फेसबूक पेटून उठले होते. जंगली मराठी ग्रूपवर नवीन टॉपिक आला होता. दारू जुनीच. बाटली नवीन. विषय गोरक्षकावरून सुरू होऊन तालिबान, ईस्लाम, आतंकवाद, ते ईंदिरा गांधीना सोबत घेत, महात्मा गांधी असा येऊन पोहोचला होता. अहिंसो परमो धर्म: .. अशक्य आहे हे. टोटल हिंसा किंवा टोटल अहिंसा. मधलं काहीतरी जमायला हवे. पण कोणंच ऐकायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे तेच मुद्दे. सोहमच्या डोक्याचा भुगा झाला होता. असह्य होऊन तो उठला आणि किचनमध्ये जाऊन कॉफी उकळवायला ठेवली. कॉफीसोबत त्याच्या आवडत्या कूकीज घ्यायला म्हणून फडताळावरच्या डब्याला हात घातला. पण वीजेचा झटका बसल्यागत हात मागे आला. भिंतीवरून मुंग्यांची एक रांग त्या डब्याला वेटोळे घालून बसली होती. त्या झटकल्याशिवाय डब्बा उघडणे अशक्य होते. एवढ्या मोठ्या संख्येचा नायनाट करणेही अशक्य होते. कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नव्हता. त्याने वैतागून गॅस बंद केला आणि पुन्हा कॉम्प्युटरमध्ये डोके खुपसून बसला. थोडी गाणी ऐकली. थोडे यूट्यूब विडिओ पाहिले. पण फार वेळ राहावले नाही. थोड्यावेळाने पुन्हा जंगली मराठीवर चक्कर टाकली. वीस-पंचवीस नवीन पोस्ट आल्या होत्या. वाद आणखी चिघळला होता. आता तो हिटलरवर पोहोचला होता. त्याने अधाश्यासारख्या सर्व पोस्ट वाचून काढल्या. हिटलरचेही समर्थक आहेत हे पचवणे त्याला जड जात होते. अवघड आहे सारे. पुन्हा एकदा तो या निष्कर्शापर्यंत पोहोचला. पोटातल्या कॉफीच्या तल्लफीने पुन्हा उचल खाल्ली. पण कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नाही. आता तरी त्या मुंग्या आपल्या घरी गेल्या असतील का बघायला म्हणून उठला. पण त्या सुद्धा त्या सोशलसाईटवर पडलेल्या मुंगळ्यासारख्याच चिवट होत्या. हटायलाच तयार नव्हत्या. चरफडत त्याने एकीवर राग काढला. एक वाट सोडून भटकलेल्या मुंगीला बोट दाबून चिरडले. कडाकड तिची हाडे मोडली आणि तिथेच भिंतीला चिकटली. तो हाडं मोडायचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला नाही. पण बोटाला जाणीव झाली. त्या संवेदना थेट मेंदूपर्यंत पोहोचल्या आणि अगदीच क्षुल्लक कारणासाठी एखाद्या निष्पाप जीवाची हत्या हातून घडल्याने त्याचे डोके गरगरू लागले. त्याच अवस्थेत तो पुन्हा कॉम्पुटरवर बसला. पण आता जंगली मराठीवर जायची भिती वाटू लागली. हिंसा, अहिंसा, गोहत्या, एका क्षुद्र मुंगीला चिरडणे, अहिंसो परमो धर्म:, ती माणसांनी माणसांची फोडलेली डोकी, रक्ताच्या चिळकांड्या, कडाकडा मोडलेली हाडे, त्यांचा मेंदूला होणारा त्रास.. डोके आणखी गरगरवून घ्यायचे नव्हते. कॉफीशिवाय पर्याय नव्हता. पण कूकीजशिवाय कॉफीला अर्थ नव्हता. ईतक्यात त्याला आठवले, काल रात्रीच्या चार शिल्लक कुकीज पुन्हा डब्यात भरून ठेवायचा कंटाळा म्हणून तश्याच ओवनमध्ये ठेवल्या होता. त्याने चटकन ओवनकडे धाव घेतली. जाता जाता कॉफीचा गॅस पुन्हा चालू केला. पण ओवनकडे पाहतो तर त्याचा दरवाजा तसाच