फेसबूक पेटून उठले होते. जंगली मराठी ग्रूपवर नवीन टॉपिक आला होता. दारू जुनीच. बाटली नवीन. विषय गोरक्षकावरून सुरू होऊन तालिबान, ईस्लाम, आतंकवाद, ते ईंदिरा गांधीना सोबत घेत, महात्मा गांधी असा येऊन पोहोचला होता. अहिंसो परमो धर्म: .. अशक्य आहे हे. टोटल हिंसा किंवा टोटल अहिंसा. मधलं काहीतरी जमायला हवे. पण कोणंच ऐकायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे तेच मुद्दे. सोहमच्या डोक्याचा भुगा झाला होता. असह्य होऊन तो उठला आणि किचनमध्ये जाऊन कॉफी उकळवायला ठेवली. कॉफीसोबत त्याच्या आवडत्या कूकीज घ्यायला म्हणून फडताळावरच्या डब्याला हात घातला. पण वीजेचा झटका बसल्यागत हात मागे आला. भिंतीवरून मुंग्यांची एक रांग त्या डब्याला वेटोळे घालून बसली होती. त्या झटकल्याशिवाय डब्बा उघडणे अशक्य होते. एवढ्या मोठ्या संख्येचा नायनाट करणेही अशक्य होते. कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नव्हता. त्याने वैतागून गॅस बंद केला आणि पुन्हा कॉम्प्युटरमध्ये डोके खुपसून बसला. थोडी गाणी ऐकली. थोडे यूट्यूब विडिओ पाहिले. पण फार वेळ राहावले नाही. थोड्यावेळाने पुन्हा जंगली मराठीवर चक्कर टाकली. वीस-पंचवीस नवीन पोस्ट आल्या होत्या. वाद आणखी चिघळला होता. आता तो हिटलरवर पोहोचला होता. त्याने अधाश्यासारख्या सर्व पोस्ट वाचून काढल्या. हिटलरचेही समर्थक आहेत हे पचवणे त्याला जड जात होते. अवघड आहे सारे. पुन्हा एकदा तो या निष्कर्शापर्यंत पोहोचला. पोटातल्या कॉफीच्या तल्लफीने पुन्हा उचल खाल्ली. पण कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नाही. आता तरी त्या मुंग्या आपल्या घरी गेल्या असतील का बघायला म्हणून उठला. पण त्या सुद्धा त्या सोशलसाईटवर पडलेल्या मुंगळ्यासारख्याच चिवट होत्या. हटायलाच तयार नव्हत्या. चरफडत त्याने एकीवर राग काढला. एक वाट सोडून भटकलेल्या मुंगीला बोट दाबून चिरडले. कडाकड तिची हाडे मोडली आणि तिथेच भिंतीला चिकटली. तो हाडं मोडायचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला नाही. पण बोटाला जाणीव झाली. त्या संवेदना थेट मेंदूपर्यंत पोहोचल्या आणि अगदीच क्षुल्लक कारणासाठी एखाद्या निष्पाप जीवाची हत्या हातून घडल्याने त्याचे डोके गरगरू लागले. त्याच अवस्थेत तो पुन्हा कॉम्पुटरवर बसला. पण आता जंगली मराठीवर जायची भिती वाटू लागली. हिंसा, अहिंसा, गोहत्या, एका क्षुद्र मुंगीला चिरडणे, अहिंसो परमो धर्म:, ती माणसांनी माणसांची फोडलेली डोकी, रक्ताच्या चिळकांड्या, कडाकडा मोडलेली हाडे, त्यांचा मेंदूला होणारा त्रास.. डोके आणखी गरगरवून घ्यायचे नव्हते. कॉफीशिवाय पर्याय नव्हता. पण कूकीजशिवाय कॉफीला अर्थ नव्हता. ईतक्यात त्याला आठवले, काल रात्रीच्या चार शिल्लक कुकीज पुन्हा डब्यात भरून ठेवायचा कंटाळा म्हणून तश्याच ओवनमध्ये ठेवल्या होता. त्याने चटकन ओवनकडे धाव घेतली. जाता जाता कॉफीचा गॅस पुन्हा चालू केला. पण ओवनकडे पाहतो तर त्याचा दरवाजा तसाच उघडा होता. अरे देवा, नरम तर पडल्या