खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग

Submitted by संयोजक on 30 August, 2017 - 00:20

खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

चवथा विषय :
निसर्ग

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज

Group content visibility: 
Use group defaults

अहो चूक बरोबर तरी सांगा किमान म्हणजे अजून डोके खाजवायचे की नाही ते कळेल..+१

आणि किती अक्षरी ते पण सांगायचं ठरलं ना आपलं ?

जलद असे परी वेग नव्हे
धवल असे परी कर्पास नव्हे
जीवन देतो परि निर्जिव असे
छाया देतो परी वृक्ष नसे

घ्या पाहू
सोप्पयं एकदम

ढग

ढग ...

चंद्र

Pages