मराठी संकेतस्थळांचे भविष्य काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2017 - 12:13

जर आज मराठी शाळांचे भविष्य धोक्यात आहे तर उद्या मराठी संकेतस्थळांचेही भविष्य धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.

कारण मराठी संकेतस्थळावर बागडण्यासाठी मराठी लिहिता, वाचता येणे गरजेचे असतेच, पण ईतकेच पुरेसे नसून मराठीत व्यक्त होण्याची आवड सुद्धा तितकीच गरजेची आहे.
येणारी पिढी जर ईंग्रजी माध्यमात शिकलेली असेल आणि त्यांचे लिखाण आचार विचार त्याच भाषेत असतील तर त्यांना मराठी भाषेची, मराठी साहित्याची फारशी गरज वा गोडी उरणार नाही.
अर्थात ईथेही कैक जण असतील जे ईंग्लिश माध्यमात शिकलेले असतील, पण त्यांच्या आधीच्या पिढ्यांमुळे त्यांच्यात मराठीची गोडी शिल्लक होती. येत्या पिढीबाबत मात्र हेच खात्रीने बोलता येणार नाही.

आज काही तरुण मुलेमुली मराठी संकेतस्थळांवर आहेत, तुरळक नव्याने येत आहेत. पुढे पुढे या युवाभरतीचा आकडा आणखी कमी होत जाणार. जे आज आहेत ते देखील आजन्म याच सातत्याने टिकणार नाहीत. पुढे गळतीचे प्रमाण जास्त जास्त आणि भरतीचे कमी कमी असा आलेख दिसू लागल्यास नवल नसावे.

अपवाद वगळता कोणीही लेखक आंतरजालावर सातत्याने फार मोठ्या काळासाठी लिहू शकत नाही, किंवा काही कारणात्सव लिहित नाही. जर नवीन सभाससदांमधून लेखक वर्ग निर्माण झाला नाही तर हळूहळू जसे जुने लेखक गळपटू लागतील तसे धाग्यांची संख्या सुद्धा रोडावू लागेल. परीणामी जुन्या वाचकांचा ओघही मंदावेल. हे एक दुष्टचक्र आहे जे आज ना उद्या एकेक करत सर्वच मराठी संकेतस्थळांना घेरण्याची शक्यता आहे.

मराठी संकेतस्थळात तंत्रात नक्कीच कात टाकतील, मात्र लिखाणाचे सोंग घेता येणार नाही. चर्चांचे धागे जगाच्या अंतापर्यंत राहतीलच, पण प्रश्न आहे की त्या चर्चा मराठी भाषेत करण्यात किती जणांना रस असेल.

कदाचित जे चित्र मला दिसतेय ते वीस वर्षानंतरचे असेल, कदाचित चाळीस वर्षानंतरचे. कदाचित असे काहीही होणार नाही, माझा अंदाजच चुकेल. कदाचित येत्या काळात मातृभाषेचे मराठीचे फॅड आले असेल. कदाचित ते फॅडच असेल आणि विरताच ठप्पाठप एकेक करत मराठी संकेतस्थळे ओसाड पडतील. कदाचित..... कदाचित काही वेगळेच घडेल.

हा प्रश्न एकट्या मायबोलीचा नाही तर एकूणच आंतर जालावरील सर्वच मराठी संकेतस्थळांचा आहे.

मराठी संकेतस्थळांचे भविष्य काय?

जर सुनिश्चित नसेल तर त्यावर उपाययोजना काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विषयावर धागा काढलास ऋन्मेष.

मराठी संकेतस्थळं सुरू होऊन बराच काळ लोटला आहे. त्यावेळेस तयार झालेली लेखकांची फौज आता येथे सातत्याने लिहीत नाही. अनेकजण असे आहेत, ज्यानी स्वत:चे ब्लॉग्ज बनवलेत ते येथे फिरकेनासे झाले आहेत. आज प्रतिलिपि सारखी संकेतस्थळं तुफान लोकप्रिय आहेत. मायबोलीसारख्या संस्थळांवरचे अनेक नावाजलेले लेखक तिकडे लिहीतात. त्यांना येथे का लिहावं वाटत नाही याचा शोध प्रशासनाने घ्यायला हवा.

