या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 May, 2017 - 13:08

आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ...

व्हॅल्यु अ‍ॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे

मला कबूल करायला जराही लाज वाटत नाही की तो मुलगा मी आहे. आणि त्याहून लाज तर मुळीच वाटत नाही की मला वरील शब्दाची स्पेलिंग खरेच येत नाही. माझे ईंग्रजी खरेच कच्चे आहे. मला असे टोमणे खायची सवय असल्याने मला वाईटही वाटत नाही. ही कोणाची तक्रारही नाही. करणार तरी कोणत्या तोण्डाने, ज्या मुलीवर मी आजच्या तारखेला सर्वाधिक प्रेम करतो ती देखील मला यावरून बरेचदा लागेल असे बोलते. अर्थात मला ते लागत नाही, पण एखाद्याच्या मनाला लागू शकते.

असो, मूळ प्रश्न हा आहे की या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

मुळात ईंग्रजी बोलणारयांकडे काय अशी महानता असते जी ती न जमणारयांकडे नसते.

पैसे कमावण्याचा किंबहुना आयुष्यात यशस्वी होण्याचा आणि ईंग्रजी भाषा जमण्याचा फारसा काही संबंध नसतो.

एखादी शुद्ध मराठी न बोलता येणारी व्यक्ती उद्योगपती असते आणि फाडफाड ईंग्रजी बोलणारे त्याच्या हाताखाली चाकरी करत असतात.

एखादा राजकारणातला नेता चक्क अक्षरशत्रू असतो म्हणून आपण त्याला हसतो पण त्याच्यातील नेतृत्वगुणामुळे मुत्सद्दीपणामुळे त्याने आपल्या चार पिढ्यांना न शिकता खाता येईल अशी सोय केलेली असते.

एखाद्या कलाकाराची खरी ताकद त्याच्या अंगातील कला असते त्याला या ईंग्रजी भाषेच्या कुबड्यांची जराही गरज पडत नाही.

मला आठवतेय, क्रिकेटमध्ये जेव्हा एखाद्या नवोदीत खेळाडूला सामनावीराचा किताब मिळायचा आणि त्याला ईंग्रजी बोलता यायचे नाही तेव्हा माझे मित्र त्याला हसायचे.. मी त्यांना हसायचो.. कारण तो खेळाडू आपल्या खेळावर मेहनत घेत तिथे आपल्या आयुष्यात यशस्वी झाला होता. आणि तुम्ही ईथे टीव्हीसमोर तंगड्या पसरून त्याला हसत बसला आहात.

अशी एक ना दोन शेकडो क्षेत्रातील लाखो उदाहरणे देता येतील. पण तरीही मला समजत नाही की आपल्याला ईंग्रजी म्हणजे काहीतरी भारी भाषा येतेय हा अहंकार नक्की येतो कुठून? याला कोण जबाबदार आहे? आपलीच समाजव्यवस्था की आणखी काही?

तळटीप - लेखात उल्लेखलेली तात्कालिक घटना एक उदाहरण म्हणून आहे. यात कोणाचीही तक्रार वा कोणावरही राग नाही. तर त्यावर चर्चा अपेक्षित नसून ती व्यापक व्हावी अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्र ऋन्म्या,

या देशात वापरल्या जाणार्‍या विंग्रजीला हिंग्लिश/ टिंग्लिश (तमिल विथ इंग्लिश) अशा जागतिक 'रेकग्निशन'वाल्या आवृत्यानी सन्मानित केलं गेलेलं आहे.
खिल्ली उडवणार्‍याला ही अ‍ॅक्सेंटयुक्त ब्रिटिश किंवा अमेरिकन इत्यादि इंग्रजी बोलता येतच असेल असे नाही.
तेव्हा जौद्या.

आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ...
मनात आलेला प्रतेक प्रश्न माय्बोलीवर टाकलाच पाहीजे का?
मला कबूल करायला जराही लाज वाटत नाही की तो मुलगा मी आहे.

टेम्प्लेट तय्यार. नेकी ऑर... होऊन जाउद्या.

खिल्ली उडवणार्‍याला ही अ‍ॅक्सेंटयुक्त ब्रिटिश किंवा अमेरिकन इत्यादि इंग्रजी बोलता येतच असेल असे नाही.
>>>><

त्यांना नक्कीच माझ्यापेक्षा चांगली येत असणार. त्यांच्या या ज्ञानाचा आदरही आहे. पण न येणारयाची खिल्ली उडवण्यामागे नक्की काय कारण असते, हा विचार नक्की मनात कसा येतो हे जाणून घ्यायचेय.

