गृहस्थांनो, ... लागा घरकामाला!

Submitted by अश्विनीमामी on 17 December, 2017 - 01:05

शिक्षण आणि ऑफिसातले काम जमायला लागल्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला. तो म्हणजे पैसे कमावून घर चालवणारे बाप्ये ही जी जागतिक जमात आहे जे ऑफिसचे काम , तिथे करावे लागणारे कष्ट, तिथले टुकार राजकारण व त्यात अनेक क्लिष्ट खेळ्या करून आपण जिंकलेली मात व बॉसचे विश्वासू आदमी असणे, आपण कमविलेल्या पैशातून घर चालले आहे नाहीतर," तुम्ही रस्त्यावरच पडले असता, भीक मागायला लागली असती, तुझ्या आईची अक्कल काय चूल अन मूल, बायकांनी स्वयंपाक घराच्या बाहेर तोंड उघडायचे नाही अन हात चालवाय्चे नाहीत. त्यांची लायकीच नाही. मी आहे म्हणून तुझ्या आईबरोबर संसार केला. नाहीतर मला रेखाने मागणी घातली होती. मी तुझ्या फोटोग्राफी क्लासची फी भरणार नाही. पैसे काय झाडावर लागले आहेत? तीस दिवस खर्डेघाशी करावी तेव्हा एक दिवस पगार मिळतो!!!" अशी मुक्ता फळे रोज आईने केलेले चहा पोहे खाताना फेकणार्‍या घरोघरीच्या बाप व नवरेवर्गा बद्दल उगीचच माजलेला आदर माझ्या डोक्यातून कायमचा नष्ट झाला.

ही वाक्ये व ती येता जाता फेकणारे कळकट पायजमा व पिवळा बनियन घालून मुलींकडे नजरा टाकत अंग खाजवत फिर णारे पुरुषोत्तम हळूहळू कमी झाले. दोघांनी नोकर्‍या करून घराचे/ गाडीचे लोन भरायचा जमाना पण य येउन जुना झाला. संपलाच. आता प्रीनप व टीटीएम एम चालते.

मी पण एंट्री लेव्हलच्या नोकर्‍या करता करता अनुभव, छोटी छोटी ट्रेनिंगे घेउन कामात एक एक लेव्हल पुढे गेले. सहि ष्णू, आत्मविश्वासाने स्त्रियांच्या हाती काम सोपवणारे, ती करेल नीट असे इतरांना ठमकावून सांगणारे
खमके अनुभवी व संयमी पुरुष बॉस भेटल्याने माझी प्रगती होतच गेली आणि आई नोकरी करते पैसे वाचवते
बारीक सारीक खर्च पण करते ह्या पुढे जाउन मी करिअरिस्ट व आर्थिक दृ ष्ट्या स्वतंत्र की हो झाले.

पैसे मिळ्वायचे बाप्यांचे ऑफिसातले काम तुम्हाला शिक्षण व अनुभव ह्यांच्या जोरावर येउ लागले कि त्यांच्याबद्दल
वाटणारा भययुक्त आदर गळून जातो. स्वप्नातला राजकुमार पांढर्‍या शुभ्र घोड्यावरून येतो. व आपल्याला
एका स्मूथ जेस्चर मध्ये उचलून घेतो. सो फार सो गुड.

मग त्याच्या मागे त्याच्या घराचे, कुटुंबाचे, घरातल्या सतराशे साठ प्रथांचे, वाण व्रते : ऑमच्या इथे अस्स्संच लागतं, फोडणी तश्शीच लागते असे तोंड घोळ्वून सांग णा र्‍या आजे आते सासवा, चुलत नणंदा, हे सर्व लटांबर मागून बैलगाडीतून येते. आपल्या स्वप्नांचा लग्नाच्या वेदीवर बळी जातो. सर्जनशीलता, मॅनेजमेंट स्किलस, कोडिंग डिझायनीं ग अ‍ॅबिलिटीज, प्रेझेंटेशन स्किल्स पीपल स्किल्स ह्याचेलटांबराला देणे घेणे नसते. सर्वांची बोळवण फक्त " ती लग्नानंतर पण जॉब करते!! " ह्या एका वाक्या त होते. व नंतर तुच्छ कटाक्ष!! घरचे सांभाळून काय कराय्चे ते करा. पगार एक तारखेला माझ्या हातात पाहिजे. तुला कश्याला लागतात खर्चाला पैसे!! अय्या वहिनी तुला रांगोळी नाही येत? अश्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो.

