या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 May, 2017 - 13:08

आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ...

व्हॅल्यु अ‍ॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे

मला कबूल करायला जराही लाज वाटत नाही की तो मुलगा मी आहे. आणि त्याहून लाज तर मुळीच वाटत नाही की मला वरील शब्दाची स्पेलिंग खरेच येत नाही. माझे ईंग्रजी खरेच कच्चे आहे. मला असे टोमणे खायची सवय असल्याने मला वाईटही वाटत नाही. ही कोणाची तक्रारही नाही. करणार तरी कोणत्या तोण्डाने, ज्या मुलीवर मी आजच्या तारखेला सर्वाधिक प्रेम करतो ती देखील मला यावरून बरेचदा लागेल असे बोलते. अर्थात मला ते लागत नाही, पण एखाद्याच्या मनाला लागू शकते.

असो, मूळ प्रश्न हा आहे की या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

मुळात ईंग्रजी बोलणारयांकडे काय अशी महानता असते जी ती न जमणारयांकडे नसते.

पैसे कमावण्याचा किंबहुना आयुष्यात यशस्वी होण्याचा आणि ईंग्रजी भाषा जमण्याचा फारसा काही संबंध नसतो.

एखादी शुद्ध मराठी न बोलता येणारी व्यक्ती उद्योगपती असते आणि फाडफाड ईंग्रजी बोलणारे त्याच्या हाताखाली चाकरी करत असतात.

एखादा राजकारणातला नेता चक्क अक्षरशत्रू असतो म्हणून आपण त्याला हसतो पण त्याच्यातील नेतृत्वगुणामुळे मुत्सद्दीपणामुळे त्याने आपल्या चार पिढ्यांना न शिकता खाता येईल अशी सोय केलेली असते.

एखाद्या कलाकाराची खरी ताकद त्याच्या अंगातील कला असते त्याला या ईंग्रजी भाषेच्या कुबड्यांची जराही गरज पडत नाही.

मला आठवतेय, क्रिकेटमध्ये जेव्हा एखाद्या नवोदीत खेळाडूला सामनावीराचा किताब मिळायचा आणि त्याला ईंग्रजी बोलता यायचे नाही तेव्हा माझे मित्र त्याला हसायचे.. मी त्यांना हसायचो.. कारण तो खेळाडू आपल्या खेळावर मेहनत घेत तिथे आपल्या आयुष्यात यशस्वी झाला होता. आणि तुम्ही ईथे टीव्हीसमोर तंगड्या पसरून त्याला हसत बसला आहात.

अशी एक ना दोन शेकडो क्षेत्रातील लाखो उदाहरणे देता येतील. पण तरीही मला समजत नाही की आपल्याला ईंग्रजी म्हणजे काहीतरी भारी भाषा येतेय हा अहंकार नक्की येतो कुठून? याला कोण जबाबदार आहे? आपलीच समाजव्यवस्था की आणखी काही?

तळटीप - लेखात उल्लेखलेली तात्कालिक घटना एक उदाहरण म्हणून आहे. यात कोणाचीही तक्रार वा कोणावरही राग नाही. तर त्यावर चर्चा अपेक्षित नसून ती व्यापक व्हावी अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबूटिंबू, संस्कृतचे एक वेगळेच दुखणे आहे. कोणाला ती आली नाही तरी फरक पडत नाही तसे एखद्याला येते त्याचेही कोणाला कौतुक नसते.

सस्मित, अमितव +१

आज भी गिरना पडेगा >>> Rofl

मला ऋचे धागे इरिटेट करत नाहीत

मूळात ऋन्मेष यांचे भारंभार धागे काढणे हे कुणाला त्रासदायक ठरण्याचं कारण नाही. मागे इथे एकजण तडका म्हणून रोजच कवितांचा रतीब टाकत होते त्यांच्यापेक्षा तर ऋन्मेष यांचे धागे संख्येने कमीच आहेत.

पण तडकाकिंग आणि ऋन्मेष यांच्यात एक मुलभूत फरक असा की, तडकाकिंगनी कधी दुसर्‍याच्या धाग्यांची वाट लावली नाही. ऋन्मेष यांच्याकडून हे फार मोठ्या प्रमाणात घडताना दिसते. ताजे उदाहरण द्यायचे तर नानाकळा यांनी बाहुबलीवर काढलेला तंत्रज्ञानाची उकल करणारा मुद्देसुद धागा. या धाग्यावर ऋन्मेषनी नानाकळांना इतके जाम पकवले आहे की विचारता सोय नाही. त्यातून त्रास देण्याकरिता वापरली जाणारी भाषा अत्यंत साळसूद. कुठेही चिडणं नाही, त्रागा नाही, शिवीगाळ अरेरावी तर अजिबातच नाही. हे सगळं टाळून समोरच्याला चिडीला आणण्याचं अफलातून कसब ऋन्मेष यांच्याकडे आहे. यामुळे होतं काय की या आयडीची अ‍ॅडमीनकडे तक्रार करावी तरी कशी हाही अजुन एक त्रासदायक प्रश्न पीडिताला पडतो.

