ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.
आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग
आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.
या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय
रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?
रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:
१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती
ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.
कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.
तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.
तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.
अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.
तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”
तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.
समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************
धन्यवाद. डॉक्टरांना माहित
धन्यवाद. डॉक्टरांना माहित आहे ते योग्य ते औषध सांगत असणार. आज केमो आहे, फरक पडेल ___/\____
पचनसंस्थेच्या कर्करोगांचे
पचनसंस्थेच्या कर्करोगांचे प्रमाण समाजात बऱ्यापैकी आहे. या कर्करोगांचे त्यांच्या शून्य अवस्थेत निदान करण्यासाठी CAD EYE AI system या प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरते. नुकतीच ती पुण्यामध्ये चालू करण्यात आलेली आहे :
https://www.msn.com/en-in/health/health-news/to-detect-gastrointestinal-...
Doctor cancer वरून एक प्रश्न
Doctor cancer वरून एक प्रश्न माझ्या मनात खूप दिवसापासून आहे.
कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ किंवा DNA मधील बिघाड.
मानवी शरीरात करोडो पेशी आहेत त्या मधील पाच पन्नास पेशी तरी दर तासाला ,किंवा दिवसाला अनियंत्रित होत .असतील.
पण त्यांच्या वर लगेच नियंत्रण मिळवून त्यांना नीट वागायला लावले जात असेल किंवा त्यांना नष्ट केले जात असेल.
आणि ही क्रिया निरंतर शरीरात चालू असेल.
म्हणजे रोज आपण कॅन्सर च्या धोक्यातून जात आहोत.
जेव्हा शरीराची पोलिस यंत्रणा कमजोर पडते तेव्हाच कॅन्सर होत असावा.
अगदी बरोबर.
अगदी बरोबर.
पेशींमध्ये डीएनएचे पुनरुत्पादन होत असताना काही रँडम चुका होत असतात. परंतु काही यंत्रणांच्याद्वारे (molecular checkpoints) त्या आपोआप दुरुस्त केल्या जातात. त्यामुळे वारंवार डीएनएतील दोष निर्माण होऊ दिले जात नाहीत.
परंतु कधीतरी या यंत्रणा कमजोर पडतात आणि मग पुढचा घटनाक्रम घडून कर्करोगाकडे वाटचाल होते.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त (
जागतिक कर्करोग दिनानिमित्त ( ४ फेब्रुवारी) सर्व संबंधित रुग्ण आणि त्यांची सेवा करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या अहवालातील दोन महत्त्वाच्या गोष्टी :
१. जगभरातील कर्करोगापैकी निम्मे कर्करोग हे खालील ५ अवयवांचे मिळून आहेत : फुफ्फुसे, स्तन, मोठे आतडे, यकृत आणि जठर.
२. त्यांची जागतिक क्रमवारी लावायची झाल्यास फुफ्फुसांचा पहिल्या क्रमांकावर तर स्तनांचा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
https://gco.iarc.fr/en
Breast cancer cancer however
Breast cancer cancer however can met to lungs. Many lines of treatment are available though. Early detection is the key to successful recovery. All the best.
कॅन्सर प्रमाण आधुनिक युगात
कॅन्सर चे प्रमाण आधुनिक युगात वाढत च आहे .कॅन्सर महामारी च रूप घेवु शकेल असा वेग आहे.
रोज प्रक्रिया केलेले अन्न हा लोकांचा रोज च आहार झाला आहे.
पारंपरिक हजारो वर्षांच्या अनुभवतून खरा उतरलेला पारंपरिक आहार घेणे हे मागास असण्याचे लक्षण आहे असे तारे तोडले जातात.
प्रक्रिया.
१) रासायनिक खतांचा वापर.
२) हायब्रीड जाती.
३) कीटक नाशक म्हणून सर्रास वापरले जाणारे रासायनिक द्रव.
४) खाण्याच्या वस्तू जास्त दिवस टिकून रहव्यात म्हणून वापरलेली रसायने.