जुने लोकं लिहीत नाहीत, अशा स्थितीत नविन लेखक तयार होणं गरजेचं आहे. अनेक कॉलेजवयीन मुलंमुली मराठी संकेतस्थळांवर येतात पण काहीच न लिहीता फक्त वाचनमात्र राहतात. यामागे आपल्या लेखनाची जुन्या लोकांकडून चिरफाड केली जाईन अशी भिती त्यांना वाटत असते.
मी मायबोली, मिसळपाव आणि ऐसी अक्षरे अशा तिन ठिकाणी बघितल्यानुसार जुने लोकं नव्यानं आलेल्या मुलामुलींना 'फेसबुकी लेखक' आणि तत्सम म्हणून हिणवतात मग लिहीण्याची उमेद खचून जाते. ते निराश होतात आणि लिहीणं बंद करतात. मागे एका संस्थळावर एका नवोदित लेखिकेला जुन्या लोकांविरोधात प्रचंड संघर्ष करावा लागलेला बघितला आहे. त्या विषयावर मी तिच्याशी संपर्क साधून बोललो असता ती प्रचंड निराश झालेली दिसून आली. तिने नंतर काहीच लिहीलं नाही.
मान्य आहे आम्ही नवोदित लेखक जे लिहीतो त्याचा दर्जा पुर्वानुभव नसल्यानं कमी असतो पण जुन्या लोकांनी लक्षात घ्यायला हवं की, 'आपल्यानंतर कोण?' नविन येणार्यांना प्रोत्साहन द्यायला हवं, समजावून सांगायला हवं ज्यानं उमेद वाढते. मायबोलीच्या सुदैवाने येथे नाउमेद करण्याचं प्रमाण बरंच कमी आहे ही मायबोलीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. मागे 'अजय चव्हाण' यांच्या धाग्यावर झालेल्या गदारोळानंतर मी उद्विग्न होऊन एक कविता लिहीली होती ती नविन लेखकांची भुमिका मांडते.
https://www.maayboli.com/node/63341

मला सांगायला आनंद वाटतोय, आपला कट्टा या गप्पांच्या पानावर वावरताना तेथे येणारे अनेकजण ज्यांनी काहीही लिहीलं नव्हतं ते हळूहळू लिहायला लागले. न जाणो यातून कोणी उद्याचा दर्जेदार लेखक/लेखिका म्हणून मिरवेल.. म्हणून गप्पांच्या पानांची संख्या वाढवून वाचनमात्र राहणार्या सदस्यांना तेथे रूळवायला हवं आणि खास वोदितांसाठी म्हणून लेखनस्पर्धा वैगरे उपक्रम राबवायला हवेत. प्रोत्साहन द्यायला हवं. नविन सदस्यांना अनुकूल असं पोषक वातावरण प्रशासनाने तयार करायला हवं तरच उद्याची ताज्या दमाची लेखकांची फौज तयार होईल.

Lol

ऋन्मेष, चिंता करायला अजूनही बर्याच गोष्टी आहेत. सो मराठी संकेतस्थळांबाबतची चिंता तूर्तास तरी नको करूस. त्यापेक्षा तुझ्या घरी तुझ्या गफ्रेबद्दल कसं सांगायचं याचा विचार कर Happy

गार्गी, मला गर्लफ्रेंड मराठी संकेतस्थळावरच मिळाली आहे. आता मला मिळाली म्हणून मी येणार्‍या पिढीतील तरुणांची चिंता करू नये काय? बोलायला अजूनही आहे, पण विषय गंभीर आहे Happy

एक पोपट विकत घेऊन एस्टी स्टॅन्ड समोर भविष्य सांगायचा धंदा करिन म्हणतो...

म्हणजे माझ्या लिखाणाला अनुभवकथन केल्यागत वजन येईल अन मग बिनदिक्कत भविष्य बरळू शकेन.

राहुल छान पोस्ट !
नवोदित लेखकांसाठी आणि त्यांच्या लिखाणासाठी पोषक वातावरण हवे ही मराठी संकेतस्थळांची गरज आहे.
सध्या मायबोलीने केलेले बदल या बाबत वाचकांसह लेखकांच्याही फयाद्याचे ठरतील, म्हणजे ज्यांना अमुक तमुक नवोदीत लेखक नकोत त्यांचे लेखन टाळून ते आवडीच्या लेखकांचे बघू शकतील. त्यामुळे आपसूक नवोदीत लेखकांचे बॅशिंग कमी होईल. मुळात ते मायबोलीवर कमी प्रमाणात होते. बाकीच्या संस्थळांची कल्पना नाही.

मला गर्लफ्रेंड मराठी संकेतस्थळावरच मिळाली आहे
>>
ऑर्कुट मराठी संकेतस्थळ नव्हे

बदल ही काळाची गरज आहे. मराठी सण्केतस्थळ कितीही छान वाटली तरी त्याची गरज संपली की ती बंद होणार.
त्याने कोणालाही काहीही फरक पडणार नाहीये, तेंव्हा चिल Happy

अजय गल्लेवाले / समीर सरवटे ??? हे कोण? मागेही एकदा मी यांच्यापैकी एकाचे नाव वाचले होते, तेव्हाही प्रश्न विचारलेला, तेव्हाही कोणी उत्तर दिले नव्हते. काही कोडवर्ड आहेत का माबोकरांचे?

