गृहस्थांनो, ... लागा घरकामाला!

Submitted by अश्विनीमामी on 17 December, 2017 - 01:05

शिक्षण आणि ऑफिसातले काम जमायला लागल्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला. तो म्हणजे पैसे कमावून घर चालवणारे बाप्ये ही जी जागतिक जमात आहे जे ऑफिसचे काम , तिथे करावे लागणारे कष्ट, तिथले टुकार राजकारण व त्यात अनेक क्लिष्ट खेळ्या करून आपण जिंकलेली मात व बॉसचे विश्वासू आदमी असणे, आपण कमविलेल्या पैशातून घर चालले आहे नाहीतर," तुम्ही रस्त्यावरच पडले असता, भीक मागायला लागली असती, तुझ्या आईची अक्कल काय चूल अन मूल, बायकांनी स्वयंपाक घराच्या बाहेर तोंड उघडायचे नाही अन हात चालवाय्चे नाहीत. त्यांची लायकीच नाही. मी आहे म्हणून तुझ्या आईबरोबर संसार केला. नाहीतर मला रेखाने मागणी घातली होती. मी तुझ्या फोटोग्राफी क्लासची फी भरणार नाही. पैसे काय झाडावर लागले आहेत? तीस दिवस खर्डेघाशी करावी तेव्हा एक दिवस पगार मिळतो!!!" अशी मुक्ता फळे रोज आईने केलेले चहा पोहे खाताना फेकणार्‍या घरोघरीच्या बाप व नवरेवर्गा बद्दल उगीचच माजलेला आदर माझ्या डोक्यातून कायमचा नष्ट झाला.

ही वाक्ये व ती येता जाता फेकणारे कळकट पायजमा व पिवळा बनियन घालून मुलींकडे नजरा टाकत अंग खाजवत फिर णारे पुरुषोत्तम हळूहळू कमी झाले. दोघांनी नोकर्‍या करून घराचे/ गाडीचे लोन भरायचा जमाना पण य येउन जुना झाला. संपलाच. आता प्रीनप व टीटीएम एम चालते.

मी पण एंट्री लेव्हलच्या नोकर्‍या करता करता अनुभव, छोटी छोटी ट्रेनिंगे घेउन कामात एक एक लेव्हल पुढे गेले. सहि ष्णू, आत्मविश्वासाने स्त्रियांच्या हाती काम सोपवणारे, ती करेल नीट असे इतरांना ठमकावून सांगणारे
खमके अनुभवी व संयमी पुरुष बॉस भेटल्याने माझी प्रगती होतच गेली आणि आई नोकरी करते पैसे वाचवते
बारीक सारीक खर्च पण करते ह्या पुढे जाउन मी करिअरिस्ट व आर्थिक दृ ष्ट्या स्वतंत्र की हो झाले.

पैसे मिळ्वायचे बाप्यांचे ऑफिसातले काम तुम्हाला शिक्षण व अनुभव ह्यांच्या जोरावर येउ लागले कि त्यांच्याबद्दल
वाटणारा भययुक्त आदर गळून जातो. स्वप्नातला राजकुमार पांढर्‍या शुभ्र घोड्यावरून येतो. व आपल्याला
एका स्मूथ जेस्चर मध्ये उचलून घेतो. सो फार सो गुड.

मग त्याच्या मागे त्याच्या घराचे, कुटुंबाचे, घरातल्या सतराशे साठ प्रथांचे, वाण व्रते : ऑमच्या इथे अस्स्संच लागतं, फोडणी तश्शीच लागते असे तोंड घोळ्वून सांग णा र्‍या आजे आते सासवा, चुलत नणंदा, हे सर्व लटांबर मागून बैलगाडीतून येते. आपल्या स्वप्नांचा लग्नाच्या वेदीवर बळी जातो. सर्जनशीलता, मॅनेजमेंट स्किलस, कोडिंग डिझायनीं ग अ‍ॅबिलिटीज, प्रेझेंटेशन स्किल्स पीपल स्किल्स ह्याचेलटांबराला देणे घेणे नसते. सर्वांची बोळवण फक्त " ती लग्नानंतर पण जॉब करते!! " ह्या एका वाक्या त होते. व नंतर तुच्छ कटाक्ष!! घरचे सांभाळून काय कराय्चे ते करा. पगार एक तारखेला माझ्या हातात पाहिजे. तुला कश्याला लागतात खर्चाला पैसे!! अय्या वहिनी तुला रांगोळी नाही येत? अश्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो.

