शिक्षण आणि ऑफिसातले काम जमायला लागल्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला. तो म्हणजे पैसे कमावून घर चालवणारे बाप्ये ही जी जागतिक जमात आहे जे ऑफिसचे काम , तिथे करावे लागणारे कष्ट, तिथले टुकार राजकारण व त्यात अनेक क्लिष्ट खेळ्या करून आपण जिंकलेली मात व बॉसचे विश्वासू आदमी असणे, आपण कमविलेल्या पैशातून घर चालले आहे नाहीतर," तुम्ही रस्त्यावरच पडले असता, भीक मागायला लागली असती, तुझ्या आईची अक्कल काय चूल अन मूल, बायकांनी स्वयंपाक घराच्या बाहेर तोंड उघडायचे नाही अन हात चालवाय्चे नाहीत. त्यांची लायकीच नाही. मी आहे म्हणून तुझ्या आईबरोबर संसार केला. नाहीतर मला रेखाने मागणी घातली होती. मी तुझ्या फोटोग्राफी क्लासची फी भरणार नाही. पैसे काय झाडावर लागले आहेत? तीस दिवस खर्डेघाशी करावी तेव्हा एक दिवस पगार मिळतो!!!" अशी मुक्ता फळे रोज आईने केलेले चहा पोहे खाताना फेकणार्या घरोघरीच्या बाप व नवरेवर्गा बद्दल उगीचच माजलेला आदर माझ्या डोक्यातून कायमचा नष्ट झाला.
ही वाक्ये व ती येता जाता फेकणारे कळकट पायजमा व पिवळा बनियन घालून मुलींकडे नजरा टाकत अंग खाजवत फिर णारे पुरुषोत्तम हळूहळू कमी झाले. दोघांनी नोकर्या करून घराचे/ गाडीचे लोन भरायचा जमाना पण य येउन जुना झाला. संपलाच. आता प्रीनप व टीटीएम एम चालते.
मी पण एंट्री लेव्हलच्या नोकर्या करता करता अनुभव, छोटी छोटी ट्रेनिंगे घेउन कामात एक एक लेव्हल पुढे गेले. सहि ष्णू, आत्मविश्वासाने स्त्रियांच्या हाती काम सोपवणारे, ती करेल नीट असे इतरांना ठमकावून सांगणारे
खमके अनुभवी व संयमी पुरुष बॉस भेटल्याने माझी प्रगती होतच गेली आणि आई नोकरी करते पैसे वाचवते
बारीक सारीक खर्च पण करते ह्या पुढे जाउन मी करिअरिस्ट व आर्थिक दृ ष्ट्या स्वतंत्र की हो झाले.
पैसे मिळ्वायचे बाप्यांचे ऑफिसातले काम तुम्हाला शिक्षण व अनुभव ह्यांच्या जोरावर येउ लागले कि त्यांच्याबद्दल
वाटणारा भययुक्त आदर गळून जातो. स्वप्नातला राजकुमार पांढर्या शुभ्र घोड्यावरून येतो. व आपल्याला
एका स्मूथ जेस्चर मध्ये उचलून घेतो. सो फार सो गुड.
मग त्याच्या मागे त्याच्या घराचे, कुटुंबाचे, घरातल्या सतराशे साठ प्रथांचे, वाण व्रते : ऑमच्या इथे अस्स्संच लागतं, फोडणी तश्शीच लागते असे तोंड घोळ्वून सांग णा र्या आजे आते सासवा, चुलत नणंदा, हे सर्व लटांबर मागून बैलगाडीतून येते. आपल्या स्वप्नांचा लग्नाच्या वेदीवर बळी जातो. सर्जनशीलता, मॅनेजमेंट स्किलस, कोडिंग डिझायनीं ग अॅबिलिटीज, प्रेझेंटेशन स्किल्स पीपल स्किल्स ह्याचेलटांबराला देणे घेणे नसते. सर्वांची बोळवण फक्त " ती लग्नानंतर पण जॉब करते!! " ह्या एका वाक्या त होते. व नंतर तुच्छ कटाक्ष!! घरचे सांभाळून काय कराय्चे ते करा. पगार एक तारखेला माझ्या हातात पाहिजे. तुला कश्याला लागतात खर्चाला पैसे!! अय्या वहिनी तुला रांगोळी नाही येत? अश्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो.