उघडा होता. अरे देवा, नरम तर पडल्या नसतील. त्याने हाताने दाबून चेक करायला कूकीजकडे हात नेला. आणि पुन्हा झटका बसल्यागत हात मागे आला. पुर्ण प्लेट मुंग्यांनी भरली होती. एखाद्या नवीन मुंगीला प्लेटमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. ओवन ते शेजारची भिंत अशी एक आतबाहेर करणारी मुंग्यांची रांग लागली होती. किती होत्या त्या एकूण. शंभर दोनशे, हजार पाचशे. सहज असतील. आज ना कूकीज नशीबात होत्या ना कॉफी. संतापून ओवनचा दरवाजा त्याने बंद केला आणि एक विचार त्याच्या डोक्यात चमकला. स्विच ऑन केला आणि स्टार्ट बटण दाबले. ओवन तीस सेकंदावर सेट होत चालू झाला. भट्टीने पेट घेतला होता. आपसूक त्याचे हात कानावर गेले, तो आक्रोश त्या किंकाळ्या त्याला ऐकायच्या नव्हत्या. पण कानावर कसलाही आवाज येत नव्हता. मेंदूपर्यंत कोणत्याही संवेदना पोहोचत नव्हत्या. ना मनाला कोणत्या वेदना जाणवत होत्या. कानावरचा हात काढला. पंधरा सेकंद झाले होते. ईतके पुरेसे म्हणत त्याने ओवन बंद केला. दरवाजा उघडला. सर्व मुंग्या निपचित पडल्या होत्या. एक ओला फडका घेऊन त्याने ओवन पुसून घेतला. फडका धुताना मुंग्यांची प्रेतंही वॉशबेसिनमार्गे गंगेला मिळाली. कूकीजना चिकटलेल्या मुंग्यांना खरडवून त्याने साफ केले. त्यांच्याबद्दल आता फक्त सोहमलाच ठाऊक होते. प्लेट धुवून पुसून त्याने कूकीज पुन्हा प्लेटमध्ये ठेवल्या. प्लेट ओवनमध्ये ठेवली. आणि ओवनचा दरवाजा पुन्हा एकदा तसाच किंचित उघडा ठेवून तो कॉप्म्युटरकडे वळला. जंगली मराठीचे पेज रिफ्रेश केले. कोणीतरी आता तिथे हिटलरचा फोटो अपलोड केला होता. मिशीतल्या मिशीत सोहमकडे बघून तो हसत होता...
- ऋन्मेष
मस्त जमली आहे कथा. फारच छान!!
मस्त जमली आहे कथा. फारच छान!!!
मस्त!
मस्त!
मस्तच रे ऋन्मेष!
मस्तच रे ऋन्मेष!
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे _
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे _/\_
note: TLDR at the bottom. (
note: TLDR at the bottom. ( TLDR = Too Long, Don't Read) बोलेतो लय लांब पोस्ट. आपल्या जबाबदारीवर वाचणे.
*
पाप्याला खूप ताप आला.
त्याने अँटीबायोटिक घेतले.
त्याच्या शरीरातले टायफॉईडचे अनेक जीवाणू तडफडून मेले.... पाप्या बरा झाला.
हिटलर हसला.
*
गावात डेंग्यीची साथ आली.
मुन्शीपाल्टीची माणसं येऊन घरोघरीच्या साठवणीच्या पाण्यात औषध टाकले. लक्षावधी डासांच्या अळ्या तडफडून मेल्या.
फॉगिंग मशीन्स आणून धूर धूर केला.. असंख्य प्रणयरत डास-डासिणींनी प्राण सोडला..
हिटलर हसला.
*
सीद्दा लॉजिक हय ना भाय.
अपुन को ज्यू लोग तक्लीफ देता, अपून उन्को मारेगा. मच्छर तक्लीफ देता उस्कू भी मारेगा. या फिर ब्याक्टेरिया.
अब सिद्दा लॉजिक के खिलाफ वाले कुच लोगा हय.
इत्ती ज्यादा अहिंसा के अपुन को पूरा कन्फूज कर देते. इस्कू मत मारो उस्कू मत मारो. जमीन के नीचे लगा वाला फल -आलू/शकरकंद जैसा- उस्कू तो खाऑ भी मत क्यु के वो मांस मच्छी जय्साच होता हय.
