बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !
बाहुबली क्रमांक १ मी घरच्याघरी पाहिल्याने पैसे गेले नव्हते. वेळ गेला. पण आपण भारतीयांना तशीही वेळेची किंमत नसल्याने फारसे वाईट वाटले नव्हते. किंबहुना खरे सांगायचे तर थिएटरला जात पैसे घालवले नाही याचा आनंदच झालेला. पण हा आनंद वर्ष दोन वर्षच टिकला. कारण आज बाहुबली क्रमांक २ बघून आलो...
तशी काही ईच्छा आकांक्षा उत्सुकता नव्हतीच. पण गर्लफ्रेंडला बघायचाच असल्याने जाणे भागच होते. तिच्या सांगण्यानुसार "ऋ तू थिएटरात बघ, मगच तुला मजा येईल, पहिला भाग छोट्या स्क्रीनवर बघितलास त्यामुळे तुला मजा आली नाही" या युक्तीवादावर विश्वास नसूनही पर्याय नसल्याने होय महाराजा म्हणत थिएटरला पोहोचलो. असे ऐकून होतो की या चित्रपटासाठी तिकीटांचे भाव वाढवलेत. पण विश्वास ठेवा, त्यापेक्षा जास्त भाव पॉपकॉर्नचे वाढवून ठेवलेत. खरे तर त्याच नुकसानीला मनाला लाऊन घेतल्याने ईतरांना सावध करायला ईथे लिहितोय. अर्थात मी कितीही सावध केले तरी बघणारे बघणारच हे माहीत आहेच ... तरी आपण आपले कर्तव्य बजावायचे.
1) अविश्वसनीय करामती - हिरोच्या पहिल्याच एंट्रीला समजते की चित्रपटात अचाट शक्तीचे अफाट प्रयोग दाखवून लोकांचे मनोरंजन केले जाणार आहे.
ज्या मानवी क्षमतेच्या आवाक्याबाहेर आहेत अश्या कित्येक करामती हिरो करतो, आणि ज्या अचूकतेने करतो ते सारे अगदी टिपिकल सौथेंडियन स्टाईल आहे.
मागे 'नायक' सिनेमात मी अनिल कपूरला दोन बसच्या मधून एक पाय ईकडे तर एक पाय तिकडे असे सरसर वर चढताना पाहिले होते. यात बाहुबली सुसाट धावणारया बैलांवरून उड्या मारायचा खेळ करतो. एकूणच पुर्ण चित्रपटभर ईथून तिथे उड्या असा मारतो जसे बिनजाळीचा स्पायडरमॅनच..
बरं याच्या धनुष्यबाणाचा नेम ईतका अचूक की काय वर्णावे. कॅरममध्ये डबलशॉट खेळावेत तसे हा बाण मारतो. म्हणजे बघा, हा आणि देवसेना एकाच वेळी एकाच डुकराला बाण मारतात. पण याचा बाण आधी देवसेनाच्या ताशी 180 मैल वेगाने सोडलेल्या बाणाला टक्कर देत त्याला बाजूला सारतो, आणि मग तोच बाण आपली दिशा बदलत तितक्याच वेगाने धावणाऱ्या डुकराचा प्राण घेतो. काळ काम वेगाचे हे अचूक गणित जे केवळ रॉकेट सायण्टीस्टच कॉम्युटरच्या साहाय्याने सोडवू शकतात ते हा चुटकीसरशी नुसते सोडवतच नाही तर शंभर टक्के खात्रीने अंमलातही आणतो. ईतकेच नव्हे, तर आपल्या अचूकतेवर ईतका अहंकार की एकाच वेळी तीन तीन बाण असे काही सोडतो की त्यातील एक देवसेनाच्या डोक्यावरून तर उरलेले दोन तिच्या कानांजवळ शिट्टी वाजवत तिच्या मागे असलेल्या तीन शत्रूंचा वेध घेतात.
