युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं त्या क्रस्ट च्या वाट्या संपल्या आता Happy ज्यात हे फिलींग भरले होते.
नुसता केक पॅन मध्ये भरून केक होऊ शकेल का?

घरच्या घरीच जर थोडे अगोड क्रॅकर्स किंवा कुकीज असतील तर त्यांचा चुरा करून त्यात मेल्टेड बटर घालून क्रस्ट थापता येईल का बघ.

कसुरी मेथी खराब होऊ शकते का?? खुप महिन्यांपुर्वी पाकिट आणल गेलय, थोडस वापरुन स्टेपल करुन ठेवल ते तसच राहिलय... आठवणच नाही पुन्हा. आताच त्याची expiry date उल्टुन गेलीय(०६-०३-११) . लगेच वापरुन संपवता येईल का? काही पदार्थ सुचवा ना की पटकन वापरुन संपवता येईल असे??

पाकीट ओलसर नाही ना ? थोडी मेथी हातावर घेऊन ती कोरडी आहे ना ते बघायला हवे. चुरडून वास घेतल्यावर, तसाच वास आला पाहिजे. त्यावर काळे वा पांढरे डाग नसावेत.
पराठे, मेथी मलाई मटार मधे वापरता येईल. भाजी आमटीत वापरुन संपवता येईल. पुलाव / बिर्यानि मधे पण वापरता येईल.

धन्यवाद दिनेशदा, पाकीट ओलसर नाहीय पण डेट होऊन गेलीय म्हणुन जरा शंका आली, वास तसाच आहे. काळे-पांढरे डाग पण नाहीत.

मग वापरुन टाकता येईल. एक्स्पायरी डेट पाळावीच, पण थोडेफार इकडे तिकडे चालते.

माझ्याकडे परवा गावाहून ८ किलो घरच्या गव्हाचं पीठ आलं आहे. पीठ जरा जास्तच भरड दळलं आहे. मी पीठ कधीच चाळून घेत नाही. पहिल्या दिवशी न चाळता केलेल्या पीठाचे फुलके घरात कुणीही खाल्ले नाहीत. म्हणून पीठ चाळून घेतलं तर रव्याच्या चाळणीने चाळल्यावर २० फुलक्यांसाठीच्या पीठात वाटीभर कोंडा निघाला. तरीसुद्धा फुलके खाण्यालायक वाटले नाहीत. काल अन आज शेवटी पीठाच्या चाळणीने चाळून मग फुलके केले, पण त्यांचा रंग चक्क काळसर येतोय (बाजरीचे पीठ मिक्स असल्यासारखा). आणि बाजरीचं वैगरे पीठ जूनं झाल्यावर जसं कडसर लागतं, तशी किंचीत कडसर चव येतेय या पीठाच्या फुलक्यांची.
हे कश्यामूळे? अन आता या डब्बाभर पीठाचं काय करू?

अल्पना, सॉरी, काहीच कल्पना नाही.
चंपी, मेथ्या मिक्सरमधून काढून पावडर कर आणि मेंदीत / आवळापावडरमध्ये मिक्स करुन केसांना लाव. दाट, काळे होतात. केस धुतल्यावर एक चमचा मेथी पावडर वाटीभर पाण्यात मिक्स करुन डोक्यावरुन घे. कंडिशनिंग. Happy

अल्पना, गहू घरचेच होते ना ? नूसता कोंडा असेल तर खायला हरकत नाही, पण जर चव कडसर असेल तर त्यात इतर धान्य मिसळले गेल्याची शक्यता आहे.
गूळाच्या पाण्यात पिठ भिजवून चव सुधारता येईल, जाडसर पिठाच्या डाळबट्ट्या पण करता येतील. पण नेमके काय मिसळले गेलेय ते कळायला हवेय.

चंपी, मेथ्यांना मोड काढून उसळ करता येते. अजिबात कडू लागत नाही. रोजच्या वरणात आमटीत पण, भाजून टाकता येतात.

मला सांगितलं तर तेच आहे, की घरचे गहू आहेत, धूवून वाळवून पीठ दळलंय, आणि त्यात इतर कोणतही धान्य /कडधान्य मिक्स नाही केलं.