तुम्हाला तुमचे काम समजले ते नीट करता येउ लागले व त्याचा रास्त मोबदला बँकेत जमा होउ लागला की तुमचे
आयुष्यातल्या पुरुषांबद्दलचे भाव् निक समीकरण बदलते. सर्व पत्ते त्यांच्या हातात असलेली निर्णय प्रक्रिया आता तुम्ही तुमच्या हातात घेउ शकता व परिस्थितीनुसार मान न तुकवता मना प्रमाणे व तुमच्या मते योग्य निर्णय घेउ शकता. शिकिवनारा बाबा लागत नाही.

आम्ही बायका स्वभावाने पुरु ष द्वेष्ट्या नसतो. अनुभवाने त्यांच्या बद्दल प्रेम, आनंद, किळस, राग अश्या भावना वाटतात त्याही अनेक वेळा दाबूनच ठेवल्या जातात. पण एकेक् पुरुष आयुष्यात चालवून घेणे कधी कधी फार वैतागवाणे होते. नोट .मी जनरलजायझेशन केलेले नाही त्यामुळे असा प्रतिसाद देउ नये. त्यांचे ते फ्रॅजाइल इगोज, सारखा सारखा येणारा राग, कंट्रोल मध्ये न राहणारी लैंगिक भावना, नकार समजू न शकणे, मारहाण करणे व्हरबल अब्युज ह्याला ते फक्त पुरूष आहेत म्हणून जीवनात काही स्थान द्यावे असे मात्र मला आता वाटत नाही. अनेक उदारमतवादी, व कंट्रोल मध्ये असलेल्या सॉर्टेड बाप्यां बरोबर युजफुल इंटर अ‍ॅक्षन आहे माझी. पण
माझी सुपि रिऑरिटी चाल्वूनच घेतलीच पाहिजे अश्या मानसिकतेतून जगावर स्वारी ़ करणारे घरोघरीचे राजाबेटा,
पतिपरमेश्वर, भाउ रायाज ह्यांना माझे एक आवाहन आहे. खालील कामे लिंग निरपेक्ष आहेत. बाई किंवा बाप्या
कोणी ही करू शकतात असे जालावरील एका पोरगेल्या काकांनी नुकतेच वर्तवले आहे.
१) घर स्वच्छ करणे व आवरणे
२) स्वयंपाक ( चहा व खाणे जेवण ) घरातील सर्वां साठी करणे रोज तीन वेळा.
३) पाळणाघरातील व शाळेतील मुलाना आणणे सोड णे, मुले आजारी पडल्यास रजा घेउन घरी त्यांच्या बरोबर
थांबणे औषधपाणी करणे.
४) बाजारहाट, बागकाम करणे
५) वॉशिंग मशीन, डिशवॉशर लो ड करणे व कपडे घडी करून भांडी सुकवून जाग्याला ठेवणे
६) घरातील ज्ये ष्ठांची देख भाल
७) पडेल ते!!
घर दोघांचे असते व कामही. हे आता रिसर्च करून प्रूव झालेले आहे. त्यामुळे घरोघरीच्या गृहस्थांनो उचला झाडू व झारा, लागा कामाला. आय होप द जर्नी इज अ हॅपी वन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि घरकाम व स्वयंपाक करता येउ लागल्याने या वर्गाचे सगळे प्रश्न त्याला कळणे याबद्दल हे चालले आहे.>>>>>> फा, कुंडलकरनी ते वाक्य मुर्खासारखं लिहिलं म्हणून फक्त तेच वाक्य धरुन तोच रंग अख्ख्या लेखाला कसं काय देऊ शकतो आपण?