एक आपला सनी देओल होता जो साधासा हॅन्डपंप उखाडून फुशारक्या मारायचा. एक हा बाहुबली आहे जो पाकिटातून सिगारेट काढावी तसे झाड मुळापासून उखडतो.
भव्यदिव्यता तर काय म्हणावी, हजारो माणसे चाकू कोयते तलवारी घेऊन राडा करायला बाहुबलीच्या दिशेने धावत येतात पण हा जराही विचलित न होता तलवारीने सपासप कापत त्यातील दोनतीनशे जणांना बघता बघता यमसदनी धाडतो. पिक्चर संपल्यावर जेव्हा मला थिएटर बाहेर पडताना गर्दीला चिरत बाहेर पडणे अवघड जात होते तेव्हा बाहुबली हा काय महान योद्धा होता याचा साक्षात्कार झाला. जेव्हा बाहुबलीला कटप्पा मारतो (का मारतो ते मी नाही हा सांगणार) तेव्हा बाहुबलीसारखा योद्धा मरणे शक्यच नाही या निष्कर्शाप्रत मी आलेलो. त्यामुळे तो मेल्याचा सर्वात मोठा धक्का त्याच्या आई वा पत्नीपेक्षा एक प्रेक्षक म्हणून मला बसला.
2) स्पेशल ईफेक्ट - मला खरे तर या ताण्त्रिक बाबींवर हक्काने कॉमेंट करता यावे ईतका मी तज्ञ नाही. तसेच एक प्रेक्षक म्हणूनही माझ्या हे प्रकार फार आवडीचे नाहीत. बाहुबलीने यात जे काही केलेय ते करायला डमी वा स्टंटमॅन वापरायचा झाल्यास तो रजनीकांतच वापरावा लागेल अन्यथा ते स्पेशल ईफेक्टनेच साध्य होऊ शकते. त्यामुळे हे स्पेशल ईफेक्ट बाहुबली सोबतच पुर्ण चित्रपटभर पसरले आहेत. जेव्हा बाहुबली हिरोईनसोबत नाचत गात बोटीतून तिला आपल्या राज्यात नेत असतो तेव्हा काहीतरी करामत करत तो ती बोट हवेत उडवतो. गाणे संपल्यावर समजते की ते स्वप्न होते. पण पाहताना समजलेही नाही की ते स्वप्न होते. कारण बाहुबली स्पेशल ईफेक्टच्या सहाय्याने काहीही करू शकतो यावर माझा ईतका विश्वास बसला होता.
3) गाणी - या चित्रपटात गाणी तशी दुय्यमच भुमिका निभावणार याची खात्री होती. पण कशी का असेना तो वेळ काढावा लागतोच. तो असह्य व्हावा अशीच गाणी आहेत.
4) विनोद - पूर्वार्धात थोडाफार विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता. सुदैवाने तो प्रयत्न थोडक्यातच आटोपला अन्यथा सौथेण्डियन विनोदाचा अत्याचार जो कधीतरी टीव्हीवर पाचदहा मिनिटांसाठी मनोरंजन करतो तो पडद्यावर सहन करने जीवावर आले असते.
5) अभिनय - चित्रपटाबद्दल चांगले लिहावे असे हे एकच. पण जाऊ दे. आज काही चांगले लिहायचा मूड नाही.
6) दिग्दर्शन - लार्जर दॅन लाईफ भव्यदिव्य दाखवणे यावरच मूल्यमापन होणार असेल तर बॉलीवूडमध्ये करण जोहार बाप ठरेल. पण त्याला नाते संबंधही चांगले दाखवता येतात. ईथे बराच बटबटीतपणा होता. सर्वात कमाल नाते तर सासूसुनेचे होते. स्वाभिमान आणि अहंकार काहीतरी फरक आहे की नाही. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा यातही फरक आहे की नाही. ती देवसेना राजमातेला तिच्या चुकीवर सुनवताना "आपको ईतनी भी बुद्धी नही है क्या" असले टोमणे भरदरबारात मारते. आणि हे एकदा नाही तर दोनतीनदा असे होते. मला खरेच त्या बाहुबलीची दया यायची. आता हा यात कसा सुवर्णमध्य काढतो याची उत्सुकता लागायची. पण शेवटी मेलाच त्यांच्या नादात 
कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..