तुम्हाला तुमचे काम समजले ते नीट करता येउ लागले व त्याचा रास्त मोबदला बँकेत जमा होउ लागला की तुमचे
आयुष्यातल्या पुरुषांबद्दलचे भाव् निक समीकरण बदलते. सर्व पत्ते त्यांच्या हातात असलेली निर्णय प्रक्रिया आता तुम्ही तुमच्या हातात घेउ शकता व परिस्थितीनुसार मान न तुकवता मना प्रमाणे व तुमच्या मते योग्य निर्णय घेउ शकता. शिकिवनारा बाबा लागत नाही.
आम्ही बायका स्वभावाने पुरु ष द्वेष्ट्या नसतो. अनुभवाने त्यांच्या बद्दल प्रेम, आनंद, किळस, राग अश्या भावना वाटतात त्याही अनेक वेळा दाबूनच ठेवल्या जातात. पण एकेक् पुरुष आयुष्यात चालवून घेणे कधी कधी फार वैतागवाणे होते. नोट .मी जनरलजायझेशन केलेले नाही त्यामुळे असा प्रतिसाद देउ नये. त्यांचे ते फ्रॅजाइल इगोज, सारखा सारखा येणारा राग, कंट्रोल मध्ये न राहणारी लैंगिक भावना, नकार समजू न शकणे, मारहाण करणे व्हरबल अब्युज ह्याला ते फक्त पुरूष आहेत म्हणून जीवनात काही स्थान द्यावे असे मात्र मला आता वाटत नाही. अनेक उदारमतवादी, व कंट्रोल मध्ये असलेल्या सॉर्टेड बाप्यां बरोबर युजफुल इंटर अॅक्षन आहे माझी. पण
माझी सुपि रिऑरिटी चाल्वूनच घेतलीच पाहिजे अश्या मानसिकतेतून जगावर स्वारी ़ करणारे घरोघरीचे राजाबेटा,
पतिपरमेश्वर, भाउ रायाज ह्यांना माझे एक आवाहन आहे. खालील कामे लिंग निरपेक्ष आहेत. बाई किंवा बाप्या
कोणी ही करू शकतात असे जालावरील एका पोरगेल्या काकांनी नुकतेच वर्तवले आहे.
१) घर स्वच्छ करणे व आवरणे
२) स्वयंपाक ( चहा व खाणे जेवण ) घरातील सर्वां साठी करणे रोज तीन वेळा.
३) पाळणाघरातील व शाळेतील मुलाना आणणे सोड णे, मुले आजारी पडल्यास रजा घेउन घरी त्यांच्या बरोबर
थांबणे औषधपाणी करणे.
४) बाजारहाट, बागकाम करणे
५) वॉशिंग मशीन, डिशवॉशर लो ड करणे व कपडे घडी करून भांडी सुकवून जाग्याला ठेवणे
६) घरातील ज्ये ष्ठांची देख भाल
७) पडेल ते!!
घर दोघांचे असते व कामही. हे आता रिसर्च करून प्रूव झालेले आहे. त्यामुळे घरोघरीच्या गृहस्थांनो उचला झाडू व झारा, लागा कामाला. आय होप द जर्नी इज अ हॅपी वन.
भरत, लिंक आणि तुमचा प्रतिसाद
भरत, लिंक आणि तुमचा प्रतिसाद आवडले.
दुसर्यावर dependent, helpless अशा गृहिणींच्या परीस्थितीचे उदात्तीकरण हा स्त्रीवाद नक्कीच नाही. उलट हे स्रीवादाच्या विरोधात जाते.