मगर इन्ही लोगा बोल्ते, की वो मुसल्मान.. उस्कू जान से मारो, बीबीबच्चोसमेत. क्यून्की ये अपुन की गाय माताकू खाता. वो ख्रिश्चन.. वगैरे.. असो.
एकेक "प्रवचनां"च्या व्हिडिओ क्लिप्स व्हॉट्सॅपवर फिरतात, त्या पाहिल्यात, की माझ्यासारख्या मूर्खांचा जीव खवळतो. बाकी सूज्ञ हिंदूंचाही खवळतो अन ते अहिंसक धर्मगुरूंच्या आर्डरप्रमाणे खवळून कमळाचं बटन दाबतात. दरम्यान स्पॉन्सर्ड तडीपार तिकडं कत्तली करतात. नंतर क्लीन चिट वगैरे. तर ते ही असोच. (उदाहरणार्थ. "Amit Shah was born in a Jain gujrati family.Now you may ask than why he potrays himself as a Sanatan dharmi." भारताच्या घटनेनुसार जैन "धर्म" अल्पसंख्यांक दर्जा मिरवतो. यांना सगळे स्पेशल बेनिफिट्स, इन्क्लूडिंग रिझर्वेशन फ्री शैक्षणिक संस्था, मिळतात)
तर हे झालं ज्यू अन हिटलरचं.
*
आता हिटलर अन हिंसा.
अहिंसा, ही काय असते व का असते, याच्या बेसिकात लोचा असला, की O.P. (ओरिजिनल पोस्टर) ने पाडलाय, असले लेख पडतात, किंवा मुद्दाम पब्लिकच्या अकलेची लेव्हल बघूच जरा, म्हणत पाडले जातात.
गांधींनी एका गालावर मारले तर दुसरा पुढे करा, असे सांगितले, ही संघिष्टांनी सांगितलेली त्यांच्या प्रकृतीला शोभेलशी खोटी बाब. यूट्यूब सर्च करा, गांधी पिक्चरमधे, गांधी एका इंग्रजी पत्रकाराला अहिंसा समजवून सांगताना, येशू ख्रिस्ताने असे सांगितले, ते उर्धृत करतात, त्याची व्हिडिओ क्लिप सापडेल, जे प्रूव्हन रिसर्च व डॉक्युमेंटेड आहे, त्याचे नेहेमीप्रमाणे विकृत वर्णन.
गांधींनी अहिंसा सांगितली.
या देशाला स्वतंत्र करण्यासाठी, इथे ताबा बळकावून बसलेल्या इंग्रजांना हाकलणे गरजेचे होते.
एतद्देशियांत राजनिष्ठा अद्यापही इतकी ठासून भरलेली आहे, की माझ्या राजाने इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले, याचा अर्थ मी त्या इंग्रजांची बाजू घेऊन एतद्देशिय नागरिकांवर अत्याचार केले पाहिजेत, ही मध्ययुगीन संकल्पना इथल्या 'सरकारी नोकरांत' होती, अजूनही आहे.
बंदूक घेऊन इंग्रज मारले असते, तर इतके कोटी भारतीयांसमोर तितके हजार इंग्रज कसे काय टिकले असते? हे ओजस्वी तेजस्वी क्रांतीकारी लॉजिक आजकालच्या "मिलेनियल्स"ना योग्य भासत असले, (प्लस गांधींनी भगतसिंगाचा बळी दिला असे खोटे व्हॉट्सॅप फॉर्वर्ड बनवता येत अस्ले,) तरी त्या १९४७ आधिच्या भारतीय सोशिओइकॉनॉमिक वास्तवाचे त्यांना काडीचेही भान नाही प्लस जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल आहे, हे वास्तव बहुतेकांच्या लक्षात येत नाही.
गांधींनी 'सविनय' कायदेभंग सांगितला. 'अहिंसक' बनून तुमच्यावर "लाठ्या" चालवणार्या हिंदी पोलिसांना उलट मारू नका हे सांगितले. अन त्याच वेळी अत्यंत माजात, पाऊण जगावर वेपन्स अन टेक्नॉलॉजीच्या बळावर राज्य करणार्या इंग्रजांना, "चले जाव!" अशी ऑर्डर दिली. गांधींची अहिंसा म्हणजे गांधीतल्या ध चा ड, अन विलांटीचा उकार करणे नाही. तसे करणे, ही भिक्कारचोट भाजपेयी मानसिकता आहे.