नसतील. त्याने हाताने दाबून चेक करायला कूकीजकडे हात नेला. आणि पुन्हा झटका बसल्यागत हात मागे आला. पुर्ण प्लेट मुंग्यांनी भरली होती. एखाद्या नवीन मुंगीला प्लेटमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. ओवन ते शेजारची भिंत अशी एक आतबाहेर करणारी मुंग्यांची रांग लागली होती. किती होत्या त्या एकूण. शंभर दोनशे, हजार पाचशे. सहज असतील. आज ना कूकीज नशीबात होत्या ना कॉफी. संतापून ओवनचा दरवाजा त्याने बंद केला आणि एक विचार त्याच्या डोक्यात चमकला. स्विच ऑन केला आणि स्टार्ट बटण दाबले. ओवन तीस सेकंदावर सेट होत चालू झाला. भट्टीने पेट घेतला होता. आपसूक त्याचे हात कानावर गेले, तो आक्रोश त्या किंकाळ्या त्याला ऐकायच्या नव्हत्या. पण कानावर कसलाही आवाज येत नव्हता. मेंदूपर्यंत कोणत्याही संवेदना पोहोचत नव्हत्या. ना मनाला कोणत्या वेदना जाणवत होत्या. कानावरचा हात काढला. पंधरा सेकंद झाले होते. ईतके पुरेसे म्हणत त्याने ओवन बंद केला. दरवाजा उघडला. सर्व मुंग्या निपचित पडल्या होत्या. एक ओला फडका घेऊन त्याने ओवन पुसून घेतला. फडका धुताना मुंग्यांची प्रेतंही वॉशबेसिनमार्गे गंगेला मिळाली. कूकीजना चिकटलेल्या मुंग्यांना खरडवून त्याने साफ केले. त्यांच्याबद्दल आता फक्त सोहमलाच ठाऊक होते. प्लेट धुवून पुसून त्याने कूकीज पुन्हा प्लेटमध्ये ठेवल्या. प्लेट ओवनमध्ये ठेवली. आणि ओवनचा दरवाजा पुन्हा एकदा तसाच किंचित उघडा ठेवून तो कॉप्म्युटरकडे वळला. जंगली मराठीचे पेज रिफ्रेश केले. कोणीतरी आता तिथे हिटलरचा फोटो अपलोड केला होता. मिशीतल्या मिशीत सोहमकडे बघून तो हसत होता...
- ऋन्मेष
आणि हसलर हिटला.
आणि हसलर हिटला.
राम तेरे मन मे है, राम मेरे
राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है
मन से रावन जो निकाले, राम उसके मन मे है
- शाहरूख खान, स्वदेस
आतंकवाद्याला धर्म नसतो पण प्रत्येक धर्मात एकतरी आतंकवादी असतो
आतंकवादाचे कारणच धर्म आहे !
आतंकवादाचे कारणच धर्म आहे !
आणि हसलर हिटला.
आणि हसलर हिटला.
विटला????
किटला???
पटला????
मिटला????
ढीटला,,,,
आतंकवादाचे कारणच धर्म आहे !
आतंकवादाचे कारणच धर्म आहे !
आणि त्याचा रंग आहे......
हि हि हि
शब्द विचार करून समजून उमजून
शब्द विचार करून समजून उमजून वापरावेत.
दहशतवादी, आतंकवादी, अतिरेकी, कट्टरवादी, अलगाववादी, नक्षलवादी, माओवादी, हिंदुत्ववादी, धर्मवादी सगळ्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत.
अर्थ वेगळे वृत्ती सेम !
अर्थ वेगळे वृत्ती सेम !
तात्विक दृष्ट्या विचार केला
तात्विक दृष्ट्या विचार केला तर कथेची मूळ कल्पनाच चुकीची आहे. आता नुसतेच काहीतरी भडकाऊ लेखन म्हणून या कथेमध्ये भरपूर तेल आहे !
तात्विक दृष्ट्या विचार केला
तात्विक दृष्ट्या विचार केला तर कथेची मूळ कल्पनाच चुकीची आहे.
>>>>
प्लीज ईलॅबोरेट
बाकी तेल तर माझ्या प्रत्येक लेखात असते. मला तूपात घोळून लिहायला आवडत नाही
कडू कारले
कडू कारले
तुपात घोळले
साखरेत लोळले
तरी कडू ते कडूच.
