सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

काल निहीरा मस्त गायली. यारा सिली सिली...... !! हृदयनाथ मंगेशकर अगदीच थकलेले वाटतात..काही विशेष विचार न करता चांगलं चांगलं म्हणत होते. आणि खरंच आहे... इतक्या उंचीचा - श्रेष्ठ संगीतकार......काय तो या नवीन लोकांचं ऐकणार नि सांगणार......!!! शाल्मली खोल्गडे वगैरे तर अगदीच सामान्य, स्वस्त, उथळ वाटतात त्यांच्या पुढे.........आणि हे आपले जजेस !!
हृदयनाथ तरी का आले असावेत? अ‍ॅट पार असल्यावर काही नॉर्म्स पाळावेत असे वाटते.

हृदयनाथ तरी का आले असावेत? >> खरं आहे...टी आर पी न पैशाचा खे़ळ म्हणुन आले असतील कदाचित...

हृदयनाथ मंगेशकर अगदीच थकलेले वाटतात..काही विशेष विचार न करता चांगलं चांगलं म्हणत होते. आणि खरंच आहे... इतक्या उंचीचा - श्रेष्ठ संगीतकार......काय तो या नवीन लोकांचं ऐकणार नि सांगणार.. > +११११११
काल हे प्रकर्षाने जाणवलं की मंगेशकरांच्या पुढच्या पिढित कोणीच ईतकं प्रतिभावान नाहिये...या ५ भावंडांनी जे काही दैवी संगीत निर्माण करुन ठेवलय ते निर्विवाद कालातीत आहे...पण त्यात भर घालायला दुर्दैवाने कोणीच नसेल Sad

सोमवारचा भागच पाहिलाय अजून. हृदयनाथ आलेत म्हणून सगळे जरा दबून आहेत असं वाटलं. कॅप्टन/जजेसही (इथे एक वाक्य लिहिण्याचं टाळलंय. पोलिटिकली करेक्ट आहे की नाही, हे ठरत नसल्याने) गाण्यात अ‍ॅडिशनल जागा न घेता आहे तसं सादर करायचा प्रयत्न.

मी खरं तर नवी गाणी फारशी ऐकत नाही. पण मला हा कार्यक्रम पाहताना नव्या पिढीबद्दल निराशा, त्यांच्याकडून अपेक्षाच नाहीत असं वाटत नाही. वर शाल्मलीबद्दल जे जे लिहिलं गेलंय (स्वस्त? :अओ:) ते खटकलं. ही मंडळी संगीताच्या वेगळ्या प्रवाहात पोहोताहेत, इतकंच. जुनंच गिरवण्यापेक्षा नवं काही करू पाहत असतील, तर चांगलंच आहे.
तंत्रज्ञानामुळे आपल्याकडे जुनं तर पुष्कळसं आहेच.

वादलवारं सुटलं गं बद्दल हृदयनाथ आक्रोश म्हणाले त्याचं नवल वाटलं. थोडी भीती , धाकधुक आहे. पण शेवटी "लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं" असंही आहे त्या गाण्यात. आक्रोश म्हणजे भावनेचा उत्कट, बेबंद आविष्कार असं म्हणत असतील. राजा सारंगा या गाण्याचं मात्र तसं नाही.

झी मराठी वरच्या सारेगमप पेक्षा हा कार्यक्रम बराच उजवा आहे. गेले काही दिवस फॉलो करतोय. समहाऊ गाणी अपील न होता बरीचशी फ्लॅट म्हटल्यासारखी आहेत. महेश सोडून बाकी दोन जजेस कमेंट्स पण उथळ देतायत असं वाटतं.
पं. हृदयनाथ मं बद्द्लचं अगदी अगदी झालंय.

परवाच्या भागात महेश काळे कोणाच्यातरी गाण्यावर कमेंट देताना "आई जशी मुलाला शाळेच्या गेटापर्यंत...." आणि अस चक्क दोन वेळा म्हणाले. मजाच वाटली एकदम

काल शरयु चं गाणं चांगलं होउनही तिला कमी गुण दिले गेले असं वाटंलं मला.....
त्याउलट मला मधुरा कुंभार चं गाणं फारसं नाही आवडलं तरी तिला शरयु पेक्षा जास्त गुण...
परीक्षकांचे निकष समजेनासे झालेत आता मला...

काल शरयु चं गाणं चांगलं होउनही तिला कमी गुण दिले गेले असं वाटंलं मला.....
त्याउलट मला मधुरा कुंभार चं गाणं फारसं नाही आवडलं तरी तिला शरयु पेक्षा जास्त गुण...
परीक्षकांचे निकष समजेनासे झालेत आता मला... +१

ते दार.. त्या दारापर्यंत
ते गेट.. त्या गेटापर्यंत !! Happy

घसा बसला/सर्दी झाली, तब्येत बरी नाही म्हणून मधुरा-वैशाली ला सवलत .. तीच सवलत जितेद्रला नाही.. परिणाम एलिमिनेट !

