तरी चकली विरघळवने/ केक करायला जाऊन शिरा बनवणे हे death during surgery सारखेच आहे म्हणणे. किंवा अक्षय कुमार एवढ्या स्टंट फाईट करतो पण त्याला साधी कोथिंबीर निवडता येते का म्हणणे. किंवा आमच्या ओळखीत एक अब्जाधीश व्यावसायिक जोडपे आहे पण त्यांना साधी फोडणी घालता येत नाही हो सांगत फिरणे.....
• आपल्याला फुकट राबवून घेतलं जातंय असं यांना वाटतं. पण ज्या दिनुचे बिल बाळघुटीवर हे वाढलेत त्याचाच वापर करून defend the expenses on you म्हनलं तर हे पळ काढतात किंवा हे करता येण शक्य नाही म्हणतात किंवा कुठलेतरी परदेशातले काहीतरी हिशेब देत बसतात.
• खरंच हिशेब मांडला तर या बायका स्वतःचे अन्न, वस्त्र, निवारा, इतर वर होणारे खर्च स्वतः उचलण्या इतकेही काम करत नसतात.
• एखादच असलेल मुल जसजसं मोठं होत जात तसतशा या बर्यापैकी निरुपयोगी होत जातात.
• मुल शाळेत गेल्यानंतरचा वेळ मग या जालावर इतरांना स्त्रीवाद शिकवण्यावर घालवतात.
• यांचा स्त्रीवाद म्हणजे काय तर पाहुणे आल्यावर १० पदार्थ बनवायचे कि १०० याचा निर्णय माझीमलाच घेऊ देणे त्यात नवर्याने लुडबुड न करणे.
• आयुष्यभर बापाच्या, भावाच्या, नवर्याच्या किंवा मुलाच्या कमाईवर राहून तुम्ही स्वतःला स्त्रीवादी किंवा स्वतंत्र कशा काय समजता? तुमचे so called स्वातंत्र्य त्या पुरुषांवरच अवलंबून होते की! म्हणल्यावर यांच्याकडे उत्तर नसते.
• अजून भर घालते आठवेल तशी
जर हा ग्रुप तुम्हाला जालावर दिसत नसेल तर तुम्ही ऐच्छिक आंधळे आहात का असे वाटू लागेल
बाब्बो, रेसिपीच लिहून टाकली
बाब्बो, रेसिपीच लिहून टाकली कि हो!
कुंडलकरांचे खालचा दोन
कुंडलकरांचा खालचा दोन भागांतला लेख कुणीच वाचला नाही का?
https://www.loksatta.com/karant-news/challenges-faced-by-career-oriented...
https://www.loksatta.com/karant-news/sachin-kundalkar-article-on-girl-do...
{{{ किंवा अक्षय कुमार एवढ्या
{{{ किंवा अक्षय कुमार एवढ्या स्टंट फाईट करतो पण त्याला साधी कोथिंबीर निवडता येते का म्हणणे. }}}
अक्षयकुमार आधी हॉटेलात काम करायचा म्हणे.. येत असेल हो त्याला कोथिंबीर निवडता...
हे कुंडलकर गृहिणींवर रीसर्च
हे कुंडलकर गृहिणींवर रीसर्च पेपर्स लिहिताहेत का?
सगळेच, जेवढे मी वाचले तेवढे लेख, गृहिणीं, काही न करणारी मुलगी, स्त्री ह्याच विषायवर आहेत.
बंगाली स्त्रियांचा विषेश अभ्यास आहे त्यांचा.
नवीन Submitted by अॅमी on 20
नवीन Submitted by अॅमी on 20 December, 2017 - 01:04>>>

ॲमी यांना सामनावीर घोषित करण्यात येत आहे
अॅमी
अॅमी

कसं आहे, स्वतःच्या तोंडानी स्वतःच महत्व पटवून द्यायचे सोपस्कार कोणी करु लागले तर तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे (आपण) की हे नेमकं कशा करता सुरु आहे.
हे असले प्रकार माझ्या घरात कमी जास्त फरकानी माझ्या आई, आज्या, मावश्या, काकवांनी केले आहेत. ह्यामुळे खरं पुढच्या पिढीच्या म्हणजे त्यांच्या मुलांच्या विचारांवर जो एक प्रकारचा पगडा बसला, तो फार इंट्रेस्टिंग होता. काही मुलांचे नंतर काही काळानंतर, कदाचित घराबाहेर पडल्यामुळे असेल पण स्वतंत्रपणे विचार करायला सुरवात केली असावी आणि ते ह्यातून बाहेर पडू शकले. काही मुलं, जी अजून त्याच घरात राहतात, त्यांच्या करता रोजचं आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे.
ह्यात गमतीची गोष्ट अशी की outwardly (बाहेरुन बघता ह्या अर्थानी) बघितलं तर ही मुलं सहसा न्युक्लियर फॅमिलीचे महत्व, आई वडिलांचा आदर ह्या विषयी फार हिरीरीनी बोलतात. ह्यात पुढे हे तत्वज्ञान असलेले व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड्स ढकलणे हे ही आजकाल एक नवीन अॅड झालय.
अॅमी, तुमच्या डोक्यात असलेला
अॅमी, तुमच्या डोक्यात असलेला (आणि डोक्यात जात असलेला) कोणतातरी एक स्त्री वर्ग तुम्ही आणून येथे ओतला आहे.
सचिन च्या ज्या लेखाचे हे विडंबन आहे, त्याबद्दल येथे चर्चा चालू आहे त्या लेखात उल्लेख केलेल्या - म्हणजे पहिल्या लेखात त्याच्या लहानपणी ज्या होत्या व दुसर्या लेखात ज्या नव्हत्या - स्त्रिया वेगळ्या आहेत.
तुम्ही जे लिहीले आहे ते आता स्ट्रॉ मॅन आर्ग्युमेण्ट च्या दिशेने चालले आहे. तो वर्ग जालावर आहे की नाही वगैरे वेगळा विषय आहे. स.कुं च्या लहानपणी तो वर्ग होता की नव्हता याबद्दल त्यानेच गोंधळ निर्माण करणे, आणि घरकाम व स्वयंपाक करता येउ लागल्याने या वर्गाचे सगळे प्रश्न त्याला कळणे याबद्दल हे चालले आहे.
Pages