५) चव ह्या नावाखाली.
नको त्या प्रक्रिया केलेले अन्न.
आणि चवी नी खाणारी लोक.
५) दूध,मांस जास्त मिळावे म्हणून जेनेटिक बदल केलेले प्राणी .
खूप प्रक्रिया केल्या जातात .
अगदी फळ पिकवण्यासाठी साठी पण रसायने वापरली जातात
बदलेली लाईफ स्टाईल, प्रदूषण,,प्लास्टिक च वापर, व्यसनी लोकांची वाढलेली संख्या, आर्थिक अस्थिरता आणि त्या मुळे वाढलेला स्ट्रेस, कौटुंबिक सुख न मिळणे, सामाजिक संबंध कमी होणे.
त्या मुळे एकटे पना, . आयुष्यातील हॅपिनेस कमी होणे नोकरी,पैसा आणि ऐश हेच आयुष्य.
मुलाना स्तन पान न करणे, योग्य वयात मुल होवून न देणे, .
ह्या आणि अशा गोष्टी पण कॅन्सर साठी जबाबदार आहेत
Multiple sex partner, चौरस आहाराचा अभाव , शारिरीक व्यायामाचा अभाव .
ह्या सर्व कारणांमुळेच कॅन्सर वाढत आहे .
पण ते जाहीर पने संशोधक पण मान्य करत नाहीत सर्व माहीत असून.
दारू,तंबाखू , ह्याच दीन गोष्टी भोवती सर्व फिरत असतात पण ह्या दोन्ही गोष्टी काही 108% कॅन्सर साठी जबाबदार नाहीत.
मी लिहिलेल्या वरील सर्व बाबी जास्त प्रमाणात जबाबदार आहेत.
पण प्रचार कशाचा.
लवकर निदान झाले पाहिजे म्हणजे भरपूर खा आणि नंतर हजमोला खा आणि अन्न पचवा. पचन क्रिया बिघडली तर त्याचे लवकर निदान करा.
लवकर निदान झाले तरी कॅन्सर नी जीव जाण्याची शक्यता थोडी फार कमी होईल पण निरोगी, सशक्त शरीराची मजा,आनंद कधीच मिळत नाही.
ह्याचा मात्र प्रचार केला जात नाही.
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/global-cancer-cases-may-...
सर,
वरील बातमी वाचताना, पुन्हा इथे हटकून आलो....
मगील काही २-३ वर्षात रक्ताच्या कर्करोगाने निधन झालेले परिचयातील दोघे आठवले, दोघेही निरव्यसनी , एकदा रिकव्हर झालेले..... आजारने पुन्हा तडाखा दिला तो जिवघेणा !!!
एकाशी रिकव्हर झाल्यवर बोलताना टाटा चे अनुभव ऐकले होते.
तुमचे लेखन बहुमोलच !!!
होय, सर्वांचे मुद्दे योग्य
होय, सर्वांचे मुद्दे योग्य आहेत
धन्यवाद !
अत्यंत उपयुक्त माहिती. मी
अत्यंत उपयुक्त माहिती. मी प्रतिसादांमधली चर्चा अजून वाचली नाही, त्यामुळे खालील प्रश्न त्यात येऊन गेले असल्यास क्षमस्व.
खालील पैकी कारणांमुळे कर्करोग होऊ शकतो का - यावर काही संशोधन झाले आहे का? यापैकी काही रास्त आणि काही वृथा भीतीदायक आहेत का? -
१. प्लास्टिकचा अतिवापर. मुख्यतः प्लास्टिक कंटेनर्समध्ये ठेवलेले अन्न तसेच मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे. रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकची बाटली वापरणे.
२. मायक्रोवेव्ह चालू असताना त्याच्या जवळ असणे.
३. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल करणे किंवा मोठ्या प्रमाणात अपारंपरिक अन्न खाणे.
४. शिळे/फ्रोझन अन्न खाण्याचा अतिरेक.
