या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 May, 2017 - 13:08

आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ...

व्हॅल्यु अ‍ॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे

मला कबूल करायला जराही लाज वाटत नाही की तो मुलगा मी आहे. आणि त्याहून लाज तर मुळीच वाटत नाही की मला वरील शब्दाची स्पेलिंग खरेच येत नाही. माझे ईंग्रजी खरेच कच्चे आहे. मला असे टोमणे खायची सवय असल्याने मला वाईटही वाटत नाही. ही कोणाची तक्रारही नाही. करणार तरी कोणत्या तोण्डाने, ज्या मुलीवर मी आजच्या तारखेला सर्वाधिक प्रेम करतो ती देखील मला यावरून बरेचदा लागेल असे बोलते. अर्थात मला ते लागत नाही, पण एखाद्याच्या मनाला लागू शकते.

असो, मूळ प्रश्न हा आहे की या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

मुळात ईंग्रजी बोलणारयांकडे काय अशी महानता असते जी ती न जमणारयांकडे नसते.

पैसे कमावण्याचा किंबहुना आयुष्यात यशस्वी होण्याचा आणि ईंग्रजी भाषा जमण्याचा फारसा काही संबंध नसतो.

एखादी शुद्ध मराठी न बोलता येणारी व्यक्ती उद्योगपती असते आणि फाडफाड ईंग्रजी बोलणारे त्याच्या हाताखाली चाकरी करत असतात.

एखादा राजकारणातला नेता चक्क अक्षरशत्रू असतो म्हणून आपण त्याला हसतो पण त्याच्यातील नेतृत्वगुणामुळे मुत्सद्दीपणामुळे त्याने आपल्या चार पिढ्यांना न शिकता खाता येईल अशी सोय केलेली असते.

एखाद्या कलाकाराची खरी ताकद त्याच्या अंगातील कला असते त्याला या ईंग्रजी भाषेच्या कुबड्यांची जराही गरज पडत नाही.

मला आठवतेय, क्रिकेटमध्ये जेव्हा एखाद्या नवोदीत खेळाडूला सामनावीराचा किताब मिळायचा आणि त्याला ईंग्रजी बोलता यायचे नाही तेव्हा माझे मित्र त्याला हसायचे.. मी त्यांना हसायचो.. कारण तो खेळाडू आपल्या खेळावर मेहनत घेत तिथे आपल्या आयुष्यात यशस्वी झाला होता. आणि तुम्ही ईथे टीव्हीसमोर तंगड्या पसरून त्याला हसत बसला आहात.

अशी एक ना दोन शेकडो क्षेत्रातील लाखो उदाहरणे देता येतील. पण तरीही मला समजत नाही की आपल्याला ईंग्रजी म्हणजे काहीतरी भारी भाषा येतेय हा अहंकार नक्की येतो कुठून? याला कोण जबाबदार आहे? आपलीच समाजव्यवस्था की आणखी काही?

तळटीप - लेखात उल्लेखलेली तात्कालिक घटना एक उदाहरण म्हणून आहे. यात कोणाचीही तक्रार वा कोणावरही राग नाही. तर त्यावर चर्चा अपेक्षित नसून ती व्यापक व्हावी अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुलाच नाही काही मलाही ईण्ग्लिश येते म्हटले हे समोरच्याला दाखवून देणे एवढे गरजेचे का वाटते.
>>
हा तुझा समज झाला Uhoh

कदाचित तुला हीच भाषा कळते तर घे यातच उत्तर असंही आसू शकतंच की

रीया त्यात तुझ्या छोटे मोठे असण्याचा संबंध नाही. आपण कसेही असलो तरी एखाद्या व्यक्तीला ओलांडताच त्याची ऊंची वाढत नाही. अर्थात यावर एक उपाय देखील आहे. पुन्हा विरुद्ध दिशेने ओलांडून जायचे.

कदाचित तुला हीच भाषा कळते तर घे यातच उत्तर असंही आसू शकतंच की
>>>
पण कोण आपल्याशी वाईट वागलं तर आपण त्याच्याशी का वाईट वागायच Happy

मला ते एकदा टक्कर लागली पुन्हा टक्कार मारायची असं काही तरी होत. ते आठवलं. नैतर शिंग येतील असं म्हणायचो आम्ही Happy

स्मिता +१
एक बोमेरिल्लू नावाचा भयंकर गोड तेलुगु सिनेमा आहे त्यात पण आहे हे (त्यात प्रभास नाहीये पण सिद्धार्थ पण गोडुच आहे)

नैतर शिंग येतील असं म्हणायचो आम्ही 
>>>
काही लोकांमध्ये टक्कर झाली की थुंकायचे अशी घाणेरडी प्रथाही पाहिलीय

बरं हे सांगा की ज्या कोणी रुमण्याची इंग्लिश स्पेल्लिंग वरून खिल्ली उडवली....माफी मागितली का..
रुंमेश माफ करून टाक रे...

नक्की आठवत नाही. बरीच वर्षे झाली ह्या घटनेला. बंडगार्डन जवळ पुणे सिटी का काहीतरी मॉल आहे तिथे असावे.>>>>> >पुण्यात बंडगार्डन जवळ "पुणे सेंट्रल" मॉल होता ... आता तो बंद केलाय ..पण मला ही तिथला स्टाफ आवडला नाही कधी ....म्हणूनंच तो बंद झाला असेल कदाचित .....आता मॉल मध्ये असं होत नाही ...