माझ्या देशातल्या "सर्व" नागरिकांना, इन्क्लुडींग पोलिस म्हणून नोकरीतले, अन कारकून म्हणूनही नोकरीतले एतद्देशिय, माझे आहेत. त्यांना इजा नको, म्हणून "अहिंसा".
उदा. जनरल डायर ला विरोध करायला हिंदू महासभा नव्हती आलेली. काँग्रेस होती तिथे.. अन ऑर्डर देणारा डायर होता, तरी गोळ्या झाडणारे कोण होते?..
इतका सिंपल विषय आहे.
अन याच अहिंसेच्या बळावर गांधी, नेहरू अन पटेलही, हिंदू महासभा (आजकालच्या विश्व हिंदू परिषदेचे पूर्वज) अन मुस्लीम लीगने पेटविलेल्या फाळणीच्या दंगलींत रस्त्यावर उतरून आगी विझवत होते..
अन तिकडे
हिटलर ऑलरेडी रडलेला होता.
टीएल डी आर,
टीएल डी आर,
हिटलरने मारलेली माणसं अन तुम्ही मारलेल्या मुंग्या ही तुलना मंदबुद्धी आहे. अन्लेस, तुम्ही स्वतः मुंगी आहात.
अन हो.
अन हो.
कुऋ,
पॅराग्राफ. उर्फ परिच्छेद. गरज आहे.
आरारा संत्र सोलून
आरारा संत्र सोलून भरवल्याबद्दल आभार
आ.रा.रा. ,
आ.रा.रा. ,
प्रतिसाद आवडला.
हिटलरने लाखो ज्यू व गैर ज्यू लोकांना मारणे आणि कोणी मुंग्या मारणे, नॉन व्हेज जेवण करणे किंवा वर डॉक्टरसाहेब म्हणाले तसं रोगाचे जीवाणू मारणे हे सर्व एका लेव्हलला आणून हिटलरचं समर्थन करायचा प्रयत्न आहे का हा? हॉरिबल प्रकार आहे.
आत्ता मात्र हिटलर नाहि तर
आत्ता मात्र हिटलर नाहि तर ऋन्म्या नक्किच खदखदुन हसला असेल...
अहिंसा, ही काय असते व का असते
अहिंसा, ही काय असते व का असते, याच्या बेसिकात लोचा असला, की O.P. (ओरिजिनल पोस्टर) ने पाडलाय, असले लेख पडतात, किंवा मुद्दाम पब्लिकच्या अकलेची लेव्हल बघूच जरा, म्हणत पाडले जातात.
<<
Raaj,
स्वतःलाच कोट करणे, हे चमच्याने भरावण्या साठी असते.
लेव्हल समजली.
नैका?
राज You nailed it
राज You nailed it
आरारा - त्याचं काय आहे
आरारा - त्याचं काय आहे बिगरीच्या मुलाला चौथीचं पुस्तक दिलं तर त्याची जी अवस्था होईल ती तुमची झालेली आहे. पण एक आहे - सवयी प्रमाणे नको तिथे, जमत नसताना बेअकली/असंबद्ध प्रतिसाद देत राहुन माबोवर होणार्या करमणुकिला हातभार लावत जा...
अन हो.
अन हो.
कुऋ,
पॅराग्राफ. उर्फ परिच्छेद. गरज आहे.
>>>>>>>
मुळीच नाही. काही चित्रपटात जसे गाणी नको असतात कारण ते वेगवान कथानकाचा फ्लो घालवतात तसे या कथेत मी जाणीवपूर्वक पॅराग्राफ स्पेस ठेवलीच नाही
note: TLDR at the bottom. (
note: TLDR at the bottom. ( TLDR = Too Long, Don't Read) बोलेतो लय लांब पोस्ट. आपल्या जबाबदारीवर वाचणे.
>>>>>>
हे अवांतर आहे पण तरीही, पोस्ट मोठी असली तरी ती खिळवून ठेवणारी हवी. जे कितीही लांब असली तरी वाचकाला कंटाळा येऊ नये.