वेमा? अ‍ॅडमिन?

मराठी सण्केतस्थळ कितीही छान वाटली तरी त्याची गरज संपली की ती बंद होणार.
>>>>
गरज तुझ्यासाठी संपली की तू तुझ्यापुरता वापर बंद करणार. पण त्याच गोष्टीची गरज आणखी कोणत्या तरी नवीन माणसाला लागणार आणि तो ती वापरू लागणार.
प्रश्न ईथे हाच आहे की जुन्या लोकांना मराठी संकेतस्थळांची गरज वाटायचे एकदिवस बंद होणारच, नवीन पिढीतील नवीन लोकांना मराठी संकेतस्थळे आकर्षित करू शकतील का? मुळात त्यांना त्याची गरज भासेल का?

गरज तुझ्यासाठी संपली की तू तुझ्यापुरता वापर बंद करणार. पण त्याच गोष्टीची गरज आणखी कोणत्या तरी नवीन माणसाला लागणार आणि तो ती वापरू लागणार.
>>>
म्हणजे ऑडिअन्स बदलला तरी वापर थांबणार नाही. म्हणजे तुझी काळजी फुकट आहे

नवीन पिढीतील नवीन लोकांना मराठी संकेतस्थळे आकर्षित करू शकतील का? मुळात त्यांना त्याची गरज भासेल का?
>>
हेच मी लिहिलेलं ना की गरज संपली की ते बंद होणार. माझ्या एकटीच्या गरजेपुर्त बोलत नव्हतेच मी Uhoh
आता माझा हा प्रश्न आहे की गरज संपली तर चालू कशाला ठेवायचं ते ?

आपल्याला १ रुपयाचा कॉईन टाकून फोन लागणारे पिसिओ गरजेचे आणि इंटरेस्टींग वाटायचे, मोबाईल आला , त्याची गरज संपली , ते बंद झालं, काही बिघडलं का? हे ही थोडे फार तसेच...

बाय द वे, अजय म्हणजे वेमा आणि समीर म्हणजे अ‍ॅड्मिन.

अजय यांना वविला कोण कोण भेटलंय हे त्यांच्या लक्षात असेल,
कोण कोणाचा डुआय आहे हे ते शोधुन काढू शकतात

प्रश्न विचारताना सांभाळून की भाऊ

रीया आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, कधी कधी मी विसरूनच जातो की मी ड्यूआय आहे Happy

आता विषयावर,
तुझे फोन मोबाईलचे उदाहरण जरासे गंडलेले आहे. तो तांत्रिक बदल आहे. विकसित टेक्नोलॉजी आली आणि आधीची बाद झाली. दूरच्या व्यक्तीशी संवाद साधायची गरज मात्र कायम राहीली. ईथे मराठीत व्यक्त व्हायची गरज उरेल का हाच प्रश्न आहे. जर ती गरज कायम राहिली तर मराठी संकेतस्थळांना मरण नाही.

टेंशन एकाच गोष्टीचे आहे की पुढे मागे मराठी संकेतस्थळे लोप पावली, मराठी भाषेचा वापर कमी झाला, तर आजवरचे मराठी साहित्यही असून नसल्यासारखे होईल.

असो, सध्या मुंबईत रात्रीचे तीन वाजत आले आहेत. मराठी भाषा संवर्धनाची आणि मराठी संकेतस्थळांच्या दिर्घायुष्याची सारी काळजी स्वत:च्या शिरावर घेतल्यागत जागे राहण्यात काही प्वाईंट नाही. उद्या ईतर सभासदांचे विचार वाचायला आवडतील.

<<ईथे मराठीत व्यक्त व्हायची गरज उरेल का हाच प्रश्न आहे.>>
उरेल का? आत्ता तरी आहे का?
खुश्शाल असे लिहीले तरी चालते - "तूम उसके हुनर को ललकार रहे हो"
आणि खालील शब्दहि सर्रास वापरले जातात,
"टेंशन, कॉईन, ऑडिअन्स, गर्लफ्रेंड, ब्लॉग्ज, टेक्नॉलॉजी"

नि रोजच्या बोलण्यात निदान पुण्यामुंबईत तरी मराठीपेक्षा हिंदी इंग्रजीच जास्त ऐकू येते.
तिथे संकेतस्थळावर कुठून मराठी येणार? लोक चक्क सांगतात - मराठी शब्द पटकन आठवत नाहीत, इंग्लिशच आठवतात.

