मराठी संकेतस्थळांचे भविष्य काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2017 - 12:13

जर आज मराठी शाळांचे भविष्य धोक्यात आहे तर उद्या मराठी संकेतस्थळांचेही भविष्य धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.

कारण मराठी संकेतस्थळावर बागडण्यासाठी मराठी लिहिता, वाचता येणे गरजेचे असतेच, पण ईतकेच पुरेसे नसून मराठीत व्यक्त होण्याची आवड सुद्धा तितकीच गरजेची आहे.
येणारी पिढी जर ईंग्रजी माध्यमात शिकलेली असेल आणि त्यांचे लिखाण आचार विचार त्याच भाषेत असतील तर त्यांना मराठी भाषेची, मराठी साहित्याची फारशी गरज वा गोडी उरणार नाही.
अर्थात ईथेही कैक जण असतील जे ईंग्लिश माध्यमात शिकलेले असतील, पण त्यांच्या आधीच्या पिढ्यांमुळे त्यांच्यात मराठीची गोडी शिल्लक होती. येत्या पिढीबाबत मात्र हेच खात्रीने बोलता येणार नाही.

आज काही तरुण मुलेमुली मराठी संकेतस्थळांवर आहेत, तुरळक नव्याने येत आहेत. पुढे पुढे या युवाभरतीचा आकडा आणखी कमी होत जाणार. जे आज आहेत ते देखील आजन्म याच सातत्याने टिकणार नाहीत. पुढे गळतीचे प्रमाण जास्त जास्त आणि भरतीचे कमी कमी असा आलेख दिसू लागल्यास नवल नसावे.

अपवाद वगळता कोणीही लेखक आंतरजालावर सातत्याने फार मोठ्या काळासाठी लिहू शकत नाही, किंवा काही कारणात्सव लिहित नाही. जर नवीन सभाससदांमधून लेखक वर्ग निर्माण झाला नाही तर हळूहळू जसे जुने लेखक गळपटू लागतील तसे धाग्यांची संख्या सुद्धा रोडावू लागेल. परीणामी जुन्या वाचकांचा ओघही मंदावेल. हे एक दुष्टचक्र आहे जे आज ना उद्या एकेक करत सर्वच मराठी संकेतस्थळांना घेरण्याची शक्यता आहे.

मराठी संकेतस्थळात तंत्रात नक्कीच कात टाकतील, मात्र लिखाणाचे सोंग घेता येणार नाही. चर्चांचे धागे जगाच्या अंतापर्यंत राहतीलच, पण प्रश्न आहे की त्या चर्चा मराठी भाषेत करण्यात किती जणांना रस असेल.

कदाचित जे चित्र मला दिसतेय ते वीस वर्षानंतरचे असेल, कदाचित चाळीस वर्षानंतरचे. कदाचित असे काहीही होणार नाही, माझा अंदाजच चुकेल. कदाचित येत्या काळात मातृभाषेचे मराठीचे फॅड आले असेल. कदाचित ते फॅडच असेल आणि विरताच ठप्पाठप एकेक करत मराठी संकेतस्थळे ओसाड पडतील. कदाचित..... कदाचित काही वेगळेच घडेल.

हा प्रश्न एकट्या मायबोलीचा नाही तर एकूणच आंतर जालावरील सर्वच मराठी संकेतस्थळांचा आहे.

मराठी संकेतस्थळांचे भविष्य काय?

जर सुनिश्चित नसेल तर त्यावर उपाययोजना काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती 2,
ते किस्से चर्चेला घ्यायचे की नाही हा अधिकार वेमांकडे आहे हे मान्यच. मुद्दा ईतकाच होता की एखाद्या क्रिमिनलची बातमी पहिल्या पानावर छापली म्हणून त्याला विशेष स्थान दिले असा त्याचा अर्थ होत नाही.

बाकी काय घडलेय हे मला माहीत नाही तसेच वरच्या आपल्या पोस्टवरून वाटते की आपल्यालाही माहीत नाही. त्यामुळे खरे तर एखाद्याला क्रिमिनल ठरवत चर्चा पुढे नेणे हे देखील चूकच. मी तरी सर्व किस्सा ऐकल्याशिवाय कोणालाही चूक ठरवू शकत नाही. त्यामुळे "अश्या" व्यक्तीला विशेष स्थान द्यावे की न द्यावे हा मुद्दाच माझ्यासाठी बाद आहे कारण ती "तशी" व्यक्ती आहे हेच मला ठाम नाही.