दहशतवादी, आतंकवादी, अतिरेकी
दहशतवादी, आतंकवादी, अतिरेकी
>> हे तिन्ही शब्द आजवर समानार्थी आहेत असं समजत होते. फरक विशद करणार का प्लीज?
अतिरेकी म्हणजे आपल्या
अतिरेकी म्हणजे आपल्या भूमिकेचा अतिरेक करणारे. हे दुसर्याच्या भावनेला, मताला अजिबात किंमत देत नाहीत. याचे पर्यवसान हिंसेतच होते. पण हिंसा करण्याची धमक नसणारेही अतिरेकी असतात. ते सातत्याने आपल्या भूमिकेचा प्रचार प्रसार करण्यात मग्न असतात. एक उदाहरणः शाकाहारी प्रसार करणारे अनेक अतिरेकी सापडतील. ते मांसाहारी मनुष्याचे जगणे कठीण करेंपर्यंत मजल गाठतात. असे अनेक प्रकारचे अतिरेकी असतात. सामान्यपणे मात्र धार्मिकतेच्या नावाखाली हिंसाचार करणार्यांना अतिरेकी म्हटले जाते. खरे तर अशांना काही आइडियोलॉजी नसल्याने ते केवळ हिप्नोटाइज्ड रोबो असतात. धार्मिक अतिरेकी म्हणजे भडक धार्मिक भाषणे देऊन भडकवणारे लोक. तूर्तास इतकेच.
दहशतवादी-आतंकवादी: दहशतवादी अनेक प्रकारचे असतात. दहशतवाद हा खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतो. त्याचे अनेक अवयव असतात. कोणतीही माहितीप्रसार यंत्रणा हे सगळ्यात मोठे अवयव. दहशतवादी म्हणजे अनामिक भय निर्माण करणारे, हे भय जीव जाण्याचे, रोजगार जाण्याचे, अधिकार जाण्याचे, आपल्या हक्काचं असलेलं बरंच काही गमावण्याचे भय. असे भय जे निर्माण होते, त्याच्या विरुद्ध सामान्य माणसाला काही करता येत नाही. फक्त एक बॉम्बस्फोट झाला, शंभरएक माणसांचे मुडदे पडले की कोट्यावधींना ती धडकी भरते. अख्खा समाज पॅरलाइज करण्याचे, त्याचे विचारवर्तन बदलण्याचे काम दहशतवाद करतो. हे मानसिक युद्ध असते. दहशतवाद केवळ मुस्लिम धर्माशी जोडून बघितला जातो. पण जिथे जिथे माणसाला भीती वाटून आपले वर्तन नियंत्रीत करण्याची अनैसर्गिक, कृत्रिम गरज पडते तिथे तिथे दहशत आहे असे समजावे. उदाहरण: मराठी माणूस धंदा करु शकत नाही हे वाक्य एक दहशतवादाचेच रुप आहे.
उदाहरण: मराठी माणूस धंदा करु
उदाहरण: मराठी माणूस धंदा करु शकत नाही हे वाक्य एक दहशतवादाचेच रुप आहे.
Submitted by नानाकळा on 9 December, 2017 - 11:11
>>>
आपल्याला डिएसके नामक सध्या डबघाईला आलेले मराठी व्यावसायिक माहित आहेत का? मराठी माणुस कारकुनी जनुके घेऊन जन्मला आहे हे सत्य पचवणे जड का जाते.?
कुमार बिल्डर्स ,हिरानंदानी कधी डबघाईला येत नाहीत पण आमचा कुल्कर्णी लगेच येतो,असे का?
अक्कलशून्य. तुम्हाला बरीच
अक्कलशून्य. तुम्हाला बरीच माहिती दिसते. अजून काही?
भन्नाट कल्पनाशक्ति.. मार्मिक
भन्नाट कल्पनाशक्ति.. मार्मिक आशय.. आवडलं आपल्याला.. अभिनंदन
धन्यवाद सर
धन्यवाद सर
आपल्याला डिएसके नामक सध्या
आपल्याला डिएसके नामक सध्या डबघाईला आलेले मराठी व्यावसायिक माहित आहेत का? मराठी माणुस कारकुनी जनुके घेऊन जन्मला आहे हे सत्य पचवणे जड का जाते.?
कुमार बिल्डर्स ,हिरानंदानी कधी डबघाईला येत नाहीत पण आमचा कुल्कर्णी लगेच येतो,असे का?>>>
अहो पण परांजपे बिल्डर्स, कोलते-पाटील अशी अनेक नावं आहेत ना..त्यांचा बिझनेस चांगला चालला आहे अजूनतरी.
