आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसा ये पैसा पैसा है कैसा
नही कोई ऐसा जैसा ये पैसा
के हो मुसीबत ना हो मुसीबत
हो मुसीबत ना हो मुसीबत
सात आठ नौ दस

फैली हुई है सपनों की बाहे
आजा चल दे कही दूर
वही मेरी मंझील वही तेरी राहे
आजा चल दे कही दूर

कोडं सुटल्यावर ज्यांनी हे गाणं ऐकलं नसेल त्यांनी जरुर ऐका, मोठ्या आवाजात.
मस्त गायन आणि संगीत.

बिंगो!

देजावू झाला. बहुतेक हे मी आधी दिलं होतं आणि तुम्ही की कृष्णांनी सोडवलं होतं.

देजावू झाला >> म्हणजे काय?>>> म्हणाजे अचानक हे आधी घडले आहे असे वाटणे.

शोधले..पहिल्याच धाग्यात शेवटल्या पानावर सापडले, हे कोडे मी दिले होते -माधव यांनी सोडवलेले.

मला या नव्या धाग्यावरचा ओ रे पिया सोडता एकही गाणं माहीत नाहीये Uhoh
मला पण द्या की चान्स एखादं गाणं द्यायचा..

ओ रे पिया हे गाणं ऐकायला एवढं अप्रतिम वाटतं ना.. सगळीकडे शांतता हवी, कानात हेड्फोन, त्यावर फुल आवाजात ओ रे पिया... डोळे मिटुन घ्यायचे आणि शब्द शब्द मनात साठवायचा..

असंच एक तमिळ साँग पण आहे "कण्गल इरंडाल" हे इतकं सुंदर गाणं पुनह होणं अशक्य आहे

१२७४ हिंदी
म म क क
ज क त प व ह
म म प क क
क म म, म स ह
अ म द द र, र र र
प प स अ र
क र श र
म र ब र
अ ब म ल स अ
क क म प स ल
......

संगीतपट अर्थात जुना
रागावर आधारीत
मराठी निर्माता, मराठी संगीतकार

व्ही शांताराम वसंत देसाई

मुरलि मनोहर कृष्ण कन्हैया
जमुना के तटपर विराजे है
मोर मुकुट पर कानों में कुंडल
कर में मुरलिया मुरलिया मुरलिया साजे है

झनक झनक पायल बाजे किंवा बैजु बावरा हे दोनच सिनेमे डोक्यात घोळत होते
ते पुढचा क्ल्यु दिल्यावर एकदम क्लिक झाले गाणे!

१२७५.

हिंदी

अ द स द म ल
अ द घ ब ल
अ र म ब अ ग ल ल

हे सोप्पय आता!

आ दिलसे दिल मिला लें
इस दिलमें घर बसा लें
ओ रसिया,मनबसिया,आज गले लगा ले

बरोब्बर!

ह्या गाण्यात आशाताईंनी अफलातून आवाज लावलाय!

१२७५.हिन्दी-अतिशय सोप्पे
द क भ क प,प क र स र

फ त ग क,क ज अ क
ज अ ह व ब ह
अ द क ब,अ ग ज प
ब य ह त प ह
द त क द र,प क र स र

१२७७.

हिंदी
ह.. न क ह अ क
न क ह अ क
अ अ ग अ स
न क ह अ क

सोप्पे हे देखिल!

या गाण्यात नुतन काय सुरेख दिसते>>

ह्याच गीता प्रमाणेच नुतन पेईंग गेस्ट मधील ओ निगाहें मस्ताना आणि दिल्ली का ठग मधील ये राते ये मौसम ह्या गाण्यांना केवळ अप्रतीम दिसते!

१२७८ हिंदी
ह द ह म ह द ह म
ग क म ह अ ब ह म
ह द ह म

१२७८:
हां दीवाना हूं मै हां दीवाना हूं मै
गम का मारा हुआ इक बेगाना हूं मै
हां दीवाना हूं मैं

हे गाणं माहीत नाहिये, गुगलून सापडलंय Happy

Pages