सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.
सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.
आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.
सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?
आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.
सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.
अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा Gold bonds मध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.
( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. त्यावर तज्ञांनी भाष्य केल्यास आनंद होईल).
*************************************
सोन्याचा दर 2000मध्ये 4400 ru
सोन्याचा दर 2000मध्ये 4400 ru होता आता एक लाखाच्या आसपास आहे >>> अतरंगी यांचे बरोबर आहे मग. या किंमती असल्या तर XIRR १३.३% येतो २०% नाही.
. या किंमती असल्या तर XIRR १३
. या किंमती असल्या तर XIRR १३.३% येतो २०% नाही.>>
विस्तृत पणे सांगाल का?? बहुतेक माझ्यासाठी नवीन आहे.
सोने ही काही वाईट गुंतवणूक
सोने ही काही वाईट गुंतवणूक नाही.
जर वळं, नाणी, बार घेतले तर making charges वाचतात व घट जास्त सोसावी लागत नाही. शिवाय सोन्यामधे स्टॅाक मार्केटपेक्षा चढ उतार कमी होतात. जर सोने physical form मधे असेल तर it is as good as cash. फक्त संभाळायचा त्रास/लॅाकरचा खर्च वाढतो.
टोटल पोर्टफोलिओच्या १५ते२०% रक्कम सोन्यामधे असावी असे मला वाटते.
SGB आता बंद करत आहेत नाहीतर ते बेस्ट आहे.
25 वर्षातील सोन्याचा परतावा
25 वर्षातील सोन्याचा परतावा अंदाजे 20%आहे तर शेअर बाजाराचा 15%. >>> परतावा .नाही Gain , % नाही गुणे पाहिजे.
परतावा म्हणजे त्यात इन्फ्लेशन रेट वगैरे लावून काय येत तो रेट वेगळा असावा. बघायला पाहिजे.
रुपये वाह!>> आय विश रुपये पण
रुपये वाह!>> आय विश रुपये पण नाही, ३०० डॉलर!
Gpld etf
Gold etf
Gold etf ना liquidity चा
Gold etf ना liquidity चा प्रॉब्लेम नाही येत का?
नाही. Listed on exchanges
नाही. Listed on exchanges
Gold ETF..
Gold ETF..
चांगला, सुरक्षित आणि flexible/ liquid पर्याय.
पण त्याला दरवर्षी खर्च येतो, शिवाय market linked असते.
सोन्याचा परतावा आणि etf छान परतावा ह्यात फरक असू शकतो.
सोने सामान्यत: मार्केट खाली घसरले की / तरी वर चढते.
****
डिजिटल गोल्ड - हा एक पर्याय मला अलीकडेच समजला...
त्यात साठवण्याची तरी जबाबदारी येत नाही.. पण पुन्हा caretaker / service offering मध्ये येतो.
-------
डॉलर/ मूल्य घसरणी च्या परिस्थितीत/ अस्थिर स्थितीत सोने / चांदी / crypto असे पर्याय ( ठराविक प्रमाणात/ जोखीम सांभाळून) संपत्ती जतन/ वृध्दी साठी उपयुक्त ठरतात..
माहितीपूर्ण चर्चा.
माहितीपूर्ण चर्चा.
वाचतोय. समजावून घेतोय
सोन्याच्या किमती वाढतच जातील.
सोन्याच्या किमती वाढतच जातील.. खालचा लेख ..
https://www.businessinsider.com/gold-price-prediction-david-einhorn-infl...
..
..
१६१८०० गोल्ड बावीसं कॅरेट
१६१८०० गोल्ड बावीसं कॅरेट
जुलै 2025मध्ये सोन्याने एक
एप्रिल 2025मध्ये सोन्याने एक लाखाचा टप्पा गाठला होता.
आता यंदा . . . दोन लाख ???
पहायचे
युद्ध वगैरे नाही झाले तर जरा
युद्ध वगैरे नाही झाले तर जरा खालीच जाईल की काय!
आज चांदी धडाधड कोसळली एका दिवसात २४% खाली आलीय.
सोने लाखाच्या वर गेले तेव्हा
सोने लाखाच्या वर गेले तेव्हा हा धागा शोधत होते.. मिळाला नव्हता.
