मराठी संकेतस्थळांचे भविष्य काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2017 - 12:13

जर आज मराठी शाळांचे भविष्य धोक्यात आहे तर उद्या मराठी संकेतस्थळांचेही भविष्य धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.

कारण मराठी संकेतस्थळावर बागडण्यासाठी मराठी लिहिता, वाचता येणे गरजेचे असतेच, पण ईतकेच पुरेसे नसून मराठीत व्यक्त होण्याची आवड सुद्धा तितकीच गरजेची आहे.
येणारी पिढी जर ईंग्रजी माध्यमात शिकलेली असेल आणि त्यांचे लिखाण आचार विचार त्याच भाषेत असतील तर त्यांना मराठी भाषेची, मराठी साहित्याची फारशी गरज वा गोडी उरणार नाही.
अर्थात ईथेही कैक जण असतील जे ईंग्लिश माध्यमात शिकलेले असतील, पण त्यांच्या आधीच्या पिढ्यांमुळे त्यांच्यात मराठीची गोडी शिल्लक होती. येत्या पिढीबाबत मात्र हेच खात्रीने बोलता येणार नाही.

आज काही तरुण मुलेमुली मराठी संकेतस्थळांवर आहेत, तुरळक नव्याने येत आहेत. पुढे पुढे या युवाभरतीचा आकडा आणखी कमी होत जाणार. जे आज आहेत ते देखील आजन्म याच सातत्याने टिकणार नाहीत. पुढे गळतीचे प्रमाण जास्त जास्त आणि भरतीचे कमी कमी असा आलेख दिसू लागल्यास नवल नसावे.

अपवाद वगळता कोणीही लेखक आंतरजालावर सातत्याने फार मोठ्या काळासाठी लिहू शकत नाही, किंवा काही कारणात्सव लिहित नाही. जर नवीन सभाससदांमधून लेखक वर्ग निर्माण झाला नाही तर हळूहळू जसे जुने लेखक गळपटू लागतील तसे धाग्यांची संख्या सुद्धा रोडावू लागेल. परीणामी जुन्या वाचकांचा ओघही मंदावेल. हे एक दुष्टचक्र आहे जे आज ना उद्या एकेक करत सर्वच मराठी संकेतस्थळांना घेरण्याची शक्यता आहे.

मराठी संकेतस्थळात तंत्रात नक्कीच कात टाकतील, मात्र लिखाणाचे सोंग घेता येणार नाही. चर्चांचे धागे जगाच्या अंतापर्यंत राहतीलच, पण प्रश्न आहे की त्या चर्चा मराठी भाषेत करण्यात किती जणांना रस असेल.

कदाचित जे चित्र मला दिसतेय ते वीस वर्षानंतरचे असेल, कदाचित चाळीस वर्षानंतरचे. कदाचित असे काहीही होणार नाही, माझा अंदाजच चुकेल. कदाचित येत्या काळात मातृभाषेचे मराठीचे फॅड आले असेल. कदाचित ते फॅडच असेल आणि विरताच ठप्पाठप एकेक करत मराठी संकेतस्थळे ओसाड पडतील. कदाचित..... कदाचित काही वेगळेच घडेल.

हा प्रश्न एकट्या मायबोलीचा नाही तर एकूणच आंतर जालावरील सर्वच मराठी संकेतस्थळांचा आहे.

मराठी संकेतस्थळांचे भविष्य काय?

जर सुनिश्चित नसेल तर त्यावर उपाययोजना काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्बा - आपल्याला माझा मुद्दा पटला याबद्धल आनंद आहे.
याच्यावर उत्तर नाहीय माझ्याकडे, फक्त कारण गेस केले आहे.

नवीन Submitted by
webmaster on 30 November, 2017 - 04:09
@राहुल
>त्यांना येथे का लिहावं वाटत नाही याचा शोध प्रशासनाने घ्यायला हवा.
एक जण असे आहेत की इथे मायबोलीवर गोडगोड लिहितात. नंतर बाहेर ट्विटरवर जाऊन मायबोली कशी बंद पाडली पाहिजे अशा ट्विट्स करतात. सायबरसेल, Home ministry यांच्याकडे जाऊन मायबोलीबद्दल ट्विटर वर तक्रारी करतात. किंवा इथल्याच काही लिहत्या लोकांच्या मागे लागून लागून त्याना मायबोली सोडायला भाग पाडतात. म्हणजे इथे आधी नांदणार्या मायबोलीकरांमधे विश्वास निर्माण करायचा आणि नंतर बाहेर मायबोलीबद्दल वाईट खोट्या बातम्या पसरवायच्या. मुद्दाम सभासदांच्या पाठीमागे लागून त्याना मायबोली सोडायला लावायचं.>>>>>

मला याबद्दल इतकं माहीती नव्हतं.

