बाजरीच्या पीठाचे गोड दिवे

Submitted by मनीमोहोर on 27 July, 2017 - 15:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आषाढ अमावस्या ही हल्ली जास्त करून श्रावण महिन्याची पूर्व संध्या म्हणून 'गटारी' या नावाने ओळखली जाते पण हीला खरं तर 'दिव्यांची अमावस्या' असं म्हटलं जातं . ह्या दिवशी दिव्यांची पूजा करतात . आषाढातला धुवाधार पाऊस, भर दिवसा भरून आलेली काळोखी, अपुरा प्रकाश अशा वातावरणात दीप पूजन करण्याची , दिव्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा खरोखरच कौतुकास्पद आहे . ह्या दिवशीचा नैवेद्य ही 'दिवे' हाच असतो . दरवर्षी मी कणकेचे दिवे करते पण ह्या वर्षी घरच्या बाजरीचं ताजं पीठ घरात होतं म्हणून बाजरीचे केले . ते चवीला खूपच सुंदर झाले होते म्हणून कृती लिहीत आहे . कृती खूपच सोपी आहे .

साहित्य : बाजरीचं पीठ एक वाटी , गूळ बारीक चिरून एक वाटी पेक्षा थोडा कमी , तेल एक चमचा, चिमूटभर मीठ, आणि दूध

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका बोल मध्ये दूध सोडून इतर सर्व जिन्नस नीट मिक्स करून घ्यावेत . नंतर त्यात दूध मिसळून आपण पोळ्याना भिजवतो तसे पीठ भिजवावे . नंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्यांना फोटोत दाखवल्या प्रमाणे दिव्याचा आकार द्यावा . चाळणीला तेलाचा हात लावून त्यात हे सर्व दिवे ठेवावेत आणि कुकर ची शिट्टी काढून दहा ते पंधरा मिनिटं वाफवावेत . बाजरीचे गोड दिवे तयार आहेत.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चार प्रत्येकी
अधिक टिपा: 

१ ) पीठ भिजवायला दूधच वापरावे. पाणी नको. दुधाने खुसखुशीत आणि हलके होतात. पीठ जुनं असेल, विरी गेलेली असेल तर दूध थोडं गरम करुन घ्यावे .
2) दिवे करताना पिठाची गोळी अंगठ्याने दाबुन तिला उभट खोलगट आकार द्यावा आणि मग त्याच आकारात मोठी करावी म्हणजे दिवे सुंदर आकाराचे होतात . पसरट होत नाहीत .
3) हे अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट होतात . गूळ आणि बाजरीची एकत्रित चव फारच छान लागते .
4) खाताना ह्यावर तूप घेतले तर चव अजून खुलते .
5) मुलांना डब्यासाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी हा एक हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे .
6) कोणी पाव्हणे येणार असतील तर गोड म्हणून ही हे करता येतील .
7) मी कडेला घातलेली मुरड ऐच्छिक आहे , जमत नसेल तर नाही घातली तरी चालेल .
8) ग्लूटेन फ्री डाएट साठी हे नक्कीच चालतील .

हा फोटो
IMG_20170723_125213.jpg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमोहोर ताई , जुई माझी फेसबुक फ्रेंड आहे. तुम्ही तिथे लिहिलं तेव्हा मला आश्चर्य प्लस धक्का बसला . नंतर तुमचा लेख आणि तिचा लेख वाचला. खूपच साम्य आढळलं . विचार सारखे असू शकतात पण शब्द तंतोतंत कसे तसेच असतील??
तस मी तिला इनबॉक्समधून कळवलं की हा लेख हेमा वेलणकर यांचाच आहे.
त्यानंतर ऑफिसात अर्जंट काम आल्याने विसरून गेले. आज मायबोलीवर हेच लिहायला आले होते तर नेमका हा लेख वर आल्याचा दिसला. तिने लिंक काढून टाकली असेल तर वेल अँड गुड Happy

थॅंक्यु blackcat सीमंतिनी जाई.