कालचं शमिकाचं गाणं अगदीच फ्लॅट वाटलं..

ते गाणं प्रमाण मराठीत नाही गायलंय. >>>> पण मग पूर्णतरी तसं गावं. प्रान / प्राण, कुणाला / कुनाला अशी वेरिएशन पण आढळली प्रसनजितच्या गाण्यात. शिवाय फक्त ण चा न आणि म्हां चा मा करून ग्रामीण बाज येत नाही ना. मुळ पंडीतजींच्या गाण्यात तो ग्रामिण हेल पण स्पष्ट जाणवतोय. तो ही मला प्रसनजितच्या गाण्यात जाणवला नव्हता.

कालचा निकाल काहीच्या काही होता. खरतर जितेंद्र तुपे मधुरा कुंभार पेक्षा चांगला गायला होता. शमिकाचं गाणं खूपच फ्ल्टॅट होतं. तिचा आवाज चोरटा वाटत होता.

आई जशी मुलाला शाळेच्या गेटापर्यंत >>>> गेटापर्यंत व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर आहे. Happy

इथे बाहेर गेलेल्या स्पर्धकाला खरच अगदी बाहेर घालवून देतात. Happy

बाकी त्या पुष्कराजचा पाचकळपणा प्लीज थांबवावा आता !

जितेंद्रचं एलिमेशन अजिबात पटलं नाही, जुइली अ‍ॅव्हरेज गायली होती.
टेक्निकली परफेक्ट होता कि नाही माहित नाही पण मला आवडायचा जितेंद्र तुपेचा वजनदार आवाज , काय ते नेमकं सांगता येत नाही something unique about it .
सुरवातीपासूनच त्याला जरा जास्तं क्रिटिसिझम मिळायचं जजेस्स्चं असं कायम वाटलं .

हो जितेंद्र तुपेची गाणी चांगली वाटायची ऐकायला. उलट जयदीप बगवाडकरची मला फार नाही आवडत. अर्थात मला काहीच ज्ञान नाहीये गाण्यातले.
तो राजगायक/गायिका खेळच वाटतोय. प्रत्येकाला एकेकदा देणार वाटतं.

हो जितेंद्र तुपेची गाणी चांगली वाटायची ऐकायला. उलट जयदीप बगवाडकरची मला फार नाही आवडत.
<<< +१

तेजश्री प्रधान मध्ये काहिच क्वालिटी नाहित ऐंकर होणाच्या असे वाटायला लागले गेले दोन इपिसोड पाहिल्यावर. तिला मंगेशकरांना अजिबात बोलते करता येत नव्हते. जवळ जवळ सर्व गाणी झाल्यावर ' पंडितजी या गाण्याची काहितरी आठवण सांगा ना ' या पलि कडे तिला काहिहि बोलता आले नाहि.
ऐंकर हा बहुश्रुत असला पाहिजे, हजरजबाबी असला पाहिजे आणी तरीहि कमी बोलुन आलेल्या सेलेब्रिंटिंना बोलते करणारा पाहिजे. इन जनरल पुर्वीचे एकंर आणी आताचे यात फार फरक पडत चालला आहे.

पंडितजीच मुळात 'लॉस्ट' सारखे बसून होते त्याला ती तरी काय करणार? जेव्हा पुष्कराज चा पांचटपणा सुरु होता तेव्हा तर ते नक्की काय चाललंय हे कळण्याच्या पलिकडे गेलेले दिसत होते. पुष्कराज ला पंडितजीं समोर तरी इतका पाचकळपणा द्यायची काय गरज होती? त्याला ब्रेक दिला असता तरी चालले असते की!

असं झालं सर्व, अरेरे. कमीतकमी अशा दिग्गजांना बोलावल्यावर तरी भान ठेवायला हवं. अर्थात मी न बघता इथे वाचून मत व्यक्त करतेय.

>>तेजश्री प्रधान मध्ये काहिच क्वालिटी नाहित ऐंकर होणाच्या
त्यांचा दुसरा पर्याय आहे- दाढी मिशी वाले पात्र- चालेल का? Happy

सून ध्यान मध्ये सर्वच गायक कुठे तरी काहितरी जिंकलेले, गायलेले, मिळवलेले, नाहितर गेला बाजार अवधूत बरोबर कार्यक्रम केले असल्याने, ईथे त्यांना स्पर्धा जिंकायची वगैरे अजीबात गरज नाहीये.. नव्याने एक्स्पोजर मिळते हा मात्र मोठा फायदा. पण do or die परिस्थिती नसल्याने मूड असेल तसे गाऊन जातात.. महेश राव ऊगाच जीव तोडून सल्ले देत आहेत. Happy अवधूत ने काल 'मेक ईन ईंडीया' चा टोमणा मारून घेतला.. त्या आधी एका एपिसोड मध्ये आम्ही म्हणजे धिंगाणा, नविन वर्षे पार्टी चे गायक तुम्ही लोक (शास्त्रीय वाले) म्हणजे दिवाळी पहाट चे गायक असेही महेश ला हळूच खिजवले..
मधूनच शाल्मली बाई झोपी गेलेला जागा झाल्या सारख्या प्रतिक्रीया देतात.. एकूणात या कार्यक्रमाची खरी गंमत परिक्षक आहेत..
मेंटोरिंग, नविन ध्यास, हे आपले ऊगाच वरचे 'आवरण' आहे.. आतील माल जुनाच आहे!