@सनव, मी प्रतिसाद दिलेला नाही
@सनव, मी प्रतिसाद दिलेला नाही. लोकसत्ता संकेतस्थळावर लेखावर आलेली प्रतिक्रिया आहे ती. वाचकाचं नावही दिलंय.
अमा, विडंबन जमले आहे
अमा, विडंबन जमले आहे
The articles in Loksatta were
कमेंट काढून टाकली आहे.
विदया.
अमा, कुंडलकरांच्या लेखावर
अमा, कुंडलकरांच्या लेखावर प्रतिक्रिया/ उत्तर म्हणून लिहिले असेल तर उत्कृष्ट जमले आहे.
मी_ अनू, प्रतिसाद आवडला.
कुंडलकर काही काही लेख सुंदर लिहितात पण काही लेख वाचून चिडचिड होते. हा त्यातलाच एक.
दुसर्यावर dependent, helpless
दुसर्यावर dependent, helpless, कामाचा मोबदला न मिळणारे मूर्ख हे इम्प्लिकेशन कुठून आलं मला माहित नाही.
संसार+बाहेरची कामे हा एक प्रोजेक्ट आहे.एक रिसोर्स थोडा लाईटली लोडेड आहे.दुसरा थोडा हेविली लोडेड आहे.जनरल प्रोटोकॉल हेविली लोडेड रिसोर्स a साठी साठी तात्पुरता टास्क फोर्स बनून लाईटली लोडेड रिसोर्स b ने थोडी कामे अंगावर घेणे हा आहे.a आणि b मधले हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते.काही ठिकाणी सांगूनही ते नसणे, स्वतःच्या टास्क लिस्ट वरून काही कामं खोडणे, काही कामं कोणाच्याच टास्क लिस्ट वर नसताना ती रिसोर्स a करेल असे अझ्युम करून ती न होणे हे हेल्दी टीम चे लक्षण नाही.इन दॅट केस रिसोर्स a ने ही कामे केली हे तो बोलून दाखवत असला तरी त्याने b च्या टास्क लिस्ट वर 7 कामे आणि स्वतःच्या टास्क लिस्ट वर 70 कामे असताना अजून 3 केली हे सत्य 'a कुजका आहे, सारखा बोलून दाखवत असतो कामं केल्याचं' हे b ने वैतागून म्हणूनही a ने ती कामं केली हे सत्य नाकारता येत नाही.अगदी a प्रचंड वरकोहोलीक असला, त्याला 73 कामं करणं मनापासून आवडत असलं तरीही a च्या आयुष्यात काही केओस डेज असू शकतात.
कोणतेही घर दोघांनी/कुटुंबाने चालवणे हे नुसते वाइन अँड रोझेस डे च्या पलीकडचे असते.ते वर्क करावे लागते.ते करत असताना आनंदाचे, वैतागाचे, गोंधळाचे, वाईट, चांगले सर्व प्रकारचे दिवस येतात.
मुळात जो वर्ग त्यांनी रंगवला आहे तो एक गृहिणी किंवा 'बायका' हा वर्ग नाही.हॅप्पीली मारीड गे कपल मध्येही हेविली लोडेड रिसोर्स कामं लाईटली लोडेड रिसोर्स ला सांगणार, विनंती करणार, लाईटली लोडेड रिसोर्स ती करत नसल्यास चिडचिड करणार/टीम बदलणार/कामे करून टाकून नंतर बोलून दाखवणार.ऍज पर थिंग मोस्ट राईट फॉर हिम/हर.
मी अनु च्या सगळ्या पोस्ट
मी अनु च्या सगळ्या पोस्ट उत्तम आहेत. एकदम पटल्या.
अमा, लेख वाचताना ते विडंबन आहे समजूनही वाचायला बोर झाले.