तिने लिंक काढून टाकली आहे असं म्हणतायत , मला ती दिसतच नाहीये fb वर. ती writer पत्रकार आहे असं वाटतंय , लेखन तिचा व्यवसाय वाटतोय.
मला सांगून किंवा विचारून घ्यायला हवं होतं. पण ठीक आहे आता तरी डिलीट केला आहे. पण मार्मिक मध्ये असणारच अजून त्याना ही लिहिणार आहे पण ते किती शहानिशा करत बसणार प्रत्येक लेखाची ,

पण मार्मिक मध्ये असणारच अजून त्याना ही लिहिणार आहे पण ते किती शहानिशा करत बसणार प्रत्येक लेखाची >>>
Happy मनीमोहोर इतका अति-समजूतदार स्टँड घेऊन मार्मिकवाल्यांना लिहू नका.
पत्र पाठवण्याआधी इ-मार्मिकचा स्क्रीन्शॉट / पीडीएफ घेऊन ठेवा. लेखिकेचे नाव, तारीख आणि मार्मिक लोगो + तुमची पाककृती दिसेल असा.

शहानिशा करणे / लेखकांना तशी अट करारात घालणे ही व्यावसायिक प्रकाशन म्हणून त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. वाटल्यास स्टाफ नेमावा plagiarism check साठी. तो त्यांचा प्रश्न आहे की कसे करायचे.

आपल्याला मायबोली प्रशासनाने नियमांची माहिती दिली आणि आपण एकमेकांना / नवीन लोकांना सावध करतोच ना? की दुसर्‍याचे फोटो/लेखन/कौशल्य आयते वापरू नकाच पण किमान नाव / परवानगी किंवा श्रेयासहित वापरा. किंवा काढून टाका. मुद्दा नियम पाळणे / बगल देणे हा आहे.

मला फेसबुक वरची नाही दिसली पण इ-मार्मिक मधील पाककृती दिसली.
तुमची तर आहेच पण बाजरीचे दिवे प्रकार २, हा अजून कुठल्यातरी व्यक्तीचा घेतलाय.
वर आणखी तळटीप दिली आहे की --
(लेखिकेला पारंपरिक अन्नपदार्थांविषयी उत्सुकता आहे आणि पाककलेत रुची आहे.)
याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी १० ठिकाणाहून पाककृती वाचाव्या आणि सर्रास ढापाव्या. आणि त्याचे श्रेय आणि बहुतेक मानधनही घ्यावे.

व्यक्तीने दुसर्‍याचे पाककृती वर्णन + फोटो वापरून त्यांनी त्याचे श्रेय आणि मानधन घ्यावे --- हा कायद्याने गुन्हा आहे.
आणि प्रकाशकांनी जाणता / अजाणता ते छापावे, हाही.

व्यक्ती आणि मार्मिक दोघांनीही तुम्हाला श्रेय / आर्थिक मोबदला न देता, तुमच्या परवानगीशिवाय तुमची कलाकृती वापरली हे क्षम्य नाहीच. त्यांच्या नजरेला आणून दिलेच पाहिजे. सभ्य पण व्यवहारी शब्दात असे मला वाटते.
मला कल्पना आहे की अनंत वेळा अनंत ठिकाणी आपण नाही विरोध करू शकत सो किती सिरीयस घ्यायचे हा प्रश्न तुमचा.

स्वतःच्या वेबपेजवर मार्मिकवाले जर हे लिहीतायत ---

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.

TERMS OF SERVICE SECTION 1
You may not use our products for any illegal or unauthorized purpose nor may you, in the use of the Service, violate any laws in your jurisdiction (including but not limited to copyright laws).
SECTION 2 – GENERAL CONDITIONS
You agree not to reproduce, duplicate, copy, sell, resell or exploit any portion of the Service, use of the Service, or access to the Service or any contact on the website through which the service is provided, without express written permission by us.

तर त्यांनी तुमच्या आणि मायबोली संस्थळाच्या प्रताधिकाराचा आदर + जाणीव ठेवणे पण गरजेचे आहे. आणि तसे त्यांच्या लेखकांना सूचित करणेही.

कारवी , थॅंक्यु सो मच. उशिरा रिप्लाय देतेय त्याबद्दल सॉरी ही.

तू लिहिलयस म्हणून बघितला इ मार्मिक , त्यावर आहे अजून. लिहिते मार्मिक ला ही. त्याना पण समजायला पाहिजे. मार्मिक चा email address शोधतेय. Site वर दिसत नाहीये कुठे. स्क्रीन shot पण घेऊन ठेवते कारण मी लिहिलं की ते डिलीट व्हायची दाट शक्यता आहे.

Pages