मराठी संकेतस्थळांचे भविष्य काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2017 - 12:13

जर आज मराठी शाळांचे भविष्य धोक्यात आहे तर उद्या मराठी संकेतस्थळांचेही भविष्य धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.

कारण मराठी संकेतस्थळावर बागडण्यासाठी मराठी लिहिता, वाचता येणे गरजेचे असतेच, पण ईतकेच पुरेसे नसून मराठीत व्यक्त होण्याची आवड सुद्धा तितकीच गरजेची आहे.
येणारी पिढी जर ईंग्रजी माध्यमात शिकलेली असेल आणि त्यांचे लिखाण आचार विचार त्याच भाषेत असतील तर त्यांना मराठी भाषेची, मराठी साहित्याची फारशी गरज वा गोडी उरणार नाही.
अर्थात ईथेही कैक जण असतील जे ईंग्लिश माध्यमात शिकलेले असतील, पण त्यांच्या आधीच्या पिढ्यांमुळे त्यांच्यात मराठीची गोडी शिल्लक होती. येत्या पिढीबाबत मात्र हेच खात्रीने बोलता येणार नाही.

आज काही तरुण मुलेमुली मराठी संकेतस्थळांवर आहेत, तुरळक नव्याने येत आहेत. पुढे पुढे या युवाभरतीचा आकडा आणखी कमी होत जाणार. जे आज आहेत ते देखील आजन्म याच सातत्याने टिकणार नाहीत. पुढे गळतीचे प्रमाण जास्त जास्त आणि भरतीचे कमी कमी असा आलेख दिसू लागल्यास नवल नसावे.

अपवाद वगळता कोणीही लेखक आंतरजालावर सातत्याने फार मोठ्या काळासाठी लिहू शकत नाही, किंवा काही कारणात्सव लिहित नाही. जर नवीन सभाससदांमधून लेखक वर्ग निर्माण झाला नाही तर हळूहळू जसे जुने लेखक गळपटू लागतील तसे धाग्यांची संख्या सुद्धा रोडावू लागेल. परीणामी जुन्या वाचकांचा ओघही मंदावेल. हे एक दुष्टचक्र आहे जे आज ना उद्या एकेक करत सर्वच मराठी संकेतस्थळांना घेरण्याची शक्यता आहे.

मराठी संकेतस्थळात तंत्रात नक्कीच कात टाकतील, मात्र लिखाणाचे सोंग घेता येणार नाही. चर्चांचे धागे जगाच्या अंतापर्यंत राहतीलच, पण प्रश्न आहे की त्या चर्चा मराठी भाषेत करण्यात किती जणांना रस असेल.

कदाचित जे चित्र मला दिसतेय ते वीस वर्षानंतरचे असेल, कदाचित चाळीस वर्षानंतरचे. कदाचित असे काहीही होणार नाही, माझा अंदाजच चुकेल. कदाचित येत्या काळात मातृभाषेचे मराठीचे फॅड आले असेल. कदाचित ते फॅडच असेल आणि विरताच ठप्पाठप एकेक करत मराठी संकेतस्थळे ओसाड पडतील. कदाचित..... कदाचित काही वेगळेच घडेल.

हा प्रश्न एकट्या मायबोलीचा नाही तर एकूणच आंतर जालावरील सर्वच मराठी संकेतस्थळांचा आहे.

मराठी संकेतस्थळांचे भविष्य काय?

जर सुनिश्चित नसेल तर त्यावर उपाययोजना काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयी... ip ऍड्रेस वरून ड्यु आयडी ओळखणे कठीण आहे, सेम फोन च्या वेगवेगळ्या browser मधून लॉगिन केले तर पकडले जातील मात्र जर वेगवेगळ्या मशीन वरून लॉगिन केले तर नाही समजणार म्हणजे एक लॉगिन पीसी वरून आणि एक फोन च्या इंटरनेट वरून.

जे जाणकार आणि मुरलेले असतात त्यांच्याकडे आपला आयपी ट्रेस होऊ नये किंवा दरवेळी वेगळाच दिसावा याच्या ट्रिक असतात. चोर पोलिसाचा खेळ आहे हा.

Wah.. आशा काँस्पिरसी थिअरी मध्ये नाव आल्यावर कसे सिनिअर माबोकर झाल्यासारखे वाटते.

Wah.. आशा काँस्पिरसी थिअरी मध्ये नाव आल्यावर कसे सिनिअर माबोकर झाल्यासारखे वाटते.

ओहो, फारच गूढरम्य प्रकार सुरू आहे एकंदरीत

अल्बर्ट पिंटो च्या खालोखाल आता मंदार जोशी नाव प्रसिद्ध झाले आहे, तो आता कुठल्या डुआय ने वाचत असेल तर किती धन्य झाला असेल.
याच साठी केला होता अट्टाहास:)

तो आता कुठल्या डुआय ने वाचत असेल तर किती धन्य झाला असेल.>>>
"वाचत असेल तर " नाही "वाचतच असेल आणि"

बादवे - DOB हा फार पर्सनल डेटा आहे आणि पब्लिक फोरम वर टाकला नाही पाहिजे. समजा तुम्ही नाव, गाव, DOB सगळे खरे टाकले तर दुरुपयोग ही होऊ शकतो.
स्वताचे अस्तित्व पटवून द्यायची इतकी गरज ती काय?

मजा आहे खरंच. बाफ कोणता अन ड्रामा काय चाललाय !!
>>>>
एकदा शंभर झाले की मी अवांतर थांबवायची विनंती करणार आहे Happy

Pages