7) राष्ट्रीय पुरस्कार - देऊन टाका आणखी एक. जर पहिल्याला दिला असेल तर ज्या कारणासाठी दिला ते कारण यात जरा जास्तच आहे. ज्यांना मजा आली पहिला भाग बघायला त्यांना दुसरा बघायला आणखी मजा येईल.
सारांश - या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो.
जय हिंद !
ऋन्मेश +१११११११११
ऋन्मेश +१११११११११
कधी नाही ते ऋन्मेष, तुझ्या
कधी नाही ते ऋन्मेष, तुझ्या धाग्याच्या एकुणच आशयाशी संपुर्ण पणे सहमत.
चांगले लिहिलय, काही पंचेस पण जबरदस्त आहेत.
सारांशाशी संपुर्णपणे सहमत.
लार्जर दॅन लाईफ भव्यदिव्य
लार्जर दॅन लाईफ भव्यदिव्य दाखवणे यावरच मूल्यमापन होणार असेल तर बॉलीवूडमध्ये करण जोहार बाप ठरेल. >>>>>>>
मी डायरेक्ट दिग्दर्शनवर गेलो होतो अन हे वाक्य वाचून थांबलो. बाकी वाचण्याची सहनशक्ती नाही, सॉरी
अप्रतिम सुंदर!!!
अप्रतिम सुंदर!!!
प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री मस्त!! पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग खरंच मस्त झालाय.
अजून एकदा तरी पहाणार
ओह प्लिज शारुक प्रभासच्या करंगळी ईतकाही वाटला नाही मला (अभिनय शरीरयष्टी, देखणेपण अगदी सर्वच बाबतीत) सो ती तुलना होऊच शकत नाही.>>>१००% सहमत
चित्रपट म्हणून कुणाला आवडला
चित्रपट म्हणून कुणाला आवडला नाही तर समजू शकतो.
पण चित्रपटात किमान एक कौवाली किंवा गाण्यात मौला वगैरे तत्सम शब्द यांचा अभाव, एकही शांतीदूत नसणे, आणि ठायी ठायी असलेली भारतीय देवतांच्या मूर्ती किंवा ठसठशीत प्रतीके यांमुळे एका विशिष्ठ कँप मधून धूर येताना दिसतो आहे याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही
जय माहिष्मती
मला तरी जाम आवडला! मी पण अजून एकदा पाहणार!!
रसिकाशी १०००% सहमत
रसिकाशी १०००% सहमत
बाकी एक नक्की, की जर आम्हाला
बाकी एक नक्की, की जर आम्हाला "हॅरी पॉटर" चालतो, तर बाहुबली चालायला काहीच् हरकत नसावी, नै?
इफ आय अॅम रॉन्ग, देन करेक्ट मी प्लिज.
करेक्ट limbutimbu जी
करेक्ट limbutimbu जी
मी मानिनी - कोणती शरीरयष्टी
मी मानिनी - कोणती शरीरयष्टी म्हणताय आपण... अहो ती बॉडी वगैरे ग्राफिक्स आहे... खरा प्रभास आणि राणा इतके ripped नाहीयत.
प्रभासने त्याचे १ दिवसाचे
प्रभासने त्याचे १ दिवसाचे उत्पन्न रु. १२० करोड नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांना दिलेय.