अ‍ॅमी, तुमच्या डोक्यात असलेला (आणि डोक्यात जात असलेला) कोणतातरी एक स्त्री वर्ग तुम्ही आणून येथे ओतला आहे.>>>>>> ह्याचे कॉन्वर्स म्हणा की काय फा पण तुम्ही तुम्ही तुमच्या डोक्यात असलेल्या एका स्त्रीवर्गाच्या प्रतिमेला अनुसरुन तर नाही ना हा विरोध करत आहात? Happy

आपल्या इथे पद्धतच आहे, आई, आजी, वडिल, आजोबा आणि त्यांच्या महत्वाविषयी कोणी अवाक्षर काढलं की पबलिक धाऊन येतं अंगावर. Lol डोळे, कान अन डोकं बंद होतं.
(हे जनरल म्हणतोय, तुला उद्देशून नाही म्हणत आहे फा Happy )

कुंडलकरांना बोलावून एक गूगल टॉक करून टाका - काय तो सोक्षमोक्ष लागेल.

फा, तू घे पुढाकार, तुझा नातेवाईक ना तो?

>>> कुंडलकरनी ते वाक्य मुर्खासारखं लिहिलं म्हणून फक्त तेच वाक्य धरुन
अहो, ओपनिंग स्टेटमेन्ट आहे ते. पुढच्या लेखाचा टोन सेट होतो त्याने. नवशिक्या लेखकालाही माहीत असायला हवं की निदान ओपनिंग मूर्खासारखं (माझा नाही, तुमचा शब्द!) असू नये.

बुवा, अ‍ॅमी यांनी जे १०-१५ पॉइण्ट्स लिहीले आहेत त्यातले "या स्त्रिया घरी काम करत नाहीत" हा पॉइण्ट सोडला, तर मूळ लेखात बाकी कसलाही उल्लेख नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या (अ‍ॅमी यांच्या) डोक्यात असलेली एक प्रतिमा उभी करून त्याला झोडले आहे असे मी म्हणतोय. क्लासिक स्ट्रॉमॅन. विशेषतः ते स्त्रीवाद वाले मुद्दे. ते तर पूर्ण टॅण्जेण्ट आहेत - त्या लेखाला.

मग मी तेच करतोय का असे तुम्ही विचारताय तर हे - मूळ लेखात "पूर्णवेळ गृहिणी" हा उल्लेख आहे. मी त्याच स्त्रियांबद्दल बोलतोय. मग त्याने दुसर्‍या लेखांत अशा स्त्रियाच त्याच्या आजूबाजूला नव्हत्या असे लिहीले.

त्यामुळे उलट त्या लेखाचे समर्थन करणार्‍यांच्या बाबतीत जे आडातच नाही ते पोहर्‍यात आले आहे Happy

त्याला महित असायला हवं होतं हे ठीक आहे. पण मी आधी लिहिलय तसं, मी वाचायला सुरवात केली, पुढे पुढे वाचावासा वाटला म्हणून वाचला आणि त्यातलं सारकाजम जरा जास्त झालं असं वाटलं तरी बरेच मुद्दे पटले. आणि त्या करताच लेखातल्या काही तृटी मी स्ट्राईड मध्ये घेतल्या (स्वेच्छेने) आणि अर्थातच त्या तृटींमुळे सगळा लेख पॉईंटलेस आहे असंही नाही.

फा, अ‍ॅमी ह्यांनी मुद्दे एक्स्टेंड केले आहेत. हे सगळं क्लासिक बिहेवियर आहे ह्या कॅटेगरीचं. तुला मुद्दे पटत नाहीत कुंडलकरांचे किंवा तशी कॅटेगरी होती/आहे हे मान्य नसल्यामुळे तुला स्ट्रॉमॅन वाटणं सहाजिक आहे.