म्हणजे समजा तुम्ही एक उत्कृष्ट गायक आहात. अगदी गरीबांचे सोनू निगम आहात. म्हणून तुम्ही बसस्टॉपवर मजेत शीळ घालत गाणे गाणारयाला काय रे किती बेसूरा गातोस तू म्हणून उगाचच बोलून दाखवणार नाहीत. ईंग्रजी भाषेबाबत मात्र हे घडते. असे का?

आरारा ओके. जे खरेच ग्रेट असतात त्यांच्याकडे एक विनम्रताही आपसूक येते हा मुद्दा आहे आपला. ते मान्य.

हे बघ ऋन्मेष प्रत्येकात काहीतरी मायनस पॉँईट हा असतो..
तुझ्याकडे दोन पर्याय आहेत एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून दे
नाहीतर मग इंग्रजी शिकून जी व्यक्ती तुला ते बोलली त्याला fluently बोलून दाखव..

मी स्वतः मराठी माध्यमची..ssc result नंतर विज्ञान शाखेत तुझा (मराठीत शिकल्याने आणि मुलगी आहे म्हणून) टिकाव लागणार नाही, असे special टोमणे ऐकायला मिळाले..
म्हणून जिद्द वाढवली आणि HSC ला चांगला स्कोर करून मुद्दाम त्याच लोकांना आधी पेढे वाटले..
{अवांतर झालं सॉरी}
पण मुद्दा हा एकतर तु शिक, नाहीतर मग अस कोण बोलले की दुर्लक्ष कर ..
आणि सध्याच्या जगात इंग्रजी शिवाय चालत नाही ही परिस्थिती आहे...

याला कोण जबाबदार आहे? आपलीच समाजव्यवस्था की आणखी काही?>>
आपणच..

कऊ शिकलोय की
नावाजलेल्या विद्यापीठातल्या नावाजलेल्या महाविद्यालयातून ईंजिनीअरींगची पदवी मिळवत एका एमेनसी कंपनीत कामाला लागत गोरया लोकांशी रोज ईंग्लिशमध्येच बोलत आणि ईंग्लिशमध्येच मेल लिहीत काम करतोय हे पुरेसे नाही का?
तरी मला हे ऐकावे लागते तर ज्यांना काहीच येत नाही त्यांची स्थिती काय असेल हा विचार करा. त्या लोकांना तर या देशात राहायलाच नको

तुला वाटतं का रे तु अस बोलून, धागा काढून
परिस्थिती बदलणार आहे??
काही वर्षानंतर तर मराठी मिडीयम बंद पडेल बघ
असो विपु बघ जरा..
उगाच या एका गोष्टीचा विचार करत बसू नको

है शाब्बास! मलाही तो प्रतिसाद खटकलाच होता.
तु काही प्रतिसादात लिहिशीलच असं वाटलेलं पण तु तर एक आख्खा धागा काढलास.
जियो.
आंतरजालावरील आभासी जगात कुणाविषयीही काहीही गेस करणं /ठाम /नेगेटीव्ह मत बनवणं/ खिल्ली उडवण्म नक्की कशाचं लक्षण आहे?

इरफान खानच आगामी चित्रपट येतोय - हिंदी मिडीयम. त्याचं प्रमोशन करण्याकरिता हा धागा काढलेला दिसतोय.

व्हॅल्यु अ‍ॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे>>>> हे तुला जे कोणी म्हणाले,,त्याचा त्रिवार निषेध.
तु जर असे धागे काढु लागला,, तर कोणाला तुला बोलायची पण सोय नाही राहणार रे.

इरफान खानच आगामी चित्रपट येतोय - हिंदी मिडीयम. त्याचं प्रमोशन करण्याकरिता हा धागा काढलेला दिसतोय.
>>>>
नाही.
तो चित्रपट आल्यावर मी पुन्हा काढणार.

तु जर असे धागे काढु लागला,, तर कोणाला तुला बोलायची पण सोय नाही राहणार रे.
>>>>>
हो. ही रिस्क मी उचललीय. म्हणजे या भितीने लोकं मला बोलायचे बंद झाले तर माझे निम्मे माबो मनोरंजन बंद होईल.
पण हा विषय खरेच माझ्याशी निगडीत आणि जिव्हाळ्याचा आहे आणि ईथे खरेच विषयाला अनुसरून चर्चा अपेक्षित आहे.