हे आपल्या पोस्टसाठी लिहिले नाहीये, तर मी स्वत: अश्या पोस्ट लिहू शकत नाही. किंवा दिर्घकथाही लिहू शकत नाही. कारण फार काळासाठी वाचकाला खिळवून ठेवावे ईतके सामर्थ्य माझ्यात लिखाणात नाहीये.
अवांतर समाप्त
हिटलर सुरू ....
तर सर्वप्रथम आपल्या
तर सर्वप्रथम आपल्या पोस्टबद्दल धन्यवाद.
ते यासाठी की आपण कथेचा आपल्याला लागलेला अर्थ तितक्याच प्रामाणिकपणे मांडला नसता तर मी मला लागलेला अर्थ ईथे सांगायची संधी घेऊ शकलो नसतो.
तसेच आपल्याप्रमाणेच सनव आणि ईतर ज्यांना असाच अर्थ लागला असेल ते देखील असाच चुकीचा अर्थ घेऊन घरी गेले असते जे अत्यंत वाईट झाले असते.
तर हिटलरने केलेल्या हत्या आणि मुंग्यांच्या झालेल्या हत्या, यांची या लेखात तुलना करायचा प्रयत्न आहे हेच मुळात चुकीचे आहे.
तुलना आहे नायकाची स्वत:च स्वत:च्या वागण्याशी. त्याच्या स्वत:च्याच बदललेल्या तत्वांची. जो काही काळापूर्वी सोशलसाईटवरच्या वादाला वैतागला, जो हिंसेच्या आणि हिंसकांच्या समर्थनावर चिडला, त्याने भले संतापाच्या भरात एक मुंगी चिरडली, पण त्यानंतर तिच्यासाठी हळहळला. त्यानेच आणखी त्रास वाढताच शेकडो मुंग्याना क्रूरपणे संपवले. ईतकेच नव्हे तर थंड डोक्याने पुन्हा ट्रॅप सेट केला. कुठून येतो हा अहिंसेचा विचार मनात याचा शोध घ्यायचा प्रयत्न आहे ही एक कथा. यात एकीकडे कथानायक आहे, तर एकीकडे हिटलर. पण दोघांची आपसात तुलना नाहीये. तरीही करायची झाल्यास त्याचे गुणोत्तर १:१००००००००० असेच काहीतरी येईल. जर कथानायकाला "क्ष" निर्दयी म्हटले तर हिटलर "शंभर करोड क्ष" निर्दयी होईल.
चला, आता पुढे जाऊया. दोघेही मान्य करूया. हिटलर होता एक क्रूर स्वार्थी निर्दयी व्यक्ती !
पण हिटलर एकटाच होता?
लाखो निष्पाप जीवांची हत्या करणारा हिटलर हा एकटाच होता? त्याने एकट्यानेच एकेकाला धरून गॅसचेंबरमध्ये कोंबत एकट्यानेच त्यांची तिथे हत्या केली?
तर नाही, जे हिटलरने केले त्यात त्याला साथ देणारे त्याचे सैनिक, साथीदार, त्याला समर्थन देणारी आणि त्याच्या पाठीशी उभी राहणारी देशातील जनता, त्याच्या या पापात सहभागी असलेले एकूण एक जण तितकेच वा कमी अधिक प्रमाणात क्रूर होते, त्या पापात सहभागी होते. ईतिहासात एकट्या हिटलरचे नाव बदनाम आहे आणि त्याच्या साथीदारांची ईतिहासाने व्यक्ती बाय व्यक्ती नोंद ठेवली नाही म्हणून आपण त्या एकेकाबद्दल बोलत नाही ईतकेच. पण या क्रूरतेत ते सारेच भागीदार होते.
आता ईथे एक विनंती - यातून पुन्हा असा चुकीचा अर्थ काढू नका की हजारो जण सामील होते म्हणून हिटलरचा गुन्हा कमी झाला वगैरे वगैरे. असे मला काहीही म्हणायचे नाहीये. मुळात मी ईथे हिटलरच्या पापपुण्याचा हिशोब मांडायला बसलो नाहीयेच. होता हिटलर क्रूरकर्मा. म्हणूनच कथेत जसे गांधीजी अहिंसेचे प्रतीक म्हणून वापरले आहेत तसे तो हिंसेचा प्रतीक म्हणून वापरला आहे.
