युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाँ, माबोवरच्या किंवा नेटवरच्या पाकृंचे प्रिंट्स किंवा पटकन मिळेल त्या कागदावर लिहून घेतलेल्या पाकृ तुम्ही कशा सांभाळता? घरी जाऊन वहीत लिहून ठेवता?!! स्वयंपाकघरात पाकृंची फाईल म्हणजे जऽरा ... Proud

मी बहूतेक वेळा सरळ नेट सुरू करते किंवा किमान सेव्ह केलेली फाइल उघडते लॅपटॉपवर, आणि ती वाचत वाचत करते. फाइलिंग करणं, वहीमध्ये लिहिणं आणि ती वही सांभाळणं ये मेरे बस की बात नही. Happy
कधीकधी करायच्या आधी २-५ वेळा वाचून घेते आणि मग न वाचता स्मरणशक्तीच्या बळावर करते (अश्यावेळी बर्‍याचदा घटकपदार्थ टाकायचा सिक्वेंस चुकतो, कधीकधी एखादी वस्तू घालायची राहून जाते.)
जर पाककृती वेगळी आणि खूपच महत्वाची (बिघडण्याजोगी) असेल तर मात्र एखाद्या चिटोर्‍यावर शॉर्टहँडमध्ये लिहिल्यासारखं काहीतरी खरडते. ते फक्त मलाच कळतं. हा चिठोरा सांभाळून ठेवत नाही कारण पुढच्या वेळी करताना (म्हणजे किमान काही महिन्यांनंतर) नक्की कसली रेसेपी आहे आणि काय लिहिलंय ते मलाही कळणं अवघड असतं. त्यामूळे सरळ कचर्‍यात टाकते. Happy

आशुडी थॅक्स . छान उपाय सांगितलास तु..खूप दिवसांची मेहंदी लावायचिये केसांना पन इथे काही कोनी आयती लावून नाही देत्..कंडीशनर म्हनून वापरून बघते, पन भाजून पूड करायची कि तशीच?

दिनेश दा, मेथ्यांना मोड मटकी सारखीच आनायची ना? आणि बनवायची कशी?

हो मटकीसारखेच मोड आणायचे, आणि तशीच परतून करायची. कांदा जरा जास्त घालायचा. बाकिच्या कडधान्याबरोबर पण ती वापरता येते. मग तर कळतही नाही, कि मेथी वापरलीय ते.

चंपी
रोजच्या वरणासाठी कुकरमध्ये डाळ शिजवतांना पण एक-दोन चहाचे चमचे मेथ्या टाकता येतील. वरण हाटल्यावर कळतही नाही मेथ्या घातल्या होत्या म्हणून. तब्येतीलापण चांगले आणि मेथ्याही संपतील.

रुनीच्या म्हणण्याला मम. तसंच मेथीची आमटीही करता येईल. तुरीच्या डाळीबरोबर घालायच्या. कुकरला नेहमीप्रमाणेच शिजवून हिंग, हळद, मोहरीची फोडणी करुन त्यात लसणीच्या फोडी परतून कढिपत्ता, लाल मिरच्याही घालायच्या. वर हे वरण्+मेथी घोतून घालायचं. उकळताना आमसूल, गूळ घालायचा. भरपूर कोथिंबीर घालायची वरुन.

तसंच सांबार, कढी करतानाही मेथ्या घातलेल्या चांगल्या लागतात.

मी किंचीतशा तेलावर मेथ्या परतून घेते मग त्याची मिक्सरवर पूड दळून बाटलीत भरून ठेवते.आमटी भाजीत छोटा चमचाभर घालते. कडवटपणा अजिबात जाणवत नाही आणी स्वाद पण छान येतो.
अल्पना फंगस वगैरे नाही असं शंका समाधान झालं तर त्या भरड पिठाचे तुझ्या लेकासाठी पौष्टीक लाडू करता येतील.

फंगस आहे की नाही माहित नाही. डोळ्यांना तरी दिसत नाही. पण चव कडवट आहे, आणि तशी चव येण्याचे साबांचे मते कारण गहू ओलसर राहिले असणे हे आहे. तस्मात वापरू नकोस. (पीठ चुसाबांनी पाठवलंय, त्यांना विचारून बघितले तर त्यांनी सांगितलं तुम्हाला विकतचे पीठ खायची सवय झाल्याने तुम्ही खाऊ शकत नाही आहात. Uhoh )

थँक्स रुनी , सायो..अग मि घालत होते डाळीत पन चंप्याला नाही आवड्त डाळीत्..आता हेल्दी आहे म्हनून त्याला खाऊच घालते Happy

प्रॅडी , तुझी आयडीया छान आहे.
दिनेश दा आताच मेथ्या भिजवल्यात...१ महिना आहे ऑस्ट्रेलियात तोपर्यंत संपवते..:)

अति खाऊ नकोस. उष्ण पडतील. कधीकधी पोटरीत एकच पाय दुखत असतो. त्यावेळी ३,४ मेथ्या पाण्यात भिजवून खाल्ल्या तरी फरक पडतो.