ऋ, 'तो' प्रतिसाद मलाही आवडला नव्हता. तुला तर माझ्यापेक्षा नक्कीच जास्त इंग्रजी कळतेय. जर तुला असे कमेंट्स येतात तर मला कायकाय येतील.
मराठी साईटवर मी यासाठीच आली आहे कारण इथे माझ्या इंग्रजीची लायकी निघणार नाही. Proud
तो प्रतिसाद नक्कीच पुर्वग्रहदुषित मनाने लिहला असावा याला कारण तुझे भारंभार निघणारे धागे.
पण तरीही मला कळत नाही की जर कोणाला तुझे सतत नवीन धागे काढणे आवडत नाही तर ते उघडून बघण्याचे कष्ट का घेतात आणि जरी बघितले तरी त्यावर प्रतिसाद देऊन तुझा TRP का वाढवतात.
मी तुझे सगळेच धागे वाचते, जे आवडेल त्याला कधीकधी प्रतिसादही देते आणि जे नाही पटत त्याला इग्नोर मारते. Proud

इंग्रजी न येणे हा निश्चितच खिल्ली उडविण्याचा विषय नाही. पण भारतात लोक एकमेकांना ह्या विषयावरून जज करतात. तेच परदेशात जेथे नेटिव्ह भाषा इंग्रजी आहे तेथे चुकीचे इंग्रजी बोलले तरीही कोणीही हसत नाही. उलट जमेल तेवढी मदत करतात.

ह्या धाग्यावरून एक प्रसंग आठवला. मी एकदा पुण्याला कोणत्या तरी मॉलमध्ये गेले होते तिथे मला काही मदत हवी होती म्हणून मी तेथील स्टाफला मराठीत विचारले. तो मला इंग्रजीत उत्तर द्यायला लागला म्हणून मी त्याला मराठीत बोलायची विनंती केली. माणूस मराठी होता हे त्याच्या नेमप्लेट वरून सहज कळत होते. तर त्याने मला सांगितले की "आम्हाला मराठीत बोलायला मनाई आहे. फक्त इंग्रजीत बोलायला परवानगी आहे". म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत ते खर्च करायची तुमची तयारी आहे पण तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून तुम्ही आमचे व्हॅल्यूड कस्टमर नाही. आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. आहे की नाही मज्जा Wink

कोणता मॉल आहे?
मला सगळे तपशील माहिती नाहीत, तरी तुम्ही मॉल व्यवस्थापनाकडे तक्रार करायला हवी होती असे वाटले.

कोणता मॉल आहे? >>> नक्की आठवत नाही. बरीच वर्षे झाली ह्या घटनेला. बंडगार्डन जवळ पुणे सिटी का काहीतरी मॉल आहे तिथे असावे.
तरी तुम्ही मॉल व्यवस्थापनाकडे तक्रार करायला हवी होती असे वाटले. >>> खरेच करायला हवी होती. पण तेव्हा सुचले नाही.

पुण्यातल्या मॉलम्धे असं व्हावं हे आश्चर्य आहे.
मुंबैत असा अनुभव आला नाही कधी. एखाद्याला मराठी येत नसेल तर तो हिंदीत वैगेरे बोलतो. नैतर मराठी समजत असेल तर तोडक्या मोडक्या मराठीत उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. मग ते ऐकुन आपणच हिंदीत सुरु करतो Happy किंवा कुणी मराठी सेलसमन/ गर्ल असेल तर त्याला/तिला सांगतात अटेंड करायला. आम्ही इंग्रजीच बोलणार असं दिसलं नाहीये कधीच.

आर ऐसे बोला कोन हमरे रुन्मेषभौ को... कोई तो बाटा दो ऊस हैवन का नाम..

आणि पुण्यात फक्त इंग्लीश वाला माल? तुलशीबाग तर नाही ना Happy

काही हॉटेल्स मध्ये असे आहे.
याचे मूळ 'वी एंटरटेन ओन्ली अ सर्टन क्लास ऑफ पीपल' आणि 'इन्ग्लिश इज सिम्बोल ओफ हाय क्लास' या दोन जोडलेल्या गैरसमजात आहे.
इन्ग्लिश बोलायला अलाउड नाही असे स्पष्ट सांगितले नाही तरी मराठीतून विचारलेल्या प्रश्नांना कटाक्षाने इंग्लिशमध्ये उत्तरं देणे.आणि दुकान तसा मोठा ब्रँड नसून एकदमच चिटकू पिटकू होतं.
या लोकांना आपला आग्रह चालू ठेवू द्यावा.आपण दुसर्‍या वेलकमिंग दुकानात जावं.इंग्लिश बोलू शकणार्‍या आम्हा मध्यमवर्गीयांपेक्षा कितीतरि श्रीमंत,डस्टर किंवा क्रेटा कॅश टाकून घेणारा असा एक मराठी व्यापारी, शेतकरी वर्ग आहे त्यांचं गिर्‍हाईक या लोकांनी गमावलंय.

