सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

मला खरंतर श्रीनिधी इतक्या लगेच बाहेर जावी इतकी टाकाऊ वाटत नाहीये. त्यापेक्शा विश्वजीतला बाहेर काढा.

काल कोणी आऊट झालच नाही का? की मी मिस केल? शरुच पहिल गाण नीट नाही ऐकल (तेवढ्यात एक फोन आला होता) पण नंतर कट्यारीसाठी गायलेल 'नको नको घाई नको' आहाहा.... फारच छान . गुप्ते म्हणाले तस ती आली .......

आउट सोमवारी करतात. मधुराला पोचवून आले गेटापर्यंत.

श्रीधर फडकेंचं वय ६७ वर्षं आहे? कसेल फिट आहेत ते.
महेश काळे पं जितेंद्र अभिषेकींकडून शिकलेत म्हटल्यावर त्यांची जन्मतारीख शोधली. ते अवधूतला सिनियर आहेत.

हा विश्वजीत कोण आहे? कधी न ऐकलेला.
तो आला तेव्हा जणूकाही याचीच वाट पहात होतो अस कौतुक झालं आणि कितीही वाईट गायला तरी त्याला चांगलच म्हटलं जात.
बरं हा गाताना कुत्रा डान्स करतो, एक पाय वर घेऊन.
तोच विनर ठरला तर मला जराही नवल वाटणार नाही.
म्हणूनच बहुदा एकेक जण काढता पाय घेत आहेत.

शेवटचे तीन बहुतेक शरयू, अनिरुध, आणि विश्वजीत असतील..!
आणि राजगायकाला केसरी ने युरोप चे तिकीट देऊ केले आहे बरोबर जोडीदार फ्री. तेव्हा त्या TRP साठी अर्थातच शरयू पेक्षा अनिरुध्द वा विश्वजीत हेच दावेदार राहतात. विश्वजीत ने आधीच विश्व जिंकलेले आहे (?) हे तेजश्री चे म्हणणे खरे असेल तर अनिरुध्द व कुटूंबाला ते तिकीट मिळणे हे 'लोकप्रीय' ठरेल.. ! तेव्हा राजगायक अनिरुध्दच होणार. Happy
काल मात्र शरयू ने एकदम किलर परफॉरमंस दिला.. विश्वजीत च्या फालतू व लाऊड अ‍ॅक्रोबेटी़स ने भाराव्लेल्या परिक्षकांचे विमान, श्रीधरजीं नी शरयू च्या गाण्याला आधीच ऊभे राहून दाद दिल्याने , झटक्यात जमिनीवर आले, नशीबच!

अजुन एक फ्लॉप आठवडा !
तो विश्वजीत उतरला सिंहासनावरून हे चांगलं म्हणावं तर याचा अर्थ नेक्स्ट वीकमधे त्याचं गाणं दोन दिवस ऐकावं लागणार !
शरयुनी गायलेली दोन्ही गाणी मला अजिबातच माहित नवह्ती, पहिलं ते कॅब्रे कि काय खरच जितकी स्तुति झाली तेवढं भारी झालं का ?
दुसरं गाणं खुद्द श्रीधर फडकेंनी उभं राहून टाळ्या वाजवल्या म्हणजे चांगलं झालं असावं.
टॉप मधे अवधूत कडून कोणीच नाही चालेल का ? निहिरा असेलच त्यामुळे अस वाटतय, पण टॉप ३ असणार कि ५ प्रश्नं आहे !
असो, सुधीर फडके यांच्या लग्नात साक्षात महंमद रफींनी (हिंदीत) मंगलाष्टकं गायली इतकच काय ते लक्षात राहिलं ! Happy

तो विश्वजीत उतरला सिंहासनावरून हे चांगलं म्हणावं तर याचा अर्थ नेक्स्ट वीकमधे त्याचं गाणं दोन दिवस ऐकावं लागणार !
lol

@योग, छान बातमी पण सुनध्यान च्या धाग्यावर आवर्जून राइझिंग स्टार बद्दल बोलण्याचा अट्टाहास का बरं ? Happy

काल गुढीपाडवा स्पेशल एपिसोड होता दोन तासान्चा. सगळी आधी झालेली गाणी होती. मला तेप्र-पुष्कराज चिरपुटकरच निवेदन काल कधी नव्हे ते आवडल.