"स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला. ‘‘मी तुमच्यासाठी इतके केले, मी होते म्हणून हे घर वर आले, मी हाडाची काडे करून, कोंडय़ाचा मांडा करून तुम्हाला वाढवले, मी होते म्हणून चार पैसे बाजूला तरी पडले, नाही तर तुझ्या वडिलांच्याने काही होणार नव्हते, मी एका साडीवर आणि चार काळ्या मण्यांवर हा संसार ओढला, मी खमकी निघाले म्हणून घरातील चांदीची का होईना, चार भांडी तुझ्या नावावर झाली, मी रात्री-अपरात्री पन्नास-पन्नास पोळ्या करून ह्यंनी जमवलेल्या गर्दीला जेवायला घातले आहे, मी कधी बाजारातून हळद आणली नाही, हळकुंडे फोडून माझे हात फाटले म्हणून ही चव आहे जेवणाला.. उगीच नाही, तुझ्या वडिलांचे काही सांगू नकोस, ते दिसतात तसे साधे नाहीत, तुम्ही लहान असताना मी कशाकशातून गेले याची कल्पना नाही तुम्हाला..’’ अशी अनेक सुंदर वाक्ये माझ्या लहानपणी आजूबाजूला दुपारच्या रिकाम्या शेकडो घरांमध्ये तरंगत असत- ती हळूहळू काळानुसार विझून गेली."
ह्या पहिल्या पॅरा मध्ये तो, त्याच्या आजूबाजूच्या घरात काय वाक्यं एकू यायची त्या बद्दल लिहितो आणि पुढे दुसर्‍या भागात त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक सर्कल मध्ये म्हणजे नातेवाईक, मित्र परिवारात त्याला ह्या कॅटेगरी मधल्या स्त्रिया कधीच दिसल्या नाही असं म्हणत आहे. ह्यात कुठे मला विरोधाभास दिसत नाही.
अजून एक म्हणजे, गृहिणी असं ह्या कॅटेगरीला नाव जरी त्यानी दिलं तरी पुढे त्यांच्या खास कॅरेक्टरिस्टिक्स त्यानी दिल्या आहेत. ह्यात मी आधीच्या पोस्ट मध्ये लिहिल तशी उदाहरणं हे एक्सेप्शन्स म्हणून असतील पण ओवरॉल त्यानी बरोबर ताडली आहे ही कॅटेगरी.

बरोबर Happy लॉक नेस मॉन्स्टर ची आठवण झाली. प्रत्येक जण आपापल्या घरातले, पाहण्यातले स्त्री चे चित्र घेऊन त्याला "गृहिणी" नाव देत सुटलेत. अमक्याला गृहिणी तीन पाय सहा हात अशी दिसतेय तर तमक्याने हात पाय नसलेली, आठ हात लांब, आगीचे फुत्कार सोडनारी ग्रूहिणी पाहिलेली आहे त्यामुळे त्याला पहिल्याचे निरीक्षण मान्य कसे होणार ?! Lol

अशी अनेक सुंदर वाक्ये माझ्या लहानपणी आजूबाजूला दुपारच्या रिकाम्या शेकडो घरांमध्ये तरंगत असत- ती हळूहळू काळानुसार विझून गेली.>> हे मला पण पटलं. अशी वाक्य बोलणार्‍या ग्रुहिणी खरचं हल्ली फारश्या दिसत नाहीत माझ्या आजू-बाजूला. म्हणजे माझ्या आई/मावश्यांच्या पिढीतल्या बर्‍याच बायका अश्या तर्‍हेची बडबड अजूनही करतात. पण माझ्या वयाच्या बायका क्वचितच असं काही बोलताना आढळतात. कदाचित संसाराची काही ठराविक वर्ष उलटली की बायका अशी वाक्य बोलायला लागत असाव्यात. आणि मी आणि माझ्या मैत्रिणी अजून त्या cutoff period ला पोचलो नाही. अशीही एक शक्यता वाटते.

@मैत्रेयी > > Lol

Stockholm syndrome झालेल्या बायका असतात या.
चंद्रावर जा पण भाकरी करता आली पाहिजे ही मानसिकता.

आणि आपल्यावर अन्याय झालाय याची जाणीवही नसते त्यांना म्हणून कुंडलकरांना वाटतो तसा मला द्वेष वाटत नाही त्यांचा उलट दया येते.
मालक आपली आस्थेनि चौ़कशी करतोय आणि नवीन ग्लोव्ह मास्क आणून देतोय यात समाधान मानणं सफाई कामगाराचा मूर्खपणा आहे. भाऊ मी तुझ्यासारखा एसी हापिसात बसून काम करतोय आणि आपापल्या एरियाची सफाई आपण आपापली करतोय अशी वेळ कधी येणार? मला तुझे प्रश्न समजून घ्यायचे आहेत असं मी enabler च्या पोझिशनवरून तुला आस्थेने कधी विचारणार? मला तुझ्याइतका किंवा जास्त पगार कधी मिळणार- हे प्रश्न पडले पाहिजेत.

विरोधाभास नाहीत? हे घ्या अजून एक. वरती एक ऑलरेडी दिलाय.