शिवाय जिथे या आयडीची चूक मुद्देसुदरीत्या दाखवून देण्यात आली आहे तिथे या आयडीने शिताफीने अशा प्रतिसादांना बगल दिल्याचे दिसून आले आहे. तेव्हा मग लोक या आयडीवरील आपला संताप अशा विविध प्रतिसादांद्वारे दाखवून देतात.

आपल्यावर इतके लोक संतापले आहेत हे पाहूनही हा आयडी इतका शांत कसा असा आश्चर्ययुक्त प्रश्न अनेकांना पडतो पण अनुभवांती असे ध्यानी आले आहे की अशा प्रकारे लोकांना संताप आणणे हाच तर या आयडीचा उद्देश असल्याने या आयडीच्या नावाने खडे फोडणारे प्रतिसाद पाहिल्यावर त्यास राग येण्याऐवजी मजा वाटणे स्वाभाविकच नाही का?

असो. तूर्तास तरी यावर काहीच ईलाज नाही. जे जे होईल ते ते पाहावे.

@ बिपीन चन्द्र हर +++११११११११११११११११११११११११११११११ अनुमोदन

ज्यांना ऋन्मेष ची भाषा त्रासदायक वाटते त्या लोकांना लिंबूटिंबू आयडीची भाषा मात्र योग्य वाटते हे कसे?
ऋन्मेष तर कुणाच्या गप्पांमधे जाऊन मुद्दामून भलतेसलते बोलून इतरांना चीड आणत नाही. आणि इतर धाग्यांवर जाऊन "मी बघा कसा त्यांना त्रास देऊन आलो" अशी फुशारकी सुध्दा मारत नाही. हे ज्या लोकांना चालते त्याच लोकांना ऋन्मेषचे प्रतिसाद का चालत नाही ?
चालायला तर दोन्ही नको.. पण एकाला एक न्याय दुसर्‍याला दुसरा असा भेदभाव का बरे ?

५) श्री ऋन्मेश हे कार्यालयीन वेळेत सहकर्मचार्‍यांशी संवाद साधताना, पत्रव्यवहार करताना, तक्रार नोंदवताना मराठी भाषा वापरतात का?
>>>>
कार्यालयीन कामकाजाची भाषा ईंग्लिश. अर्ध्या मायबोलीला ठाऊक आहे मी एमेनसीत कामाला आहे.
कामाव्यतीरीक्त एकूण एक गप्पा मराठीत. ज्याला मराठी येत नाही त्याच्याशी हिण्दीत. ज्याला दोन्ही येत नाही त्याच्याशी ईण्ग्रजीत. ज्याला तिन्ही येत नाही त्याच्याशी नजरेने आणि ईशारयांनीच बोलतो. एकदा एका रशियन मुलीचा मार खाता खाता वाचलोय. तो किस्सा वेगळ्या धाग्यात. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद Happy >>>>>>>>>>> वाट बघतेय Wink

>>>> ज्यांना ऋन्मेष ची भाषा त्रासदायक वाटते त्या लोकांना लिंबूटिंबू आयडीची भाषा मात्र योग्य वाटते हे कसे? <<<<
इथे या विषयाचा अन ओढुन ताणून माझे नाव घेण्याचा काय संबंध? Uhoh
( पण असो.... वाईटातून चांगले काढावे त्याप्रमाणे... Wink यामुळे एक तर बरे झालय, मा.पं.मोदी अन भाजप्ये तरी यांच्या टारगेटवरुन सुटले म्हणायचे.... Proud )

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 17 May, 2017 - 12:33
>>
अनुमोदन.
नेमक्या शब्दात ऋ या आयडीचा उद्देश सांगितलात.

ज्यांना ऋन्मेष ची भाषा त्रासदायक वाटते त्या लोकांना लिंबूटिंबू आयडीची भाषा मात्र योग्य वाटते हे कसे?
>>>
मी त्यांच्या पोस्टी ओलांडून जाते Proud
त्यांच्याशी पर्सनल दुष्मनी नाही पण मोठ्या पोस्टी वाचायला बोअर होतं मला

ऋच्या पण पोस्टी ओलांडते मी Proud

बिपिनचंद्र - bang on!