ऋन्मेष,
इथे वेमांनी सांगितले त्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही हे खरे आहे. माझ्या पोस्टमधे मी त्या व्यक्तीला क्रिमिनिल म्हटले नाहीये, वेमानी दिलेली माहिती बघता ती व्यक्ती मायबोलीबद्दल टोकाचा वैरभाव बाळगुन आहे असे म्हटले आहे. मनात वैरभाव बाळगणे आणि कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा मी जे विधान मी केले नाहीये ते मी केलेय असे भासवणे, आणि वर चर्चा पुढे नेणे चूक आहे हे मला सांगणे योग्य नाही. इथे किस्से सांगा , वाचायला गंमत येइल ही पोस्ट तुमची होती, माझी नाही.
माझ्या बाजूने या बाबतच्या चर्चेला पूर्णविराम.

वेमांचा प्रतिसाद क्षणभर वाचून Uhoh झालं; दस्तुरखुद्द वेमाच विषयाला सोडून बोलताहेत असं वाटलं. पण एकंदरित नक्की काय चाललंय त्याबद्दल वेमांना जितकं माहीत आहे, तितकं आपल्याला माहीत होणं शक्य नाही, असं पुढला प्रतिसाद पाहून वाटलं.

धाग्याचा विषय वाचून साहित्यसंमेलनातल्या मराठीच्या, मराठी साहित्याच्या भवितव्यासंबंधीच्या ठरीव परिसंवादांची आठवण झाली.

काही होत नाही.व्यवस्थित चालू राहिल मायबोली आणि इतर मराठी संकेतस्थळं. एक छोटी लीगल टिम इन प्लेस हवी. राजकीय वाद्/बुलिइंग/लिखाणावरुन एखाद्या माणसाच्या आयुष्याबद्दल जजिंग आणि त्यातून त्याला बुलिइंग/पर्सनल डिफेमेशन संबंधी लिखाणाबद्दल योग्य निर्णय घ्यायला/निर्णयातून उशीर होऊन सरकारी अ‍ॅक्शन झाल्यास समर्थ पणे उत्तरे द्यायला.

फक्त एक आणि एकच गोष्ट/संकेत लक्षात ठेवणे: व्हर्च्युअल/सोशल नेटवर्क वरील मित्र आणि शत्रू हे दोन्ही खर्‍या प्रत्यक्ष भेटणार्‍या मित्र आणि शत्रूना पर्याय नाही.वाक्य अगदी साधं आहे.आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न सारखा करत असतो.पण कधीकधी आपण खूप गुंतत जातो व्हर्च्युअल जगात.त्या जगातली माणसं खरी आहेत, त्यांच्यात खर्‍या माण्ससांप्रमाणेच गुण दुर्गुण चांगलं वाईट उदारपणा कोतेपणा आहे हे लक्षात घेत नाही.माणसाच्या व्हर्च्युअल लिखाणातून्/स्क्रिनवर व्यक्त होण्यातून त्याच्या विषयी तर्क बांधत जातो.मनात एक इमेज बनवत जातो.आणि मग ते माणूस प्रत्यक्षात त्याच्या त्या इमेज पेक्षा वेगळं वागलं की हर्ट होत जातो.

संकेतस्थळावरील वादांमध्ये आपला शब्द अखेरचा ठरला नाही, आपण हरलो याची नामुष्की वाटून लिहीणं बंद करणारे/लिहीण्यात कडवट्पणा आलेले कीती?
प्रत्यक्षात रात्री बसून पेल्याला पेले भिडवणारे पण संकेतस्थळावर मुद्दाम काड्या टाकून एखादे भांडण आपसात करुन गंमत पाहणारे किती?
एखाद्या अत्यंत दु:खद विषयाबद्दल स्वतःला देणं घेणंही नसताना काहीतरी धागा काढून टि आर पी साठी त्यावर मुद्दाम वादग्रस्त वाक्यं लिहून प्रतीसादाची कमाई करणारे किती?
हे सर्व कळत असताना काही लोकांशी हितसंबंध दुखावता येत नाही,दुखावून चालत नाही म्हणून काही स्टँड न घेता अगतिकपणे पाहत बसणारे किती?

वेमांचा प्रतिसाद वाचुन बापरे झालं.
असेही लोक आहेत माबोवर? Uhoh>>> हो आहेत त्यापैकी मी आहे..
कारण अश्या काहि कुलंगड्या कोणी करत असतील अशी मी तर कल्पनाहि करु शकत नाहि.. सुरवातीलाच मराठी साईट असं सर्च करताना जेव्हा मला मायबोलीची साईट सापडली तेव्हा कोण आनंद झाला होता अन त्यात सगळ्यांशी बोलता येत होत अन तेहि मराठीतुन. खुपच मस्त वाटायचं मायबोलीवर येवुन लिहायला. अन अश्या साईट बद्दल ती बंद व्हावी असा प्रयत्न करणारी लोकं आहेत हे पाहुन वाईट अन आश्चर्य वाटलं.
अन आता त्याचं नावहि कळलं.