तुम्हाला तुमचे काम समजले ते नीट करता येउ लागले व त्याचा रास्त मोबदला बँकेत जमा होउ लागला की तुमचे
आयुष्यातल्या पुरुषांबद्दलचे भाव् निक समीकरण बदलते. सर्व पत्ते त्यांच्या हातात असलेली निर्णय प्रक्रिया आता तुम्ही तुमच्या हातात घेउ शकता व परिस्थितीनुसार मान न तुकवता मना प्रमाणे व तुमच्या मते योग्य निर्णय घेउ शकता. शिकिवनारा बाबा लागत नाही.

आम्ही बायका स्वभावाने पुरु ष द्वेष्ट्या नसतो. अनुभवाने त्यांच्या बद्दल प्रेम, आनंद, किळस, राग अश्या भावना वाटतात त्याही अनेक वेळा दाबूनच ठेवल्या जातात. पण एकेक् पुरुष आयुष्यात चालवून घेणे कधी कधी फार वैतागवाणे होते. नोट .मी जनरलजायझेशन केलेले नाही त्यामुळे असा प्रतिसाद देउ नये. त्यांचे ते फ्रॅजाइल इगोज, सारखा सारखा येणारा राग, कंट्रोल मध्ये न राहणारी लैंगिक भावना, नकार समजू न शकणे, मारहाण करणे व्हरबल अब्युज ह्याला ते फक्त पुरूष आहेत म्हणून जीवनात काही स्थान द्यावे असे मात्र मला आता वाटत नाही. अनेक उदारमतवादी, व कंट्रोल मध्ये असलेल्या सॉर्टेड बाप्यां बरोबर युजफुल इंटर अ‍ॅक्षन आहे माझी. पण
माझी सुपि रिऑरिटी चाल्वूनच घेतलीच पाहिजे अश्या मानसिकतेतून जगावर स्वारी ़ करणारे घरोघरीचे राजाबेटा,
पतिपरमेश्वर, भाउ रायाज ह्यांना माझे एक आवाहन आहे. खालील कामे लिंग निरपेक्ष आहेत. बाई किंवा बाप्या
कोणी ही करू शकतात असे जालावरील एका पोरगेल्या काकांनी नुकतेच वर्तवले आहे.
१) घर स्वच्छ करणे व आवरणे
२) स्वयंपाक ( चहा व खाणे जेवण ) घरातील सर्वां साठी करणे रोज तीन वेळा.
३) पाळणाघरातील व शाळेतील मुलाना आणणे सोड णे, मुले आजारी पडल्यास रजा घेउन घरी त्यांच्या बरोबर
थांबणे औषधपाणी करणे.
४) बाजारहाट, बागकाम करणे
५) वॉशिंग मशीन, डिशवॉशर लो ड करणे व कपडे घडी करून भांडी सुकवून जाग्याला ठेवणे
६) घरातील ज्ये ष्ठांची देख भाल
७) पडेल ते!!
घर दोघांचे असते व कामही. हे आता रिसर्च करून प्रूव झालेले आहे. त्यामुळे घरोघरीच्या गृहस्थांनो उचला झाडू व झारा, लागा कामाला. आय होप द जर्नी इज अ हॅपी वन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख जहाल आहे पण याच्या मागील कंटेक्स्ट असलेला मूळ लेख माहीत असल्याने काही मुद्दे रिलेट झाले.
तो लेख ज्यांनी वाचलेला नाही त्यांना हा लेख त्या लेखाच्या भाषेत आणि सुरात, शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हे न कळून काही अति जहाल प्रतिसाद येऊ शकतात.