सस्मित - मानव आणि इतर - वर अमित ला रिप्लाय दिलाय. तोच तुम्हालाही. टीपापाच नाव काढलयत तर सांगते. तिथे कधी चालू असणाऱ्या चर्चा - लिंक्स आवडतात मला. बाकी मला इर्रिलेवंट वाटणारं टाळून ते वाचते मी.

इंग्लिश बद्दल अनुमोदन रुन्मेश. मला हे मानसिक गुलामगिरी न संपल्याच लक्षण वाटतं. एक जागतिक भाषा म्हणून इंग्लिश च महत्त्व नक्कीच आहे. पण इंग्लिश म्हणजे शहाणपण - इंग्लिश म्हणजे हुशारी हे गैरसमज फार मोठ्या प्रमाणावर इंग्लिश येणाऱ्या आणि न येणाऱ्या दोन्ही गटात दिसतात.

रीया, हेच म्हणायचे होते मला. जरी तो दुसर्‍यांचा धागा हायजॅक करायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पोस्टी ओलांडून गेलो तर तो काय स्वतःच्याच प्रतिसादाला उत्तरे देत राहिल काय? Happy

लिंबूटिंबू आणि ऋन्मेष या दोन्ही आयडींची तूलना अस्थानी आहे. मायबोलीवर दोन भिन्न मतप्रवाह आहेत आणि दोन्ही गटांत आग्रही आणि आक्रमक लोक आहेत जे आपला अजेण्डा राबविताना संबंधित धाग्यावर न चुकता प्रतिसाद देतात.

लिंबूटिंबू यांनी त्यापैकी एका गटातली विचारसरणी स्वीकारली आहे आणि ते तिचा आग्रही प्रचार आणि प्रसार करतात हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या विरोधी गटातले लोक तर नुसते आग्रही नसून आक्रमक देखील आहेत आणि तेही प्रत्येक ठिकाणी आपल्या विचारसरणीचा आक्रमक, अनावश्यक (जसा की आता या धाग्यावर लिंबूटिंबू यांचा उल्लेख केला गेला आहे) आणि कित्येकदा फारच खालच्या पातळीवर येऊन प्रसार आणि प्रचार करतात. असो.

ऋन्मेष तर या दोन्ही गटांत नाही आणि त्यामुळे या दोन विचारसरणीव्यतिरिक्तही इतर अनेक धाग्यांवरही या आयडीचे स्वच्छंदपणे बागडत धुमाकूळ घालणे चालूच असते.

त्यांच्या विरोधात ? जर एखादा आयडी मुद्दामुन त्रास देत असेल तर त्याच्या विरुध्द लोक जाणारच. म्हणून म्हणालो की ऋन्मेश त्यांच्यासारखा नाही त्यामुळे रुन्मेश चा त्रास होणे हे चुकीचे आहे. लिंबूचा त्रास होणे हे बरोबर आहे. कारण तो त्रास मुद्दामुन देतो.

http://www.maayboli.com/node/62603#new या धाग्यावरचा

{{{ बाबरी मशिद की वादग्रस्त ढाचा की काय ते पाडले तेंव्हा कोण कटाप्पा होते? वाजपेयी की नरसिंहराव? आणि २००२ साली गुजरात दंगल की प्रतिक्रिया की काय ते झाले तेंव्हा?
नवीन Submitted by आगाऊ on 17 May, 2017 - 12:26}}} हा प्रतिसाद

कसा वाटतो?

त्रासदायक आहे का? हा प्रतिसाद जर त्रासदायक नसेल तर लिंबूटिंबू यांचे प्रतिसाद तर यामानाने फारच सौम्य असतात.

असो तुम्हाला ऋन्मेषचा त्रास होत नसेल आणि लिंबूटिंबू यांचा त्रास होत असेल तर तुमचे वैयक्तिक मत आहे. आमचे मत तुमच्यापेक्षा वेगळे आहे. आम्ही वेगळ्या मताचा मान राखतो. तुम्हीही तसे करता आले तर पाहा.

भेदभाव कंपुगिरी करणार्‍यांचा मान आम्ही ठेवत नाही. जमत नाही. आगाउ यांचा प्रतिसाद त्या धाग्याला अनुरुप आहे. तो प्रतिसाद कुठल्या गप्पांच्यापानावर मुद्दामुन टाकलेला नाही. इतके ही समजू नये ? अर्थात कंपुगिरी करणार्‍यांना ते समजणार नाही.