५. पॅकबंद अन्न खूपदा सेवन करणे.
६. कार्बोनेटेड पेय पिणे.
यांची चर्चा झाली असल्यास कृपया पुन्हा उत्तर न देता फक्त नवीन मुद्द्यांनाच (उरले असल्यास) उत्तरं दिलीत तरी चालेल. अनेक आभार!
ता. क. वरीलपैकी मुद्दा क्र १ आणि ६ यांवर चर्चा झालेली दिसते आहे; मी वरवर प्रतिसाद चाळले.
ह पा
ह पा
४. शिळे/फ्रोझन अन्न खाण्याचा अतिरेक. >>>>
ते कर्करोगकारक असल्याचा पुरावा नाही.
.. ..
प्र. ३ व ५ >>
• या सर्व प्रश्नांची उत्तरे थेट होय किंवा नाही या शब्दात नाहीत. अन्नप्रक्रिया करताना अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. त्यांचा आढावा लेखात घेतलेला आहे.
• काही रसायने खात्रीने कर्करोगकारक तर काही बहुधा कर्करोगकारक अशा सदरात मोडतात
• तसेच अशी काही रसायने प्राण्यांवरील प्रयोगांमध्ये कर्करोगकारक म्हणून सिद्ध झालेली असतात परंतु मानवी शरीरातील त्यांचा अभ्यास सध्या अपुरा असल्याने मत देता येत नाही.
• प्रक्रिया केलेले ‘कुठलेही अन्नपदार्थ’ आणि कर्करोग या मुद्द्याला तसा अर्थ नाही. कुठल्या प्रकारचे अन्न प्रक्रिया केलेले आहे यावरही काही गोष्टी अवलंबून राहतात. काही मोजकी उदाहरणे :
१. मांस टिकवून पॅकबंद करताना त्यामध्ये Nitrate or nitrite ही रसायने घालतात त्यातून पुढे NOCs ही रसायने तयार होतात जी तीव्र कर्करोगकारक आहेत.
२. खारवलेले मासे आणि नाक व घशाचा कर्करोग यांचा संबंध असावा.
३. खारावून टिकवलेल्या भाज्या (pickled) आणि अन्ननलिका व जठराचा कर्करोग यांचा संबंध असू शकेल.
अर्थात वर उल्लेख केलेल्या
अर्थात वर उल्लेख केलेल्या कुठल्या प्रकारचे अन्न सातत्याने कोण किती वर्षे खातो आणि त्या व्यक्तीची एकंदरीत आनुवंशिकता, व्यसनाधीनता वगैरे वगैरे बऱ्याच मुद्द्यांचा एकत्रित विचार करावा लागेल.

म्हणूनच अशा प्रश्नांची उत्तरे देताना अनेक संदर्भ, “ अमुक रसायने बऱ्याचदा कर्करोगकारक असतात / असे असण्याची शक्यता असते/ नाकारता येत नाही, अशा मोघम स्वरूपातच उत्तरे देतात.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4651461/
२. मायक्रोवेव्ह चालू असताना
२. मायक्रोवेव्ह चालू असताना त्याच्या जवळ असणे.
>>>
या संदर्भात अमेरिकी एफडीए चा संदर्भ असे म्हणतो,
की जर मायक्रोवेव उपकरण तुटले असेल किंवा त्याची रचना बदललेली असेल तर त्यातून विद्युतचुंबकीय लहरी बाहेर पडतात.
आता अशा लहरी किती प्रमाणात बाहेर पडतात, किती काळ त्या मानवी शरीरात जाव्या लागतात.. वगैरे प्रश्न माझ्यापेक्षा मूलभूत विज्ञानातील तज्ञाच्या अखत्यारीतील आहेत.
असे कोणी असल्यास त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तर द्यावे
धन्यवाद !
विस्तृत उत्तरांबद्दल अनेक
विस्तृत उत्तरांबद्दल अनेक आभार.
