सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

अवधूतचे कपडे तुफान विनोदी होते. ही खरंच फॅशन आहे का? झी गौरवचा लहानसा भाग पाहिला, त्यात पण अभिजीत खांडकेकर, प्रसाद ओक, सुमीत वगैरेंना पण असेच बटणं उलटी-सुलटी लागल्यावर दिसतील असे कोट दिले होते. कायतरीच!

पिळलं म्हणजे पिळगांवकर यांनी Lol

निहिरा जिंकणार नाही कळल्यावर माझा इंटरेस्टच गेला. मी झी गौरव बघितलं. मध्ये add मध्ये महेश काळेची दोन गाणी बघितली. म का ऐकायला आवडतात, बघायला नाही. तोंड कित्ती वेडेवाकडे करतात आणि ताना करताना केवढे हातवारे.

तोंड कित्ती वेडेवाकडे करतात आणि ताना करताना केवढे हातवारे. >>>> जनरली सगळ्याच शास्त्रीय गायकान्ना अश्याच पद्दतीने गाताना बघितलय. त्यात त्यान्चा काही दोष नसतो.

संपले एकदाचे... आणि अपेक्षाभंग देखिल नाही झाला, तीनाचे पाच केलेले वगळता: Happy

Submitted by योग on 15 March, 2018 - 20:20
>>शेवटचे तीन बहुतेक शरयू, अनिरुध, आणि विश्वजीत असतील..!
आणि राजगायकाला केसरी ने युरोप चे तिकीट देऊ केले आहे बरोबर जोडीदार फ्री. तेव्हा त्या TRP साठी अर्थातच शरयू पेक्षा अनिरुध्द वा विश्वजीत हेच दावेदार राहतात. विश्वजीत ने आधीच विश्व जिंकलेले आहे (?) हे तेजश्री चे म्हणणे खरे असेल तर अनिरुध्द व कुटूंबाला ते तिकीट मिळणे हे 'लोकप्रीय' ठरेल.. ! तेव्हा राजगायक अनिरुध्दच होणार. Happy

नवीन सिझन बघतंय का कोणी??
आत्ता ऑडिशन्स दाखवतायत..
स्पृहा जानूबाईंपेक्षा सुसह्य आहे..
पण स्पर्धक मुलं फारशी अपिलिंग वाटली नाहीत.. आर्या, प्रथमेश या मराठी आणि सोनाक्षी, श्रेयन या हिंदी लिटल champs नी दर्जा वाढवून ठेवल्यामुळे असेल कदाचित

नवीन सिझन बघतंय का कोणी?? >>>> मी बघतेय.

छान गातायत सगळी मुल. विशेषत: मुली. सिलेक्ट झालेल्या सगळया मुलान्चे (अपवाद ओमकार) आवाज मात्र एकसारखे आहेत.

कालपासून मेगा ऑडिशन्स चालू झाल्या. शाल्मली खोलगडे पहिल्याच आठवडयात गैरहजर.

स्पृहा जानूबाईंपेक्षा सुसह्य आहे.. ++++१११११

ऑडिशन्स च आहेत म्हणून अजून खूप लक्ष देऊन पाहिले नाहीये . पण स्पृहा आवडली मला. तेजश्री सारखी अवघडलेली नाही. एकदम उत्साही आणि उस्फुर्त वाटते आहे.

आज तो अगदी छोटा मुलगा खूप गोड होता. कॅनडाच्या मुलाला बळेच पुढे आणलं असं वाटलं. एका मुलीचे वडिल सांगत होते ते जेवलेच नाहीत सकाळपासून. स्वत:च्या ईच्छा मुलीवर लादण्याचा प्रकार वाटला मला तो. निवडून यावं असं सगळ्यांना वाटतं पण हा काही जीवनमरणाचा प्रश्न नाही, आणि त्यावर अवधूतचा डायलाॅग, बापाचं काळीज पिळवटून येतं वगैरे सगळं अतीच.

काल तो एक सोलापूर चा १० वर्षाचा मुलगा होता तो किती मॅचुअर्ड होता एवढ्याशा वयात. डौल मोराच्या आणि लख्ख पडला प्रकाश अशी दोन गाणी म्हटली त्याने. म्हणे माझे बाबा माझ्यासाठी खुप कष्ट करतात. मी चांगल्या ठिकाणी गाणं शिकावं म्हणून दर रविवारी पुण्याला क्लास साठी नेतात. मला बाबांचं स्वप्न पुरं करायचंय. कसं सुचलं असेल इतक्या लहान मुलाला हे बोलायला! त्याचे सिलेक्शन नाही झाले पण . मला वाईट वाटले. महेश सरांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिलं मात्र.

