बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !
बाहुबली क्रमांक १ मी घरच्याघरी पाहिल्याने पैसे गेले नव्हते. वेळ गेला. पण आपण भारतीयांना तशीही वेळेची किंमत नसल्याने फारसे वाईट वाटले नव्हते. किंबहुना खरे सांगायचे तर थिएटरला जात पैसे घालवले नाही याचा आनंदच झालेला. पण हा आनंद वर्ष दोन वर्षच टिकला. कारण आज बाहुबली क्रमांक २ बघून आलो...
तशी काही ईच्छा आकांक्षा उत्सुकता नव्हतीच. पण गर्लफ्रेंडला बघायचाच असल्याने जाणे भागच होते. तिच्या सांगण्यानुसार "ऋ तू थिएटरात बघ, मगच तुला मजा येईल, पहिला भाग छोट्या स्क्रीनवर बघितलास त्यामुळे तुला मजा आली नाही" या युक्तीवादावर विश्वास नसूनही पर्याय नसल्याने होय महाराजा म्हणत थिएटरला पोहोचलो. असे ऐकून होतो की या चित्रपटासाठी तिकीटांचे भाव वाढवलेत. पण विश्वास ठेवा, त्यापेक्षा जास्त भाव पॉपकॉर्नचे वाढवून ठेवलेत. खरे तर त्याच नुकसानीला मनाला लाऊन घेतल्याने ईतरांना सावध करायला ईथे लिहितोय. अर्थात मी कितीही सावध केले तरी बघणारे बघणारच हे माहीत आहेच ... तरी आपण आपले कर्तव्य बजावायचे.
1) अविश्वसनीय करामती - हिरोच्या पहिल्याच एंट्रीला समजते की चित्रपटात अचाट शक्तीचे अफाट प्रयोग दाखवून लोकांचे मनोरंजन केले जाणार आहे.
ज्या मानवी क्षमतेच्या आवाक्याबाहेर आहेत अश्या कित्येक करामती हिरो करतो, आणि ज्या अचूकतेने करतो ते सारे अगदी टिपिकल सौथेंडियन स्टाईल आहे.
मागे 'नायक' सिनेमात मी अनिल कपूरला दोन बसच्या मधून एक पाय ईकडे तर एक पाय तिकडे असे सरसर वर चढताना पाहिले होते. यात बाहुबली सुसाट धावणारया बैलांवरून उड्या मारायचा खेळ करतो. एकूणच पुर्ण चित्रपटभर ईथून तिथे उड्या असा मारतो जसे बिनजाळीचा स्पायडरमॅनच..
बरं याच्या धनुष्यबाणाचा नेम ईतका अचूक की काय वर्णावे. कॅरममध्ये डबलशॉट खेळावेत तसे हा बाण मारतो. म्हणजे बघा, हा आणि देवसेना एकाच वेळी एकाच डुकराला बाण मारतात. पण याचा बाण आधी देवसेनाच्या ताशी 180 मैल वेगाने सोडलेल्या बाणाला टक्कर देत त्याला बाजूला सारतो, आणि मग तोच बाण आपली दिशा बदलत तितक्याच वेगाने धावणाऱ्या डुकराचा प्राण घेतो. काळ काम वेगाचे हे अचूक गणित जे केवळ रॉकेट सायण्टीस्टच कॉम्युटरच्या साहाय्याने सोडवू शकतात ते हा चुटकीसरशी नुसते सोडवतच नाही तर शंभर टक्के खात्रीने अंमलातही आणतो. ईतकेच नव्हे, तर आपल्या अचूकतेवर ईतका अहंकार की एकाच वेळी तीन तीन बाण असे काही सोडतो की त्यातील एक देवसेनाच्या डोक्यावरून तर उरलेले दोन तिच्या कानांजवळ शिट्टी वाजवत तिच्या मागे असलेल्या तीन शत्रूंचा वेध घेतात.
एक आपला सनी देओल होता जो साधासा हॅन्डपंप उखाडून फुशारक्या मारायचा. एक हा बाहुबली आहे जो पाकिटातून सिगारेट काढावी तसे झाड मुळापासून उखडतो.