मी आता नेहेमी आणत असलेल्या चक्की च्या आट्यामध्ये थोडं मिक्स करून बघते. तरीसुद्धा जर कुणी खाल्लं नाही तर मात्र नाद सोडून देते. Happy

अल्पना, नाहीतर गव्हाचा चीक, कुरडया वगैरे करून डबाभर पीठ संपव : आल उन्हाळा, वाळवणं घाला Proud

(चीककुरडयावगैरेसाठीगहूवापरतातकीगव्हाचंपीठतेमलामाहीतनाहीये हां अल्पना Wink )

चीककुरडयावगैरेसाठीगहूवापरतातकीगव्हाचंपीठतेमलामाहीतनाहीये हां अल्पना >> हे लिहीलेस बरे केले.. नाहीतर मला माझ्या बेसिकमधेच राडा आहे अक शंका आली होती Lol

नाहीतर गव्हाचा चीक, कुरडया वगैरे करून डबाभर पीठ संपव >>> पीठाच्या कशा करतात? (माफ कर मंजूडी, मला गव्हाच्याची पा. कृ. माहीतीये, पण पीठाच्या?)

अल्पना, गावाकडून आलंय म्हणतेस ना? मग तिथल्या घरच्यांनाच विचार ना त्यांनी ते कसं वापरलं ते Happy त्यांनाही हा प्रॉब्लेम आला का ते कळेल.

मंजू Proud
फुलके कडसर का लागत असतिल हे शेवटी साबांना फोन करून विचारले तर त्यांचे मत बहूदा गहू ओला असणार आतून (धुतल्यावर नीट वाळवला नसणार). मला त्या म्हणाल्या ते सगळं काही समजलं नाही फक्त शेवटचं वाक्य चांगलंच समजलं. -" ये वापस वंही भेज दो और उनको बोलना डंगरोंको (गुराढोरांना) खिला दो ये आटा, यहां कोई नही खा रहा है." Proud

अल्पना, तुझ्या साबा म्हणाल्या त्याप्रमाणे गहू ओला राहिला असेल तर ते पीठ बुरशीने खराब झाले असेल. कुणीच खाऊ नका ते. जनावरांनाही नकोच.

वर्षा बर्‍याचदा, गहू साफ करण्यासाठी धूवून स्वच्छ वाळवतात. मी इकडे पंजाब, हरियाणा आणि युपीमध्ये बघितलंय हे.
हो, केश्विनी मी नाही वापरणार.

किरेक्ट त्यात फंगस ग्रोथ असेल तर प्रॉब्लेम असेल. साबाजी हॅज प्वाइंट. मी दोन दिवस दिल्ली नणंदे कडे पोळ्या केल्या तिचीही कणिक अगदी कशीतरी होती. जाडी भरडी. नथिंग लाइक अवर सॉफ्ट रोटीज ऑफ आशीर्वाद आटा Happy चाळूनही काही फरक पडत नाही म्हटली ती. घडीच्या पोळ्या तिच्या मुलाने पराठा म्हणून खाल्ल्या.

गेल्या आठवड्यात इन्स्टंट लोणच्यासाठी २ कैर्‍या आणल्या होत्या. (वेळ न होणे (विसरणे) इ. महत्त्वाच्या कारणांमुळे) फ्रीजमध्ये मऊ झाल्यात. पन्हे खपण्याचे चान्सेस नाहीत. रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत. (शनि रविसाठी वरील कंस पेस्ट.) काय करु?

आंब्याची कढी किंवा कैरीची उडदमेथी कर आशू. दोन्हीमधे कैरी वाफवून घ्यायची आहे, त्यामुळे ती मऊ पडली असली तरी चालेल.

केश्वि, तो 'संकटसमयी सुटण्याचा मार्ग' ठेवला होता गं.. Happy संकट आले बहुधा.
उडदमेथीची लिंक मंजूतै, कृपया.

http://www.maayboli.com/node/21480 >> हे करता येईल की आशू. ही उडदमेथीचीच लिंक आहे. Happy
तसंच मेथांबा पण करता येईल बहूतेक (नक्की कसा करतात मला माहित नाही)

Pages