दुसर्यावर dependent, helpless
दुसर्यावर dependent, helpless, कामाचा मोबदला न मिळणारे मूर्ख हे इम्प्लिकेशन कुठून आलं मला माहित नाही.
ही भारतातील वस्तुस्थिती आहे. अनेक गृहिणीना फक्त राबवून घेतलं जातं. आर्थिक स्वातंत्रय नसतं. नवरा मनमानी करु शकतो. जर कधी नवर्याने साथ सोडली तर अशा बायकांचे हाल होतात. या परिस्थितीत समर्थनीय किंवा उदात्त काहीच नाही.
नवरा बायको दोघेही नोकरी करत आहेत पण बायको स्वयंपाक करते टाईप सिच्युएशन वेगळी.
मला मूळ लेख (कुंडलकरांचा) धड
मला मूळ लेख (कुंडलकरांचा) धड कळला नाही.
अमांचा हा लेख त्याचं विडंबन आहे असं मानलं तरी किंवा हा लेख स्वतंत्र आहे असं मानलं तरी आयदर नीट कळला नाही ऑर/त्यामुळेच नीट प्रॉसेस झाला नाही.
एकूणात लग्न होणे म्हणजे (फक्त) बाईने तिचं घर सोडून पुरूषाच्या घराचा हिस्सा बनणे हे सत्य जोपर्यंत बदलत नाही (शहरी जीवनात चित्र बदलत आहे असं दिसतं) तोपर्यंत एकमेकांबद्दलच्या ह्या अतिशय भिन्न पर्सेप्शन ला उपाय नाही असं वाटतं.
कूटस्थ ह्यांच्या ह्या शब्दांचा निषेध. "कालानुरूप योग्य ते बदल होत आहेत आणि त्यामुळेच आज स्त्री सुद्धा पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते आहे. आणि याचे श्रेय पुरुषांनाच जास्त आहे. ज्योतिबा फुले, राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे ही काही उदाहरणे."
स्त्रीवर्गाचा विकास झाला तो पुरूषांमुळेच ही मानसिकता आणि पुरूषप्रधान संस्कृती (जी अजूनही टिकून आहे; पूर्णपणे लयास गेलेली नाही) तोपर्यंत कठिण आहे.
mi-anu ह्यांच्या पोस्ट्स बर्याचशा पटल्या.
हल्ली बर्याच पुरूषांत "मला स्वैपाक करता येतो", "मी घरकामात मदत करतो" , "आमच्या घरी घरकामाची समसमान विभागणी असते" असे असर्ट करण्याची फॅशन आहे. असं सांगणारे पुरूष ते करतही असतीलही, थोडक्यात ह्या बाता बेसलेस नसतीलही पण अजून असे पुरूष मायनॉरिटी मध्येच असावेत असा माझा तरी कयास आहे.
पुन्हा वाचला. धमाल आहे. ते
पुन्हा वाचला. धमाल आहे. ते बैलगाडीतील लटांबर वाला पॅरा महा-परफेक्ट आहे
अमित - ओळ न ओळ वाचण्याची गरज नाही या लेखात. सचिन चा लेख वाचला असेल तर त्याच्या प्रीमाइस ला उलटे करून मस्त जमले आहे विडंबन असे मला वाटले. हे तू ही आवडून घेण्याची सक्ती करण्याकरता नाही, फक्त मी ज्या अँगल ने वाचले ते देतोय :). अगदी डीटेलमधे मी वाचलेला नाही लेख, पण पॅटर्न लगेच लक्षात आला.
अमा, छान विडंबन!
अमा, छान विडंबन!
मी_अनु, प्रतिसाद खूप आवडले.
मी अनु च्या सगळ्या पोस्ट
मी अनु च्या सगळ्या पोस्ट उत्तम आहेत. एकदम पटल्या. >> +७८६
विडंबन आवडले.
विडंबन आवडले.
अनु च्या पोस्ट ही उत्तम..
