या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 May, 2017 - 13:08

आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ...

व्हॅल्यु अ‍ॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे

मला कबूल करायला जराही लाज वाटत नाही की तो मुलगा मी आहे. आणि त्याहून लाज तर मुळीच वाटत नाही की मला वरील शब्दाची स्पेलिंग खरेच येत नाही. माझे ईंग्रजी खरेच कच्चे आहे. मला असे टोमणे खायची सवय असल्याने मला वाईटही वाटत नाही. ही कोणाची तक्रारही नाही. करणार तरी कोणत्या तोण्डाने, ज्या मुलीवर मी आजच्या तारखेला सर्वाधिक प्रेम करतो ती देखील मला यावरून बरेचदा लागेल असे बोलते. अर्थात मला ते लागत नाही, पण एखाद्याच्या मनाला लागू शकते.

असो, मूळ प्रश्न हा आहे की या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

मुळात ईंग्रजी बोलणारयांकडे काय अशी महानता असते जी ती न जमणारयांकडे नसते.

पैसे कमावण्याचा किंबहुना आयुष्यात यशस्वी होण्याचा आणि ईंग्रजी भाषा जमण्याचा फारसा काही संबंध नसतो.

एखादी शुद्ध मराठी न बोलता येणारी व्यक्ती उद्योगपती असते आणि फाडफाड ईंग्रजी बोलणारे त्याच्या हाताखाली चाकरी करत असतात.

एखादा राजकारणातला नेता चक्क अक्षरशत्रू असतो म्हणून आपण त्याला हसतो पण त्याच्यातील नेतृत्वगुणामुळे मुत्सद्दीपणामुळे त्याने आपल्या चार पिढ्यांना न शिकता खाता येईल अशी सोय केलेली असते.

एखाद्या कलाकाराची खरी ताकद त्याच्या अंगातील कला असते त्याला या ईंग्रजी भाषेच्या कुबड्यांची जराही गरज पडत नाही.

मला आठवतेय, क्रिकेटमध्ये जेव्हा एखाद्या नवोदीत खेळाडूला सामनावीराचा किताब मिळायचा आणि त्याला ईंग्रजी बोलता यायचे नाही तेव्हा माझे मित्र त्याला हसायचे.. मी त्यांना हसायचो.. कारण तो खेळाडू आपल्या खेळावर मेहनत घेत तिथे आपल्या आयुष्यात यशस्वी झाला होता. आणि तुम्ही ईथे टीव्हीसमोर तंगड्या पसरून त्याला हसत बसला आहात.

अशी एक ना दोन शेकडो क्षेत्रातील लाखो उदाहरणे देता येतील. पण तरीही मला समजत नाही की आपल्याला ईंग्रजी म्हणजे काहीतरी भारी भाषा येतेय हा अहंकार नक्की येतो कुठून? याला कोण जबाबदार आहे? आपलीच समाजव्यवस्था की आणखी काही?

तळटीप - लेखात उल्लेखलेली तात्कालिक घटना एक उदाहरण म्हणून आहे. यात कोणाचीही तक्रार वा कोणावरही राग नाही. तर त्यावर चर्चा अपेक्षित नसून ती व्यापक व्हावी अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो मी माझा प्रतिसाद देतोय. तुम्हाला उद्देशून काही बोललो आहे का? मग तुम्हाला जाब द्यायची मला काही गरज वाटत नाही.

अहो जाब कोण विचारतंय? मी का विचारू?

इन ज्ञरल चांगला टिपी चाल्लेला इथे तुम्ही येऊन नविन काही तरी चालू केलंत.. आता मला बोअर होतंय तर मी काय करू?

ऋच्या नेमक्या कुठल्या धाग्यावर आपल्याला हवं ते अवांतर चालूये ते आठवावं लागतं नेहमीच

मी नाही चालू केले. वर बिपिन यांनी चालू केले आहे. त्यास मी प्रतियुत्तर दिले. तुम्हाला जाब विचारायचा असेल तर बिपिन यांना खुशाल विचारा.

बरं Proud

प्रशन तुम्हीच विचारला ना ? आणि बिपिन चंद्र यांनी उत्तर इलं?

