Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे कुणी नोटीस केले नाही का?
अरे कुणी नोटीस केले नाही का?
दाढी मिशी वाले पात्र चक्क ऊगवले नाही तिनही एपिसोड मध्ये... प्यारेजीं समोर असला पोरखेळ नको असा (योग्य) विचार केला असावा सून टीम ने.
शमिका एकदाची गेली... काय तर म्हणे गळ्याने दगा दिला. दोन गाणी जेमेतेम गायची असतात तेही आठवड्यातून एकदा.. असो.
विश्वजीत ला अर्थातच दोन घडीची करमणूक म्हणून आणला असावा... पण सूर, ऊच्चार, बेअरिंग, आवाज... सगळ्याच डीपार्ट्मेंट मध्ये राडा आहे.
पण त्यामूळे महेश रावांची तात्विक प्रवचने थोडी कमी झाली आहेत. शाळेत बहुतेक 'एका वाक्यात ऊत्तरे द्या' हा विभाग तो ऑप्शन ला टाकत असावा.. 
असो.
अवधूत संधी मिळेल तिथे महेश ला हाणत असतो. हाडाचा कलाकार!
अवधूत खरोखर जबरदस्त माणूस,
अवधूत खरोखर जबरदस्त माणूस, कलाकार, रसिक आणि जज आहे.
त्याच्यासारख्या अफाट उपमा हाडाच्या कानसेनालाच सुचू शकतात.
बाकी, या स्पर्धेत उर्मिला धनगर का नाही म्हणे? ती हवी होती. म्हणजे अवधूतच्या जबरदस्त कमेंटस ऐकायला मिळाल्या असत्या.
निहिरा आणि प्रसेनजीतच "मेघा
निहिरा आणि प्रसेनजीतच "मेघा रे मेघा" ड्युएट आवडल. >>>>+११११११
अवधूत संधी मिळेल तिथे महेश ला
अवधूत संधी मिळेल तिथे महेश ला हाणत असतो. हाडाचा कलाकार! Happy पण त्यामूळे महेश रावांची तात्विक प्रवचने थोडी कमी झाली आहेत. शाळेत बहुतेक 'एका वाक्यात ऊत्तरे द्या' हा विभाग तो ऑप्शन ला टाकत असावा.. Wink
<<
+१
प्रेझेन्स ऑफ माइंड शॉल्लिट आहे अवधूतचे
शमिका गेली एकदाची आणि केविलवाण्या प्रसन्नजीतला कट्यार मिळाली एकदाची !
आता मधुरा, विश्वजीत , जयदीप आणि जुइली एलिमिनेट झाले पाहिजेत पुढे.
निहिरा ,वैशाली, प्रसेन्जीत ,शरयु आणि अनिरुद्ध असायला हवेत टॉप ५ पण बहुदा जुइली ठेवतील आणि शरयुला काढतील.
मला वैशालीपेक्षा मधुरा आणि
मला वैशालीपेक्षा मधुरा आणि जुईली आवड्ल्या काही काही वेळा नक्कीच. मला ओकेच वाटली वैशाली बर्याच गाण्यांत.
बे एरिया लॉयल्टीला जागून, महेशच्या जड मराठी कॉमेंटस् बोर होत असतील कदाचित, पण सारखं "टांगा पल्टी घोडे फरार" पण काही फार नाविन्यपूर्ण नाही
मला महेशच्या कॉमेंटस आवडतात.
मला महेशच्या कॉमेंटस आवडतात. अर्थात मी सुरुवातीपासून फॉलो केलं नाही त्यामुळे त्याची प्रवचने ऐकली नाहीत.
तशा मला अवधूतच्या पण आवडतात.
प्रेझेन्स ऑफ माइंड शॉल्लिट आहे अवधूतचे >>> अगदी अगदी. कालची त्याची महेशला केलेली " तुमचा जन्म चैत्री पाडव्याचा आणि आमचा शिमग्याचा" ही टीप्पणी फार आवडली.
