सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

शाल्मलीकडे फक्तं आणि फक्तं मर्यादा आहेत, हॉरिबल गायली, I don’t know what’s this fuss all about her and why is she even popular Uhoh
तिच्या नंतर आलेल्या मधुरा आणि निहिरा तिच्यापेक्षा हजारपटींनी चांगल्या गायल्या.

>>I don’t know what’s this fuss all about her
same as Vaishali ... Happy rather Shalmali has few solo hits to her credit Wink

पण वैशाली आणि शाल्मलीची व्यावसायिक दृष्टीने काय कंपॅरिझन ?
शाल्मली इंडस्ट्रीतली मेन स्ट्रिम सिंगर आहे, बर्यपैकी सक्सेसफुल कॅटॅगरीतली.
वैशालीचं एखादं आलय, ती अजुन तरी रिअ‍ॅलिटी शो सिंगर आहे.

शाल्मलीकडे फक्तं आणि फक्तं मर्यादा आहेत, हॉरिबल गायली, I don’t know what’s this fuss all about her and why is she even popular
>> लक आणि टायमिंग.. जिवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत वगैरे ठीक आहे पण लक पण पाहिजेच

निहिराचा बुजण्याचा प्रॉब्लेम चालुच आहे, लता दिदी किती साध्या होत्या पण प्रत्येक गाण त्यानी आपलस केल , त्यानी केलेल्या स्टेज शोज मधे त्या दोन खाद्यावरुन पदर घेवुन गात सो अगदी परफॉर्मर व्हायची गरज नाही पण आत्मविश्वास अजुनही कमी आहे तिच्यात, जाळी मन्दी तालासुरात झाल पण ठसका कमी पडला.
वैशाली ने चिकनी चमेली गायल तेव्हा अवधुतही म्हणला सुरामुळे मी तुझे मार्क कमी केले असते पण यु ओन द सॉन्ग आणी खरच तिने मस्त गायल तीच्या परफॉर्मन्स कडे शाल्मली सुधा अवाक होवुन बघत होती मनात म्हणत असेल की " अमित त्रिवेदी ने चान्स नसता दिला तर कुठेच लागत नव्हतो आपण"
( तिला असा खडकी -दापोडी ड्रेस काय दिला होता)
मी वैशाली फॅन नाही पण तिची तयारी ,स्टेज प्रेझेन्स, सुराची समज आणि सगळ्यात महत्वाच मेहनत करायची तयारी अफाट आहे,

वैशालीची "येणारा दिवस मला येताना हसणारच" ही गझल ऐका. संगीत श्रीधर फडके. मी रेडियोवर ऐकलीय. ऑनलाइन शोधूनही मिळालेली नाही. अल्बम कोणता ते पण कळले नाही. पण तिचं आणखी कोणतंही गाणं ऐकायला मिळालेलं नाही.
होणार सूनचं टायटल साँग तिने गायलंय.
इथे ती फारच अंडरपर्फॉर्म करतेय असं वाटतंय.

या आठवड्याचा कार्यक्रम टोटल टुकार. अजिबात नाही बघितला, रादर बघावासा वाटलाही नाही.

अनिरुद्धचं रश्के कमर ऐकल्यावर उठूनच गेले मी. कानावर पडत होती ते फक्त किंचाळण्याचे आवाज.

उग्गाच किती ते पाणी घालून घालून एपिसोड्स वाढवायचा अट्टाहास. Angry

कोल्हापूर दौर्‍यातला फक्त कालचाच भाग.. तो ही शरयू आणि प्रसेनजीत मुळे त्यातल्या त्यात बरा झाला.
तीन ही दिवशी स्पर्धक आणि परिक्षक सर्व मिळून.. एकटा अवधूतच कार्यक्रमात काय ती... जान आणायचा प्रयत्न करत होता असं वाटलं .
लाइव्ह कार्यक्रम असल्याने सगळ्याच गायक / गायिका मंडळींच्या गाण्यातल्या मर्यादा उघड्या पडल्या सारख्या वाटल्या !