सांगायचा मुद्द्दा असा की हिटलर हा अपवादाने एकटाच असा क्रूर सणकी नव्हता. तर त्याच्या या कृत्यात हजारो लोकं सामील होते. अश्या हजारो लोकांना ईतकी पराकोटीची हिंसा करावीशी वाटते तेव्हा त्यामागची मानसिकता जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केला आहे?
हिटलरने त्याच्या अनुयायांचा केलेला ब्रेनवॉश किंवा कसाब सारख्या आतंकवाद्याच्या वा काश्मीरी तरुणांचा केला जाणारा ब्रेनवॉश आणि त्यायोगे त्यांना हिंसेसाठी उद्युक्त कसे केले जाते याचा विचार कधी केला आहे?
मुळात माणसाने हिंसेच्या मार्गाला जाण्याचे सर्वात पहिले, प्रबळ आणि महत्वाचे कारण ठाऊक आहे?
... तर माणूस हिंसा करतो, लढतो, झगडतो ते त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी !
क्रमश:
तो पर्यंत आपण या बोल्ड केलेल्या वाक्यावर विचार करा. आपण स्वत:ही डॉक्टरी पेश्यातील छान उदाहरणे दिली आहेतच.
बाकी गांधीजींबद्दल आपण जे लिहिले ते माहिती म्हणून रोचक आहे, धन्यवाद. पण तो विषय ईथे गैरलागू आहे. आपण कथेचा अर्थ काढण्यात चुकल्याने आपण गांधीजींची अहिंसा काय होती, कशी होती हे सांगत बसलात. मोठी पोस्ट त्या नादात झाली. अन्यथा गांधीजींना कथेत फक्त अहिंसेचे प्रतीक म्हणून वापरले होते, जसे त्यांच्याकडे सारी जनता बघते. ईतकेच!
काही वेळा काही कारण नसताना
काही वेळा काही कारण नसताना दुसर्याला संपवावं किंवा त्रास द्यावा अशी विकृती असलेलेही लोक असतात.
हिटलरची विकृती अशी की त्याने लाखो लोक मारले.दुसरा एखादा विकृत व्यक्ती फक्त सोशल साइटवरून लोकांना पकवून विकृत आनन्द मिळवेल. मानसिकता एकच, ability to cause nuisance वेगवेगळी.
@ ऋ
@ ऋ
असे म्हणतात की गीता /ज्ञानेश्वरी जेवढ्या वेळेस वाचाल तेवढ्या प्रत्येक वेळेस वाचकाला वेगवेगळा अर्थबोध होतो. (कृपया या वाक्याच्या मागील माझ्या भावना माबोकरांनी समजून घ्याव्या. यातून नवीन धागा प्रसूती करण्याचा/धागा भरकटवण्याचा अथवा तसे उद्युक्त करण्याचा कोणताही उद्देश नाही. तसे घडल्यास "मी तो नव्हेच" - लखोबा लोखंडे )
तर घडले असे
वरील वैचारिक गुद्दागुद्दी वाचून मला पामराला उगीच असे वाटले की मलाच निटसे रसग्रहण झाले नाही म्हणून लेख पुन्हा वाचला. मला नवीन गवसलेला अर्थ असा
"कथानायक हा ठाम मनोवृत्तीचा नाही त्याचे सहज ब्रेनवाॅश होऊ शकते. "
दोन मिनिटांपूर्वी भुतदया दाखवून सोडून दिलेल्या मुग्यांचा त्याने संहार (?) केला. आणि याला कारणीभूत ठरल्या (फक्त?) नवीन आलेल्या पाचपंचवीस पोस्ट? एवढ्या कचदिलाचा हा नायक आहे.
मी लावलेला अर्थ बरोबर आहे का याचे कृपया विवेचन करावे. उत्तराच्या प्रतीक्षेत.
ऋ, मस्त लिहिली आहेस . खूप
ऋ, मस्त लिहिली आहेस . खूप आवडली.
५०
५०
आरारा, पोस्ट आवडली.
आरारा, पोस्ट आवडली.