पण चित्रपटात किमान एक कौवाली
पण चित्रपटात किमान एक कौवाली किंवा गाण्यात मौला वगैरे तत्सम शब्द यांचा अभाव, एकही शांतीदूत नसणे, आणि ठायी ठायी असलेली भारतीय देवतांच्या मूर्ती किंवा ठसठशीत प्रतीके यांमुळे एका विशिष्ठ कँप मधून धूर येताना दिसतो आहे याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही Wink
टिपिकल संघी प्रोपगंडा.... आपणच धूर उठल्याची बोंब मारायची आणि वरुन आश्चर्य वाटत नाही असा शहाजोगपणाही दाखवायचा..
शहिदांना दान केल्याची न्युज
शहिदांना दान केल्याची न्युज खोटी आहे. विनिता.झक्कास.
हा परत एकदा प्रोपगंडा.... लोकांना चित्रपट आता निव्वळ चित्रपट म्हणूनही बघायचे नाहीत असे दिसते आहे. इथेही आपआपले अजेंडे रेटायचे सुरु आहे. एकाच वेळी चित्रपट आणि शहिद दोघांचाही निर्लज्ज वापर करत आहेत...
टिपिकल संघी प्रोपगंडा....
टिपिकल संघी प्रोपगंडा.... आपणच धूर उठल्याची बोंब मारायची आणि वरुन आश्चर्य वाटत नाही असा शहाजोगपणाही दाखवायचा..
>>
कृपया डोळे उघडून सोशल मिडियातल्या पोस्टी वाचाव्यात. ढिगावारी तसले प्रतिसाद आहेत नेटवर. तुम्ही नाही म्हटल्याने धूर दिसायचा थांबत नाही.
अरे रे कट्टरपंथीम्नी आता या
अरे रे कट्टरपंथीम्नी आता या चित्रपटाआडून असले धंदे चालवायल घेतले ? अर्थात आश्चर्य नाही. याआधी त्यांनी रितिक ला हाताशी धरून हा प्रकार केला होता आता प्रभासला धरला आहे.
चित्रपट बे निव्वळ चित्रपट
चित्रपट हे निव्वळ चित्रपट असते तर तसे बघितले असते. बनवणारे अजेंडा रेटतात तर बघणार्यांना कधी ना कधी तरी तो दिसणारच
असले अजेंडा रेटणारे नेहमी
असले अजेंडा रेटणारे नेहमी तोंडघाशी पडतात. रितिकच्या वेळेस त्यांचे तोंड पोळले तरी बोध काही घेतलेला दिसत नाही.
उलट पहिल्या चित्रपटात शिवलिंग प्रभास खंडीत करून खांद्यावर उचलतो या द्रुष्यावरुन त्यावरून काही कट्टरपंथींनी आवाज उठवला होता. त्याला पाठिंबा आहे वाटते?
असले अजेंडा रेटणारे नेहमी
असले अजेंडा रेटणारे नेहमी तोंडघाशी पडतात.
>>
त्याच प्रक्रियेला आता सुरवात झालेली आहे.
हो आपल्या प्रतिसादावरुन दिसून
हो आपल्या प्रतिसादावरुन दिसून आले

बाकी खान मंडळीच्या चित्रपटात असे शिवलिंग खंडीत केल्याचे दृष्य असते तर आतापर्यंत नागपुर उ. प्रदेश इथून बरेच काही चालू करायला सांगितले असते. परंतू प्रभास असल्याने थोडे त्याकडे दुर्लक्ष करावे आअणि स्वतःचा प्रोपगंडा पसरवा हा आदेश दिला असेल हे वरिल काहींच्या प्रतिसादांवरून जाणवते
कबूल केल्याबद्दल धन्यवाद
कबूल केल्याबद्दल धन्यवाद
गजोधरजी, सगळे आदेशावरुन काम
गजोधरजी, सगळे आदेशावरुन काम करतात हा तुमचा गैरसमज मनोरंजक आहे. खंडित करुन सन्मानपूर्वक दुसरीकडे नेणे आणि भंगित करण्यामागचा फरक समजून घ्यावा ही विनंती. अर्थात, जमले तरच.