लेख आवडला,

एक मात्र माझे ऑफिसमधील निरीक्षण - आमच्या ऑफिसमध्य काही ईंजिनीअर मॅनेजर सिनिअर लेव्हलच्या विवाहीत बायका आहेत. त्या ऑफिस कामात हाताखालच्या पुरुषांवर बरोबर बॉसिंग करत त्यांच्याकडून काम करवून घेतात. पण लंच टेबलवर याच बायका टोटल घरगुती गप्प्पा, नणंद भावजय सासू आणि प्रथा परंपरा स्वयंपाक घरकाम अश्या गप्पा मारताना ऐकतो त्यावरून जाणवते की यांचे घरातले स्थान अजून तेच आहे. ऑफिसातील एका डॅशिंग लीडरोलमध्ये काम करणार्‍या बाईला तिची सासू दोन मुली झाल्या म्हणून सुनावते, माझा मुलगा डायपर बदलणार नाही असे सांगते आणि तिला ते कबूल करावे लागते. आणि त्यात हे लव्हमॅरेज बरे का... एकदा तिचे असे दुखडे ऐकून मी सहज बोललेलो, अरे एवढा त्रास आहे तर नवर्‍याला सोडून दे ना.. मी हे अ‍ॅक्चुअली सिरीअसली बोललो होतो. कारण तिच्यासारखी बाई असा विचार करू शकत नाही तर ईतरांकडून अपेक्षाच नको असे मला वाटलेले.. पण झाले उलटच.. ती हे ऐकून चिडली.. संसार आहे तो कसाही असेल तरी आम्हालाच पडते घेऊन सांभाळावेच लागते, पोरांची काळजी वगैरे वगैरे.... मी विषय वाढवला नाही. कारण एकतर ती स्त्री आणि दुसरे मला सिनिअर..

असो,
तर सांगायचा मुद्दा, आजच्या कित्येक स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनेच कर्तुत्व दाखवतात हे खरे असले तरी त्या बळावर घरात पुरुषांच्या जोडीने स्थान मिळवावे हे अजून त्यापैकी कित्येक स्त्रियांना जमले नाहीये. अजून ही परीस्थिती बदलणे बाकी आहे.

अवांतर - मूळ लेख नक्की कुठला, कोणीतरी हिटही द्या ना यार..

ओह.. ईथला लेख.. आणि मी मायबोलीवरचा समजत होतो.
बाकी तो लेख मला फुल्ल बाऊन्सर गेला.. अर्ध्यावरच सोडला..

त्याखालची एक प्रतिक्रिया मात्र मजेशीर वाटली...
Shubhangi
Dec 4, 2017 at 2:16 am
हा लेख वाचायचा निर्णय माझा असून त्यामुळे आलेल्या भिकार अनुभवाची जबाबदारी संपूर्णपणे माझी- इति मी एक भारतीय स्त्री
Happy

< स्वत:च्या निर्णयाची आणि आपण ज्यातून गेलो त्या चांगल्या-वाईट अनुभवांची शंभर टक्के जबाबदारी स्वत: घेणाऱ्या अनेक मुलींच्या सहवासात मी राहतो आणि काम करतो.>
लेखातल्या या वाक्यावरची कमेंट आहे ती.

लेख बराच विस्कळित झाला आहे.पुरुषाची लैंगिकता कंट्रोलमध्ये नसते हा बेछुट आरोप करुन काय साध्य झाले ते कळले नाही व त्याचा घरकामाशी संबंध काय हे देखिल कळले नाही.
एकंदरीत बायकांची निरीक्षणशक्ती खूप विक असते हे असे लेख वाचल्यावर जाणवते.
पुरुषांनी घरकाम करावे या मताचा मी देखिल आहे पण हे करताना बायकांनी पुरुषाचा भारही कमी करण्याचा प्रयत्न करावा.स्त्री पुरुष समान असतील तर घटस्फोट झाल्यास स्त्रीला पोटगी का द्यावी लागते? तशी पोटगी पुरुषाला मिळावी जर स्त्रिने डिव्होर्स फाईल केला असेल तर.