तुम्ही दोघं प्लिज दुसर्‍या धाग्यांवर जाऊन बोला

या धाग्याचा विषय लिंबूदा दोषी आहेत की नाही हा नाहीये आणि धागाकर्ताही लिंबुदा नाहीयेत त्यामुळे त्यांच्यावर चर्चा उगाच आहे इथे

{{{ प्रतिसाद कुठल्या गप्पांच्यापानावर मुद्दामुन टाकलेला नाही. इतके ही समजू नये ? अर्थात कंपुगिरी करणार्‍यांना ते समजणार नाही. }}}

गप्पांच्या कुठल्याही धाग्यावर मी कधीही नसतो (असल्यास दाखवून द्यावे). सबब, कंपूबाजीचा आरोप फुकाचा आहे.

रीया,

लिंबूटिंबू यांचा उल्लेख या धाग्यावर मी केलेला नाही. मी ज्याचा त्रासाचे स्पष्टीकरण दिलेय त्याच आयडीने हा धागा काढलाय. मला अमक्याचा त्रास होतोय तर तम्क्याचा का होत नाही हा प्रश्नच अनाठायी नाही का?

तुम्ही पोस्टी ओलांडू शकता.

>>> म्हणून म्हणालो की ऋन्मेश त्यांच्यासारखा नाही त्यामुळे रुन्मेश चा त्रास होणे हे चुकीचे आहे. लिंबूचा त्रास होणे हे बरोबर आहे. कारण तो त्रास मुद्दामुन देतो. <<<<
या माझ्या आयडीच्या सततच्या खोडसाळ उल्लेखावरुन, ऋन्मेष, मला अशी दाट शंका येत्ये आहे की तुमचा/तुमच्या धाग्यांचा वाढता टीआरपी न बघवुन तो कमी करण्याचे हे कारस्थान आहे, ... Proud अन मी त्यात सामिल नाहीये हे सांगणे न लगे. Happy

>>>> ऋन्मेश त्यांच्यासारखा नाही त्यामुळे रुन्मेश चा त्रास होणे हे चुकीचे आहे. <<<<
यावरुन हे देखिल सिद्ध होते आहे की हे म्हणजे "बाबारेऽऽ म्हणत म्हणत बिब्ब्याचे पट्टे ओढण्यासारखे आहे".... ! Proud बिब्ब्यापासुन आयमीन, बिब्ब्यांच्या पट्ट्यापासुन सावधान ! Happy

इन फॅक्ट, हे दुसरे तिसरे काहीही नसुन निव्वळ "ट्रोलिंग" आहे, मी जिथे जिथे ज्या वर्दळीच्या धाग्यावर लिहिन, तिथे तिथे ही गजोधर नावाची आयडी येऊन माझ्याविरुद्ध वातावरण निर्मितीचा सातत्याने प्रयत्न करीत आहे.

बरोबर आरोप आहे. ऋन्मेश यांचे प्रतिसाद जर त्रास देत असतील तर त्याच प्रमाणे लिंबु यांचे सुध्दा प्रतिसाद त्रासदायक ठरावेत.
परंतू ऋन्मेष कुठल्याही कंपुचा नसल्याने त्याला इतरजण कंपू बनवून मुद्दामुन त्रास देत आहे हे दिसून येते.

हा प्रश्नच अनाठायी नाही का? >> मग इतर धाग्यावरचा अनुरूप प्रतिसाद देण्याचे प्रयोजन काय ? ते विचारणे अनाठायी कसे नाही?

ऋन्मेष ची त्रास देण्याची पद्धत फार वेगळी आहे.
आपण ऋन्मेषला विचारलं किती वाजले ?कि तो म्हणणार आज सोमवार आहे आणि त्याने दिलेलं उत्तरच आपल्या प्रश्नच योग्य उत्तर आहे हे आपल्याला पटवून द्यायला बघणार त्यासाठी कसलेही तर्क लढवणार
सरळ सरळ भांडणारे लोक परवडतात पण हे गोड बोलून पिडणारे नाही

सरळ सरळ भांडणारे लोक परवडतात पण हे गोड बोलून पिडणारे नाही >>> +११११ लिंब्या तेच करतो गोड बोलून अक्षरश: पिडतो वर बघा कसे त्यांना पिडले हे शौर्य इतर धाग्यांवर जाऊन इतर आयडींसमोर मांडतो.

गजोधर तुम्ही नेमकं काय करताय?
- लिंबुदांना टारगेट - मग ऋन्मेषच्या आडून कशाला?
- ऋन्मेषला सपोर्ट - लिंबुदांच्या आडून कशाला?
- टाईमपास - मग ठिकेय.. दुसरा चांगला विषय घ्या ना प्लिज म्हणजे मला पण टिपी करता येईल

एक पर्याय निवडा

गजोधर तुम्ही नेमकं काय करताय?
- लिंबुदांना टारगेट - मग ऋन्मेषच्या आडून कशाला?
- ऋन्मेषला सपोर्ट - लिंबुदांच्या आडून कशाला?
++११११

Pages