तर जाऊ द्या झाले - पूर्वी संस्कृत भाषा होती, भरपूर नि दर्जेदार वाङ्मय होते, आता ती भाषा मेल्यातच जमा आहे. तसेच मराठीचे होईल.
मराठी लोकांनाच लाज वाटते मराठीची, अहमहिकेने इतर भाषा बोलतात.

@राहुल
>त्यांना येथे का लिहावं वाटत नाही याचा शोध प्रशासनाने घ्यायला हवा.
एक जण असे आहेत की इथे मायबोलीवर गोडगोड लिहितात. नंतर बाहेर ट्विटरवर जाऊन मायबोली कशी बंद पाडली पाहिजे अशा ट्विट्स करतात. सायबरसेल, Home ministry यांच्याकडे जाऊन मायबोलीबद्दल ट्विटर वर तक्रारी करतात. किंवा इथल्याच काही लिहत्या लोकांच्या मागे लागून लागून त्याना मायबोली सोडायला भाग पाडतात. म्हणजे इथे आधी नांदणार्‍या मायबोलीकरांमधे विश्वास निर्माण करायचा आणि नंतर बाहेर मायबोलीबद्दल वाईट खोट्या बातम्या पसरवायच्या. मुद्दाम सभासदांच्या पाठीमागे लागून त्याना मायबोली सोडायला लावायचं.
तुम्हाला काय वाटतं, या आयडीचं आम्ही काय करावं ? की ते सुधारतील अशी आशा करणेच चुकीचे आहे?

>>तुम्हाला काय वाटतं, या आयडीचं आम्ही काय करावं ? की ते सुधारतील अशी आशा करणेच चुकीचे आहे?<<

हे खुप जुनं दुखणं आहे आणि याला जबाब्दार कदाचित मायबोलीचं सभासद नोंदणी (ऑन्बोर्डिंग) बाबतचं धोरण आहे. अजुनहि लोकांना स्वतःची खरी ओळख उघड न करता मायबोलीचं सभासदत्व घेता येतं. आणि एकदा अनानिमस यायची सोय झाली कि हे आय्डी/डु आय्डी/हाकललेले आय्डी निर्लज्जा सारखे पुनःपुन्हा येउन, कंबरेचं डोक्याला गुंडाळुन वातावरण दुषीत करतात. माझ्या मते प्रशासनाने तीन स्ट्राइक्सचा नियम लावावा. दोन स्ट्राइक्स नंतरहि एखाद्याच्या वागण्यात फरक पडत नसेल तर ती व्यक्ती सुधारेल अशी आशा करणे हाच मुर्खपणा आहे. अशा व्यक्तीला (आय्डी सकट) कायमचं तडीपार करावं...

>>हा प्रश्न एकट्या मायबोलीचा नाही तर एकूणच आंतर जालावरील सर्वच मराठी संकेतस्थळांचा आहे.<<

खरी गोष्ट आहे. संस्थळाचा स्वतःचा एखादा खास युएस्पी, डिफरंशिएटर असल्या शिवाय ट्रॅफिक वाढणार नाहि. सुरुवातीच्या काळात बहुतेक संस्थळांचा उद्देश मराठी पोर्टल बनवण्याकडे होता - सॉर्ट ऑफ वन स्टॉप शॉपिंग. अशा प्रकारचा जगर्नाट पोसणं, कांटेंट, ट्रॅफिक, रेवेन्यु इ. ची गणितं जुळवणं हे महत्प्रयासाचं काम आहे. या कारणां मुळे कित्येक आले आणि गेले सुद्धा. हल्लीच्या नविन संस्थाळांचा (थिंक महाराष्ट्र इ.) फोकस्/अजेंडा मर्यादित अस्ल्याने त्यांचा सर्वायवल रेट चांगला असु शकतो, अर्थात हे सगळं पॅट्रनेज आणि आर्थिक गणितांवर अवलंबुन आहे.

या घडामोडींचा मायबोली वर काहिहि परिणाम होणार नाहि कारण मायबोली तर गल्लेवाले यांच्या गराज मध्ये सुरु केलेली लॅब आहे. आणि त्यांनी या लॅबची फॅक्टरी होऊ दिली नाहि हेच मायबोलीच्या यशाचं गमक असु शकतं... Happy

>>माझ्या मते प्रशासनाने तीन स्ट्राइक्सचा नियम लावावा. दोन स्ट्राइक्स नंतरहि एखाद्याच्या वागण्यात फरक पडत नसेल तर ती व्यक्ती सुधारेल अशी आशा करणे हाच मुर्खपणा आहे. अशा व्यक्तीला (आय्डी सकट) कायमचं तडीपार करावं...>> हे आजवर जमू शकलेलं नाही असं मला वाटतं. पेड मेंबरशीप हा एक उपाय असू शकेल कदाचित.