गायकांचा ताण कमी करुन त्यांना मोकळं करायचं काम अवधूत खरंच खूप छान करतो.
निहिराचे मेघा रे मेघा रे,
निहिराचे मेघा रे मेघा रे, सुरेख झाले एकदम . मला शरयू चा आवाज आवडतो .
सुरुवातीला पहिले तेव्हा शाल्मली का आहे तेच कळत न्हवते . मग गुगलून पाहीले..
तरी पण आनंदी जोशी , जान्हवी प्रभू अरोरा ला तरी घ्यायला हवे होते ..मस्त गातात दोघीही .
निहिराचे मेघा रे मेघा रे,
निहिराचे मेघा रे मेघा रे, सुरेख झाले एकदम . मला शरयू चा आवाज आवडतो .
सुरुवातीला पहिले तेव्हा शाल्मली का आहे तेच कळत न्हवते . मग गुगलून पाहीले..
तरी पण आनंदी जोशी , जान्हवी प्रभू अरोरा ला तरी घ्यायला हवे होते ..मस्त गातात दोघीही .
जान्हवी प्रभू अरोरा बरीच
जान्हवी प्रभू अरोरा बरीच सिनियार आहे ना, मला वाटते शाल्मली पेक्षा तर आहेच, कदाचित महेश आणी अवधुन पेक्षाहि असेल
>>बे एरिया लॉयल्टीला जागून,
>>बे एरिया लॉयल्टीला जागून,


लॉयल्टी ला जागायचे तर ईथे मूग गिळून गप्प बसावे लागेल.
अवधूत संपूर्ण कलाकार आहे यात वादच नाही. मुख्यत्वे त्याच्या प्रतिक्रीया उस्फूर्त असतात, कधिही ठरवून दिलेल्या वाटत नाहीत.. आणि असेही तो किशोरदांचा 'भक्त' आहे तेव्हा त्याला सगळे गुन्हे माफ आहेत
आत पुढील खेपेस कट्यार कुणाला? सगळ्यांना एक एक वेळा देऊन झालीये बहुतेक.. तेजू व शाल्मली ला द्यायला हरकत नाही.
स्वतःची लाल करणे म्हणजे काय
स्वतःची लाल करणे म्हणजे काय याचे हा कार्यक्रम एक उदाहरण आहे...
कित्ती ते कौतुक सगळेच सगळ्यांचे नुसते कौतुक करतात ... ती तेजश्री तर प्रत्येक गाण्याला एकाच प्रतिक्रिया देते ... हा कार्यक्रम इतका गोड गोड आहे कि काही दिवसातच खाली सूचना दिसेल "मधुमेह असणाऱ्यांनी हा कार्यक्रम आपल्या जबाबदारीवर पाहावा". कधी कधी तर वाटते कि कोणीच नाही मिळाला तर हे लोक स्पॉट बॉय, कॅमेरामन, ड्रेस वाले यांना बोलावून त्यांचे कौतुक सुरु करतील
विश्वजीत ला काल शेवटी बोलणी
विश्वजीत ला काल शेवटी बोलणी बसली.
आपलीमराठी वर कुठे आहे कलर्सची
आपलीमराठी वर कुठे आहे कलर्सची लिन्क ? मला तरी दिसली नाहि
>>>मिळाली मिळाली! झी च्या शोज मधे होत म्हणून कळलच नाही आधी, मी कलर्स चॅनेल शोधत होते.
जान्हवी प्रभू अरोरा बरीच
जान्हवी प्रभू अरोरा बरीच सिनियार आहे ना, मला वाटते शाल्मली पेक्षा तर आहेच, कदाचित महेश आणी अवधुन पेक्षाहि असेल>>> जान्हवीला इंडस्ट्रीमधे अवधूतनेच आणलंय.. ती अवधूतला सिनिअर कशी असेल? सारेगमपचंच प्रॉडक्ट आहे तीसुद्धा.