मी मगाशी पण तुमच्याशी बोलत होते तर ते आले मधेच मी म्हणलं का करत
आता तुमचयशी बोलतेय तर तुम्ही म्हणताय त्यांना बोला

हे बरंय Uhoh

हा ऋ दुसर्‍यांचा धागा हायजॅक करतो, पण इथे तर त्याचाच धागा हायजॅक झालाय. Biggrin

ते म्हणतात ना, ईश्वर के घर पे देर है, अंधेर नही. Happy

हा ऋ दुसर्‍यांचा धागा हायजॅक करतो, पण इथे तर त्याचाच धागा हायजॅक झालाय. Biggrin
ते म्हणतात ना, ईश्वर के घर पे देर है, अंधेर नही. Happy .>>>>>>>>>>> Rofl Rofl Rofl

दक्षिणा यांच्याशी सहमत आहे.
एखाद्याला एखाद्या गोष्टीची व्याख्या किंवा स्पेलिंग तरी माहित आहे की नाही असं जेव्हा म्हट्लं जातं तेव्हा त्या शब्दांचा योग्य अर्थ (रोजच्या जीवनात त्या गोष्टीचा वापर कसा करायचा किंवा अंगवळणी कसा पाडायचा हे तरी त्याला माहित आहे की नाही असा त्याचा अर्थ होतो, जरी शब्द प्रथम दर्शनी इंग्रजीच्या ज्ञानावर शंका घेत असले तरिही. ) कारण प्रथम आपण तो शब्द कसा लिहायचा ते शिकतो, मग त्याचा अर्थ आणि मग त्याचे आयुष्यातले अवलंबन.>>>+११११
ज्यानि ज्यांनि तो प्रतिसाद धागाकर्त्याच्या नजरेतुन पाहिला त्यांनि तो अजुन एक्दा वाचावा (स्वतःच्या नजरेतुन)

नानबा, तुम्ही अमितव यांना दिलेलं उत्तर मी आधीच वाचलं होतं. Happy
माझी पोस्ट ही ऋन्मेषच्या वाट्टेल ते धागे काढण्याची तक्रार असूनही त्याच्या बहुतेक धाग्यांमध्ये सहभागी होणार्‍यांबद्दल आहे.
ऋन्मेषचे अथवा त्याच्या धाग्यांचे इन जनरल समर्थन करण्याच्या उद्देश नाही.

बिपिनचंद्र यांची पोस्ट विचार करण्याजोगी आहे. नानाकळांच्या बाहुबली धाग्यावर खडाजंगी सुरु झालेली मी पाहिली, ती पुढे फार वाचली नाही. असे इथे बर्‍याच धाग्यांबद्दल तो करतो, याची कल्पना नव्हती.

राहुल१२३, ऋन्मेषचा धागा हॅक झाला याबद्दल तो स्वतःही तेवढाच खूष होत असेल बरं, अ‍ॅज लाँग अ‍ॅज त्याचा उल्लेख होत आहे.

धाग्याचे रप्पारप शतक झाले तेव्हाच समजलो की भरकटलाय. अन्यथा ईंग्रजी आणि ईंग्रजांविरुद्ध तावातावाने बोलावे ईतकी हिंमत आजही मराठी माणसात नाहीये Happy

रीया,
मी त्यांच्या पोस्टी ओलांडून जाते 
त्यांच्याशी पर्सनल दुष्मनी नाही पण मोठ्या पोस्टी वाचायला बोअर होतं मला
>>>>>
लहाबपणी कोणाला ओलांडून गेले की ती व्यक्ती छोटी होते अशी अंधश्रद्धा फार फेमस होती.. अजूनही मानतेस का ते Happy

>>मागे एकदा अमन की आशा टीममधून पाकिस्तानला गेलेलो.

ऋन्मेष दादा, यावर धागा का काढला नाहीयेस अजून?

<<
मला कबूल करायला जराही लाज वाटत नाही की तो मुलगा मी आहे. आणि त्याहून लाज तर मुळीच वाटत नाही की मला वरील शब्दाची स्पेलिंग खरेच येत नाही. माझे ईंग्रजी खरेच कच्चे आहे. >>
ज्या दिवशी लाज वाटेल त्या दिवसापासून इंग्रजी पक्के ही होईल आणि स्पेलिंगही येइल. का लाज वाटत नाही ?

आता लाज वाटू देऊ नका. खिल्लीला घाबरु नका. अभिमानाने सांगा की तुमच्या देवालाही इंग्रजीत कमी गुण मिळाले होते.

http://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-shah-rukh-khan-h...

सुलू, कारण गरज वाटत नाही. एखाद्या गोष्टीशिवाय आपले सुरळीत चालू आहे, आयुष्य मजेत जगतोय, तर ईतर कोणाला ती गोष्ट आपण करने वा शिकणे गरजेचे वाटत असेल म्हणून आपण आपल्या आयुष्यातील वेळ खर्च करायचा हे पटत नाही.
पण येस्स, तशीच लाज वाटली असती तर प्रयत्न केला असता Happy

जिओ बिपीनचण्द्र काय खबर आणलीय..
अजून लिण्क ओपन करून वाचली नाही पण आपली पोस्ट आणि लिंकवर शाहरूखचे नाव ऐकूनच मन ताजेतवाने गार्डन गार्डन झाले Happy

कलाकार आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी कोण, कसा आणि किती प्रयत्न करेल, याचा काहीच नेम नाही. त्यातच शाहरुख खानबद्दल काही जाणून घेण्याचा विषय निघाल्यावर अनेकांचच लक्ष त्या विषयाकडे एकवटतं. ‘टेड टॉक्स’मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चर्चेत आलेल्या शाहरुखच्या महाविद्यालयातील फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या ‘डीयू टाइम्स’ फेसबुक पेजवर किंग खानच्या अॅडमिशन फॉर्मचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. मुख्य म्हणजे या फॉर्ममध्ये नमूद केल्यानुसार इंग्रजी विषयात त्याला फक्त ५१ गुण मिळाले होते. जो किंग खान इतक्या सहजतेनं अस्खलित इंग्रजी बोलू शकतो. त्याला या विषयात इतके कमी गुण कसे, हीच चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचं पाहायला मिळतंय.