सचीनच्या लेखाबद्दल बरीच उडत उडत चर्चा वाचली होती. त्या लेखामुळे नक्की काय कोणाचे दुखले ते कळत नव्हते. कुणाच्या शेपटीवर पाय पडलाय अजूनही कळलेले नाहीये. एक मात्र कळले की स्री-विरुद्ध-पुरुष हा प्रकार सॉल्लिड टीआरपीवाला आहे. ते एक असो.

हा जमला आहे.
पण मुळात कुंडलकर यांचा लेख चुकीच्या पद्धतीने interpret झाला आहे असं मला वाटतं.
ते गृहिणींची हेटाळणी करतात ते त्यांना त्या अवस्थेतून बाहेर या, तुम्हाला manipulate केलं जातंय हे समजावण्यासाठी.

अन्याय होत असलेल्या घटकाला 'अरे काय तुझी अवस्था' असं म्हणणं म्हणजे त्याचा द्वेष करणं नाही. हां, कुंडलकरांची मांडणी चुकली असावी. मी त्यांची फॅन नाही, अनेकदा त्यांचे लेख अजिबात आवडलेले नाहीत पण सगळीकडे त्यांना उगाच धारेवर धरलं जातंय.
अर्थात, एक independent लेख म्हणून हा अमांचा लेख उत्तम आहेच.

अशी मुक्ता फळे रोज आईने केलेले चहा पोहे खाताना फेकणार्‍या घरोघरीच्या बाप व नवरेवर्गा बद्दल उगीचच माजलेला आदर माझ्या डोक्यातून कायमचा नष्ट झाला.>>>>>

कुंडलकराच्या लेखाची सुरवातही नेमकी अशीच झालीय. त्यात त्याने वर्णन केलेले गृहिणीचे व्यक्तिचित्र लोकांनी 'प्रचंड जनरालाईजेशन' म्हणत टीकेची राळ उडवली. इथे पुरुषांबद्दल तसेच जनरलाईज केलेले असता त्याचे कौतुक..... असो.

काही दुखणे, शेपटीवर पाय पडणे असे शब्द वापरले म्हणजे कुंडलकरांचा तो लेख निर्विवाद उत्तम दर्जेदार वगैरे असून काही लोक केवळ पोटदुखी, जळजळ इ. मुळे लेखाला नावे ठेवत आहेत असे म्हणायचेय का नानाकळा ? तो लेख एक लेखन, विचार म्हणून मुळीच न आवडणे हे कारणही असू शकते ना Happy

इथे पुरुषांबद्दल तसेच जनरलाईज केलेले असता त्याचे कौतुक..... असो.
>>>>>
हा विडंबन/ प्रत्युत्तर लेख असल्याने त्या भाषेत आहे. मूळ लेख अमांचा असता तर तो असा नसता ना..