तुम्हाला काय वाटतं, या आयडीचं आम्ही काय करावं ? की ते सुधारतील अशी आशा करणेच चुकीचे आहे?
>>>मला वाटते लोकांना माबो वर राग नाही, पण इतर लोकांवर आहे. सर्वात आधी कट्टे, अड्डे बंद झाले पाहिलेत.. तिथे लोक एकमेकांचे शत्रू होतात, तिथले संवाद अडमिंन ला पोस्ट करतात की या आयडी वर कारवाई करा. कारवाई नाही झाली की अजून चिडतात. व्यक्तीचा राग माबो वर काढतात बॅड पब्लिसिटी करून.

एखाद्याला व्यक्त व्हायला फेसबुक, स्वतः चा ब्लॉग अशी माध्यमे असताना कोणी पेड मेम्बर्शीप घेऊन का येईल?

मुळात मराठी संस्थळे आशा काय सोयी/प्लॅटफॉर्म देतात की लोकांना तिकडेच यावेसे वाटेल? एक साधारण ओळखीचा वाचक वर्ग ही एकच सोय मानता येईल, पण फेसबुक वर तुम्ही साधारण 6 8 महिने काढलेत, आणि थोडी उमेदवारी केलीत तर तुमचा स्वतः:चा वाचक वर्ग तयार होऊ शकतो.

लेखक/जुने नाराज झालेले लेखक फेसबुक, ब्लॉग वर समांतर चूल मांडतात
चर्चा करायची भूक फेसबुक वरती अमर्याद प्रमाणात भागवू शकतात.
सारख्या मताचे लोक wa गृप बनवतात,

यात लोकांना मराठी येणे , न येणे चा संबंध कमी आहे, पण टेकनोलॉजि ने लोकांना व्यक्त होण्याचे सोप्पे आणि आकर्षक मार्ग दिले आहेत हे जास्त रिलेवन्त करण आहे.

सर्वात आधी कट्टे, अड्डे बंद झाले पाहिलेत.. तिथे लोक एकमेकांचे शत्रू होतात, >>>>>
तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो,
रोहिनग्या मुसलमान वर जे धागे निघाले होते, ज्यावर नीट चर्चा झाली, काही लोकांनी त्यांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक लिहिले होते.
NIA ने इकडे लक्ष द्यावे, रोहिग्यांना सहानुभूती दाखवणारे लोक या साईट वर आहेत, आशा अर्थाच्या टिप्पणीसह त्या धाग्याच्या लिंक ट्विटर /fb पसरवल्या गेल्या.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हा मायबोली वरचा राग नाही, ही ओव्हर ऑल सेन्सॉरशिप, कंट्रोलरशिप ची आवड आहे, मला रुचेल तेच विषय इकडे चर्चिले जावेत हा त्या id चा हेका आहे, तो id मनोरुग्ण आहे, आणि मायबोली victim आहे

अशा वेळी काय करावे असे तुमचे मत आहे?

फेसबुक, वॉअ‍ॅ, ब्लॉग्ज ही सगळी व्यक्त व्हायची साधनं सगळ्यांना उपलब्ध असली तरी मायबोलीवर इतकी सदस्यसंख्या आहेच ना?
पेड मेंबरशीपचा मुद्दा डुआयडी आटोक्यात ठेवायला सुचवला आहे.

ही सदस्य संख्या एक सवय म्हणून येते आहे असे मला वाटते.
गेल्या काही quartrs मध्ये किती नवीन सभासद नोंदणी झाली हे कळले तर ट्रेंड कळू शकेल.

काही वर्षांपूर्वी रंगीबेरंगी मध्ये जागा विकत घ्यावी लागत होती, एकूण सभासदांच्या प्रमाणात किती लोकांनी विकत घेतली होती?

ऑनलाइन मराठी वाचणे, हे फुकट उपलब्ध असताना लोक पेड मेम्बरशीप का घेतील?
काही डु आई आटोक्यात ठेवायला ,पेड मेम्बर्शीप काईने म्हणजे पायावर धोंडा पडून घेणे आहे , स्पेसिफिकली जेव्हा मिपा आणि ऐसी फुकट आहेत, आणि 40 50% कन्टेन्ट दोन्ही कडे सारखा आहे.

Pages