समजूनी आम्हाला घ्या रे

Submitted by र।हुल on 1 August, 2017 - 22:05

विचारांना उमटवताना लेखणी
जरी चुकतात लिहीणारे
लहान अजुनी साहित्याच्या अंगणी
समजूनी आम्हाला घ्या रे ॥१॥

कोमल कळ्यांना ऊद्याच्या फुलांना
का खुडवता बालकांना रे
कौतुक मातेला, बोबड्या बोलांना
समजूनी आम्हाला घ्या रे ॥२॥

जरी आहोत लहान, लेखनाची अतृप्त तहान
बनवेल आम्हाला ऊद्याचे सितारे
सृजनाची गरुडभरारी घेण्यासाठी
समजूनी आम्हाला घ्या रे ॥३॥

―₹!हुल / २.८.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. आपल्या हृदयातील निर्मळ भावना कवितेत उतरल्यासारखी वाटली. दिल छोटा न करो। सभी माबोकर आपके साथ है।

मस्त....