स्त्री विरुद्ध पुरुष ह्यावर अजूनही लेख संपले का नाहीत यावर आश्चर्य वाटते. हा विषय सुद्धा चघळून चोथा झालेला आहे. कालानुरूप योग्य ते बदल होत आहेत आणि त्यामुळेच आज स्त्री सुद्धा पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते आहे. आणि याचे श्रेय पुरुषांनाच जास्त आहे. ज्योतिबा फुले, राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे ही काही उदाहरणे. त्याचप्रमाणे आजची पिढी ही आधीपेक्षा बरीच समंजस आहे. आज घरात जिथे दोघेही नोकरी करतात तिथे बऱ्याच घरामध्ये पुरुषही कामाला मदत करतात असे माझे मत आहे...निदान मध्यमवर्गीयात तरी. असो.
स्त्री आणि पुरुष हे या विश्वाच्या गाड्याची दोन सामान चाके आहेत. कोणीही छोटा अथवा मोठा नाही किंवा मित्र अथवा शत्रू नाही. खर तर बव्हंशी एक स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची अहितचिंतक (शत्रू हा शब्द मुद्दामूनच वापरला नाही) असते. आज पुरुषांनी स्त्री बाबत काही बदल जेवढ्या सहजतेने स्वीकारले आहेत (जसे कि घरकाम किंवा इतर तत्सम कामे) तेवढे सहज बदल अजूनही सासू-सून, नणंद-भावजय यांच्या नात्यामध्ये आलेले नाहीत. तिथे अजूनही जळफळाट, टोमणे मारणे, छळ करणे, काड्या लावणे, विनाकारण स्पर्धा करणे असे प्रकार होताच आहेत. आजकालच्या डेली सोप मुले तर यात अजूनही भर पडत आहे (आणि असे सीरिअल बनवणारी पण एक स्त्रीच आहे) त्यामुळे प्रबोधनाची खरी गरज तिथे जास्त आहे असे मला वाटते.

पण मुळात कुंडलकर यांचा लेख चुकीच्या पद्धतीने interpret झाला आहे असं मला वाटतं.
ते गृहिणींची हेटाळणी करतात ते त्यांना त्या अवस्थेतून बाहेर या, तुम्हाला manipulate केलं जातंय हे समजावण्यासाठी.
>>>>

जर त्यांचा खरेच हा हेतू असेल तर लेखाची मांडणी आणि शैली फारच गंडली आहे. तो लेख टीआरपीसाठी काड्या कराव्यात असा वाटला.. अर्थात, मी अर्ध्यावरच सोडला.. शेवटाला ट्विस्ट दिला असेल तर कल्पना नाही Happy

पुरुषाची लैंगिकता कंट्रोलमध्ये नसते हा बेछुट आरोप करुन काय साध्य झाले ते कळले नाही
>>>>>
हे खरेच असते का यावर स्वतंत्र धागा निघाला तर मजा येईल
कारण पौगंडावस्थेत असताना आम्हा मुलांच्यात नेहमी याच्या उलट अफवा पसरायच्या Happy

विषय 'स्त्री विरुद्ध पुरुष' असा नसून 'ह्या, मी पण केला स्वयंपाक, सोप्पा आहे, या रिकामटेकड्या बाया काय पिढ्यानुपिढ्या रडतायत आणि बोलून दाखवतायत' हा आहे.स्त्री वाद म्हणजे पुरुषांना शिव्या घालणे किंवा सतत लाटणी मारत राहणे असा अजिबात नाही.जनरल मध्ये जे इश्यू अंडर एस्टीमेट केले गेले त्यावर बोलणे, खरंच शोषण होत असेल तिथे आपल्या आवाक्यातल्या ऍक्शन घेणे आणि या सगळ्यात अपरिहार्य म्हणून एका अति लहान परसेंटेज अन्यायी वर्गास शब्द किंवा लाटणी (ज्याने काम होईल ते) मारावी लागली तरी मागे न हटणे असा घ्यायला हरकत नाही. आणि याचबरोबर 'बाहेरची कामं त्याचीच आहेत मी का करु' आणि 'घरातल्या कामात एक काडी तिकडे करत नाही' हे दोन्ही एकाचवेळी वापरून डबल स्टॅण्डर्ड न दाखवणे ही रिस्पॉन्सीबिलिटी येतेच.