भव्यदिव्यता तर काय म्हणावी, हजारो माणसे चाकू कोयते तलवारी घेऊन राडा करायला बाहुबलीच्या दिशेने धावत येतात पण हा जराही विचलित न होता तलवारीने सपासप कापत त्यातील दोनतीनशे जणांना बघता बघता यमसदनी धाडतो. पिक्चर संपल्यावर जेव्हा मला थिएटर बाहेर पडताना गर्दीला चिरत बाहेर पडणे अवघड जात होते तेव्हा बाहुबली हा काय महान योद्धा होता याचा साक्षात्कार झाला. जेव्हा बाहुबलीला कटप्पा मारतो (का मारतो ते मी नाही हा सांगणार) तेव्हा बाहुबलीसारखा योद्धा मरणे शक्यच नाही या निष्कर्शाप्रत मी आलेलो. त्यामुळे तो मेल्याचा सर्वात मोठा धक्का त्याच्या आई वा पत्नीपेक्षा एक प्रेक्षक म्हणून मला बसला.
2) स्पेशल ईफेक्ट - मला खरे तर या ताण्त्रिक बाबींवर हक्काने कॉमेंट करता यावे ईतका मी तज्ञ नाही. तसेच एक प्रेक्षक म्हणूनही माझ्या हे प्रकार फार आवडीचे नाहीत. बाहुबलीने यात जे काही केलेय ते करायला डमी वा स्टंटमॅन वापरायचा झाल्यास तो रजनीकांतच वापरावा लागेल अन्यथा ते स्पेशल ईफेक्टनेच साध्य होऊ शकते. त्यामुळे हे स्पेशल ईफेक्ट बाहुबली सोबतच पुर्ण चित्रपटभर पसरले आहेत. जेव्हा बाहुबली हिरोईनसोबत नाचत गात बोटीतून तिला आपल्या राज्यात नेत असतो तेव्हा काहीतरी करामत करत तो ती बोट हवेत उडवतो. गाणे संपल्यावर समजते की ते स्वप्न होते. पण पाहताना समजलेही नाही की ते स्वप्न होते. कारण बाहुबली स्पेशल ईफेक्टच्या सहाय्याने काहीही करू शकतो यावर माझा ईतका विश्वास बसला होता.
3) गाणी - या चित्रपटात गाणी तशी दुय्यमच भुमिका निभावणार याची खात्री होती. पण कशी का असेना तो वेळ काढावा लागतोच. तो असह्य व्हावा अशीच गाणी आहेत.
4) विनोद - पूर्वार्धात थोडाफार विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता. सुदैवाने तो प्रयत्न थोडक्यातच आटोपला अन्यथा सौथेण्डियन विनोदाचा अत्याचार जो कधीतरी टीव्हीवर पाचदहा मिनिटांसाठी मनोरंजन करतो तो पडद्यावर सहन करने जीवावर आले असते.
5) अभिनय - चित्रपटाबद्दल चांगले लिहावे असे हे एकच. पण जाऊ दे. आज काही चांगले लिहायचा मूड नाही.
6) दिग्दर्शन - लार्जर दॅन लाईफ भव्यदिव्य दाखवणे यावरच मूल्यमापन होणार असेल तर बॉलीवूडमध्ये करण जोहार बाप ठरेल. पण त्याला नाते संबंधही चांगले दाखवता येतात. ईथे बराच बटबटीतपणा होता. सर्वात कमाल नाते तर सासूसुनेचे होते. स्वाभिमान आणि अहंकार काहीतरी फरक आहे की नाही. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा यातही फरक आहे की नाही. ती देवसेना राजमातेला तिच्या चुकीवर सुनवताना "आपको ईतनी भी बुद्धी नही है क्या" असले टोमणे भरदरबारात मारते. आणि हे एकदा नाही तर दोनतीनदा असे होते. मला खरेच त्या बाहुबलीची दया यायची. आता हा यात कसा सुवर्णमध्य काढतो याची उत्सुकता लागायची. पण शेवटी मेलाच त्यांच्या नादात 
कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..