असे म्हणतात की गीता
असे म्हणतात की गीता /ज्ञानेश्वरी जेवढ्या वेळेस वाचाल तेवढ्या प्रत्येक वेळेस वाचकाला वेगवेगळा अर्थबोध होतो.
>>>>
_/\_
शक्य आहे ते या कथेच्या बाबत..
आणि असे असल्यास मी काय आपल्याला लागलेल्या अर्थाचे विश्लेषण करणार..
सत्याचा शोध म्हणजे अनंताचा प्रवास. अगदीच दिशा भरकटली तर मार्गदर्शन तेवढे करू शकतो.
वर सनव यांचेच उदाहरण घ्या. काल त्यांनी हि कथा राजकीय चष्म्यातून वाचली आणि मुंग्या मारण्याची तुलना हिटलरने माणसे मारण्याशी होत आहे म्हणत हे तर हिटलरचे उदात्तीकरण असा निश्कर्ष मांडला. पण माझ्या कालच्या पोस्टनंतर कदाचित त्यांनी तो राजकीय चष्मा उतरवून ठेवला आहे असे वाटते. आज त्यांनी अत्यंत सहजतेने हिटलरने माणसे मारायची तुलना सोशलसाईटवर पकवणारयांशी केली. सत्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे.
आता आरारा यांचे सुधारीत मत वाचण्यास उत्सुक
ममो, धन्यवाद
ममो, धन्यवाद
ऋन्मेऽऽष
ऋन्मेऽऽष
तुझ्या २-३ पोस्ट्स वाचल्या वाचलेल्यापैकी आवर्जून रिप्लाय द्यावा अशी हि एक (च?) आहे. मला बाकीच्यांसारखं मस्त आहे असं म्हणता येणार नाही उलट सुन्न करणारी आहे असे म्हणेन. सर्वार्थाने corelate करू शकले मी या कथेशी आणि नंतर अराराना दिलेल्या रिप्लायशी सुद्धा. अभिनंदन !!
आरारा - त्याचं काय आहे
आरारा - त्याचं काय आहे बिगरीच्या मुलाला चौथीचं पुस्तक दिलं तर त्याची जी अवस्था होईल ती तुमची झालेली आहे. पण एक आहे - सवयी प्रमाणे नको तिथे, जमत नसताना बेअकली/असंबद्ध प्रतिसाद देत राहुन माबोवर होणार्या करमणुकिला हातभार लावत जा... Rofl
नवीन Submitted by राज on 6 December, 2017 - 00:
<<
प्रति,
मा. वेबमास्तर, अॅडमिन.
इथे श्री सन्माननीय लिंबूटिंबू यांची अक्कल काढल्यावरून साती यांचा आयडी उडवला गेला होता.
राज आपले निकटवर्तीय/ प्रिव्हिलेज्ड मेंबर वगैरे आहेत किंवा कसे, ते ठाऊक नाही,
पण https://www.maayboli.com/node/64653?page=1#new येथील या माझ्या बेअकली प्रतिसादाव्दारे, मी फॉर्मल तक्रार नोंदवित आहे.
बाकी साईटची पॉलिसी, सभ्यता वगैरे बाबी सांभाळण्यास आपण सक्षम आहात.
cc : maayboli user1, user3.
@ राज,
@ राज,
तुहि यत्ता कंची?
असो.
तुम्हाला योग्य त्या भाषेत उत्तर देण्यास / नदीवर कुस्तीस बोलवण्यास मी सक्षम आहे, पण काये, की हेडमास्तर कावत्यात. तेव्हा तूर्तास हेडमास्तरांस पत्र लिहिले आहे.
बाकी आम्रविकेत ट्रंपुल्यासोबत हिटलरचे देऊळ बांधण्याच्या प्रोजेक्टला कधी गती देताहात मग?
सांगायचा मुद्द्दा असा की
सांगायचा मुद्द्दा असा की हिटलर हा अपवादाने एकटाच असा क्रूर सणकी नव्हता. तर त्याच्या या कृत्यात हजारो लोकं सामील होते. अश्या हजारो लोकांना ईतकी पराकोटीची हिंसा करावीशी वाटते तेव्हा त्यामागची मानसिकता जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केला आहे?
<<
त्याचं काये,
की बाकीची लोकं वरती 'वाटप' चालू असताना चाळणी घेऊन उभे होते लायनीत
आपण एकट्यानेच घडा सोबत नेला होतात.