लेख-१
ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात.....हातात दिलेली चकली किंवा करंजी मुकाटय़ाने चाखत आपल्या आया दुपारी एकटीने घरात जी बडबड करतात, ती बडबड ऐकणारी आमची पिढी ही शेवटचीच असावी

आमच्या लहानपणी खूप गृहिणी असत. आता पूर्णवेळ गृहिणी हा प्रकार तसा कमी होत जातो आहे

लेख-२
मी निर्णय न घेणाऱ्या आणि दुसऱ्याच्या कष्टांवर किंवा नुसतेच नवऱ्याच्या कमाईवर आयुष्य काढणाऱ्या बायका घरीही पाहिल्या नाहीत आणि आजूबाजूच्या समाजातही नाही. मी ज्या वातावरणात आणि आर्थिक व सामाजिक संस्कृतीत वाढलो त्यात बायका पैसे कमवायला घराबाहेर पडत होत्या. पूर्णवेळ गृहिणी म्हणून घरी बसून स्वत:च्या सुखाची किंवा दु:खाची अंडी उबवत बसणाऱ्या बायका प्राणिसंग्रहालयात पाहायला जावे तशा दुर्मीळ असत

मालक आपली आस्थेनि चौ़कशी करतोय आणि नवीन ग्लोव्ह मास्क आणून देतोय यात समाधान मानणं सफाई कामगाराचा मूर्खपणा आहे. भाऊ मी तुझ्यासारखा एसी हापिसात बसून काम करतोय आणि आपापल्या एरियाची सफाई आपण आपापली करतोय अशी वेळ कधी येणार? मला तुझे प्रश्न समजून घ्यायचे आहेत असं मी enabler च्या पोझिशनवरून तुला आस्थेने कधी विचारणार? मला तुझ्याइतका किंवा जास्त पगार कधी मिळणार- हे प्रश्न पडले पाहिजेत. >>>>> सनव , हे लॉजिक गंडलेले वाटते. सफाई कामगाराची गृहिणीशी तुलना करत नाही ना आपण ? आय होप नॉट!!
सफाई कामगार हा डिफाइन्ड जॉब आहे. सफाई हेच काम असताना वर्कींग कडिशन्स चांगल्या, सेफ असणे आणि चांगले ट्रीट केले जाणे हे चांगलेच आहे की. एसीत बसून तो जॉब कसा करता येईल ? मॅनेजर इतका पगार कसा मिळेल ?
गृहिणीचे तसे नसते ना!! डिफाइन्ड ड्यूटीज नाहीत आणि त्यामुळे पर्क्स पण डिफाइन्ड नाहीत. त्यामुळे काम घरातल्या मॅनेजर, ते सफाई कामगार यातले कितीही असू शकतं आणि पर्क्स सफाई कामगाराइतके पण नसू शकतात हेच तर दुखणं असतं ना!! यात प्रचंड व्हेरिएबल्स आहेत. 'गृहिणी' या एकाच नावाखाली गृहिणी असलेल्या सगळ्या प्रकारच्या स्त्रिया बसत नाहीत !