7) राष्ट्रीय पुरस्कार - देऊन टाका आणखी एक. जर पहिल्याला दिला असेल तर ज्या कारणासाठी दिला ते कारण यात जरा जास्तच आहे. ज्यांना मजा आली पहिला भाग बघायला त्यांना दुसरा बघायला आणखी मजा येईल.
सारांश - या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो.
जय हिंद !
त्या लिंक वर लिहा निरोप
त्या लिंक वर लिहा निरोप
तरी आठवतच होतो की कुठेतरी
तरी आठवतच होतो की कुठेतरी पाहिलाय हा सीन ..
तू रामायणपण पाहिले आहेस....वाहवा
ते ४० जण बांग्लादेशी आहे
ते ४० जण बांग्लादेशी आहे
व्ही एफ एक्स बद्दल - बाहुबली
व्ही एफ एक्स बद्दल - बाहुबली आणि ज्युरासिक वर्ल्डची व्ही एफ एक्स टीम एकच आहे असे वाचले होते. तेव्हा रा-वन च्या व्ही एफ एक्स ची बाहुबलीशी तुलना म्हण्जे अगदीच 'हे' आपले 'ते' वाटते
बाहूबली हे तर मोदींचे मेक इन
बाहूबली हे तर मोदींचे मेक इन इंडीया चे उदाहरण आहे - श्री वैंकय्या नायडू

हसुन हसून पोट दुखू लागले
ज्युरसिक वर्ल्ड फारच भयाण
ज्युरसिक वर्ल्ड फारच भयाण सिनेमा होता, एक चित्रपट गाजल्यावर त्याची लोकप्रियता सिक्वेल वर सिक्वेल काढून कॅश करत राहण्याच्या वृत्तीचे द्योतक.
अर्थातच रा- वन च्या महाभयानक अनुभवासमोर तो कित्येक पटीने चांगला असला तरी मूळ ज्युरसिक पार्क ची त्याला अजिबात सर नव्हती.
रावन एसडी मधे टिव्हीवर बघून
रावन एसडी मधे टिव्हीवर बघून त्यातील स्पेशल इफेक्ट्स कितपत लोकांना आवडतील हा त्यांच्या प्रश्न आहे पण किमान माझ्यासाठी तरी रावन हा त्या वेळेचा सर्वोत्तम स्पेशल इफेक्ट्स असलेला चित्रपट होता. रावन येऊन ६ वर्ष लोटली आहे. मर्यादीत तंत्रज्ञ आणि पैसा यातून हॉलिवूड इफेक्ट्सच्या जवळपास जाणारा सीन बनवणे हे खचित दुर्लभ होते. रावन ने भारतीय चित्रपटांमधे स्पेशल इफेक्ट्सचा माईलस्टोन ठेवला असे जाणकारांचे म्हणणे आहे. चेहर्यावर चेहरा बसवून विडीओ तयार करणे हे आपल्या इथे आधी शक्य नव्हते. डुप्लिकेट्स यांचा चेहरा दाखवला जात नव्हता त्यांना पाठमोरे दाखवायचे परंतू रावन मधे बरीचशी अॅक्शन्स ही डुप्लिकेट्स यांनी करून सुध्दा त्यावर शाहरुख चा चेहरा परफेक्ट लावण्याची किमया रेडचिलिच्या भारतीय तंत्रज्ञांनी साधली होती. हेच तंत्र " एम एस धोनी" या चित्रपटात वापरले गेले होते जिथे धोनीच्या चेहर्यावर सुशांतचा चेहरा जोडला होता. त्यामुळे विश्वचषक सेलेब्रेशनच्या क्षणात सुध्दा सुशांत लिलया मिसळून गेला होता. ज्यांनी ते क्षण कधी टीव्हीवर पाहिले नसतील (म्हणजे जे क्रिकेट बघत नाही) त्यालोकांना धोनीच्याजागी सुशांत वाटेल.
या कामगिरीवरुन क्रिश३ चे संपुर्ण स्पेशल इफेक्ट्स करण्याचे काम भारतात भारतीय तंत्रज्ञांना मिळाले. जे प्रचंड खर्चीक होते. हे विसरुन चालणार नाही.