माहिती पूर्ण लेखासाठी धन्यवाद
माहिती पूर्ण लेखासाठी धन्यवाद!
गेल्या काही वर्षात कुठलीही व्यसने नसताना ही, साधे नॉर्मल जीवन/ आहार असतानाही., अतिशय लहान वयात ( २५-४०) कॅन्सर ने ( पोटाच्या किंवा तत्सम digestive system related) गेलेल्या स्त्रियांची संख्या (ओळखीत) चमकवून टाकणारी होती.. विचारात पाडणारी ही.
2050 पर्यंत कॅन्सर ग्रस्त
2050 पर्यंत कॅन्सर ग्रस्त रुग्णांचे प्रमाण 70% पर्यंत वाढेल असा अंदाज who नी व्यक्त केला आहे( एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के नाही कॅन्सरग्रस्त रुग्ण ७०% वाढतील असा अर्थ आहे)
आणि हा अंदाज भीती दायक आहे.
आता अशा लहरी किती प्रमाणात
आता अशा लहरी किती प्रमाणात बाहेर पडतात,>>> मायक्रोवेव्ह लिकेज डिटेक्टर मिळतात. आणि काही रिसर्च पेपर मध्ये त्याचे थ्रेशोल्ड दिलेले आहेत.
अच्छा ! उपयुक्त माहिती
अच्छा ! उपयुक्त माहिती
" कॅन्सर कायमचा जाणार" :
" कॅन्सर कायमचा जाणार" : दिशाभूल करणाऱ्या शीर्षकाची बातमी
(https://www.lokmat.com/national/cancer-will-go-away-forever-the-first-pa...).
या बातमीचे शीर्षक अर्थातच दिशाभूल करणारे आहे. CAR-T cell therapy हा जो अत्याधुनिक कर्करोग उपचार आहे त्याच्या मर्यादा, दुष्परिणाम आणि प्रचंड खर्च हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत :
1. सध्या या उपचारांना फक्त रक्तपेशींच्या काही कर्करोगांसाठीच (lymphomas, some forms of leukemia, and multiple myeloma) मान्यता आहे. मेंदू, स्तन किंवा मूत्रपिंडाचे सॉलिड ट्यूमर यासाठी हे उपचार अजून तरी उपयुक्त ठरलेले नाहीत
2. सदर उपचार घेतल्यानंतर 50% हून कमी रुग्णांना दीर्घायुष्य लाभलेले आहे
3. ते प्रचंड म्हणजे प्रचंड खर्चिक आहेत. भारतात ज्यांनी उपचार प्रथम घेतला आहे त्यांना 42 लाख रुपये खर्च आला आहे. परदेशातील हा खर्च सुमारे पावणेचार ते चार कोटी रुपयांच्या घरात आहे !
4. या उपचारांचे मेंदूवरील काही गंभीर दुष्परिणामही विचारात घ्यावे लागतील - जसे की, फीट्स आणि वाचाशक्तीवर परिणाम होणे.
https://www.cancer.gov/about-cancer/treatment/research/car-t-cells
आजचीच आमच्या कुटूंबातली दु:खद
आजचीच आमच्या कुटूंबातली दु:खद घटना: माझी चुलत मामी कॅन्सरने गेली. काल रात्रीच समजलं की ती सिरिअस आहे, व्हेंटिलेटरवर आहे आणि जवळचे नातेवाईक आले की पहाटे व्हेंटी काढणार.. त्याप्रमाणे तो आज पहाटे ४ ला काढला. ती गेली.