चितळ्यांसारखे चवीचे श्रीखन्ड कसे करायचे..आपण नेहेमी चक्का+साखर असे घोटुन .गाळुन करतो..त्याचे थोडे चमकदार [लकाकी] दिसते. फ्रीज मधे ही.जास्त दिवस टिकते.. अजुन घट्ट होत नाही बहुतेक पाकातले करतात..

अल्पना Happy त्या कागदांना पाकृच्या पुस्तकात खुपसून पुस्तकाला पुस्तक व्हायची वेळ आली आहे. फायलिंगशिवाय पर्याय दिसेना आता.
चंपी, भाजायची गरज नाही गं.

आशू, कधीतरी निवांत वेळ असेल तेव्हा, घरी मध्ये मध्ये यायला कुणी नसेल तेव्हा डायरी घेऊन मन लावून उतरवून काढ आणि एकदाचा हा प्रश्न निकालात काढ. डायरी अपडेट झाल्यानंतर अजून रेसिपीज आल्या तर सगळे चिटोरे एका एन्वलपमध्ये सारुन ठेव. म्हणजे डायरीही व्यवस्थित दिसेल आणि चिटोरेही दिसणार नाहीत.

रेसिपीजः मी तरी प्रिण्ट काढुन ते एका फाइल मध्ये ठेवलेले आहेत. पंच करुन फाइल नाही केलेले आजुन, पण असे निदान एकत्र तरी रहातात.

मुलींनो
मुलं पुण्यात असताना मीही अधून मधून त्यांच्या बरोबर रहायची. तेव्हा वेळ जाण्यासाठी म्हणून सहजच मी घरात जे पदार्थ वरचेवर करायची व अर्थातच जे सगळ्यांना आवडायचे...अश्या पदार्थांच्या रेसिपीज लिहीत गेले. व लेकीच्या लग्नानंतर सासरी जाताना तिने ती वही ढापली. तिच्या तिकडच्या मैत्रिणींना व सासरच्या लोकांना खूपच कौतुक वाटलं. त्यांना वाटलं मी लेकीला देण्यासाठी मुद्दामच रेसिपीज लिहीत गेले. असो....खरी गोष्ट वेगळीच! वर याच विषयावर चर्चा चालू आहे म्हणून लिहिलं!
आताही एका क्लिकेसरशी काहीही कधीही मिळू शकते तरी आता मी दुसरी डायरी करत आहे. अर्थातच त्यात माबो. वरच्याच खूप रेसिपीज आहेत.

मऊ पण आंबट कैरी असेल तर मुगाच्या वरणात घालता येईल. मुगाची डा़ळ पाण्यात शिजवत लावायची ( कु़करमधे नाही ) . अर्धी शिजली की कैरीचे तुकडे घालायचे. शिजत आलं की मीठ घालायचं. लसूण - जिरं, हि मिरचीची फोडणी द्यायची . मस्त लागते .

केश्वि, लीनाएस, मानुषी Happy
मेधा, हे पण करेन पुढच्या वेळेस. कैर्‍यांची उडीदमेथी आणि मोरांबा केला. मस्त झाले दोन्ही. धन्यवाद लोक्स.

मी प्रिंट काढून फाईल करुन ठेवते. पुरेशा प्रिंट झल्य कि स्पायरल बाईंडिन्ग करून घेणार!!!

मेधा,
अगदी दोन कैर्‍या आहेत ना? मग अगदी बारिक फोडण्या करून, त्यावर मेथी, हिंग हळदिची चरचरीत फोडणी दे, मीठ घाल, आवडत असल्यास गुळ घाल... हे झालं इन्स्टंट लोणचं, फ्रिजात ठेव... फार तर २ दिवसात संपून जाईल.

बारिक फोडण्या >>>>>>>>>> दक्स तुला बारिक फोडी म्हणायचंय का? असू दे असू दे!!!!
मेधा घेईल समजून!( दिवे!)
दिनेशदा त्यात(डायरी नं२) तुमच्याही रेसिपीज आहेत हो!
ती डायरी टीव्हीवर ठेवली आहे. म्हणजे बघता बघता पटकन लिहून घेता येईल हा विचार!
पण टीव्हीवरच्या "पपई कोलाडा" वगैरे रेसिपीज पाहून तो विचार अगदी कोलमडल्यासारखा झालाय!
काहीही दाखवतात.