हाही आठवडा खास नाही, उतरता ग्राफ चाल्लाय !
राणी मुखर्जी एपिसोडची सगळी हिंदी गाणी डल वाटली, अनिरुध्दच्या तेरी दिवानीची एवढी स्तुति ? Uhoh
निहिरा २००५ हिंदी सारेगमप मधे छलका छलकारे छान गायली होती , परवा मात्रं अ‍ॅव्हरेज !
आता काय टॉप ५ मिळाले, नो एलिमिनेशन त्यामुळे आधीच कंटाळलेले स्पर्धक आता फार सिरियसली गातात कि नाही माहित नाही !
शरयुच्या बाबतीत एग्झॅक्ट्ली काय खटकतं ते आज जाणवलं, यस ती अनुराधा पौडवाल सारखी चोरट्या आवाजात गाते कधीकधी.
वादक मंडळींनी बिछुआ मस्तं वाजवलं , इतरही गाणी मस्तं वाजवली, बाकी काहीच उल्लेखनीय नाही.

छलका छलकारे >>> हे गाण मूळ वैशाली सामन्तने गायल हि नवीन माहीती मिळाली मला.

विश्वजीत बरा गायला हया आठवडयात.

हो विश्वजीत ला जरा सूर सापडलयासारखा वाटला , जरासा बेटर गायला. मला या कार्यक्रमात सर्वात जास्त आणि कन्सिस्टन्टली काय आवडत असेल तर वाद्यवृंद. सर्वच वादक मंडळी एकदम टॅलेन्टेड आहेत.
शरयू , निहिरा पण चांगल्या गाताहेत. शरयू जास्त मनापासून गाते असे वाटते. निहिराचे गेले द्यायचे राहुनी आवडलं. अनिरुद्ध तसा चांगला आहे पण वरच्या पट्टीत बर्‍याच वेळा फार कर्कश कोकलतो. प्रसेनजीत चा युनिक आवाज आहे पण त्याचा कॉन्फिडन्स जजेस नी त्याला(च) जास्त क्र्टिसाइज केल्याने गेला आहे असे वाटते.

मैत्रेयी +१.

विश्वजीतची कपाळ झाकणारी झुलुपे आणि गोल भिंगांचा चष्मा गेल्यापासून तो बरा वाटायला लागलाय. Wink

त्याच्या गाण्यात काय खटकायचं तर दाढ ठणकून हिरडी सुजल्याने तोंड उघडता येत नसल्यासारखं दर चौथ्या पाचव्या ओळीला करणं. हे सध्या थांबलेलं दिसतंय.

अनिरुद्धकडून काहीच प्रकारची गाणी ऐकायला आवडतात. रंग और नूर की बारात या रफीच्या गाण्यात त्याचा आवाज तलतसारखा कापला. वर त्याचं कौतुकही झालं. एक श्रोता म्हणून काही मला ते रुचलं नाही.

शरयू अजून खूप लहान आहे, म्हणून. पण तिचं गाणं खूपच घोटून घेतलेलं. बसवल्यासारखं वाटतं.

गाण्यात कोणती वाद्य वापरली गेलीत, याकडे या कार्यक्रमामुळे लक्ष जायल लागलं.

छलका छलकारे >>> हे गाण मूळ वैशाली सामन्तने गायल हि नवीन माहीती मिळाली मला.
<
तिने एकटीने नाही गायलं, बरच कोरस मधे आहे.
रिचा शर्मा , महालक्ष्मी ऐय्यर मेन असाव्यात .

बुधवार चा भाग काल पाहिला. मला अज्जिबात न आवडणार्‍या कॅटेगरीतली गाणी अनिरुद्ध आणि विश्वजीत ने गायली आणि तेच दोघे टॉप ठरले. ते कुडी , दिलाचा मामला असली अर्धवट हिंदी इन्ग्रजी आणि नावाला मराठी अवधूत छाप गाणी, तसंच ते आवाज वाढव डीजे, असली गाणी गाऊन वर "सुर कसा हलला नाही" अशासारख्य कमेन्ट्स कशा मिळतात? कसाही धांगडधिंगा केला तरी चालते असल्या गाण्यात , सूर बिर कोण बघणार? माझ्यासाठी सर्वात बेकार एपिसोड्स पैकी हा एक.

सोमवारी विशवजीत ने चिन्मय सकल .. चांगले गायलं. बहुतेक पाय आणि तोंड दोन्ही वाकडं न केल्याने बरं वाटलं असेल Proud
anirudha la somvar agadi projection jasta zala vagaire comments dilya mag tech 'teri diwani' la applicable navhta ka ? Kiti karkasha vatat hota te !!