झकास विडंबन आणि मी अनु च्या
झकास विडंबन आणि मी अनु च्या सगळ्या पोस्ट्स सुद्धा वाचनीय.
ते बैलगाडीतील लटांबर वाला पॅरा महा-परफेक्ट आहे >> अगदी अगदी
अमा, छान विडंबन!
अमा, छान विडंबन!
मी_अनु, प्रतिसाद खूप आवडले. >>> मम.
"कूटस्थ ह्यांच्या ह्या
"कूटस्थ ह्यांच्या ह्या शब्दांचा निषेध. "कालानुरूप योग्य ते बदल होत आहेत आणि त्यामुळेच आज स्त्री सुद्धा पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते आहे. आणि याचे श्रेय पुरुषांनाच जास्त आहे. ज्योतिबा फुले, राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे ही काही उदाहरणे."
स्त्रीवर्गाचा विकास झाला तो पुरूषांमुळेच ही मानसिकता आणि पुरूषप्रधान संस्कृती (जी अजूनही टिकून आहे; पूर्णपणे लयास गेलेली नाही) तोपर्यंत कठिण आहे " -->
सशल, मी वस्तुस्थिती मांडली आहे. पूर्वीचा काळ हा अतिशय पुरुषप्रधान होता आणि स्त्रियांवर अन्याय झाले यात वादच नाही. परंतु हि परिस्थिती थोडी का होईना बदलली आहे याचे कारण स्त्री मुक्ती चळवळ ज्यांनी राबवली त्यात पुरुषांचा सहभाग जास्त होता आणि केवळ हीच वस्तुस्थिती मी मांडली आहे. यामध्ये पुरुषप्रधान मानसिकतेचा काहीही संबंध नाही. आज ज्या ज्या क्षेत्रात महिलांनी जे यश संपादन केले आहे त्यात त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांचा जास्त वाटा आहे ना कि पुरुषांचा. 'सद्यकाळात स्त्रियांनी जे यश मिळवले आहे ते पुरुषांमुळेच' असे विधान मी केले असते ती झाली पुरुषप्रधान मानसिकता झाली असती. I hope तुम्हाला फरक समजला असावा.
मस्त लिहीलंय अमा. बैलगाडी
मस्त लिहीलंय अमा. बैलगाडी पर्फेक्ट
कूटस्थ, स्पष्टीकरणाबद्दल
कूटस्थ, स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. सावित्रीबाई फुले , रमाबाई रानडे ह्या आणि अशा अनेक नावांचा विसर पडू नये ही अपेक्षा. तुम्ही उल्लेख केलेल्या पुरूषांबरोबरच अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्त्रीमुक्ती चळवळ पुढे नेणार्या स्त्रीयांचाही त्यात वाटा आहे ; फक्त पुरूषांचा नाही एव्हढंच म्हणणं आहे.
मी स्त्रियांचे कर्तृत्व
मी स्त्रियांचे कर्तृत्व नाकारतच नाहीये. पण तो काळच असा होता कि जर पुरुषांनी स्त्री मुक्ती चळवळीसाठी पुढाकार घेतला नसता किंवा पाठींबा दिला नसता तर कदाचित सुधारणा झालीच नसती कारण स्त्रीला त्या काळात फारच कमी हक्क होते. सावित्रीबाई फुले , रमाबाई रानडे यांच्या कार्याविषयी आदर आहेच परंतु त्यांच्यामागे ज्योतिबा फुले, महादेव गोविंद रानडे उभे राहिले हेही तितकेच महत्वाचे.
जश्या आज बऱ्याच स्त्रिया नोकऱ्या करत आहेत तसे पुरुषही घरची कामे करत आहेतच. पण सरसकट नेहमीच पुरुषांना दोष दिला जातो किंवा ते काहीच करत नाहीत असा सूर आवळला जातो आणि माझा आक्षेप यालाच आहे. कधीतरी पुरुषांनाही क्रेडिट मिळाले पाहिजे
ओके
ओके
कूटस्थ, तुमच्या मूळ पोस्टमधला टोन मला तरी चढा वाटतो. त्यावर वाद घालत बसण्यात काही पॉइंट आहे असं मला वाटत नाही.