नानाकळांच्या बाहुबली धाग्यावर खडाजंगी सुरु झालेली मी पाहिली, ती पुढे फार वाचली नाही. असे इथे बर्‍याच धाग्यांबद्दल तो करतो, याची कल्पना नव्हती.
Submitted by मानव पृथ्वीकर on 17 May, 2017 - 20:22

>>>>>>>>

याचे उत्तर द्यायचे राहिलेले.
तुम्ही ती खडाजंगी पाहिली पण त्याचा आगापिछा नाही.
तो मूळ वाद माझ्या या धाग्यावर सुरू झालेला.
बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली ! - http://www.maayboli.com/node/62474
मी आणि माझ्यासारख्यांनी बाहुबलीच्या दर्ज्याची उडवलेली थट्टा तिथेही नानाकळा यांना पटली नव्हती.
तेथील चर्चेवरूनच नानाकळांना आपला मुद्दा मांडायला वेगळा धागा सुचला असावा. तीच चर्चा मग त्यांच्या धाग्यातही कंटीन्यू झाली ईतकेच. मी काही त्यांच्या लेखाच्या विरोधात जायला म्हणून तिथे अवतरलो नसून आधीच माझ्या धाग्यावर आमची मते विरोधात होतीच Happy

मला तर वाटते वेळ जात नसला तर ऋन्मेSSष चे धागे वाचावे. साईनफेल्ड जसा रोजच्या जीवनातील अत्यंत क्षुल्लक गोष्टींना मोठे करून अर्ध्या तासाचा शो चालवतो, तसे ऋन्मेSSष पण अनेक विषयांवर धागा काढून प्रत्येक धाग्याला किमान पाच सहा पाने तरी बघता बघता भरतो.
पण साईनफेल्डला ग्रेट म्हणतात, नि ऋन्मेSSषची बिचार्‍याची टिंगल करतात.
लगे रहो ऋन्मेSSष, एक धागा तरी असा निघेल की लोक तुम्हाला पण ग्रेट म्हणतील. नि नुसते ग्रेट ग्रेट म्हणून सात आठ पाने तरी भरतील, कुणि टिंगल करणार नाही.

<<नानाकळा यांनी बाहुबलीवर काढलेला तंत्रज्ञानाची उकल करणारा मुद्देसुद धागा. या धाग्यावर ऋन्मेषनी नानाकळांना इतके जाम पकवले आहे की विचारता सोय नाही. त्यातून त्रास देण्याकरिता वापरली जाणारी भाषा अत्यंत साळसूद. कुठेही चिडणं नाही, त्रागा नाही, शिवीगाळ अरेरावी तर अजिबातच नाही. हे सगळं टाळून समोरच्याला चिडीला आणण्याचं अफलातून कसब ऋन्मेष यांच्याकडे आहे. यामुळे होतं काय की या आयडीची अ‍ॅडमीनकडे तक्रार करावी तरी कशी हाही अजुन एक त्रासदायक प्रश्न पीडिताला पडतो.>> हा हा हा हा . एकदम पटेश Lol Lol

अरे वरची माझी पोस्ट वाचा की, त्या चर्चेचे मूळ कुठून आलेले ते लिहिलेय, लिंकही दिली आहे.. ती चर्चा त्याला धरूनच कंटिन्यू झालेली..
बाकी आपण पब्लिक आहे बॉस, एखादा पिक्चर नाही आवडला तर नाही बोलतो, २०० रुपये मोजलेले असतात. उगाच कोणी त्यासाठी किती मेहनत घेतली वगैरे कौतुक सांगायची गरज नाही. उलट एवढा पैसा खर्च करून बंडल चित्रपट बनवणे ही पैश्याची आणि उपलब्ध रिसोर्सेसची नासाडीच असते. अन्नाची नासाडी या विषयावर व्यथित होणारे आपण आपल्या आजूबाजूला घडणार्‍या अश्या कैक नासाड्यांबाबत उदासीन असतो Sad

अपने ही फेडरेशन ने उड़ाया हिमा दास का मजाक,
https://www.livehindustan.com/sports/story-athletics-federation-of-india...

अंडर-20 विश्व एथलेटिक्स चैम्पियनशिप में महिलाओं की 400 मीटर में स्प्रिंट इवेंट में स्वर्ण पदक जीतकर असम की हिमा दास ने भारत का सिर गर्व से उंचा कर दिया है। लेकिन, इसी बीच भारतीय एथलेटिक्स महासंघ को हिमा को बधाई देने के लिए किए गए ​ट्वीट में एक चूक के कारण ट्रोल होना पड़ रहा है। लोगों का कहना है कि इस ट्वीट में भारतीय एथलेटिक्स महासंघ ने हिमा की अंग्रेजी का मजाक उड़ाया है। फिनलैंड के टेम्पियर में चल रही आईएएएफ अंडर-20 विश्व चैम्पियनशिप में हिमा दास ने 51.46 सेकेंड का समय निकालते हुए 400 मीटर स्प्रिंट इवेंट का स्वर्ण अपने नाम किया।

भारतीय एथलेटिक्स महासंघ ने हिमा की इस उपलब्धि पर उनका एक वीडियो ट्वीट किया, 'हिमा दास स्वर्ण पदक जीतने के बाद मीडिया से बातचीत करती हुईं। अग्रेंजी में उतनी दक्षता से अंग्रेजी नहीं बोल पा रही हैं, लेकिन अपनी तरफ से पूरी कोशिश कर रही हैं। हमें आप पर गर्व है हिमा।' इस ट्वीट के बाद लोग भारतीय एथलेटिक्स महासंघ को ट्रोल करने लगे। उनका कहना था कि हिमा दास ट्रेम्पियर में स्प्रिंट इवेंट में अपना टैलेंट दिखाने के लिए गईं हैं ना की अंग्रेजी में अपनी काबिलियत साबित करने ​के लिए। लोगों की प्रतिक्रिया के बाद एफआई (एथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडिया) ने एक दूसरे ट्वीट में अपनी सफाई दी है और माफी मांगा है।

Pages