पण माझ्या वयाच्या बायका क्वचितच असं काही बोलताना आढळतात>>>
माजघरातल्या बडबडीची जागा आता फेसबुकी बडबडीने घेतली आहे एवढंच. या बायकांचं व्यवच्छेदक लक्षण सांगायचं झालं तर उच्चवर्गीय, उच्चशिक्षित आणि चांगल्या करीयरमध्ये असूनही स्वतः काहीतरी करून दाखवण्याऐवजी भौतिक स्वार्थासाठी (श्रीमंत घरात सून किंवा फारेनला जायला भेटणे) भुक्कड करीयर असणार्‍या नवर्‍यामागून जाऊन स्वतःच्या करीयरचा आणि स्वातंत्र्याचा बळी स्वतःहून देतात. यात म्हटलं तर चुकीचं असं काही नाही, पण नंतर आपल्या गुणवत्तेच्या तुलनेत आपल्या गृहिणी असण्याचा उगाच न्यूनगंड बाळगतात आणि आपल्या परिस्थितीला आपला चॉईस नव्हे तर 'समाज' किंवा 'सासरचे लोक' किंवा 'एच४ स्टॅटस' असली दिल को बहलानेवाली कारणं शोधत रहातात. यथावकाश यांना स्त्रीवादाचा किडा चावतो आणि मग नवर्‍याचा डबा करून देऊन त्याला ऑफिसात पाठवल्यावर 'ओप्रा' किंवा 'एलेन' चालू व्हायच्या वेळेपर्यंत इंटरनेटवरून स्त्रीवादी फूत्कार सोडत 'स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी' या जुन्याच गाण्याचा नवीन रिमिक्स सादर करत बसतात. 'स्त्रीवादी म्हणवून घेणार्‍या या बायका स्वतः स्त्रीवादाचा मूर्तीमंत पराभव आहेत' हे निरीक्षण स्पॉट ऑन आहे.
रिक्षा चालवणे, कंडक्टर असली कामे करून पुरुषी बालेकिल्ले उध्वस्त करणार्‍या स्त्रिया, आपला बेवडा नवरा हा केवळ इतर पुरुषांना दूर ठेवण्यासाठीचे बुजगावणे आहे हे ओळखून मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढणार्‍या बायका, फार काय उपद्रवी इन-लॉज, पोरांचे डबे, घरात काडीची मदत न करणारे नवरोबा, ऑफिसातले राजकारण या सर्व आघाड्यांचा दर दिवशी समर्थपणे सामना करत असलेल्या हजारो मध्यमवर्गीय चाकरमान्या यांच्याशी असल्या बेगडी स्त्रीवाद्यांचा दूरान्वयाने संबध नसतो.
ज्यांना अशा बायका दिसत नाहीत त्यांना त्या स्ट्रॉ मॅन वाटत असतील तर वाटूदे बापड्या Wink

ज्यांना अशा बायका दिसत नाहीत त्यांना त्या स्ट्रॉ मॅन वाटत असतील >>>
Lol बायका स्ट्रॉमॅन नसतात हो. त्या ज्या काय आहेत त्या असतील. मुद्दा स्ट्रॉमॅन असतो. स.कुं ने दुसर्‍या लेखात बेगडी स्त्रीवाद्यांबद्दल जे लिहीले आहे ते आणि त्याने पहिल्या लेखात गृहिणींबद्दल जे लिहीले आहे त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

बरोबर Happy लॉक नेस मॉन्स्टर ची आठवण झाली. प्रत्येक जण आपापल्या घरातले, पाहण्यातले स्त्री चे चित्र घेऊन त्याला "गृहिणी" नाव देत सुटलेत. >>>>> Lol जोक्स अपार्ट, मला नाही वाटत. पोकळ वॅलिडेशन वर आपल्या अस्तित्वाचे महत्व सतत पटवून देत राहणे हा कॉमन डिनॉमिनेटर आहे. हे ह्या कॅटेगरीचे क्लासिक लक्षण आहे. This behavior is more common in this gruhini category and he has used that to define them. That's where we have a divide among us as not everyone believes this is the case.

फा, आलं लक्षात. आधी वाचलं तेव्हा हा मुद्दा लक्षत आला होता. मी लेख १: तो स्वतः अगदी लहान म्हणजे शाळेत असताना वगैरे चा काळ आणि लेख २ पुढे तो कॉलेज वगैरे ला जायला लागला तेव्हाचा काळ असं गृहित धरलं.
वाचणार्‍याचा घोळ होऊ शकतो आणि ही कुडव रिटन इट बेटर हे आधी म्हणालोच आहे.

‘‘मी तुमच्यासाठी इतके केले, मी होते म्हणून हे घर वर आले, मी हाडाची काडे करून, कोंडय़ाचा मांडा करून तुम्हाला वाढवले, मी होते म्हणून चार पैसे बाजूला तरी पडले, नाही तर तुझ्या वडिलांच्याने काही होणार नव्हते, मी एका साडीवर आणि चार काळ्या मण्यांवर हा संसार ओढला, मी खमकी निघाले म्हणून घरातील चांदीची का होईना, चार भांडी तुझ्या नावावर झाली, मी रात्री-अपरात्री पन्नास-पन्नास पोळ्या करून ह्यंनी जमवलेल्या गर्दीला जेवायला घातले आहे, मी कधी बाजारातून हळद आणली नाही, हळकुंडे फोडून माझे हात फाटले म्हणून ही चव आहे जेवणाला.. उगीच नाही, तुझ्या वडिलांचे काही सांगू नकोस, ते दिसतात तसे साधे नाहीत, तुम्ही लहान असताना मी कशाकशातून गेले याची कल्पना नाही तुम्हाला..’’