मध्यमवर्गीयांपेक्षा कितीतरि श्रीमंत,डस्टर किंवा क्रेटा कॅश टाकून घेणारा असा एक मराठी व्यापारी, शेतकरी वर्ग आहे त्यांचं गिर्‍हाईक या लोकांनी गमावलंय. >>> प्रचंड अनुमोदन.

'इन्ग्लिश इज सिम्बोल ओफ हाय क्लास >>> हे इंग्रजांची मानसिक गुलामगिरी करत असल्याचेच लक्षण आहे.

वाह! माझ्या प्रतिसादाला हवं तसं वळण देऊन त्याला इंग्रजी येत नसल्याचा जो काही फाटा फोडला आहे ते पाहून हसावं की रडावं तेच कळत नाहिये.
एखाद्याला एखाद्या गोष्टीची व्याख्या किंवा स्पेलिंग तरी माहित आहे की नाही असं जेव्हा म्हट्लं जातं तेव्हा त्या शब्दांचा योग्य अर्थ (रोजच्या जीवनात त्या गोष्टीचा वापर कसा करायचा किंवा अंगवळणी कसा पाडायचा हे तरी त्याला माहित आहे की नाही असा त्याचा अर्थ होतो, जरी शब्द प्रथम दर्शनी इंग्रजीच्या ज्ञानावर शंका घेत असले तरिही. ) कारण प्रथम आपण तो शब्द कसा लिहायचा ते शिकतो, मग त्याचा अर्थ आणि मग त्याचे आयुष्यातले अवलंबन.
त्यामुळे जेव्हा मी तो प्रतिसाद दिला तो तुझ्या इंग्रजी च्या ज्ञानावर शंका घेणारा नव्हता. (हे तुला दुर्दैवाने समजलं नाही)
समजुतीच्या मर्यादा.

इतर लोकांनी सुद्धा ज्यांनी माझा प्रतिसाद आवडला नसल्याचं लिहिलं आहे त्यांनी सुद्धा तो तुझ्याच नजरेतून वाचलेला दिसतोय.

* अजून कुणितरी लिहिलंय की तुझे धागे आवडत नाहीत तर वाचतात आणि टिआर्पी कशाला वाढवतात? त्यांना मी सांगू ईच्छिते की मी हा जो काही वरिल प्रतिसाद दिला आहे तो आशुचॅंप च्या धाग्यावर दिला आहे. तुझ्या धाग्यावर येऊन मी कधीही माझा वेळ वाया घालवत नाही. काल कुणितरी मला तु माझ्या वक्तव्यावर धागा उघडल्याचं सांगितलं तेव्हा कळलं की तुझ्या या धाग्याला काय 'अर्थ' आहे ते.

ऋन्मेष माझं तुझ्याशी वैयक्तिक असं काहीही वैर नाही, पण प्रामाणिक पणे सांगू इच्छिते की तुझ्या भारंभार धागे काढण्याला काही मर्यादा नाही आणि त्यातून त्यांना दर्जा नसतो. (हे माझं वैयक्तिक मत आहे) ज्यांना त्यात टाईमपास दिसतो, मनोरंजन मूल्य दिसतात त्यांनी ती जरूर जपावीत आणि त्याचा आनंद घ्यावा माझे काही म्हणणे नाही. पण तुझ्यामुळे अनेक चांगले लिहिते लोक इथे येणं आता टाळू लागले आहेत.

मुद्दा हा एकतर तु शिक, नाहीतर मग अस कोण बोलले की दुर्लक्ष कर ..
आणि सध्याच्या जगात इंग्रजी शिवाय चालत नाही ही परिस्थिती आहे...
याला कोण जबाबदार आहे? आपलीच समाजव्यवस्था की आणखी काही?>>
आपणच.....>>>>हे पटतंय ...!!!

पण तुझ्यामुळे अनेक चांगले लिहिते लोक इथे येणं आता टाळू लागले आहेत.>>> हे का बुवा?? Uhoh या 'चांगले लिहित्या' लोकांनी असं कुठे कारण वगैरे दिलंय का, की ऋन्मेष मायबोलीवर लिहितो म्हणुन आम्ही लिहिणार नाही ?

Pages