बुधवारचा भाग बोअरच होता.
विश्वजीतचे गाणे निदान टपोरी डान्स कॅटॅगरी तरी होत पण अनिरुद्ध, प्रसन्नजीत यांची गाणी जांभया कॅटॅगरी होती.
शरयुनेही यापेक्षा चांगलं गाणं निवडायला हवं होतं .
निहिराचा चॉइस मस्तं पण तिला हवं तसं झालं नाही !
‘ध्यास नवा ‘ म्हणून सगळ्यांनी सगळ्या कॅटॅगरीज एक्स्प्लोअर करायला हवात हा आग्राह कशी पटत नाही, या बाब्दीत हिमेसभाय म्हणतो ते खरं , अपनी जॉनरका गाना गाओ!
सगळेच काही अष्टपैलु गायक नसतात.
अनिरुद्धने नाट्य संगीत आणि क्लासिकल , प्रसन्नजीतने पोवाडे- लोकसंगीत किंवा पत्रास कारण कि सारखी इंटेन्स गाणी , वैशाली निहिरानी गझल-भावगीत- फिल्मी प्लेबॅक सिंगिंग गाणी, मधुरा जुइलीने लोकगीत/उडत्या चालीची गाणी , शरयु खूप व्हरसाटाइल आहे पण तिच्या होम पिच वरची क्लासिकल बेस्ड गाणी गावीत, शो बघायला प्रेक्षकांना मजा आली असती :).

सगळे ग्रहणामागे लागले वाटतं.
हे कधी उरकणार आहेत? महाअंतिमफेरीच्या महासोहळ्याची महाजाहिरात आलेली दिसत नाही.

विश्वजीत धाडसी आहे. या भवनातील- अगदीच वेगळं करून गायलं. हे त्याचं स्वतःचं की त्याच्या गुरूंनी (स्पर्धेतल्या नव्हे, मूळच्या) शिकवलेलं हे सांगितलं नाही. नाट्यगीतात एकच ओळ वेगवेगळ्या पद्धतीने आळवतात, ते केलं नाही.

शरयूचं 'सावर रे' खरंतर फिकं वाटलं. मूळ गाणं खूपच कठीण आहे, म्हणून आणि त्यात काहीतरी साउंडच्या करामती असाव्यात म्हणूनही. पण तिला महेशचा रेअर जीनियस मिळाला.

सध्यातरी निहिराच फेव्हरिट.

तेजश्री देवळात जाऊन घंटी वाजवते.

अनिरुद्धला उग्गाच चढवतायत असं कुणाला वाटतंय का? मला तर हल्ली त्याची गाणी ऐकवतही नाहीयेत आणि त्याला दोन जिनीयस वगैरे मिळतायत. Uhoh

प्रसेनजीतचं गाणंही अजिबात नाही आवडलं. विश्वजीताबद्दल न बोललेलंच बर.. निहीरा आणि शरयूच लाडक्या. निहीराला आधीच वोट देऊन टाकलंय.

वोटिंग ज्याला करू त्याला जातंय का नीट. मध्ये एक स्क्रीनशॉट बघितला दोन वेगळे नं टाकले तरी वोटस प्रसनजीतला जातायेत असा.

मी बघत नाही पण निहिरा आवडते मला म्हणून तिला वोट दिलं असतं पण ते वाचून जाईल की नाही नीट असं वाटत राहते.

मलाही निहिराच जिंकावी असं वाट्तय.
अनिरुध्द जजेस फेवरेट आहेच, मला नाही तो आवडत समहाउ , हिंदी गाणी तर जाम फसतात त्याची.

त्या प्रेक्षकांमध्ये दोन मुली सारख्या दाखवतात, एक वैशालीसारखी दिसते black and white striped dress घातलेली आणि दुसरी गुलाबी. १०७ वेळा तरी दाखवल्या असतील. कधी तरी ५५ आठवड्यांपूवी केलेलं शूटींग असावं.

काही काही मुलगे पण सारखे दिसताहेत.
लाइव्ह ऑडियन्सपण मिळेना की काय?
एक स्पर्धक सोडून गेला. एक जजसुद्धा सोडून गेला. ऑडियन्सपण ?

प्रसेनजीत-शाल्मली चिडवाचिडवी खूपच अती झालीय. पोरकटपणाची पातळी गाठलीय.

Pages