शाहरुखच्या महाविद्यालयाचा फॉर्म व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. पण, यावेळी मात्र ‘डीयू टाइम्स’च्या अधिकृत पेजवरुनच या फॉर्मचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. याविषयी सांगताना त्या पेजचा अॅडमिन मिल्हाज हुसैन म्हणाला, ‘तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष असेल आणि तुम्ही मेहनती असाल तर कोणत्याही विषयात मिळालेल्या कमी गुणांनी काहीच फरक पडत नाही. ही बाब लक्षात आणून देण्यासाठी हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

<<सुलू, कारण गरज वाटत नाही. एखाद्या गोष्टीशिवाय आपले सुरळीत चालू आहे, आयुष्य मजेत जगतोय, तर ईतर कोणाला ती गोष्ट आपण करने वा शिकणे गरजेचे वाटत असेल म्हणून आपण आपल्या आयुष्यातील वेळ खर्च करायचा हे पटत नाही.
पण येस्स, तशीच लाज वाटली असती तर प्रयत्न केला असता Happy>>

ज्याना गरज वाटते ते खिल्ली उडवतात. हे सामान्यज्ञान आहे. धागा नक्की का काढलाय्स? Happy

धागा नक्की का काढलाय्स? 
>>>
आवडीचा विषय आहे. चर्चा करायला मजा येते. चार मुद्दे मांडायला, काही किस्से सांगायला धमाल येते. लोकांचेही अनुभव वाचायला मजा येते. कोणी आपले मुद्दे खोडते, आपण कोणाचे खोडायचे.
थोडक्यात कोणाच्या भावना न दुखावता निकोप चर्चा होते, सर्वांशी रिलेट होत असल्याने सर्वांना भाग घेता येतो आणि सोबत मनोरंजनही होते असा कुठलाही विषय आवडतोच

<<आवडीचा विषय आहे. चर्चा करायला मजा येते. चार मुद्दे मांडायला, काही किस्से सांगायला धमाल येते. लोकांचेही अनुभव वाचायला मजा येते. कोणी आपले मुद्दे खोडते, आपण कोणाचे खोडायचे.
थोडक्यात कोणाच्या भावना न दुखावता निकोप चर्चा होते, सर्वांशी रिलेट होत असल्याने सर्वांना भाग घेता येतो आणि सोबत मनोरंजनही होते असा कुठलाही विषय आवडतोच>>
आवडले! +१ देव करो आणि तुला इंग्रजी येत नाही याचीही लाज वाटो. भाषा वाईट नाही आणि जगभरात बोललीही जाते. नुकसान नक्कीच नाही शिकण्यात. Happy

हो
गर्लफ्रेण्ड शिकवून सोडणार लग्न झाल्यावर असे वाटतेय खरे.
आताच धमकी देतेय, शिकला नाहीस तर आपलीच पोरे उद्या हसतील तुला.. Happy

मायबोलीसारख्या मराठी संकेतस्थळावरील चर्चेत असे बरेचदा होते की ईंग्लिशमध्ये एकाने एखादा डायलॉग मारला की प्रत्युत्तर करणाराही लगेच ईंग्लिशमध्येच ऊत्तर देतो Happy

असे का होते?

तुलाच नाही काही मलाही ईण्ग्लिश येते म्हटले हे समोरच्याला दाखवून देणे एवढे गरजेचे का वाटते.

मज्जा तर तेव्हा येईल जेव्हा आपापल्या वेगवेगळ्या भाषेत इंग्लिश प्रतीसादास उत्तर दिले जाईल Lol जसे की कोणाला जर्मन फ्रेंच रशियन अश्या भाषेवर सुद्धा प्रभुत्व असेल आणि सगळ्यात कहर होईल जर कोण इकडे मोर्स कोड वापरणारा असेल Wink

कोणाला ओलांडून गेले की ती व्यक्ती छोटी होते अशी अंधश्रद्धा फार फेमस होती.. अजूनही मानतेस का ते
>>>
हे मी कुठे म्हणलं?
मी कोणाला उलांडून गेल्याने ती व्यक्ती लहान वा मोठी व्हावी इतकी मोठी मी नाही रे

Pages