सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

कमेंट्स आणि मार्क्स मधे खूप फरक जाणवतो...म्हंजे फार कौतुक नाही झाल तरी मार्क मिळतात भरपूर...आणि कौतुक भरभरून झाल म्हणून मार्क्स मिळतीलच अस नाही...

कोणाला साधना सरगमचं गाणं बेसूर वाटलं का? तिचे नीले नीले अंबर पर अजिबात चांगले वाटले नाही. त्यानंतर चुपके से चुपके से च्या दोन ओळी गायल्या त्यासुद्धा सुरात वाटल्या नाहीत. तिची कदाचित तब्येत बरी नसेल असे वाटले.

सुमुक्ता अगदी! फारच वाईट गायली साधना सरगम.

मला श्रीरंग भावे खूप फ्लॅट वाटत होता. तो व शमिका भिडे जातील हेच वाटत होते..

ओहह, thank u दीपांजली.

vootवर एक फायदा म्हणजे खाली चौकोनात दिसतं आणि त्याप्रमाणे बघता येतं हवं त्याचं Lol

शरयु, निहीरा बघितलं. वैशालीचं राहिले बघायचं. निहिरा एकदम टचिंग. महेशने उगाच बारीक काहीतरी काढून मार्क्स कमी दिले असं मला वाटतं.

वैशाली इतकी सुंदर गायली, तिच्या पेक्षा पद्मनाभला जास्तं मार्क्स
वैशालीकडून जास्तं अपेक्षा म्हणून तिला वेगळ्या लेव्हलला जज करतात, इतरांना वेगळ्या , त्या पेक्षा घ्यायचं नाही वेगवेगळ्या कुवतीच्या गायकांना एकाच शो मधे ! >>>>>>+१००००

मला श्रीरंग भावे खूप फ्लॅट वाटत होता. तो व शमिका भिडे जातील हेच वाटत होते.. >>> पण शमिका भिडे जायला हवी होती. श्रीरंग भावेचं गाणं तिच्यापेक्षा बरे झाले होते. शमिकानी हाफ नोट खाली लावल्यामुळे गाणं अगदी म्हणजे अगदीच फ्लॅट झालं. आणि श्रीरंग भावे ओव्हरऑल शमिकापेक्षा चांगला गायक वाटला होता मला.

हे म्हणजे 'शरुबाळा दिली ना तुला दोन वेळा कट्यार आता थोडावेळ तिला दे' असं वाटल. >>> +१

निहिरा, शरयु, जुईली छान गायल्या पण कट्यार शरयूला मिळायला हवी होती. वैशाली चांगली गायली पण ह्या स्पर्धेत ती फारच कॅज्युअली गातेय असं वाटतं आहे मला.

कितीतरी उजवी होती शरयु जुइल्या पेक्षा >>>>>>

काही पण काय... जुइलीच पहील गाण सगळ्यात छान होत त्या एपीसोड मध्ये...
शरयु ची गाणी खुपच प्लॅट वाटतात...

कालच्या भागातलं वैशालीचं "हाय रामा" कातील होतं !!
परिक्षकांचं गाण्यानंतर कौतुक करणे आणि मग गुण देणे यातलं व्यस्त प्रमाण हे अजूनही तसंच चालू आहे. थोडाफार अपवाद महेश काळेचा..
सुरेश वाडकर ( आणि हृदयनाथ मंगेशकर पण) आपली स्वतःचीच गाणी लाइव्ह गाताना नीरस करुन का गातात समजत नाही. इतकं की वादक मंडळी सुद्धा वाजवताना गडबडल्या सारखी वाटतात Happy

सुरेश वाडकर ( आणि हृदयनाथ मंगेशकर पण) आपली स्वतःचीच गाणी लाइव्ह गाताना नीरस करुन का गातात समजत नाही. >>> वय झाले आता.

शाल्मली खूपच उथळ वाटते. काय ते कानातले आणि काय एक्स्प्रेशन्स! दोन मेल जजेस मधे कुणीतरी एक आयटेम पाहीजेच असा जणू एक अलिखित नियमच झालाय. त्या इंडियन आयडॉल मधल्या सलीम, अनु मलिक आणि सुनिधी चौहान अशा त्रयी पासून!

तेजश्री प्रधानला एलिमिनेट करता येणार नाही का? आणि त्या पुष्करला देखिल 'बस कर' म्हणायची वेळ आली आहे! कसले वाईट सूत्रसंचालक निवडलेत

कालच्या भागात सगळेच कंटाळल्यासारखे वाटत होते. स्पर्धक गाणी गात असताना वाडकरांच्या चेहऱ्यावर खूप झोप येतेय असे भाव दिसत होते. एकूणच कालचा भाग जरा निरस वाटला.

आज रात्री बघेन हा भाग. प्रतिक्रिया ऐकून नक्की बघावा की नाही असे वाटते आहे.

काल वैशाली मस्तच...

शाल्मली खूपच उथळ वाटते. काय ते कानातले आणि काय एक्स्प्रेशन्स! Submitted by आंबट गोड >>>>
असहमत... शाल्मली खुपच सामंजस वाटते.. दिसायला ती सुंदर आहेच पण तिला गाण्यची उत्तम जाण आहे...
तिने दिलेले रिव्हीवु कमेन्ट्स पहा ...

अवधुत च्या कामेंट्स आणी मार्क यात काहिहि सम्बध दिसत नाहि

एकुणच टीआर्पी घसरु नये म्हणुन सर्वच जण (गेस्ट देखील) जपुन बोलत आहेत (सानेंनी सागीतले असावे) असे वाटते.

वैशाली या आठ्वड्यात बेस्ट , फायनली कट्यार , व्हेरी वेल डिझर्व्ड !
वैशालीचं हाय रामा आणि सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या दोन्ही झकास झाली.
जुईलीचं ‘सख्या रे ‘ देखील आवडलं आज , या पूर्ण आठवड्यात या दोघीच चांगल्या गायल्या.

या वेळेचा एपिसोड पहिल्यान्दाच पाहिला. बाप रे तेजश्री महा भयाण! अगदी कृत्रिम आणि काय ते दर ३ शब्दांनंतर रँडमली मानेला झटका!! Lol
३-४ लोक सोडले तर स्पर्धक आणि एकूण कार्यक्रमाचा दर्जा सुमार वाटला पण खरं सांगायचं तर.

Pages