आज आता 24ct सोन्याचा भाव 1,61,00 तोळे aahet.
वर गणित मंडळी आहेत त्यानुसार 16 वर्षात 11% पेक्षा जास्त रिटर्न मिळतात.
सोन्याचे भाव कायमच चढते असतील हा जसा गैरसमज आहे तसंच त्याचा दीर्घकाळासाठीचा ट्रेंड हा चढता आहे हेही कर आहे.
एखाद्याला गुंतवणुकीचा काही भाग म्हणून सोने, चांदी ह्यात पैसे घालायला हरकत नाही. अर्थात त्यात जोखीम ही आलीच.. पण गुंतवणूक त्यासाहितच होते.
दागिने , आवड, हौस वगैरे एक बाजूला त्यात घडणवळीचे पैसे जातात.
गुंतवणूक म्हणू. वळी , नाणी, बार हे physical done, किंवा ETF, fund , bond यातही त्याचा अभ्यास करून गुंतवता येतात.
पूर्वी भेसळ वगैरे होत असे. आता सर्टिफाइड असते..
गाड्या, महागडे फोन, कपडे यावरील खर्च म्हणे पैसे गेल्यात जमा पण सोन्याचा परतावा मिळतो.
चांदीचेही ते आहे.
आज चांदीचा भाव ३,९५,००० प्रति किलो आहे
वरील भावांमध्ये सतत होत
वरील भावांमध्ये सतत होत असलेल्या चढउताराची आर्थिक व आंतरराष्ट्रीय राजकीय कारणे इथे वाचली :
https://poonawallafincorp.com/blogs/gold-loan/why-is-the-gold-price-incr...
आज चांदीचा भाव ३,९५,००० प्रति
आज चांदीचा भाव ३,९५,००० प्रति किलो
आहेहोता.चढउतार होत असतात पण गेल्या दीड दोन महिन्यातली नेहमी प्रमाणे चढ-उतार नसुन प्रचंड वेगाने वर गेले भाव. सोने जवळपास दीडपट चांदी दुपटीच्यावर.
तेव्हा यंदा वाढ होऊन २ लाख पार करेल का याबाबत शंका आहे. कदाचित आताचा उच्चांक आहे त्यापेक्षा जरा खाली राहील.
ज्यांची जुनी गुंतवणूक आहे सोन्या, चांदीची ते तोट्यात जातील असे म्हणायचे नाहीय.
चांदीला औद्योगिक क्षेत्रातही
चांदीला औद्योगिक क्षेत्रातही मागणी आहे. फक्त एक असेट , गुंतवणुकीचा प्रकार किंवा प्रतिष्ठेसाठीच नाही.
मी गेल्या जानेवारीपासून गोल्ड ईटीएफमध्ये नेमाने गुंतवणू़क करीत आहे. पोर्टफो लियोचा दहा टक्के भाग सोन्यात असावा असं टारगेट होतं. परवाच्या उच्चांकी वाढीने ते लवकर साध्य झालं. कालच्या घसरणीमुळे आणखी एक महिना युनिट्स विकत घ्यावे लागतील एवढी गॅप पडली.
आता चांदी ईटीएफचा विचार करतोय.
आता वाव आहे. काल आपले NSE,
आता वाव आहे. काल आपले NSE, BSE बंद झाले त्यानंतर चांदी व सोने आणखी पडले आंतरराष्ट्रीय बाजारात.
मी तीन महिन्यांपासुन सिल्व्हरबीज घेतोय महिन्याला SIP करत. आणि मधल्या एका करेक्शनला थोडे आणखी घेतले.
कालच्या पडझडी नंतर ७% नफा आहे त्यात, पण नंतरच्या दिवसभराच्या आंतरराष्ट्रीय घसरणीने सोमवारी अजून थोडा कमी होईल.
पण थोडे अधिक घ्यायला वाव ही मळेल.