परत एकदा, एकट्या पुरता टुमदार स्वयंपाक करून 'हे सोप्पं काम आहे' असं कांकल्युड करून बायांना मूर्खांत काढण्यापेक्षा एखादा महिना अनेक बाया करतात ते पूर्ण मल्टी टास्किंग(स्वयंपाक+त्यात मुलांना चालणारे+ज्येना ना चालणारे+त्या दिवशीच्या उपलब्ध वेळात करायला सोपे असणारे+घरात सर्व इन्व्हेंटरी रेडी असणारे बनवणे+क्लीन अप+बाई काचेची भांडी/पाण्याची भांडी/नॉन स्टिक भांडी नीट घासत नसेल तर हाताबरोबर काढून टाकणे+कपडे मशीन ला टाकणे+वाळलेले कपडे घडी इस्त्री सॉर्टइंग+दुसर्या दिवशी ची तयारी+पसारा आवरणे+पाव्हणे/सुतार/पलंबर/इस्त्री वाला+गॅस वाला+कुरियर वाला एकेका दिवशी एंटरटेन करणे+बाहेरची कामं(बँक आधार कार्ड वगैरे वगैरे)+मूल किंवा मुले यांच्या बशी येण्या आधी कामं आवरणे वगैरे रोज करून पाहावे आणि मग आपण कितीदा किती लोकांना ते बोलून दाखवू याचा काऊंट इतरांना ठेवायला सांगावा.

डिस्क्लेमर: हल्ली खुप घरात पुरुष ही कामं, बेबी सिटिंग पण आनंदाने करताना दिसतात.खूप चांगली मंडळी भेटली आहेत.पण म्हणून समग्र देशात परिस्थिती बदलली आणि बाया मेल्या आरामात बसून पाय चेपवून घेऊन आक्रस्ताळेपणि फेसबुकवर टाईमपास करतात असे चित्र उपरोधात मांडून त्यावर काहीही बॅक फायर येणार नाहीत, शेपट्यावर पाय पडले तरी तोंडं गप गुमान डोलत राहतील असंही समजू नये.

>>स्त्री आणि पुरुष हे या विश्वाच्या गाड्याची दोन सामान चाके आहेत. कोणीही छोटा अथवा मोठा नाही किंवा मित्र अथवा शत्रू नाही. >> कूटस्थ, तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती बदलते आहे. पण अजून खूप वेळ जावा लागेल. बायका नोकरी करुन घर मॅनेज करतात, पुरूष थोडाफार हातभार लावत असतीलही त्यात. पण पहाटे उठून डबे करणं, भरणं, बाकीचं घरकाम करुन सकाळची ट्रेन पकडणं, संध्याकाळी घरी येऊन पुन्हा स्वैपाकाचं करणं वगैरे किती पुरूष करतात? मुद्दा हा बायकांकडून केल्या जाणार्‍या अपेक्षांचं ओझं कधी कमी होणार?

षय 'स्त्री विरुद्ध पुरुष' असा नसून 'ह्या, मी पण केला स्वयंपाक, सोप्पा आहे, या रिकामटेकड्या बाया काय पिढ्यानुपिढ्या रडतायत आणि बोलून दाखवतायत' हा आहे.---

घरातली कामं अगदी रॉकेट सायन्स किंवा ब्रेन सर्जरीइतकी कठीण आहेत असं मानलं तरी सायंटिस्ट किंवा सर्जनसारखा कचकून पैसा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. ही कामं करायला मदतनीस बायका लावल्या तरी त्या सर्जनइतका चार्ज घेत नाहीत. एखादा संजीव कपूर स्वयंपाक या व्यवसायातून साम्राज्य निर्माण करतो पण बाकीच्या बायका तेच ते रोज रुटीन काम करत राहतात आणि 'राधिका' प्रमाणे नवर्याने abuse केलं तरी सहनही करतच राहतात.
सामान्य गृहिणीना 'तुम्ही फार ग्रेट बुवा , किती कठीण आणि महान काम आहे घर चालवणं' असं म्हणून शेवटी फुकटच राबवून घेतलं जातं. ऑफिसमध्ये बॉस 'तू फारच ग्रेट हं कसं करतेस गं इतकं मल्टिटास्किंग ' असं कौतुकाने म्हणाला पण महिन्याला पगार दिलाच नाही तर आपण एक दिवस तरी तिथे जाऊ का? त्यामुळे कुंडलकर बरोबर बोलतायत. एकतर घरकाम काही कठीण नाही किंवा बायका हे कठीण काम फुकट करून स्वतः powerless, vulnerable, financially dependent राहत असतील तर त्या मूर्ख आहेत हेच खरं नाही का?