बाहुबली हा त्याच यशस्वी वाटचालीचा एक पुढचा टप्पा आहे असे म्हणता येईल. ज्युरासिक वर्ल्ड ची टीम ने सुध्दा यात काम केले होते.
हॉलिवूड मधे एक एवेंजर्स मालिका सोडल्यास बाकी बहुसंख्य चित्रपटांचे स्पेशल इफेक्ट्स हे अंधारात जास्त चित्रित केलेले आहे. त्यामुळे काही त्रुटी जरी असतील तरी त्या झाकून जातात. याउलट भारतातील चित्रपटांचे दिवसाढवळ्या इफेक्ट्स असतात. रावन मधील सीएसटी पडण्याचा सीन हा जर रात्री दाखवला असता तर तो सीन अजुन उठावदार झाला असता. (वैयक्तिक मत आहे)
आता कुठे तर भारतीय सिनेमात स्पेशल इफेक्ट्सचा दौर सुरु झाला आहे. आपल्याला हॉलिवूड माईलस्टोन "अवतार"च्या स्पेशल इफेक्ट्स पर्यंत पोहचायला बराच काळ लागेल.
या लेखाशी खरंच मी सहमत आहे
या लेखाशी खरंच मी सहमत आहे
शेवट्ची ओळ तर एकदम खरी.
<<<<< या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो>>>>>
रा-वन मी मल्टीप्लेक्समध्ये
रा-वन मी मल्टीप्लेक्समध्ये जाऊन पाहिला होता आणि ते दुसाहस केल्याबद्दल मी आजही स्वताला माफ करू शकत नाही.
मला कदाचित तुमच्याइतके तांत्रिक ज्ञान नसेलही पण ते जे काही दाखवलं होतं रा-वन मध्ये ते तद्दन टुकार दर्जाचं होतं.
बाहुबली आणि कांदा - whatsapp
बाहुबली आणि कांदा - whatsapp मेसेज
.
असेल.. प्रत्येकाला स्वतःचा एक
असेल.. प्रत्येकाला स्वतःचा एक दृष्टीकोन असतो.
मी टेक्निकल दृष्टीकोन ठेवला होता. बाकी चित्रपटात काय चालु आहे तो स्वतंत्र विषय .
गजोधर, रावण बद्दल छान पोस्ट.
गजोधर, रावण बद्दल छान पोस्ट.
मागे देखील हे वाचलेले. पण आपल्याच तोंडाने आपल्याच शाहरूखचे काय कौतुक करायचे.
शाहरूख हा आधुनिकतेची कास धरणारा द्रष्टा कलाकार आहे. त्याने फार वर्षांपूर्वीच म्हटलेले की भारतीय चित्रपट नवे तण्त्रज्ञान आत्मसात न करेल तर जगाच्या मागे पडेल.
तो स्वता काही तण्त्रज्ञ नाही मात्र याबाबतीत प्रोत्साहन द्यायला पुढाकार घ्यायला पुढे असतो. रावणच नाही तर फॅन हा देखील एक धाडसी प्रयोग त्याने केलाय.. या प्रयोगात जिथे तंत्रज्ञान फसते त्यावर पडणारया शिव्या तो सुपर्रस्टार म्हणून स्वता झेलतो पण माझा चित्रपट यांच्यामुळे पडला असे बोलून त्यांना कधी नाऊमेद करत नाही. वुई ऑल लव्ह यू शाहरूख
त्या ऑल मधून कृपया मला वगळा
त्या ऑल मधून कृपया मला वगळा
मला तर सगळ्यात पहिले
मला तर सगळ्यात पहिले
हा पण त्याने जर माझे रा-वन वर वाया गेलेलं पैसे व्याजासकट परत केले तर पुनर्विचार करीन हो
हा हा….. टग्या
हा हा….. टग्या
मला पण वगळा all मधून...