तेव्हा, आजवर झालेली जगातील युद्धे, त्यादरम्यान व नंतरचेही माणसांनी माणसांवर केलेले पराकोटीचे अत्याचार, यातून पुढे यायचे, त्यातल्या चुकांना चूक आहे असे म्हणायचे, की ती "मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न" करायचा हा उत्क्रांत होण्याचा भाग आहे.
अर्थात, आजकालच्या प्रचण्ड वेगाने उज्ज्वल भूतकाळाकडे जाण्याच्या मानसिकतेत, विकृतीची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केला आहे? हा प्रश्न या टोनमधे विचारून, त्याचवेळी अन्नाला लागलेल्या मुंग्या मारणे अन ऑश्विझमधे माणसे मारणे याची तुलना करणे, हे स्पष्ट शब्दांत सांगायचे, तर माझ्या मते सिक आहे, पण तुमच्या दॄष्टीने योग्य असेल. लेट टीनेजमधे माझ्याही होस्टेल रूममधे मी थर्ड राईशचा झेंडा रंगवून भिंतीवर चिकटवला होता. नंतर हळूहळू चाळणीतून शिल्लक राहिले, ते कामी आले.
तेव्हा, तुमची हिटलरच्या विकृतीला, तो एकटाच विकृत नव्हता, तर उदा. त्याच वेळी रामन राघवनही मुंबईत खून करत फिरत होता, अर्थात अनेक विकृतांनी त्याला साथ दिली, असे म्हणून त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न, मलातरी अत्यंत विकृत व घृणास्पद तसेच निषेधार्ह वाटतो.
बाकी मी अजूनही मिशन घेण्याबाबत सिर्येस नाहिये
बघू कधीतरी.
अरारा यांना अनुमोदन.
अरारा यांना अनुमोदन.
हिटलर(ज्यु) आणि मुंग्या अशी तुलना आणि वर तोंड करून दिलेलं स्पष्टीकरण सगळंच सिक आहे.
हे उद्दातीकरणावरही त्वरीत कारवाई व्हावी.
बाकी मॉब सायकॉलॉजी,
बाकी मॉब सायकॉलॉजी,
हिंसाचार, आत्महत्या, इ. करण्यास उद्युक्त करणे, इ. बद्दलच्या जगभरातल्या प्रगत्/अप्रगत देशांतल्या कायदे/पीनल कोड्स मधील शिक्षा, त्यापाठचे विचार, यांचा थोडा अभ्यास / आकलन केले तर हिटलरसारखे काही हिप्नोटायझर्स, तथाकथित शिस्तबद्ध संघटनांमार्फत, अनुयायांना अत्याचार / अविचार / अनाचार अगदी आत्महत्याही करण्यास कसे भाग पाडतात, व त्यांवर प्रतिबंध लादण्यासाठी हे कायदे आहेत, हे सहज समजते.
आसारामचे अनुयायी असोत, की कुण्या जपानी अमेरिकी कल्टचे.
सूज्ञांस किती सांगावे?
हिटलरला रडवणे गरजेचे,
अन बुद्ध हसणे तितकेच गरजेचे.
सध्या शुभ्रात्री!
असे म्हणतात की गीता
असे म्हणतात की गीता /ज्ञानेश्वरी जेवढ्या वेळेस वाचाल तेवढ्या प्रत्येक वेळेस वाचकाला वेगवेगळा अर्थबोध होतो.
>>>>
_/\_
शक्य आहे ते या कथेच्या बाबत..
आणि असे असल्यास मी काय आपल्याला लागलेल्या अर्थाचे विश्लेषण करणार..
सत्याचा शोध म्हणजे अनंताचा प्रवास. अगदीच दिशा भरकटली तर मार्गदर्शन तेवढे करू शकतो.
<<
हे रत्न आत्ता दिसलं.
देवा, मला माफ कर. हे साहेब इतक्या नम्रपणे मार्गदर्शन करणारेत.
या प्रतिसादातून फक्त अन फक्त माऽऽऽज दिसतोय!
मस्त!
लै इच्चार करून पाडलाय लेख. माझा वरचा प्रतिसाद व्हॅलिडेट झाला.
Pages