कालच्या सोन्या चांदीच्या भाव
कालच्या सोन्या चांदीच्या भाव पडण्याबद्दल अनेक अफवा पण बाजारात आल्या. ते पडण्याचे मुख्य कारण हे डोनाल्ड ट्रंप आणि फेड रिझर्व (अमेरिकन रिझर्व्ह बँक) यांच्यातल्या तणावामुळे झाले. फेड रिझर्वच्या गव्हर्नरना हटवण्याची धमकी ट्रंप यांनी दिल्याने लोकांनी उलट्या दिशेने रिअॅक्ट केले. त्यांनी डॉलर विकायचे सोडून सोने चांदी विकले. अर्थात यात काही लोकांचा नफा काढून घेऊन पुन्हा खालच्या भावाला विकण्याचा हेतूही होता. नेमक्या कशा पद्धतीने बातम्या फिरवून लोकांना सोने चांदीतली गुंतवणूक काढून घ्यायला मोटीव्हेट केलं हे लगेच समजणार नाही. हा जो दणका बसला त्याने १.५ ट्रिलियन चलन साफ झाल्याने ते उचललं तर गेलं पण पहिल्या इतके नाही. मार्केट वरच्या दिशेने क्लोज झाले असले तरी पुन्हा तो विश्वास यायला वेळ लागेल.
आमच्याकडे लग्न येवू घातले आहे
आमच्याकडे लग्न येवू घातले आहे. मात्र, आईबाबा व मला सोन्याची अजिबात आवड नसल्याने किंवा गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही आम्ही ते कधीही खरेदी केले नाही. दुर्दैवाने सोन्याच्या सध्या गगनाला भिडणाऱ्या किंमती बघून आता पश्चाताप होत आहे. लग्नात सोन्याचे नाममात्र दागिने बनवायलाही प्रचंड पैसा खर्च होणार आहे. खरंच सोन्याच्या किंमती काहीअंशी तरी कमी होण्याची काही शक्यता आहे का? तेवढाच भार कमी होईल.
राहुल
राहुल
खूप दिवसांनी तुमचा प्रतिसाद बघून आनंद वाटला
तुमच्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू लोक देऊ शकतील.
कार्यास शुभेच्छा !
राहूल, कार्य उत्ताम प्रकारे
राहूल, कार्य उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी शुभेच्छा!
२०२६ मधे सोन्याच्या किमतीत मोठा उतार-चढाव रहाणार. त्या शिवाय दागिन्यांचा विचार करायचा तर एकंदरीत महागाई म्हणूनही मेकिंग चार्जेस चढे असू शकतात. मेकिंग चार्जेससाठी शॉप अराउंड, थोडी घासाघीस, जरा साधे डिझाईन असेल तर कमी चार्ज वगैरे पर्याय आहेत.
समोरच्या पार्टीशी या बद्दल बोलून काही सोल्यूशन मिळते का बघा. तसेही लग्न करणार, फायनान्सेस मर्ज होणार तर त्या दृष्टीने प्रीमरायटल बोलणे अपेक्षित असतेच. कुणी सांगावे तुम्हाला आउट ऑफ बॉक्स उत्तर मिळेलही. आमच्याकडे नव्या पिढीने फिजिकल सोने काय वापरले जात नाही म्हणत अप्लायंसेस, भटकंतीसाठी पैसे, कार घ्यायच्या फंडात पैसे , घर डाऊन पेमेंट फंडात पैसे, पार्शल ट्युशन, म्युचुअल फंड वगैरे पर्याय ऐकवले.
सोने, चांदीच्या भावातील
सोने, चांदीच्या भावातील अस्थिरता कमी करण्यास चीनने चांदीच्या काही फंड्स वरील ट्रेडींग स्थगित केले.
अमेरिकेच्या शिकागो मर्कंटाइल एक्स्चेंजने सोन्याच्या डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवरील मार्जिन ३३ टक्क्यांनी व चांदीच्या डेरिव्हेटिव्ह ट्रेंडिंगवरील मार्जिन ३६ टक्क्यांनी वाढवली. याचा कितपत परिणाम होईल बघावे.
राहूल, कार्य उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी शुभेच्छा!>> + १
गुरुवारी आपल्याकडे २४ कॅरट (फिजिकल) सोन्याच्या भाव १,७७,००० होता आज १,६२,००० आहे. ( दागिन्यांसाठी कमी कॅरटचे सोने लागते सोना ऐकुन माहित आहे.) हे असेच एक निरिक्षण अस्थिरता किती आहे याबद्दल, यातुन काही सुचवायचे नाही. सोने - चांदी-दागिने विकत घेण्याचा माझा अनुभव शून्य आहे.
Pages