काल चा तेजश्रीचस ड्रेस् किती
काल चा तेजश्रीचस ड्रेस् किती म्हणजे किती वाईट असावा!! तिला अजिबात कॅरी करता येत नव्हता. इतर सगळे स्टेज वर सहज वावरताना, नाचत असतना ही आपली स्वतः होस्ट असून ऑकवर्ड, एखाद्या खांबासारखी उभी होती.
बाकी कोळी गीतांना नाजूक आवाज शोभत नव्हते. मधुरा आणि जुइलीला तो जॉनर सूट झाला.
मला प्रसेनजीतची ग़जल
मला प्रसेनजीतची ग़जल अनिरुद्धच्या नाट्यगीतापेक्षा जास्त भावली मनाला.
काल चा तेजश्रीचस ड्रेस् किती
काल चा तेजश्रीचस ड्रेस् किती म्हणजे किती वाईट असावा!! >>>>> अगदी. ह्यांना ड्रेसेस देताना कळत नसेल आपण किती वाईट्ट कपडे डिझाईन केलेत आणि ते तितकेच बेक्कार दिसतायत.
एकंदरीत प्रोग्रॅममध्ये पाणी घालणं चाललंय फक्त.
होना. एलिमिनेशन नाही आणि वर
होना. एलिमिनेशन नाही आणि वर एक नवी एंट्री. बोअर. आता तर पूर्णवेळ पाहुणेही मिळेनात त्यांना.
पाहिले या आठवड्याचे एपिसोड्स,
पाहिले या आठवड्याचे एपिसोड्स, अजिबातच नाही आवडले.
कोळीवाडा थीम ? लोकसंगीत एपिसोड झालाय ना ऑलरेडी ?
जुईली तेंव्हा ‘चांदणं झाली रात ‘ गायली होती.
जर हे सगळे एक्स्पिरिअन्स्ड, कमर्शिअल गायक आहेत तर क्लासिकल बेस्ड, नाट्यस्संगीत, गझल्स , सूफी अशा थीम्स का नाही घेत ?
सु.न.ध्या.न. कार्यक्रमाची सुरवात छान झाली होती पण ग्राफ खाली चाल्लाय.
या आठवड्यात फक्त प्रसेनजीत आणि अनिरुद्धची शेवटची कट्यार राउंड आवडली, बाकी नुसताच टाइमपास.
ती कोण आता नवीन चँलेंजर आलीये?
हो खरच, तेजश्री ला खरच काय ते
हो खरच, तेजश्री ला खरच काय ते कपडे दिले होते ?
ना धड कोळीणीची साडी ना धड नौव्वारी ना धड पटीयाला सलवार.. विचित्रं अगदी !
बाकी अवधूत गुप्तेचे संवाद भारी एंटरटेनिंग होते कोळीवाडा एपिसोड मधे , प्रोग्रॅम पेक्षा जास्तं :).
गाण्यांमधले बारकावे महेश काळे इतका सांगत नसला तरी एंटरटेनिंग असतो आणि जड मराठी बोलत नसला तरी मराठी भाषे वरचं प्रेम, महाराष्ट्रावर प्रेम, वाचन भरपूर आहे हे दिसतं .
अवधूत ते कोळी लोकांना घेऊन
अवधूत ते कोळी लोकांना घेऊन काय घोषणा देत होता ? आये आये ... अशी सुरुवात आणि त्यावर ते लोक काहीतरी ओरडायचे! मग महेश ने पण ते करून पाहिले. काय नक्की आरोळी आहे कळलीच नाही मला. नवी गायिका श्रीनिधी घटाटे म्हणे. खूपच कौतुक ऐकले तिचे पण तिचे गाणे अजिबात खास नाही वाटले. अवधूत चा पोपट चा डायलॉग आवडला
<जर हे सगळे एक्स्पिरिअन्स्ड,
<जर हे सगळे एक्स्पिरिअन्स्ड, कमर्शिअल गायक आहेत तर क्लासिकल बेस्ड, नाट्यस्संगीत, गझल्स , सूफी अशा थीम्स का नाही घेत ?>+१
ते आये आये नाही कळलं.