असेही लोक आहेत माबोवर? Uhoh>>> हो आहेत त्यापैकी मी आहे..>>>>>
भावना काय लिहिताय? असे माबोची तक्रार वैगेरे करणारी वाईट लोकं आहेत माबोवर असं लिहिलंय मी. Uhoh

ओह अस होय.. मला वाटलं बापरे अस वाटणारी लोकं आहेत इथे. समजण्याचा घोटाळा झाला Happy

Lol

स्वाती२ - याच साठी मी त्याला प्रत्यक्ष भेटण्याचा सल्ला दिला होता पण आपले पितळ उघडे पडेल या भीतीने त्याने विषयाला पद्धतशीर बगल दिली आणि फाटे फोडत बसलाय नेहमीप्रमाणे.
मी_अनु यांचीही पोस्ट अत्यंत समर्पक

ओह राहुल म्हणजे मंदार जोशी का? Uhoh
कारण तिकडे राहुल आयडी असतो त्या आपला कट्टा गप्पा वैगेरे वर राहुल आयडी ब्लॉक झाल्याची चर्चा आहे..

एतेन

सस्मित. राहुल जेनुयीन आयडी वाटतो.. तो मंदार जोशी नसावा. तो एक नवलेखक आणि नवकवी आयडी होता.

सस्मित, काहीतरी गैरसमज आहे. राहुलचा आयडी ब्लॉक करवून घेतलाय. मला मंदार जोशी माहित नाहीत, पण त्यांच्याबद्दल ऐकून राहुल ही त्यांची आयडी नसावी म्हणून च्रप्स यांच्याशी सहमत.

सस्मित. राहुल जेनुयीन आयडी वाटतो.. तो मंदार जोशी नसावा. तो एक नवलेखक आणि नवकवी आयडी होता.>>+१११

@र।हुल>मला याबद्दल इतकं माहीती नव्हतं.असं म्हणता? बरं मी सांगतो. त्या व्यक्तिचं नाव आहे मंदार जोशी. मायबोली बंद व्हावी म्हणून त्यांनी होम मिनिस्ट्री आणि इतर सरकारी विभागांकडे केले ट्विट्स कुणालाही पाहण्यासाठी ट्विटरवर उपलब्ध आहेत. ते मोठे झाले असं वाटलं होतं.आता तर तुम्हाला माहित झालं ना? तर तुम्हाला (र।हुल यांना) व्यक्तीशः त्यांच्याबद्दल काय वाटतं? आणि अशांचं काय करायचं ?
Submitted by webmaster on 30 November, 2017>>>>
वेमा मला राहुल यांनी हा मेल पाठवला आहे.
काही महिन्यांआधी ते मला बहिण मानत होते पण काही कारणांमुळे मी ते नात तोडलं.
मी त्यांना पर्सनली ओळखत नाही.
परंतु त्यांचा हा मेल तुमच्या पर्यंत पोहचवणं मला गरजेचं वाटलं.

हाय कऊ Happy
पुर्वी मायबोलीवर मंदार जोशी नावाचा एक राजकीय आयडी कार्यरत होता. मायबोलर शेकडो ड्युआय घेऊन त्यांनी अनेक कारनामे केलेले असं लोकं म्हणतात.
'आपला अड्डा' (ग्रुप- राजकारण भारतात) या वाहत्या पानावरील आरारा, सिंबा, भरत मयेकर यांनी पॉलिटिक्स करून वेमांना भासवलं की, राहुल म्हणजेच मंदार जोशी. मंदार जोशी यांनी मागे कधीतरी होम मिनीस्ट्री कडे मायबोली बंद करण्यात यावी अशी ट्विट्टर वरून तक्रार केली होती. त्यामुळे आरारा यांनी राहुल हाच मंदार असं वेमांना सांगितल्याने वेमांनी मला मंदारच समजलं. मी मेल पाठवून माझी संपुर्ण ओळख वेमांना पटवून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याची दखल न घेताच ब्लॉक केलं. माझं एफबी अकाऊंट, बंद असलेलं ट्वीटर अकाऊंट,संपुर्ण नाव, राहण्याचा पत्ता इ.सविस्तर गोष्टी मेलमधून पाठवूनही त्यांनी लक्षदिलेलं दिसत नाही. मला का ब्लॉक केलंय याचं कारणही दिलेलं नाही.काहीही चुक नसताना मला ब्लॉक केलं गेलंय.
ऋ च्या 'मराठी संकेतस्थळांचे भविष्य' या धाग्यावर झाल्या गोष्टी वाचायला मिळतील..
मायबोली सुटलीच.. Sad
तुला कधी काहीही चुकून बोललो असेल तर मोठ्या मनानं मला माफ करशीन..