ह्यात जे जे काही लिहिलय, ते तसं नसताना ह्या बायका नुसतंच म्हणतात असं स.कुं चं मत आहे का? का हे सगळं खरं असतं पण त्यांनी तसं स्वतःच्या तोंडाने म्हणायचं नाही?

अ‍ॅमी यांच्या लिस्ट मधे एक मुद्दा आहे:
• खरंच हिशेब मांडला तर या बायका स्वतःचे अन्न, वस्त्र, निवारा, इतर वर होणारे खर्च स्वतः उचलण्या इतकेही काम करत नसतात.

ह्याचा नक्की अर्थ काय? कसा मांडायचा हिशेब- कामाच्या तासांवर, का दर्जावर, डेडिकेशन वर, का अजून काही?
माझ्या आईने लग्न झाल्यापासून गृहिणी म्हणून जेवढं आणि ज्या दर्जाचं काम आणि जितकं मनापासून केलंय, त्याचा वरील कुठल्याही प्रकारे हिशेब मांडला तर तिचं काँट्रिब्युशन पैसे कमावून आणणार्‍या वडिलांच्या काँट्रिब्युशन एवढंच असेल - आणि हिशेबाच्या पलिकडे जाऊन पाहिलं तर कितीतरी जास्त.

माझी आई स्वतःहून कधीच ह्या बाबतीत "पिरपिर" करत नाही - तिच्या कष्टांना घरात कधीही अप्रिशिएट केलं गेलेलं नसूनही! पण एखाद्या स्त्रीने जर असा पाढा वाचून दाखवला, तर ते मला चुकीचं वाटत नाही -- विशेषतः जेव्हा त्यांना आयुष्यभर गृहित धरून वागवलेलं असतं. (जे लोक काही काम न करता स्वतःचं कौतुक करतात त्यांची गोष्ट वेगळी.)

हं!!

ह्यात जे जे काही लिहिलय, ते तसं नसताना ह्या बायका नुसतंच म्हणतात असं स.कुं चं मत आहे का? >> हो.

ह्याचा नक्की अर्थ काय? कसा मांडायचा हिशेब- कामाच्या तासांवर, का दर्जावर, डेडिकेशन वर, का अजून काही? >> कसाही मांडून बघा. उच्च/ मध्यम वर्ग असेल तर हिशोब जुळत नाही.

माझ्या आईने लग्न झाल्यापासून गृहिणी म्हणून जेवढं आणि ज्या दर्जाचं काम आणि जितकं मनापासून केलंय, त्याचा वरील कुठल्याही प्रकारे हिशेब मांडला तर तिचं काँट्रिब्युशन पैसे कमावून आणणार्या वडिलांच्या काँट्रिब्युशन एवढंच असेल - आणि हिशेबाच्या पलिकडे जाऊन पाहिलं तर कितीतरी जास्त. >> बरं मग? आम्ही काय करायचं??

===
Submitted by π on 20 December, 2017 - 22:48 >> +७८६

आधी ते माबोवर लिहायचे ना? / का?
आता ते जरी माबोवर लिहित नसले तरी इतरत्र लिहिलेले लेख इथे काही काळाने प्रकाशित झाले आहेत.
त्यावर येणार्‍या प्रतिक्रिया वाचत असतील का ते?

त्या सं कु ला मायबोलीचे आवताण द्या. मग बघा कसा त्याला हर्षवायु होईल.
नवीन Submitted by रश्मी.. on 22 December, 2017 - 15:02

उलट इथले प्रतिसाद वाचून कदाचित अर्धांगवायूच होईल.

माझी रिक्षा. उगीच घोळ घालणे आपला स्वभाव नाही. बहिणींनो वाचा व आनंद घ्या.

आता घरी पळते. कुत्रा फिरवायचा आहे. कामे नोकर्‍या करण्यात जन्म गेला function at() { [native code] आता निवृत्ती व रिकामा वेळ हाताशी येउ पाहात आहे तर काय करावे समजत नाही आहे.
पोकळ बांबू घेउन पॅट्रार्कीच्या मागे लागावे किंवा कसे?!

Pages