सोने : चकाकती प्रतिष्ठा

Submitted by कुमार१ on 26 July, 2017 - 04:39

सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.

सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.

आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.

सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?

आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.
सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.

अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा Gold bonds मध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.

( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. त्यावर तज्ञांनी भाष्य केल्यास आनंद होईल).
*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख!

खरे तर सोने हा इतर धातूंसारखाच अजून एक धातू आहे. जगात तर दुर्मिळ गोष्टी पुष्कळ आहेत. तरीही सोन्याला एवढे महत्व का दिले जाते हे मला न पडलेले एक कोडे आहे. वास्तविक सोन्याची उपयुक्तता (utility) अगदी कमी आहे. आपल्याकडे इतरांपेक्षा एखादी दुर्मिळ गोष्ट आहे ह्याचा अभिमान बाळगणे ह्या मनुष्य स्वभावामुळेच त्या गोष्टीला विनाकारण महत्व येते.

दुसरे, आपल्या सभोवतालचे सर्व लोक सोन्याला महत्व देतात म्हणून आपणसुद्धा देतो. सर्वांनीच जरका सोन्याला महत्व देणे बंद केले तर आपोआप आपला सोन्याचा हव्यास कमी होईल. म्हणजेच सोन्याचे असलेले महत्व हे आपल्या सर्वांच्या मानण्या, न मानण्यावरच अवलंबून आहे.

सागरजी व सचिन, आभार ! सचिन, तुमचा प्रतिसाद उत्तम आहे. सहमत
तुमचे प्रतिसाद हे नेहमीच उत्साहवर्ध क असतात .

सोनं आणि चांदी हे दोन मौल्यवान धातू आज कित्येक शतकं विनिमयाचे माध्यम आहेत . पूर्वी कागदी नोटांच्या मूल्या एवढ सोनं central banks बाळगून असतं .
आता अगदी तेवढं नाही तरी प्रत्येक central बँके कडे सोनं असतंच . ठेवायला सोपं, जगभरात सर्वत्र मान्यता प्राप्त सोनं सामान्य जनांनाही आकर्षक नाही वाटलं तरच नवल !

आर्थिक तज्ञांच्या मते सोनं हे गुंतवणूकीमधे Hedging साठी वापरतात. त्याचे एकूण प्रमाण एकंदर गुंतवणूकीच्या (Portfolio) 5 ते 8 % असावे असा दंडक आहे.
सर्वसाधारणतः शेअर मार्केट वर असत तेव्हा सोन्याचे दर कमी आणि Vice versa असतात...

सोन्याचे आकर्षण असणे गैर नाही, सोन्यात गुंतवणूक बेस्ट असते.

उगा इम्प्रक्टिकल आदर्शवादाच्या पिपाण्या वाजवून काही फायदा नसतो. आर्थिक बाबतीत जमानेके साथ चलो हा अप्रोच असावा.

फक्त ते दागिन्यांच्या व्यवहारात हातोहात उल्लू बनवले जातात, तेवढं टाळलं तरी बेस्ट! नेहमी सॉलिड गोल्ड घ्यावं ते हि प्रमाणित असलेलं. चांगले 100 ग्राम सोन्याचे पैसे जमवून तेव्हडे सोने घ्यावे, 50 ग्रॅम 100ग्राम च्या पटीत सोने खरेदी असावी

लेखातला शेवटचा पॅरा बर्‍यापैकी सेन्सिबल वाटला. देशप्रेम आणि सोन्याची आयात ह्याचा काही संबंध नाही.

सोन्याचे आकर्षण असणे गैर नाही, >> सहमत. सोन्यात गुंतवणूक बेस्ट असते. >> असहमत.

मागच्या दोनशे वर्षांची गोल्ड, स्टॉक आणि बाँड चे रिटर्न कंपॅरिझन बघा
stocks-vs-bonds-vs-gold.png
रिटर्नस रिअल टर्म्स मध्ये आहेत म्हणजे .. महागाई हा फॅक्टर गृहीत धरलेला आहे.