आश्चर्य हे, ती परवापर्यंत घरी रोजचं रूटीन सांभाळत होती. कॅन्सरची शंकापण नव्हती. संध्याकाळी चक्कर आली, आणि डायबेटीक असणं आणि ७५ च्या आसपास वय, म्हणून अॅडमिट केली, ब्लड टेस्ट केल्या तर ब्लड कॅन्सर असेल अशी शंका आली!! नेमका दुसर्या दिवशी (काल) रविवार होता, मुख्य डॉ. नव्हते पण उपचार चालू होते. दुपारी पेज पिऊन, सगळ्यांशी गप्पा मारत होती. पण पुन्हा बहुधा चक्कर आली, आणि सकाळपासून थोड्याथोड्या कमी होणार्या प्लेटलेट्स अचानक झपाझप कमी होत दुपारी ती पूर्ण अन्कॉन्शस झाली. तिचा भाचा डॉ. आहे, त्याला सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना आली आणि ताबडतोब व्हेंटी आणि नातेवाईकांना कळवणं वगैरे.. जबर धक्का होता सगळ्यांनाच!
ब्लड कॅन्सरसारखी मोठी गोष्ट आणि कुठलंच लक्षण कसं नाही दिसलं? अधूनमधून होणार शुगरचा त्रास सोडता काहीही आजार नाही. सगळं आयुष्य कोकणात, घरचं पारंपरिक अन्न खाण्यात गेलं. भरपूर शारीरिक कष्टांची सवय, नोकरी केली तीही आनंदाने. कोणत्याही वाईट सवयी नाहीत. साधं सरळ समाधानी आयुष्य! जे झालं ते झालं तरी काहीच कसं लक्षण नाही हाच प्रश्न आहे! बाकी मृत्यू अटळ असतो आणि आम्ही हे सगळ्यांनीच स्वीकारलंय.
अशीच केस १८-१९ वर्षांपूर्वीची, माझ्या मैत्रिणीच्या भावाची. तो तेव्हा १०वीत शिकत होता. काहीतरी किरकोळ आजार म्हणून तपासलं, तर डॉ ना शंका आली. ब्लड टेस्ट केली तर ब्लड कॅन्सर! आणि ट्रीटमेंटसाठी मिरजेला नेलं, पण १५ व्या दिवशी गेलाच तो! जराही शंका नव्हती आली तेव्हाही.
एवढा मोठा आजार आणि तरी हे असं का आणि कसं होऊ शकतं याला काही शास्त्रीय उत्तर आहे का?
सामान्य माणूस ज्याला ‘ब्लड
सामान्य माणूस ज्याला ‘ब्लड कॅन्सर’ असे म्हणतो ती फार व्यापक संज्ञा आहे. त्या अंतर्गत सुमारे तीसहून अधिक कर्करोगांचा समावेश आहे. त्यामुळे मुळात पक्के रोगनिदान ( lymphoma, leukemia, myeloma, इ. ) कुठले होते हे समजल्याशिवाय त्या आजाराबद्दल अधिक बोलता येणार नाही.
या आजारांचे सर्वसाधारण स्वरूप दोन प्रकारचे असते :
1. काही जणांमध्ये बाह्य लक्षणे दोन दिवस ते एक-दोन आठवडे या कालावधीत दिसू शकतात,
2. तर अन्य काही जणांमध्ये ती काही आठवड्यांपासून काही महिन्यापर्यंत सौम्य स्वरूपात असू शकतात
बऱ्याचदा थोडासा ताप येऊन जातो, जंतुसंसर्गही होऊ शकतो किंवा एरवी कार्यक्षम असणाऱ्या माणसाला अचानक थकवा प्रमाणाबाहेर जाणवू लागतो. निव्वळ थकवा असेल तर बऱ्याचदा माणूस दुर्लक्ष करतो. तुमच्या मामीच्या बाबतीत त्यांचा संपूर्ण आरोग्य-इतिहास समजला तरच त्यावर अधिक भाष्य करता येईल.
असो. आदरांजली !
वरील प्रकारच्या घटनांमधून
वरील प्रकारच्या घटनांमधून चाळणी चाचण्यांचे महत्व अधोरेखित होते.
साधारण वयाच्या 40 नंतर काही त्रास होत नसला तरी हिमोग्लोबिन आणि रक्तासंबंधी काही मूलभूत चाचण्या करून पाहिलेले चांगले असते.