एक जण असे आहेत की इथे मायबोलीवर गोडगोड लिहितात. नंतर बाहेर ट्विटरवर जाऊन मायबोली कशी बंद पाडली पाहिजे अशा ट्विट्स करतात. सायबरसेल, Home ministry यांच्याकडे जाऊन मायबोलीबद्दल ट्विटर वर तक्रारी करतात. किंवा इथल्याच काही लिहत्या लोकांच्या मागे लागून लागून त्याना मायबोली सोडायला भाग पाडतात.>>> ओह बापरे अशी पण लोकं आहेत इथे? कठीणच आहे मग..

यावर माझं मत लिहिते. मी स्वतः ४-५ वर्षांपूर्वी सभासद झाले. पण एकूणच फॉरमॅट तेव्हा रुचला नाही. दोनेक वर्षांनी पुन्हा आले तरीही आपलेसे वाटले नाही. गेल्या वर्षभरापासून इथे नियमित लिहिते आहे. मध्ये, चारेक महिन्यांपूर्वी काही पोस्टवर उचकणाऱ्या कमेंट येऊ लागल्या किंवा विषयांतर होऊ लागलं, तेंव्हा मात्र मी लिहिणं पुन्हा कमी केलं होतं. कारण होतं काय की लिखाण झाल्यावर काय मत असेल लोकांचं हे पाहण्याची उत्सुकता असतेच. आणि खरं सांगायचं तर इथल्या काही चांगल्या वाचकांमुळे बऱ्याच गोष्टी शिकलेही. त्यातून नवीन प्रयोग करत राहिले. पण जेव्हा कमेंटचा त्रास होऊ लागतो तेव्हा नाराजी येणे साहजिक आहे असे मला वाटते.
इथल्या सुजाण वाचकांनी नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी योग्य प्रकारे मुद्दे द्यावेत. म्हणजे काय की, कथेचं सूत्र कसं वाटत आहे, त्याचा वेग, त्याची भाषा, मांडलेले मुद्दे विस्कळीत आहेत वगैरे. अशा उत्तरातून माणूस शिकत जातो. इथल्या काही कमेंट्स मुळे मला स्वतःला खूप फायदा झाला आहे.

तर हा पुढचा सल्ला नवीन लेखकांना. जेव्हा एखाद्या पोस्टवर कमेंट येतात त्यातून योग्य ते घ्यायचं. मी मला जे योग्य वाटले तेच घेत राहिले म्हणून आज इथे लिहीत आहे. प्रत्येक पोस्टच्या कमेंटवर वाद घालत बसले असते तर माझं येणं नक्कीच बंद झालं असतं.
कमेंट आली नाही तरी उदास न होता लिहीत राहिलं पाहिजे. कारण एक महत्वाची गोष्ट कळली आहे गेल्या दोनेक वर्षात, लिखाण बंद झाल्याने प्रगती होणार नाहीये. त्यामुळे लिहीत राहायचं. एका पोस्टवर अडकून न राहता पुढची लिहायची म्हणजे मागच्यातील वाद मागे राहून जातात.

बाकी, अनेक संकेतस्थळं बघता आणि फेसबुक वर सध्या जवळपास पाहिलेले इतके लेखक आहेत की पुढचे काही वर्षं तरी मराठी लिखाण कमी होईल असं वाटत नाही. एक पोर्टल नाही दुसरं, एक पेज नाही दुसरं चालू राहील.

विद्या.