धन्यवाद Happy

Rahul Pimpale
Ahmednagar

मला तर तो ऋ चाच डुआयडी असल्याचे वाटत होते.
>>>>
+786
सुरुवातीला मलाही तसेच वाटायचे

<या वाहत्या पानावरील आरारा, सिंबा, भरत मयेकर यांनी पॉलिटिक्स करून वेमांना भासवलं की, राहुल म्हणजेच मंदार जोशी.>
अय्या! हो का? मला माहीत नव्हतं, वेमांकडे माझी एवढी वट आहे ते.
पुढचा नंबर कोणाचा लावू बरं? Wink

आणि आम्ही हे वेमांना भासवलं हे वेमांनी सांगितलं का राहुलना?

कोहम आयडी आहे ना अजून? तो राहुल यांचाच आयडी असल्याचं कट्टापट्टा अशा काहीतरी नावाच्या गप्पांच्या पानावर अनेकदा वाचलंय.

अगदी!!!
जोश्यांची जुनी स्टाईल आहे. काही खुट्ट झालं मायबोलीवर की आपल्या संपर्कातल्या सगळ्यांना मेल पाठवून किंवा विचारपुशीतून आपण निरागस असल्याचा निर्वाळा द्यायचा.

भास्कराचार्य +१.

वेमांचे प्रतिसाद वाचून तशी पुसट शंका आली होती. मेल वाचल्यावर खात्री झाली.

संभवामि मासे मासे (किंवा सप्तमीचं जे काय रूप असेल ते)

आणि आम्ही हे वेमांना भासवलं हे वेमांनी सांगितलं का राहुलना? >> हो ना.

अगदी!!!
जोश्यांची जुनी स्टाईल आहे. काही खुट्ट झालं मायबोलीवर की आपल्या संपर्कातल्या सगळ्यांना मेल पाठवून किंवा विचारपुशीतून आपण निरागस असल्याचा निर्वाळा द्यायचा. >> बरोबर सायो. मी पाहिलं आहे ते आधी कधीतरी.

काय गोंधळ सुरु आहे Sad
"अमक्याने सांगितले" म्हणून वेमा काही निर्णय घेतील हा आरोपच हास्यास्पद आहे. (पूर्वी हाच आरोप दुसर्‍या एका पानावरच्या ग्रुप ने केला होता तेव्हाही तसाच विनोदी वाटला होता!) त्यांच्याकडे इतर टूल्स असणार ना कोणता आयडी कोण आहे ते ओळखायला! (आयपी अ‍ॅड्रेस ट्रॅक करणे वगैरे)
बाकी हे पर्सनल आहे जरा पण नेट वरच्या ओळखीतून मानलेला भाऊ वगैरे फारच भाबडेपणा नाही का वाटत Happy

मंदार जोशी कविता लिहायचे का?

बाकी हे पर्सनल आहे जरा पण नेट वरच्या ओळखीतून मानलेला भाऊ वगैरे फारच भाबडेपणा नाही का वाटत Happy
>>>>>
लोकं लग्नही करतात. Happy
काही फसतात,काही सुखाने नांदतात.

व्वा! हे खरे मनोरंजन. अ‍ॅक्शन, ड्रामा, मेलोड्रामा, सस्पेन्स, थ्रीलर, आयटम सॉन्ग, बॅड बॉयज, गुड बॉयज, पॉलिटिक्स, पुलिस, कानून के हाथ बहुत लंबे होते है, सत्यमेव जयते, सगळाच मसाला पुरेपूर आणि लाइव!!!

मजा आली.

(वेमा, मला उडवू नका राव. तुम्ही फार शातीर किस्म के आदमी आहात हे यामिनित्ताने जबराच कळले Happy )

माबोवर आल्यापासुन मंदार जोशी हे नाव ऐकतो. ते मायबोली बद्दल आकस बाळगुन आहेत. हे ही माहित होते. पण मायबोली बंद करा हे जरा अतिच होतेय.
पण ज्या अर्थी राहुल हा मंदार जोशी आहे असे वेमांच्या प्रतिसादावरुन काहीजण ठरवत आहेत. त्याअर्थी वेमांनी एखाद्या आयडीच्या गोपनीयतेचा भंग केलाय असे वाटते.
प्लीज वेमा क्लिअर करा राहुल मंदार जोशी आहे की नाही.

वेमा कोणाला उत्तर द्यायला बांधील आहेत असे वाटत नाही. बाकी त्यांनी काहीही उत्तर दिले तरी त्या उत्तरातही शंभर फाटे फोडणारी लोकं इथं असतीलच.

वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,
उसे एक ख़ूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा !

Pages