काही जणांमध्ये हिमोग्लोबिन बऱ्यापैकी खाली उतरले असले तरी बाह्य लक्षणे दिसतातच असे नाही.
ओके डॉक्टर.
ओके डॉक्टर.
ओह प्रज्ञा.वाईट झालं.कधीकधी
ओह प्रज्ञा.वाईट झालं.कधीकधी लक्षणं नुसता थकवा किंवा आयर्न कमी झालं असेल, गोळ्यांनी वाढेल असं समजून थोडी नॉर्मल घेतली जात असावी
उत्तम माहिती! काही प्रतिसाद
उत्तम माहिती! काही प्रतिसाद वाचून नात्यातील आणि ओळखीतील केसेस आठवल्या. कर्करोगाचे निदान झाल्यापासून त्यावर यशस्वी मात करेपर्यंत शारिरीक आणि मानसिक दोन्ही बाबतींत कसोटी लागते. (काही प्रमाणत आर्थिक सुद्धा).
एक प्रश्न आहे, स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचा आणि स्तनांच्या कर्करोगाचा काही संबंध आहे का?
गर्भाशयाची पिशवी काढून
गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचा आणि स्तनांच्या कर्करोगाचा काही संबंध आहे का?
याबाबतीतील संशोधनाचे निष्कर्ष बऱ्यापैकी उलटसुलट आहेत. स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयासंबंधीच्या शस्त्रक्रिया खालील प्रकारच्या असू शकतात :
1. फक्त गर्भाशय काढणे
2. फक्त बीजांडे (ovaries) काढणे
3. गर्भाशय आणि बीजांडे काढून टाकणे
मूलतः बीजांडांत इस्ट्रोजेन आणि अन्य हार्मोन्स तयार होत असतात, ज्यांचा स्तन-कर्करोग होण्याशी संबंध आहे. म्हणून, गर्भाशयापेक्षाही बीजांडे काढून टाकणे, किंवा दोन्हीही काढून टाकली तर स्तनांच्या कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी होतो.
वरील प्रकारच्या शस्त्रक्रियांनंतर स्त्रियांना बाहेरून हार्मोन्सचे उपचार दिले जातात. त्यातून हा मुद्दा अजून गुंतागुंतीचा होतो.
https://academic.oup.com/jnci/article/115/6/662/7048674
(No subject)
हल्ली द्राक्षे खाताना त्यावरचा रेसिडू पूर्ण गेला नसले चा जाणवतो. नंतर घशाला खव खव पण जाणवते. थोडी शोधाशोध करता बेकिंग सोडा वापरून द्राक्षे धुतली तर रेसिडू कमी होतो असा बऱ्याच ठिकाणी लिहलं आहे. एकदा रिसर्च पेपर सापडतो का चेक करत असताना वरचा टेबल सापडला.
त्याचा फायदा होतोय असे वाटते ( रिअल इफेक्ट कि प्लासिबो माहित नाही)
अजून एक खात्रीशीर उपाय म्हणजे ओझोनाटेड वॉटर वापरणे.
धन्यवाद डॉक्टर! अलिकडे चाळीशी
धन्यवाद डॉक्टर! अलिकडे चाळीशी पार केलेल्या एका ओळखीच्या बाईंनी डॉक्टरांनी hysterectomy चा सल्ला देऊनही ब्रेस्ट कॅन्सर ची शक्यता असते म्हणून घाबरून, तो सल्ला न मानता डॉक्टर बदलला.
चांगली माहिती.ओझोनेटेड वॉटर
नि पा,
चांगली माहिती.
ओझोनेटेड वॉटर >>>
पण हे मिळवण्यासाठी महागडे उपकरण विकत घ्यावे लागेल ना ?
एकंदरीत अनुभव आहे कसा आहे याचा ?
चांगली माहिती निवांत पाटील.Do
चांगली माहिती निवांत पाटील.
Do pesticides get into the flesh of conventional fruits and vegetables?
Pages