शॉर्ट टर्म मार्केट सायकल मध्ये जेव्हा 'फ्लाईट टू सेफ्टी' सेंटिमेंट येत त्यावेळी काही काळासाठी सोने आऊटपर्फॉर्म करू शकते. पण लाँग टर्म मध्ये सोने ही अतिशय सबऑप्टिमल ईन्वेस्टमेंट आहे.

@ नानाकळा, सचिन काळे, सोन्याची युटिलिटी कमी म्हणजे काय? >>> सोन्याची उपयुक्तता कमी असणे म्हणजे माझ्या दृष्टीने जीवनावश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये सोन्याचा क्रम खालचा असणे.

kodak कंपनी हा अ‍ॅसेट क्लास नाही. गोल्ड आणि ब्रॉड मार्केट ईक्विटी ईंडेक्स हे अ‍ॅसेट क्लासेस आहेत.

गळ्यात सोन्याची चैन जर लोखंडाच्या चैनीपेक्षा छान दिसत असेल तर लोकांनी सोन्याला कवटाळण्यात गैर काही नाहीये.
याऊपर सोन्याचा लोभी हे मी केवळ पैश्याचा लोभी या समानार्थानेच बघतो.

हाब यांच्याशी सहमत . Long run मध्ये सोनं इतकं चकाकत नसलं तरी ही निरु म्हणतात त्याप्रमाणे एकूण गुंतवणुकीच्या 8ते 10 टक्के सोनं ( दागिने नाही ) असायला हरकत नाही असं मला ही वाटत. सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत.

सोन्याचे दागिने बनवून मिरवायचे नाही, फक्त सोन्याचे तुकडे घेऊन बँकेत ते आपले आहेत या समाधानात पडून ठेवायचे , जर रिटर्न चांगले नसेल तर लॉजिक काय?

शेअर्स मधील गुंतवणूक जास्त फायदा देत असेलच.
पण सामान्य माणसाला जे थोडे फार पैसे असतात त्यातून सोने घेणे जास्त सोप्पे आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला जी माहिती, जे जजमेंट लागते ते सर्वसामान्य माणसाकडे असेलच असे नाही. म्युच्युअल फंड्स मुळे जर हे प्रकरण सोप्पे झाले असले तरी आमच्या सारख्यांना सोने, घर, जमीन हेच पर्याय सोप्पे आणि जास्त भरवशाचे वाटतात.

आज काल प्रमाणित सोने 1 तोळा, 5 ग्रॅम वगैरे मध्ये पण मिळते, एकदम 50 किंवा 100 ग्रॅम घ्यायचे म्हणजे खूप दिवस अतिशय संयमाने बचत करावी लागेल.

ऋन्मेष,
सोन्याची लिक्विडीटी जास्त आहे. चार पैसे हवे असतील तेव्हा सोने मोडून पटकन रोकडा रक्कम हातात येते. शिवाय नुसते पैसे FD करून किंवा बँक मध्ये राहिले तर चलनवाढी मुळे जास्त काही फायदा नाही. सोन्याचे भाव थोडे फार वाढतात.
दागिने न घेता वळी, नाणी वगैरे घेतले तर घडणावळी चे पैसे वाचतात. टॅक्स पण वाचतो बहुतेक.

सोने तुम्हाला हौस वायरायचे आहे ... हवे तेवढे खरेदी करा आणि वापरा, हौसेला मोल नाही.

तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची आहे ...
मग पायात चार-चार किलो सोन्याचे बुट घालून ऊसेन बोल्ट बरोबर १०० मी. रेस जिंकायची अपेक्षा ठेवणार्‍याला काय म्हणाल त्याच्यासाठीही एक शब्दं शोधून ठेवा.

https://www.youtube.com/watch?v=3mInSm0Ibi0

चांगली चर्चा. सर्व भाग घेणार्‍यांचे आभार.
माझी एक भाबडी शंका :
जो देश सोने उत्पादनात स्वयंपूर्ण असेल त्या नागरिकांनी हवे तेवढे सोने घ्यावे, हे पटते. पण, जर भारत तसा नाही तर मग आपले बहुमूल्य परकीय चलन हौसेखातर खर्च होणे बरोबर आहे का?