एलिमिनेशन नाही आणि वर आणखी एक स्पर्धक. जान्हवीच्या प्रेग्नंसीसारखंच प्रकरण लांबवायचा विचार दिसतोय.
कोळीवाडा थीम ? लोकसंगीत
कोळीवाडा थीम ? लोकसंगीत एपिसोड झालाय ना ऑलरेडी ?
जुईली तेंव्हा ‘चांदणं झाली रात ‘ गायली होती.
जर हे सगळे एक्स्पिरिअन्स्ड, कमर्शिअल गायक आहेत तर क्लासिकल बेस्ड, नाट्यस्संगीत, गझल्स , सूफी अशा थीम्स का नाही घेत ?>>>+१
बाकी अवधूत गुप्तेचे संवाद
बाकी अवधूत गुप्तेचे संवाद भारी एंटरटेनिंग होते कोळीवाडा एपिसोड मधे , प्रोग्रॅम पेक्षा जास्तं :).
गाण्यांमधले बारकावे महेश काळे इतका सांगत नसला तरी एंटरटेनिंग असतो आणि जड मराठी बोलत नसला तरी मराठी भाषे वरचं प्रेम, महाराष्ट्रावर प्रेम, वाचन भरपूर आहे हे दिसतं .>>>+१
एलिमिनेशन नाही आणि वर आणखी एक
एलिमिनेशन नाही आणि वर आणखी एक स्पर्धक. जान्हवीच्या प्रेग्नंसीसारखंच प्रकरण लांबवायचा विचार दिसतोय.>>
विश्वजीत कंठ फुटत
विश्वजीत कंठ फुटत नसल्यासारखाच गातोय का?? त्याची एन्ट्री झाल्यानंतर आजच पाहिला कार्यक्रम..
अरिजितची बेसूर नक्कल..
नवी गायिका श्रीनिधी घटाटे
नवी गायिका श्रीनिधी घटाटे म्हणे. खूपच कौतुक ऐकले तिचे पण तिचे गाणे अजिबात खास नाही वाटले. >>>> अगदी अगदी!
एकंदरीत एल्पी आणि कोळी गिते दोन्ही आठवडे फार बोअर झाले. अनिरुद्ध, निहिरा वगळता बाकीचे अगदीच बोअर गायले.
त्या विश्वजितला जजेसनी झापलं ते बरं केलं. काय त्या उड्या, उठणं बसणं ! कधीतरी देवकी पंडीतला आणलं पाहिजे गेस्ट जज म्हणून !
टीआरपी मिळतोय म्हणून उगीच पाणी घालतायत आता.
हा आठवडा नाना पाटेकर खाणार
हा आठवडा नाना पाटेकर खाणार असं दिसतय, ट्रेलर मधे लय फुटेज खातोय.
आपला मानुस सिनेमा प्रमोट करायला येतोय.
सुमीत राघवनही दिसला, तो उत्तम गायक आहे, बघु गातोय का !
प्रोमो मधे नाना जिभ जड
प्रोमो मधे नाना जिभ जड असल्यासारखा बोलत आहे असे वाटले.
सुमित ची बकेट लिस्ट पूर्ण झाली असेल असा लोक इनोद करत आहेत.
सुमित आपला मानुस मधेही आहे हे लक्षातच आले नाही चटकन. त्याचा माधुरीसोबतचा रोम्यान्टिक फोटू पाहिला की नाही त्या बकेट लिस्ट की काय त्या मराठी सिनेमात?
प्रोमो मधे नाना जिभ जड
प्रोमो मधे नाना जिभ जड असल्यासारखा बोलत आहे असे वाटले.
<,
होना, किती बडबड ती नानाची, ट्रेलर मधेच कंटाळा आला
सुमीत राघवन आणि मधुरी ? नाही पाहिले अजुन .
Pages