अच्छा. जय माहिष्मती
नविन आदेश आला वाटते चालू द्या
नविन आदेश आला वाटते चालू द्या. सोईस्कर भेदभाव करणे हे आपल्याकडून काही नविन नाही.
कृपया डोळे उघडून सोशल
कृपया डोळे उघडून सोशल मिडियातल्या पोस्टी वाचाव्यात. ढिगावारी तसले प्रतिसाद आहेत नेटवर
>>> उदाहरणार्थ?
नानाकळा, काय आहे आम्हाला आदेश
नानाकळा, काय आहे आम्हाला आदेश नाही आणि पैसेही मिळत नाहीत. तेव्हा तुम्ही स्वतः शोधावे. धन्यवाद.
बाकी सीमेवर जवान शहिद होत आहे
बाकी सीमेवर जवान शहिद होत आहे आणि काही जण दोन दोन वेळा बाहूबली२ बघण्याचे ठरवत आहे. ५००-५०० रुपयाचे चे तिकीट काढून असल्या चित्रपटावर पैसे खर्च करण्यापेक्षा शहीद जवानांच्या रिलिफ फंड मधे टाकावे. बघा जमते का.
गंमतच आहे.
Straw man fallacy
Straw man fallacy
कॅरी ऑन !
कॅरी ऑन !
बाहुबली आणि देवसेना या
बाहुबली आणि देवसेना या दोघांनी मिळून केलेला शत्रुपक्षावरचा हल्ला हे द्रुष्य "मिस्टर अँड मिसेस स्मिथ" या चित्रपटात असलेल्या शेवटच्या दृष्याबरोबर मिळतेजुळते आहे. एका कडे धनुष्य बाण आहे तर दुसरीकडे बंदूक आहे इतकाच काय तो फरक.
ओह प्लिज शारुक प्रभासच्या
ओह प्लिज शारुक प्रभासच्या करंगळी ईतकाही वाटला नाही मला (अभिनय शरीरयष्टी, देखणेपण अगदी सर्वच बाबतीत) सो ती तुलना होऊच शकत नाही.
>>>>
वाह!

शाहरूख आणि प्रभासचीही तुलना आता
मी वर लिहिलेय की अभिनय छान होते सर्वांचे. राजमातेचा मला विशेष आवडला. प्रभास देखणा रुबाबदार नक्कीच आहे. किंबहुना तो नसता तर ते पराक्रम आणखी हास्यास्पद वाटले असते. गंमत म्हणजे काल आमच्या ग्रूपवर हीच चर्चा चालू होती की ऋनम्या जरा बॉडी बनवशील तर तू थोडा कमी ऊंचीचा प्रभासच वाटशील. त्यामुळे तर तो आता जास्तच आवडू लागलाय
मला शाहरूखला भारी दाखवायला ईतर कोणाला कमी दाखवायची गरज भासत नाही. जे शाहरूखकडे आहे ते मला आवडते, त्याच्या करोडो चाहत्यांना आवडते आणि त्यात तो बेस्ट आहे. आता ते काय आहे हा स्वतण्त्र लेखाचा विषय आहे. डोन्ट वरी लिहिणार नाही लगेच
पैसे मिळत नाहीत..? कशाला
पैसे मिळत नाहीत..? कशाला लष्कराच्या भाकर्या भाजायच्या उगाच..
भाजप आयटीसेलवाले पाकिस्तानसाठी हेरगीरी करतात ते पैसे मिळवून खर्च काढण्यासाठीच हे स्पष्ट झाले म्हणायचे आता... संघ फुकट राबवतो बिचार्यांना
सिनेमातल्या दृश्यांचा
सिनेमातल्या दृश्यांचा कल्पनाविलास!! अश्या कल्पना करणे, त्या पडद्यावर उतरवणे खरंच कौतुकास्पद आहे.
चित्रपट प्रेक्षकांना रंजवून ठेवतो.
Pages