जवळजवळ सर्वच मसंस्थळांवर एक पॅटर्न ठरून गेला आहे. कशा प्रकारचे वादविवाद झडतील, काथ्या कुटला जाईल हे जवळजवळ प्रेडिक्ट करता येते. नविन सदस्यांबरोबर प्रस्थापितांचे वागणे तिडिक जाण्यासारखेच असते. माहितीपूर्ण, अनुभवसिद्ध मते मांडू शकणार्‍या किती तरी लोकांना केवळ वादंग आवडत नाही म्हणून संस्थळांवर लिहावेसे वाटत नाही. मला व्यक्तिशः कंपुबाजी फार मोठी समस्या वाटत नाही.
माझ्या मते, मराठी संस्थळांचे भविष्य काय असा निरवानिरवीचा सवाल विचारत बसण्यात अर्थ नाही. जोवर मराठीत संवाद साधण्याची भूक असेल तोवर सम्स्थळे राहतील अन्यथा मरण पावतील. तो काळ अजून लांब आहे असे वाटते. जोवर संस्थळे आहेत तोवर त्यांचा जास्तीत जास्त उत्तम वापर होईल हे पाहिले जावे. राजकिय उखाळ्ञापाखाळ्या अन प्रोपगंडा यांना जमेल तितके कमी स्थान मिळावे. फिक्शन लिहिणारे केवळ प्रतिसाद मिळाल्यावाचून दुरावू नयेत हे पहाणे सदस्य अन नियंत्रक या दोहोंच्याही हातात आहे. आवडलेली कथा पूर्ण करण्याचा आग्रह करण्यासाठी सदस्यता घेणारे किती तरी आहेत. त्यांचे पाहून अन्य वाचनमात्रांनी देखिल आळस झटकावा आन जिथे उत्तम साहित्य उपेक्षित ठरते आहे असे दिसते तिथे प्रतिसाद द्यावा.

ठप्पाठप एकेक करत मराठी संकेतस्थळे ओसाड पडतील >>>

ऋन्म्या, तुझ्या जीभेला काही हाड ! जरा शुभ बोल नार्‍या
आता असे काही म्हणायच्या ऐवजी काही जण 'तुझ्या तोंडात किडे पडो' असेही ( मुह मे किडे पडे तेरे चं भाषांतर ) ऐकवतील.

ज्ञानेश्वरांच्या वेळची मराठी आणि आताची मराठी ह्यात जमीन अस्माना चा फरक आहे. इतकी बदलली तरी ती मराठी म्हणूनच ओळखली जाते
जमीन, अस्मान, फरक असे शब्द येऊनही ती फारसी म्हणून ओळ्खली जात नाही तसेच आता असलेल्या हिंदी /इंग्रजी भाषेच्या अतिरेकी प्रभावा मुळे मराठीचे रुपडे पालटेल पण 'मराठी' जिवंतच राहील आणि त्यामुळे मराठी संकेत स्थळे देखिल.

आणि समजा पडलीच बंद तर 'अपनी तो जैसे तैसे, कट जाएगी'
पर तेरा क्या होगा कालिया Wink

हर्पेन, हो सगळीच मराठी संकेतस्थळे बंद झाली तर माझ्या आयुष्यातील एक मजा कमी होईल. पण जोपर्यंत शेवटचे मराठी संकेतस्थळ चालू असेल तोपर्यंत मी त्यावर माझे दुकान थाटून असेल Happy

मला याबद्दल इतकं माहीती नव्हतं.
Submitted by र।हुल on 30 November, 2017 - 08:53
<<
हो नं.
याला म्हणतात निरागस प्रांजलपणा.
आता त्यांनी तुमचं नांव घेऊन प्रश्न विचारलाय, तेव्हा तितके तुम्ही ज्ञानी आहेत, असा सरळ अर्थ होतो. नैका?

@र।हुल
>मला याबद्दल इतकं माहीती नव्हतं.
असं म्हणता? बरं मी सांगतो. त्या व्यक्तिचं नाव आहे मंदार जोशी. मायबोली बंद व्हावी म्हणून त्यांनी होम मिनिस्ट्री आणि इतर सरकारी विभागांकडे केले ट्विट्स कुणालाही पाहण्यासाठी ट्विटरवर उपलब्ध आहेत. ते मोठे झाले असं वाटलं होतं.
आता तर तुम्हाला माहित झालं ना? तर तुम्हाला (र।हुल यांना) व्यक्तीशः त्यांच्याबद्दल काय वाटतं? आणि अशांचं काय करायचं ?

ईथे मराठीत व्यक्त व्हायची गरज उरेल का हाच प्रश्न आहे.
>>
मराठीत व्यक्त होण्याची गरज आणि मराठी संकेतस्थळं हे २ वेगळे मुद्दे आहेत. मराठीत व्यक्त होणारी प्रत्येक व्यक्ती मराठी संकेतस्थळावर आहेच असं म्हणतोयेस का?

मराठी संकेतस्थळं नसली तरी दुसरं काही तरी असेलच. तेंव्हा तू खरच चिल!!!!!!
खुद्द वेमा आणि अ‍ॅड्मिनना एवढी काळजी वाटत नसेल जेवढी तुला वाटतेय Proud

मंदार जोशीला जर मायबोलीबद्दल इतका आकस आहे आणि ती बंद पडावी म्हणून इतके प्रयत्न चालू आहेत तर इथून इतक्यांदा उडवल्यानंतरही परत परत का येतो हा आयडी??