बम्प
बम्प
हा धागा आत्ता वाचला. लेख
हा धागा आत्ता वाचला. लेख प्रचंड आवडला. जी. ए., ग्रेस ह्यांची आठवण झाली. माणसातल्या क्रौर्याचा वेध घेणारी कथा.
दुर्बळांना चिरडून टाकणे सोपे असते आणि ते कित्येकदा सत्तेच्या मदामुळे किंवा पोकळ अहंगंडामुळे होते. ही एक मानसिक विकृतीच. चिरडणे म्हणजे कत्तलच असे नाही. दडपशाही, लोकांचे न्याय्य हक्क दडपणे, आवाज दडपणे हेसुद्धा हिटलरी मनोवृत्तीचे लक्षण आहे.
आ. रा. रा. ह्यांचा प्रतिसाद माहितीपूर्ण आहे.
लेख आवडला हे पुन्हा एकदा.
धन्यवाद च्रप्स वर
धन्यवाद च्रप्स वर काढल्याबद्दल
धन्यवाद हिरा.. माझ्या ईतर सगळ्या लिखाणापेक्षा हे टोटल वेगळे आहे.
छानच! आवडलं व भावलं पण.
छानच! आवडलं व भावलं पण.
)
( गाधीजीही तसे मिष्किल होते. कदाचित म्हणाले असते,"खरी गोम आहे ' कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नव्हता ' यालाच अंतिम सत्य व म्हणून त्यासाठी कांहीही, असं समजण्यात !! "
(No subject)
हा हा.. धन्यवाद भाऊ
हा हा.. धन्यवाद भाऊ
लिखाण आवडले. रूपक असणे नसणे
लिखाण आवडले. रूपक असणे नसणे हा भाग अलाहिदा. पण हि भावना प्रत्येकवेळी जेंव्हा जेंव्हा मी 'हिट स्प्रे' वापरतो तेंव्हा माझ्या मनात येतेच
आणि माझे मन मला म्हणते "तू आयुष्यात जेवढी झुरळंसुद्धा मारली नसशील ना, तेवढी माणसं मारलीत हिटलर ने" आणि थरकाप उडतो. म्हणूनच हे लिखाण रिलेट झाले बऱ्याच प्रमाणात. मला अनेकदा असे वाटते (आणि मी कदाचित हे इम्पलीमेंटसुद्धा करेन नजीकच्या भविष्यात) कि एक मध्यम पॉवर वाला ब्लोअर/सक्शन पम्प (व्ह्याक्युम) घ्यायचा. आजकाल तो सहजी मिळेलही कुठेतरी ऑनलाईन बाजारात. त्यायोगे जिथे जिथे मुंया/झुरळे दिसतात तिथे औषध फवारा करण्यापेक्षा पंपात ओढून घेतली कि झाले. काही मरतील पण त्यातल्या बिन ब्याग मध्ये बरीच जिवंतसुद्धा राहतील. कुठेतरी बाहेर दूरवर मोकळ्या माळरानात झटकून यायचे कि झाले.
खरेच, अनेकदा विषारी औषधामुळे तडफडत हे जीव मरताना पाहणे बघवत नाही. विषाचे स्प्रे मारणे तसेही आपल्याला सुद्धा चांगले नव्हे. म्हणून हा उपाय करून पाहणार आहे. (बाकी बरेच 'रीपेलंट' वापरून झाले पण काही उपयोग नाही)
ऋन्मेषजी आपल्या कल्पकतेला
ऋन्मेषजी आपल्या कल्पकतेला कोणाच्या समर्थनाची गरज नाही.आपण एक उत्तम लेखक,जागरुक वाचक आणि चतुरंगी व्यक्तीमत्व आहात! तुमच्या लिखाणावर मिळालेले प्रतिसाद हेच तुमच्या लिखाणाचे यश आहे.
बाकी सोहम आणि हिटलरचे साधर्म्य तुम्ही या छोट्याश्या प्रहसनावरुन छान जुळवून आणले.हिटलरलाचा ज्यूची कत्तली करण्यामागे वैयक्तिक द्वेष होता.पण सोहमला आपली पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजास्तव त्यांना मुखाग्नी द्यावी लागली.जसे नैतिक हत्याकांड!
Pages