स्त्रीया (स्त्रीवादी असणार्या स्त्रीया) म्हणजे जन्मजात पुरूषांशी वैर घेऊन जगणार्या स्त्रीया असा समज करून घेण्यात आणि पसरवण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक माणसाकडे (स्त्री, पुरूष) स्वतःची सदसदविवेकबुद्धी असते आणि त्याप्रमाणे ज्याचं जे ड्यु क्रेडिट आहे ते दिलं/घेतलं जायला हवं आणि ते बर्याच अंशी होतं असं मला वाटतं आणि आय होप त्यावर तुमचं ऑब्जेक्शन नसेल. .
अमा, मी कुंडलकरांचा लेख
अमा, मी कुंडलकरांचा लेख वाचलेला नाही पण इतरत्र चर्चांमधून साधारण कल्पना होती त्यात काय आणि कशा पद्धतीने मांडलय त्याची. त्यामुळे खरं स्वतंत्र लेख म्हणूनच वाचला. सॉलिड जमला आहे! तो लटांबर वाला मजकूर तर फार भारी!
कुंडलकरचे दोन्ही लेख मला
कुंडलकरचे दोन्ही लेख मला आवडले!
१९८०ज मध्ये घरकामाला मोलकरीण ठेऊ शकणाऱ्या उच्च, मध्यम वर्गातल्या 'गृहिणी' आणि 'होममेकर' म्हणून मिरवणारा, फेसबुक स्त्रीवाद घालणारा त्यांचाच नवा अवतार या एका ठरावीक गटाबद्दलच त्याने लिहिले आहे. आणि त्याच्या मताशी मी सहमत आहे.
स्त्रिवादाचा, निम्न वर्गातील घरकाम+बाहेरकाम करून आपल्या मुलांना+बेवड्या नवर्याला पोसणाऱ्या स्त्रियांचा किंवा घरकाम+बाहेरकाम करूनही काहीही निर्णय स्वातंत्र्य नसणार्या स्त्रियांचा या लेखांशी सबंध नाही.
सनवचे प्रतिसाद आवडले.
अॅमी, १०० मोदक घ्या. मी
अॅमी, १०० मोदक घ्या. मी आत्ताच लेख वाचला. You literally spoke my mind!!
अॅमी, तुमचा हा खालील
अॅमी, तुमचा हा खालील प्रतिसाद आवडला. माझेही असेच मत आहे. टंकनश्रम वाचवल्याबद्दल शतशः धन्यवाद!
१९८०ज मध्ये घरकामाला मोलकरीण ठेऊ शकणाऱ्या उच्च, मध्यम वर्गातल्या 'गृहिणी' आणि 'होममेकर' म्हणून मिरवणारा, फेसबुक स्त्रीवाद घालणारा त्यांचाच नवा अवतार या एका ठरावीक गटाबद्दलच त्याने लिहिले आहे. आणि त्याच्या मताशी मी सहमत आहे.
स्त्रिवादाचा, निम्न वर्गातील घरकाम+बाहेरकाम करून आपल्या मुलांना+बेवड्या नवर्याला पोसणाऱ्या स्त्रियांचा किंवा घरकाम+बाहेरकाम करूनही काहीही निर्णय स्वातंत्र्य नसणार्या स्त्रियांचा या लेखांशी सबंध नाही.