ती एक अजब केस आहे सायो.
बाकी मंजो महाशय बरेच दिवसांनी चर्चेत आले आणि वेमानी नाव गाव घेऊन उल्लेख केल्याबद्दल बरेही वाटले. जुन्या सगळ्यांनाच हे उपद्व्याप करणारी व्यक्ती महिती होती आता त्याला अधिकृत शिक्कामोर्तब झाले

मला माहित नव्हतं आशुचँप. माझा ह्या आयडीशी मायबोलीवर, मायबोलीबाहेर काहीही संबंध नाही. मात्र इथे डुआयडी घेऊन लिहायला लागल्यावर तोच एक नाही तर जामोप्या, उदय (इनामदार) हे आयडी ओळखू येतातच.

कोणीतरी जुन्याजाणत्या माबोकराने हे मंदार जोशी आणि तत्सम किस्से लिहा ना. आम्हाला वाचायला मजा येईल.

भेट मला तुला सगळे किस्से सांगतो
मंजो माझा माबोवरचा पहिला मित्र
प्रत्यक्ष भेटलेली पहिली व्यक्ती असे बरेच काही होता
तू भेटलास तर तुला प्रत्यक्ष भेटणारा पहिला म्हणून माझी नोंदणी होईल.

त्यात फक्त मंजो सापडेल, बाकीचे कोकणस्थ, सदरक्षणाय, शांताराम कागाळे कुठून सापडायचे??
मंजो चे अवतार खुद्द त्यालाही आठवत असतील का शंका आहे आणि जर आठवले तर लिम्का बूक मध्ये नोंदणी करण्याच्या क्षमतेची संख्या असेल असे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो Happy

>>वेमांचा प्रतिसाद वाचुन बापरे झालं.
असेही लोक आहेत माबोवर?>> +१

>>कोणीतरी जुन्याजाणत्या माबोकराने हे मंदार जोशी आणि तत्सम किस्से लिहा ना. आम्हाला वाचायला मजा येईल.>>
एखादी व्यक्ती मायबोलीबद्द्ल इतका टोकाचा वैरभाव बाळगून असताना पुन्हा याच संकेतस्थळावर त्या व्यक्तीला किश्श्याच्या रुपात का होईना विशेष स्थान का द्यावे?

बाकी मराठी संस्थळांचे रुप पालटेल, लेखक आणि वाचक बदलतील. काळानुरुप हे बदल होत रहाणार. मराठीबद्दल बोलायचे तर वीस वर्षांपूर्वी अमेरीकेत तुरळक मराठी शाळा होत्या. आज बघायला गेले तर मराठी भाषेच्या शाळांमधे लक्षणीय वाढ झालेय. कुणी सांगावे उद्या या शाळेतून शिकलेले कुणीतरी अजून एक मराठी संकेत स्थळ सुरु करेल. Happy

वेमा, आपल्या संपुर्ण प्रतिसादाबद्दल फक्त एवढंच बोलेल,
धन्यवाद ! Happy
संपर्कमेल बघावी.

रिये युद्धस्य कथा रम्य: .. त्या अपेक्षेने विचारले.पण तरीही कधीतरी मैफल जमायला हवी एखाद्या धाग्यावर.. चाळीतले काका आजोबा जसे पोरांना त्यांच्या जमान्यातील किस्से कहाण्या सांगतात तसे.. जुन्या माबोकरांनी सांगावेत. आणि आम्ही डोळे मोठ्ठाले करून ऐकावेत..

"त्यात फक्त मंजो सापडेल, बाकीचे कोकणस्थ, सदरक्षणाय, शांताराम कागाळे कुठून सापडायचे??", "मात्र इथे डुआयडी घेऊन लिहायला लागल्यावर तोच एक नाही तर जामोप्या, उदय (इनामदार) हे आयडी ओळखू येतातच." - हे कळतं कसं की कोण कुणाचा डुप्लिकेट आयडी आहे?

"तू भेटलास तर तुला प्रत्यक्ष भेटणारा पहिला म्हणून माझी नोंदणी होईल." - तसं झालं तर तुझा (तुमचा?) सत्कारच करायला लागेल शनिवार वाडा बूक करून Happy

एखादी व्यक्ती मायबोलीबद्द्ल इतका टोकाचा वैरभाव बाळगून असताना पुन्हा याच संकेतस्थळावर त्या व्यक्तीला किश्श्याच्या रुपात का होईना विशेष स्थान का द्यावे?
>>>>

या लॉजिकने क्रूरकर्म्यांना ईतिहासात स्थानच देऊ नये असे झाले.