येताजाताच पाहिले ऑडीशन एपिसोड्स, बरीचशी मुलं आवाज फुटायच्या जस्ट आधीच्या स्टेज मधली वाटली , अत्ता गातायेत तो आवाज किती दिवस सेम असेल माहित नाही.
मला गुळ्गुळीत शुध्द तूपातल्या आवाजांपेक्षा लोकगीत गाणारे आवाज आवडले , अर्थात ते स्पर्धेत किती टिकतील हे गायक माहित नाही पण तो आळंदीचा अभिषेक कांबळे त्याचा आवाज वेगळा वाटला, अभंग वगैरे गातो, त्याचा आवाज सुफी गाण्यांना पण छान वाटेल !
स्टँडबायला ठेवलेला आळंदीचाच चैतन्य देवडेही झाला शेवटी सिलेक्ट, आवडली त्याची गाणी.
बडबडा गमतीशीर ओमकार कानिटकर क्युट आहे, मजा आणली त्यानी ऑडीशन राउंड्सना.
मुली अत्ता तरी फार लक्षात नाही राहिल्या, पगारे बहिणी आठवतायेत , त्या चांगल्या गायल्या होत्या दोघीही.
एक मुलगी मेरी जिंगदी एक प्यास गायली, तिचा आवाजही वेगळा होता सुफी गायकीचा, लक्षात नाही ती सिलेक्ट झाली कि नाही ते !

गाणी सिलेक्शन मध्ये प्रोड्युसर्/डायरेक्टर इ. नी हस्तक्षेप करणं आवश्यक आहे असं वाटतंय. काल त्या मुलीने "सावर रे सावर रे" तिच्या कुवती नुसार गायलं. एव्हढं कठिण गाणं स्पर्धेच्या सुरुवातीच्या स्टेजला गाणं हे सुसायडल ठरु शकतं. मेंटॉर वगैरे प्रकार इथे असतो का?

एक मुलगी मेरी जिंगदी एक प्यास गायली, तिचा आवाजही वेगळा होता सुफी गायकीचा, लक्षात नाही ती सिलेक्ट झाली कि नाही ते ! >>>> झाली ती सिलेक्ट. हे गाण आजपर्यन्त कुठल्याही रिएलिटी शो मध्ये सादर झाल नव्हत.

काल तो एक सोलापूर चा १० वर्षाचा मुलगा होता तो किती मॅचुअर्ड होता एवढ्याशा वयात. डौल मोराच्या आणि लख्ख पडला प्रकाश अशी दोन गाणी म्हटली त्याने. म्हणे माझे बाबा माझ्यासाठी खुप कष्ट करतात. मी चांगल्या ठिकाणी गाणं शिकावं म्हणून दर रविवारी पुण्याला क्लास साठी नेतात. मला बाबांचं स्वप्न पुरं करायचंय. कसं सुचलं असेल इतक्या लहान मुलाला हे बोलायला! त्याचे सिलेक्शन नाही झाले पण . मला वाईट वाटले. महेश सरांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिलं मात्र.>> त्याचं गाण्याचं सिलेक्शन चुकलं असं वाटलं मला.. किंवा गाण्याची लय तरी जास्त झाली होती. कारण वाक्य सलग पूर्ण होत नव्हतं त्याचं.. मी ओळखतो त्याला, माझ्या आजोबांच्या शिष्याकडे येतो तो दर रविवारी शिकायला.. ह्या रविवारी भेटेल तो मला कदाचित..

हे गाण आजपर्यन्त कुठल्याही रिएलिटी शो मध्ये सादर झाल नव्हत.>>> झालं होतं एकदा, झी सारेगम मधे बहुतेक राजा हसन की अशा कोणीतरी गायलं होतं . तेव्हाही त्याचे कौतुक झाले होते त्यामुळे ते गाणे लक्षात राहिले आहे. काल ते गाणे गायली ती स्वराली पण आवडली. वेगळा आवाज आणि स्टाइल आहे. अजून पण एक दोन मुली आवडल्या हट के गाणार्‍या. नावे लक्षात नाहीत. चैतन्य चा आवाज आवडलाच. अजून एक तो यॉडलिंग करणारा होता त्याने ही एक क्लासिकल गाऊन सरप्राइज केले. छान वाटला तो पण.
तो छोटा पोवाडा गाणारा मुलगा कित्ती गोड होता!! बोलत पण गोड होता अगदी Happy

Pages