नवीन Submitted by अॅमी on 18 December, 2017 - 07:50
मग त्याच्या मागे त्याच्या
मग त्याच्या मागे त्याच्या घराचे, कुटुंबाचे, घरातल्या सतराशे साठ प्रथांचे, वाण व्रते : ऑमच्या इथे अस्स्संच लागतं, फोडणी तश्शीच लागते असे तोंड घोळ्वून सांग णा र्या आजे आते सासवा, चुलत नणंदा, हे सर्व लटांबर मागून बैलगाडीतून येते. आपल्या स्वप्नांचा लग्नाच्या वेदीवर बळी जातो. >

राजाबेटा,पतिपरमेश्वर, भाउ रायाज >
लेख आवडला !
मुळात कुंडलकर यांचा लेख
मुळात कुंडलकर यांचा लेख चुकीच्या पद्धतीने interpret झाला आहे असं मला वाटतं.>>+१
तो लेख/ विचार 'उपहासात्मक' लिहीला असावा असे मला वाटले.
विडंबन मस्त जमले आहे अमा.
विडंबन मस्त जमले आहे अमा. लटांबरवाला पॅरा मला पण आवडला.
>>मुळात कुंडलकर यांचा लेख
>>मुळात कुंडलकर यांचा लेख चुकीच्या पद्धतीने interpret झाला आहे असं मला वाटतं.>>+१
तो लेख/ विचार 'उपहासात्मक' लिहीला असावा असे मला वाटले.>> असं आता कुंडलकरांनाही वाटतंय असं ऐकू आलं.
काही दुखणे, शेपटीवर पाय पडणे
काही दुखणे, शेपटीवर पाय पडणे असे शब्द वापरले म्हणजे कुंडलकरांचा तो लेख निर्विवाद उत्तम दर्जेदार वगैरे असून काही लोक केवळ पोटदुखी, जळजळ इ. मुळे लेखाला नावे ठेवत आहेत असे म्हणायचेय का नानाकळा ?
>> मै, ती प्रतिक्रिया देईस्तोवर मी मूळ लेख वाचलाच नव्हता. फक्त जो काय धुरळा उडाला तो उडत उडत बघितला. सचिन कुंडलकरसारख्या लेखपाडू माणसाचे लिहिणे इतके सिरियसली घेऊन त्यावर सुनिल सुकथनकर आणि इतर दिग्गजांनी हाय तोबा करत प्रतिक्रिया देणे जरा ओवररिअॅक्टींग वाटले. एवढेच माझे इन्टरप्रीटेशन . आता कुणाचे कुठे तरी दुखले तरच प्रतिक्रिया येतात, सचिन सारख्या माणसाला इतकी वॅल्यू देण्याइतका तो ग्रेट (त्याला उत्तरं देणार्यांच्या तुलनेत) नसून का दिल्या गेली हा माझा प्रश्न होता. बाकी कोणाही माणसाचे मत हे निर्विवाद उत्तम दर्जेदार सदासर्वकाळ नसते एवढे मला कळते.
बाकी मला दोन्ही लेख वाचल्यावर जे समजलं व जे म्हणायचंय ते अॅमी यांनी अचूक मांडलंय.
तो लेख एक लेखन, विचार म्हणून मुळीच न आवडणे हे कारणही असू शकते ना Happy
Submitted by maitreyee on 17 December, 2017 - 20:02
>> काही गोष्टींमध्ये दंगा न करता सोडून देणे गरजेचे असते. सिरियस लोकांनीही अटेन्शनसीकर लोकांच्या उचकवण्याला रिअॅक्ट होणे पटलेले नाही. हे माझे वैयक्तिक मत. ते निर्विवाद उत्तम दर्जेदार वगैरे असण्याचा कोणताही दावा नाही.
>>काही गोष्टींमध्ये दंगा न
>>काही गोष्टींमध्ये दंगा न करता सोडून देणे गरजेचे असते. >>त्या सुकथनकरांच्या फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रिया मला नॉत्मलच वाटल्या. कुठेही दंग्याचं स्वरुप आलेलं दिसलं नाही. इथेही सो फार नॉर्मलच दिसतंय.
Pages