पण पहाटे उठून डबे करणं, भरणं, बाकीचं घरकाम करुन सकाळची ट्रेन पकडणं, संध्याकाळी घरी येऊन पुन्हा स्वैपाकाचं करणं वगैरे किती पुरूष करतात? मुद्दा हा बायकांकडून केल्या जाणार्या अपेक्षांचं ओझं कधी कमी होणार?
नवीन Submitted by सायो on 17 December, 2017 - 17:27
>>
शेकड्यात २०% स्त्रीया कामाला जातात बाकीच्या ८०% पुरुषांवर भारच की.पण शेकड्यात जवळपास सगळे १००% पुरुष कामाला जातातच ,ही उद्यमशीलता बायकांकडे आहे का? स्कील असणे वेगळे व त्याचा वापर करणे वेगळे.
काही शिक्षण आयटी बॅकिंग क्षेत्रं सोडली तर बायका कुठं आहेत म्हणे.कंस्ट्र्कशन ,मायनिंग,इन्फ्रा ,ट्रान्सपोर्ट ,शेती इत्यादी ही सगळी महत्वाची क्षेत्र पुरुष आहेत म्हणून तयार झालीत वा ते तिथं काम करतात म्हणून आहेत.पुरुष घरकाम करायला तयार आहे/असतील पण बायकांनी करीअर निवडताना चेरी पिकींग करु नये.एकाच विश्वाची दोन चाके आहेत तर सगळ्याच जबाबदार्या वाटून घ्याव्यात.
मला ट्रक चालवणार्या ,पिएमटी चालवणार्या प्लंबर फिटर या क्षेत्रात बायकांना बघायला आवडेल ,जेव्हा हे वास्तवात येईल तेव्हा पुरुष सकाळी लवकर उठून डबा करेल आणि लोकल पकडून कामाला जाईल.

त्या लेखाचा दुसरा भाग

त्यावरची ही प्रतिक्रिया मला पटली
ह्या लेखातील काही मुद्दे ा योग्य वाटताहेत. ते स्त्रीवादाच्या साचेबद्ध मांडणीपलिकडे जाणारे, कालसुसंगत आणि भविष्यवेधी आहेत. इतर काही मुद्दे मात्र रागीट शेरेबाजीसारखे आहेत. त्यामुळे एकेक मुद्दा लक्षात घेऊन ह्या लेखाबद्दल चिकित्सक चर्चा करावी लागेल. महाराष्ट्रभरच्या स्त्रीवादी महिलांबद्दल सरसकट एक विधान करणे बरोबर नाही पण हे समाजशास्त्रीय भान बाळगून अधिक नेमकी मांडणी लेखामधे करता आली असती. अशी मांडणी करणारे लेख वर्तमानपत्रात सा वाचायला मिळत नाहीत. भारतातील सुजाण नागरिकांकडे कालसुसंगत असे आत्मभान, विश्वभान काय असावे असा व्यापक विचार करताना ह्या लेखाची दखल घ्यावी लागेल. - सुबोध केंभावी

भरत., हा लेख वाचलेला नाही पण हा भाग कव्हर अप झालाय असं मत ऐकलं.

>>त्यात त्याने वर्णन केलेले गृहिणीचे व्यक्तिचित्र लोकांनी 'प्रचंड जनरालाईजेशन' म्हणत टीकेची राळ उडवली. इथे पुरुषांबद्दल तसेच जनरलाईज केलेले असता त्याचे कौतुक..... असो.>> साधना, हा लेख त्या लेखाचं विडंबन आहे. तसा नसता तर तुझा मुद्दा बरोबर ठरला असता.

Pages