काय हा असा आठवडा, सगळे लाइट्ली घेत होते स्पर्धा.
प्रसन्नजीत , शरयु चांगले गायले.
कोल्हापुर कॉन्सर्ट म्हणजे उगीच वाढीव एपिसोड !
एलिमिनेशन नाही आणि फॉरमॅटही बदलला, अनिरुद्धाला त्या कर्कश्श गाण्याबद्दल पुन्हा कट्यार.

>>पण वैशाली आणि शाल्मलीची व्यावसायिक दृष्टीने काय कंपॅरिझन ?
शाल्मली इंडस्ट्रीतली मेन स्ट्रिम सिंगर आहे, बर्यपैकी सक्सेसफुल कॅटॅगरीतली.
वैशालीचं एखादं आलय, ती अजुन तरी रिअ‍ॅलिटी शो सिंगर आहे.
correct..! suprisingly, Vaishali's journey (2009 saregama, 2011 Bolywood) started before Shalmali (2012 Bollyood).. has perhaps better potential and understanding of music. But as they say- in this industry your luck is shaped by who you hang out with and your GodFather (exceptions- Akki, and few others).
It is strange fact that most talented Martahi singers of Today don't make it big in Bollywood inspite of all. It looks like once you start career as Marathi singer, you are labelled. Given that Asha, Lata, and many other legends are of Marathi background, Today very few make it to the big league! Ajay Atul have been exception.

थोडक्यात सून ध्यान सारख्या दर्जा खालावत चाललेल्या कार्यक्रमापेक्षा ईथे माबो वर एखादा 'दर्जेदार' कार्यक्रम सुरू केला जावा...
अनेक कलाकार आहेत... आणि जाणकार रसिक प्रेक्षक व 'जज' देखिल आहेत Wink
फक्त एव्हडीच सोय आवश्यक आहे:
एक डेडिकेटेड बाफ, दर सप्ताहाला पाच मायबोलीकर कलाकारांनी अपलोड केलेल्या गाण्यांची क्लिप्/लिंक बाफ वर ऐकायची सुविधा, पब्लिक साठी वोटींग ची लिंक.. आणि अगदीच ऊत्साह असेल तर ईथल्या काही निवडक 'जज' मंडळींच्या प्रतिक्रीया.. टांगा पलटी, घोडे फरार स्टाईल.. ऊगाच महेश सारखे अवजड प्रवचन नको किंवा शाल्मली सारखे चणे फुटाणे नकोत.. Happy
फक्त थिम द्यायची व रिझल्ट्स सांगायचे काम ईथले अँकर करतील.
तेव्हा, होऊन जाऊ देतः
सु वा मा रा (सुरेल वाडा मायबोलीवर राडा)
--------------------------------------------------------------------
किंवा कार्यक्रमाचे योग्य शीर्षक सुचवा... Happy

अवधूत इतका शिवभक्त म्हणवतो स्वतःला आणि सरणार कधी या गाण्याचा संदर्भ / इतिहास माहित नाही. बरं नाही तर नाही, कशाला उग्गीच सगळं माहीत असल्याचा आव आणायचा?? Angry

निहिरा, वैशाली आणि श्रीनिधीची गाणी आवडली. वादकांना ____/\____

विश्वजीत नाहीच आवडत आहे काही झालं तरी.

अगदी अगदी. उगाचच स्वतःला ह्रुदयनाथ मंगेशकर समजायला लागला का काय ? बोलु नये माहिती नसेल तर. आलतु फालतु गाणी गा तु अवधुत! उगाचच झेपत नाहि त्यात जाउ नको. पुर्ण निषेध आणी राग !

वैशाली उत्तम गायली, निहिरा ओके ओके, घटाते उत्तम गायली, विश्वजीतने वाट लावली . सुखविंदर ने काय गायलेले आहे हे गाणे .

खरंच निषेध.

फेसबुक पेज आहे कां या कार्यक्रमाचं? असेल आणि कोणी लिहीत असेल तर प्लीज लिहा हे तिथे. प्रेक्षक मूर्ख नाहीत हे जरा कळू देत.