तुम्हीच सांगा घरबसल्या एका क्लिक वर S&P 500 SPIDER ETF चा स्टॉक खरेदीसाठी तयार बसलेल्या लाखो लोकांना तुम्हाला आधीच माहित असलेल्या किंमतीला विकणे आणि दुसर्या मिनिटिला खात्यात पैसे जमा होण्याला जास्तं लिक्विड म्हणतात की पारख करण्याची क्षमता नसतांना एखाद्या दुकानात जाऊन सोनार देईल तेवढे पैसे घेण्याला लिक्विड म्हणतात.

घरबसल्या एका क्लिक वर S&P 500 SPIDER ETF चा स्टॉक खरेदीसाठी तयार बसलेल्या लाखो लोकांना तुम्हाला आधीच माहित असलेल्या किंमतीला विकणे आणि दुसर्या मिनिटिला खात्यात पैसे जमा होण्याला

>> खूप त्रांगडं आहे त्यात दादा! खूप सिस्टीमॅटिक अ‍ॅप्रोच व वेळेची, बुद्धिची गुंतवणूक लागते त्यात. सोन्यात असे काही नसते. तिथे अगदी निरक्षर मनुष्यही सोन्याचे व्यवहार कोणत्याही कंप्युटर, इन्टरनेट, ज्ञानाशिवाय आरामात करु शकतो.

स्पेशल नोटः मी 'सोन्याचे दागिने' या प्रकाराचा कट्टर विरोधक आहे. तो म्हणजे राजरोस लुटीचा समाजमान्य प्रकार आहे.

नाना तुम्ही पुन्हा कालच्यासारखा 'मग गरीबानं काय करायचं' असा स्टँड घेत आहेत. Happy
माझ्या पोस्ट फक्तं ईथे लिहिणार्‍या आणि वाचणार्‍या लोकांना गृहीत धरून लिहिलेल्या असतात हो.
मायबोलीवर अकाऊंट ऊघडता येते, काँप्युटर ऑपरेट करता येतो, बँकेचे व्यवहार कळतात मग डी-मॅट ऑपरेट करणे काय अवघड असावे.

अगदी निरक्षर मनुष्यही सोन्याचे व्यवहार कोणत्याही कंप्युटर, इन्टरनेट, ज्ञानाशिवाय आरामात करु शकतो. >> अगदी निरक्षर मनुष्यही स्टॉक
ब्रोकरच्या एजंटला पकडून स्टॉक्स चे व्यवहार आरामात करू शकतो.

हाब, शेअर मार्केट चांगला पर्याय असेल पण सामान्य माणसाला त्यातलं किती कळतं? कोणता घ्यायचा ? कधी विकायचा? पोर्टफोलिओ कसा हवा??? किती तरी गोष्टी आहेत.
सोनं म्हणजे कसं अगदी सोप्पं. महिन्याला 2 ते 4 हजार पु ना गाडगीळ कडे भिशी मध्ये नाही तर एखाद्या बँक मध्ये RD मध्ये ठेवा. ते पैसे आले की त्यातून सोने घ्या. गरज लागले की विकून टाका. अजिबात जास्त डोकं लागत नाही.

शेअर मार्केट तुमच्या सारख्या हुशार आणि माहिती असलेल्या लोकांसाठी चांगले आहे, पण आमच्या सारख्या सामान्य लोकांना सोने, घर आणि फ्लॅट हे सोडून काय कळतं? आणि जे कळत नाही त्यात उगीच मेहनतीने कमावलेले पैसे घालून का आणि कशी जोखीम घ्यावी? कोणाच्या मार्गदर्शना खाली घ्यावी?

Pages