हे कळतं कसं की कोण कुणाचा डुप्लिकेट आयडी आहे?
>>>
ते प्रत्येकाचा युएसपी की ट्रेडमार्क की काही ते मराठीत व्यवच्छेदक लक्षण असते ना.. जसे की मी ऑर्कुट सनूहावर काका आजोबा पोरी बाळी अश्या कैक रुपात फेक प्रोफाईल काढायचो. पण नवनवीन धागे गुंफायचा किडा माझी ओळख ठरवायचा. त्यावर कण्ट्रोल केली तरी दर दुसरया वाक्यावर वाद घालणे, आर्ग्युमेंट करणे. नाही लपून राहत एखद्याची उपजत शैली. त्यासोबत बागडलेल्यांना समजतेच. मुळात ड्यू आय बनवणारे कुठल्या मिशनवर आलेले गुप्तहेर नसतात. आपण ओळखले जाऊ नये अशी जाणीवपूर्वक काळजी ते घेतही नाहीत.
असो, तीन वाजून गेले.. शुभरात्री!

>>या लॉजिकने क्रूरकर्म्यांना ईतिहासात स्थानच देऊ नये असे झाले.>>
असहमत! मायबोली हे एक खाजगी मालकीचे संकेतस्थळ आहे. इतिहासाचे तसे नाही. त्या व्यक्तीबद्दलचे किस्से खाजगीत कुणी तुम्हाला सांगणार असेल तर ठीक आहे पण मायबोलीवर त्यासाठी अजून एक धागा नको. तसेच अशा किश्श्यांच्या धाग्यामुळे मायबोलीच्या मालकांना अजून काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी कुणावर?

महाराष्ट्र शासनाचे शालेय अभ्यासक्रमातील ईतिहासाचे पुस्तकही खाजगीच झाले.
खाजगी असल्याने अभ्यासक्रमात काय समावेश असावा की नसावा हे ठरवयाचा हक्क महाराष्ट्र शासनाकडे आणि ईथे मायबोलीकडे आहे हे मान्य. पण ते लपवण्यात काही हशील नाही हा माझा मुद्दा आहे.

>>लपवण्यात काही हशील नाही हा माझा मुद्दा आहे.>>
'किस्से इथे नको ' असे म्हणण्यामागचे कारण माहिती लपवणे नाही. वेमांना आवश्यक आणि योग्य वाटल्यास ते माहिती देतील. मात्र आत्ताच वेमांनी जी माहिती दिली आहे त्यावरुन बरेच काही गंभीर घडले असावे. तेव्हा या प्रकरणाकडे ' इथे किस्से सांगा . आम्हाला वाचायला मजा येइल' अशा प्रकारे बघू नये असे मला तरी वाटते.

इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी मुलामुलींना फेसबुकवर लिहायला आवडतं. तिथेही त्यांचे सर्वच मित्र मराठी नसल्याने ते इंग्रजीतच लेखन आणि प्रतिसाद लिहितात. ते मराठीत लिहितात तेव्हाही इंग्रजी शब्द बरेच वापरतात. लाइक्स मिळालेले आवडतात.
इकडेही त्यांची लेखन करावे असे वाटत असेल तर लेखाखाली 'लाइक' बटन ठेवता येईल. शाळांचे माध्यम हा चावून चोथा झालेला विषय आहे. मराठी शाळा इतिहास आहे. संस्थळांनीच बदल करायला हवेत.

काही लेखकांना फक्त लाइक्स आवडतात. विरोधी / अधिक माहिती देणारे/ चुका काढणारे/ इतरांची स्तुती करणारे प्रतिसाद येऊ नये असं वाटतं. आपलं लेखनमात्र इतरांनी मनोभावे वाचावं ही आस असते. किंवा लेखनावर चर्चा करूच नये,केलीच तर दुसरीकडे करा. अशा लेखकांसाठी फक्त वाचनमात्र लेख लिहिण्याचा पर्याय ठेवावा - अर्थात लाइक बटणसह.

ऋन्मेष लिहितोस,चर्चा घडवतोस आणि प्रतिसादांस उत्तरेही{तीन वाजेपर्यंत} देतोस हे आवडतं.

मंडळी,
वर माझ्या एका प्रतिसादात एक घटनेचा उल्लेख केला आहे,
बाकी वेमा नि सांगितलेच आहे fb ट्विटर ची time line पहा त्याची.

आशु,
बाळाजीपंत, अंतुबरवा, चिमणराव,निलेश हे id राहिले. Happy

Pages