मला निहीरा सर्वात आवडली, डोळ्यातून पाणी आलं माझ्या. श्रीनिधीचं कौतुक केलं तेवढं नाही वाटलं मला, तिच्या गाण्यात कोरस आणि वादक जास्त आवडले, वेडात माझं सर्वात आवडतं गाणं पण मला मिसिंग वाटलं काहीतरी, मी नाही श्रीनिधीवर खुश.

आज शिवाजीमहाराजांच्या गाण्यांसाठी मी आख्खा एपिसोड बघितला.

वादकांना खरंच हॅटस ऑफ.

अवधूत इतका शिवभक्त म्हणवतो स्वतःला आणि सरणार कधी या गाण्याचा संदर्भ / इतिहास माहित नाही. बरं नाही तर नाही, कशाला उग्गीच सगळं माहीत असल्याचा आव आणायचा??>>>>अगदी अगदी हेच लिहायला आलो होतो.

मला जयदीपचे उच्चार विचित्र वाटतात. अमराठी , अगदी अभारतीय माणसाने गावे तसे.
अवधूतबद्दल आधीच लिहिलं गेलंय.
कालची मुलींचीच गाणी ऐकलीत आतापर्यंत. प्रत्येक गाणं अत्यंत कठीण होतं. लताचा आवाज १००० वॅटच्या बल्बसारखा लख्ख आणि तापलेला वाटतो त्या गाण्यांत. तो परत कुठून आणणार? असं झालं. तिघींचेही प्रयत्न आवडले.

अवधूत इतका शिवभक्त म्हणवतो स्वतःला आणि सरणार कधी या गाण्याचा संदर्भ / इतिहास माहित नाही. बरं नाही तर नाही, कशाला उग्गीच सगळं माहीत असल्याचा आव आणायचा??>
Correct sandarbh Kay ahe ?

सरणार कधी रण - बाजीप्रभू देशपांडे - पावनखिंड.

कवितेत

पावनखिंडित पाउल रोवून
शरीर पिंजेतो केले रण

असे शब्दही आहेत.

थँक्स भरत.
बरोबर आठवलं.
शिवकल्याण राजा कॅसेटमधे पावनखिंडीचा इतिहास, बाजींच्या देहाची चाळण उडाली होती वाक्यं, त्यानंतर ढालतलवारींचे आवाज हे सगळं आहे.
अवधूतने “प्राणीमात्रं झाले दु:खी” ची बॅक्ग्राउंड इथे जोडली बहुदा.

निहिरा, वैशाली छान गायल्या .
श्रीनिधीचे उच्चार क्रिस्प नाहीत, तिच्या इतर गाण्यांपेक्षा चांगली गायली पण मला नाही आवडलं जितकी स्तुति झाली.
विश्वजीतचं गाणं आजही नाहीच आवडलं.
कोरस आणि वादक फारच सुंदर आज !
बाकी अगदी दुसर्या कि तिसर्या एपिसोड मधे प्रसन्नजीतनी गायलेला ‘ महाराजांची किर्ती बेफाम“ अफझुलखान वध पोवाडा आज जास्तं शोभला असता !
उद्या शिवजयंति थीम नाही दिसते, ट्रेलर वरून तरी प्रसन्नजीत भारुड , मधुरा गवळण, शरयु अभंग गाताना दिसली म्हणजे पुन्हा लोकसंगीत , मागचीच थीम रिपीट का ? Uhoh

वैशाली ...काल पहिल्यांदाच आवडली या पूर्ण सिझन मद्धे....अत्यंत अवघड गाणं पण अतिशयच मस्त गायली.
निहिरा ...नेहेमीच आवडते....अवधुत के काय कमेंट केल्या नक्की...मी मिसलं ते....
श्रीनिधी ....नेहेमी ज्या गाण्यात कोरस जास्त असतो अशी गाणी निवडते ( उदा : उषःकाल होता होता...)..गाणं छान वाटण्यामद्धे तिच्यापेक्षा कोरस चाच वाटा जास्त असतो...असो
विश्वजीत....घालवा यार आता याला...कंटाळा आला त्याचे हावभाव, पाय वाकडा करण्याची पद्दत आणी चोरटा आवाज ऐकुन...आणि तरी त्याला २ जिनिअस..बहुतेक यावेळी त्याचा कटारीसाठी नंबर आसावा.

Pages