वै.म.: या तिघांत अवधूत नक्कीच परिक्षक वा मेंटोर होण्याच्या योग्यतेचा आहे.. गायन, निर्मिती, काव्य, संगीत संयोजन, कार्यक्रम, मराठी, हिंदी दोन्ही मधिल अनुभव... असे त्याचे अष्ट्पैलू व्यक्तीमत्व आहे. त्याच्या बरोबरीने बेला शेंडे, व ईतर कुणि 'वादक' वा 'संगीत संयोजक' परिक्षक म्हणून असते तर बहार आली असती. असो.

>>पण do or die परिस्थिती नसल्याने मूड असेल तसे गाऊन जातात..
अपवादः अनिरुध्द जोशी. नेहेमीच प्रामाणिक व १००% प्रयत्न असतो. कालचे त्याचे 'माझे माहेर पंढरी..' सर्वोत्कृष्ट होते.

हो जितेंद्र तुपेची गाणी चांगली वाटायची ऐकायला. उलट जयदीप बगवाडकरची मला फार नाही आवडत.
<<< +१२३

अनिरुद्धने जून हसण्याचं गाणं छान म्हटलं. एकदाचं हृदयनाथांनी त्याबद्दल सांगितलेलं ऐकायला मिळालं.
रेकॉर्डमध्ये हासून ते पहाणे आहे, अनिरुद्ध हे पहाणे गायला.

आत्ताच एका दिवाळी अंकात अविनाश प्रभावळकर (हृदयेश आर्ट्स) यांचा हृदयनाथांवरचा लेख वाचला. त्यात म्हटलंय की डॉ काशीनाथ घाणेकरांनी "शूर अम्ही सरदार" नंतर हृदयनाथांना सांगितलं की तुमचा आवाज मला अजिबात सूट होत नाही; म्हणून "गोमू संगतीनं"साठी हेमंतकुमारना बोलवलं. हा खेळ सावल्यांचा मधलंच हे गाणं.

त्याच अंकात वर्षा भोसलेंच्या लेखात म्हटलंय की गोमू संगतीनं कोळीगीतांच्या(डोलकर इ.) ईपीसाठीच बनवलेलं. पण ईपी भरल्यामुळे ते राहून गेलं.
आता ती तिन्ही कोळीगीतं शांताबाईंची आहेत. आणि हे गाणं सुधीर मोघ्यांचं.

तेजश्रीबद्दल राहुलका+१.
सूत्रसंचालन करणार्‍याने बहुश्रुत असावं, अभ्यास केलेला असावा ही अपेक्षा आता कालबाह्य झाली असावी.
हृदयनाथ त्यांच्या नेहमीच्या थाटातच होते की. कविता, ओव्या, त्यांचे अर्थ सगळं नेहमीसारखंच होतं.

<<< त्यात म्हटलंय की डॉ काशीनाथ घाणेकरांनी "शूर अम्ही सरदार" नंतर हृदयनाथांना सांगितलं की तुमचा आवाज मला अजिबात सूट होत नाही; म्हणून "गोमू संगतीनं"साठी हेमंतकुमारना बोलवलं

Uhoh , हेमंत कुमार अजिबातच सूट होत नाही. असो, तेव्हाच्या अ‍ॅक्टर्सच्या तर्‍हाच वेगळ्या Happy

अनिरुद्धने जून हसण्याचं गाणं छान म्हटलं.
रेकॉर्डमध्ये हासून ते पहाणे आहे, अनिरुद्ध हे पहाणे गायला. >> हो ते माझ्यापण लक्षात आलं.

बायदवे, महेशच्या गाण्याबद्दल पंडीतजी काहीच कसं बोलले नाहीत?
मी आपली मराठीवर येणारा एपिसोड बघते.
मुळात त्या गाण्याला डॉ घाणेकर सूट होत नव्हते >>> Biggrin

मुळात त्या गाण्याला डॉ घाणेकर सूट होत नव्हते
< + ११११
Proud
हो महेशच्या गाण्यानंतर कमर्शिअल ब्रेक होता, नंतर डायरेक्ट पुढचा परफॉरमन्स होता बहुदा, कोणीच काही म्हंटलं नाही .

तो दाढीवाला काय किंवा इतर झी मराठीवरचे सो कॉल्ड स्टँडप कॉमेडीयन्स काय, हे लोक का आवडतात पब्लिकला फार मोठं कोडं आहे.
चला हवा येउ द्या एक दोनदा पहायचा प्रयत्न केला, अजिबात हसु आलं नाही Uhoh

Pages