तसेही प्रत्येक गोष्टीला अपवाद
तसेही प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. तुम्हा तीन अपवादांना वगळतो
तीन काहो, तीस हजार मिलेंगे,
तीन काहो, तीस हजार मिलेंगे, बस फिर से ये मत केहना की हम शारुख के फॅन्स है
हो ना. आम्ही पण शाखा फॅन आहोत
हो ना. आम्ही पण शाखा फॅन आहोत. पण तू वरती "आधुनिकतेची कास धरणारा द्रष्टा" वगैरे चरित्रात्मक लिहू लागल्यावर पुढे शाहरूख हा कलाकार नसून ज्येष्ठ समाजवादी नेते वगैरे असतात तसा वाटू लागलाय.
शाहरूख ईज ग्रेट
शाहरूख ईज ग्रेट
मला पण वगळा all मधून...>>>+१
मला पण वगळा all मधून...>>>+१
हा पण त्याने जर माझे रा-वन वर
हा पण त्याने जर माझे रा-वन वर वाया गेलेलं पैसे व्याजासकट परत केले तर पुनर्विचार करीन हो >>>
पण जाउ द्या) असा हिशोब जर केला तर
ठिक आहे
किमान टिकिट २०० रुपयाचे गृहित धरू. रावन येऊन ६ वर्ष झाली. २०११ मधे बँक ९% व्याज फिक्स डिपोझीट वर देत होती (आता ६% देत आहे
२०० रुपयावर ९% ने ७२ महिन्यांमधे १३५.४२ रुपये व्याज मिळेल. म्हणजे देण्याची एकून रक्कम २००+१३५.४२= ३३५.५० रुपये होतात.
ऋन्मेश ३३५ रुपयामधे एक शाहरुख फॅन बनत असेल तर नुकसानीचा सौदा नाही
मला पण वगळा all मधून...>>>+१
मला पण वगळा all मधून...>>>+१
वगळण्याची विनंतीला मान
वगळण्याची विनंतीला मान देण्यात येत आहे..
मायबोलीची वाचक संख्या पाहता अपवादांची संख्या दोन टक्केही नाही..
TRP गेम आहे सगळा, कारण
TRP गेम आहे सगळा, कारण त्याला माहिती आहे की कदाचित ईथे "वगळा" वाले जास्त असतील अन त्यातल्या काहिंनी जरी प्रतीसाद दिला तरी धागा जोरात धावेल
त्यामुळे तो मेल्याचा सर्वात
त्यामुळे तो मेल्याचा सर्वात मोठा धक्का त्याच्या आई वा पत्नीपेक्षा एक प्रेक्षक म्हणून मला बसला.>>>


कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..>>>
हा लेख छान लिहला आहेस.
त्यामुळे तो मेल्याचा सर्वात
त्यामुळे तो मेल्याचा सर्वात मोठा धक्का त्याच्या आई वा पत्नीपेक्षा एक प्रेक्षक म्हणून मला बसला.>>>


कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..>>>
हा लेख छान लिहला आहेस.
फक्त त्याची बायको कोण होती हे
फक्त त्याची बायको कोण होती हे अजुन गुपित आहे. बहुदा ३ र्या भागात दाखवतील>>> दुसरा भाग काढला तो 'कट्प्पाने बाहूबली को क्यो मारा?' हा सस्प्नेन्स फोडण्यासाठी.
आता तिसरा भाग 'भल्लालदेवा की बिवी कौन?' हा सस्पेन्स फोडण्यासाठी काढतील वाटत.
पण होती का बायको नक्की?
पण होती का बायको नक्की?
कालच कोणीतरी त्या भुर्जीच्या धाग्यात लिहिलेय की अंडे होण्यासाठी कोंबडा आणि कोंबडी दोघांची गरज नसते. टेक्नॉलॉजी ईतकी सुधारलीय. आणि दबाहुबलीचा काळ तर आजच्यापेक्षाही प्रगत तण्त्रज्ञान असलेला दाखवलाय..
उदाहरणार्थ??
उदाहरणार्थ??
म्हणजे एका कोंबड्यापासून किती
म्हणजे एका कोंबड्यापासून किती अंडी मिळाली
Pages