बनियनच्या काखेच्या साइटच्या कडा थोड्या पिवळसर झाल्यात? त्यावर उपाय?
त्या घामामुळे झाल्या असतील कि कपडे निट न धुतल्यामुळे ? (या अगोदर कधी झालं नाही )

मला एका महीन्यासाठी भारतात जायचे आहे. नवरा ईथे एकटा राहाणार आहे. त्याचे कोलेस्टेरॉल सध्या खुपच वाढले असल्यामुळे बाहेर जास्त खाता येणार नाही ऑफीसमधे खुप काम आहे. प्रोजेक्ट लाईव्ह जाणार असल्यामुळे त्याला स्वतःला कुकिंगला जास्त वेळ मिळणार नाही. मला एका महिन्यासाठी त्याच्यासाठी पोळ्या/फुलके करुन डीप फ्रिज मधे ठेवता येतील का? मी २ ते ३ पोळ्यांचा एक एक पॅक याप्रमाणे वेगवेगळे पॅक्स झिपलॉक मधे ठेवले तर पोळ्या टिकतील का? त्याचा भात (कोलेस्टेरॉल खुपच वाढल्यामुळे)पुर्णपणे बंद आहे.त्यामुळे फुलके, कमी तेलातले मेथी पालक पराठे हेच पर्याय आहेत. तेल तुपही खुपच कमी खायचे आहे, बाहेरचे सबवे सॅन्डविच आहेत पण घरी झटपट करता येण्यासारखे ईतर पदार्थ/ आणी फुलके फ्रीज करता येतात का? प्लिज सांगा.

झी, महिनाभराचे पराठे करुन ठेवणे योग्य नाही. त्यापेक्षा खाकरा मिळण्यासारखे असतील तर चांगले.
ओट्स चे वेगवेगळे प्रकार आता मिळतात. काही प्रकारात नूसते गरम पाणी टाकले तरी चालते. सोबत चालण्यासारखी फळे व सलाद खाल्ले तर चांगले. कोलेस्ट्रॉल साठी ओट्स चांगले.

धन्स दिनेशदा, ओट्स आहेतच, ते रोजच ब्रेकफास्ट्ला खातो तो !! फळे व सलाद ई ही आहेच. फुलके डिप फ्रिज करुन टिकतील का? किंवा करावे का? भाज्या, आमटी याचेही काही पौष्टीक शॉर्ट्कट्स हवे आहेत मला !

झी, फुलके पूर्ण गार करून, फॉईलमधे घट्ट गुंडाळून डीप फ्रीज करू शकतेस. एकावेळी लागतील एवढेच एकेका झिप्लॉक मधे ठेवायचे. रोज सकाळी एक बॅग लंच साठी न्यायची. ते फुलके बाहेर मस्त थॉ होतील लंच टाइम पर्यंत. शिवाय सकाळीच एक बॅग काढून फ्रीज मधे ठेवली तर ती रात्रीच्या जेवणापर्यंत व्यवस्थित थॉ होईल.
गरम करताना पेपर टावेल वर दोन थेंबा पाणी शिंपडून त्यावर फुलके ठेवून गरम करायचे मावे मधे -१५-२० सेकंद लागतील २-४ फुलक्यांना .

आसपास कोणी दर आठवड्याला फुलके करून देणारे सापडतील का ते पहा.

झी, ओटसचा उपमा, धिरडे अश्या रेसिपीज आहेत इथे, वेळखाऊ नाहीत. quinoa, couscous पण चालेल. रवा भाजून ठेवला तर उपमा लवकर होईल.
खोबरे नसलेल्या कोरड्या चटण्या करुन ठेवता येतील.
सार, सूप असेही ऑप्शन आहेत.

ही लिन्क IE मध्ये पहा. यात तांदूळ आहे पण नकोच असेल तो वगळून मुगाची डाळ वाढवता येईल. हे आधी करुन ठेवता येईल.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/124162.html?1182198778

अजून झटपट रेसिप्या, वन डिश मील सापडल्या तर लिन्क देईन.

मेधा, मी तसच काहीसं विचारत होते. एकावेळेस खाता येतील एवढे फुलके पॅक करुन ठेवायचे. लालु, उपमा, किनवा
या आयडियांसाठी खुप खुप धन्यवाद!! नक्की करुन ठेवील.

Pages