बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !
बाहुबली क्रमांक १ मी घरच्याघरी पाहिल्याने पैसे गेले नव्हते. वेळ गेला. पण आपण भारतीयांना तशीही वेळेची किंमत नसल्याने फारसे वाईट वाटले नव्हते. किंबहुना खरे सांगायचे तर थिएटरला जात पैसे घालवले नाही याचा आनंदच झालेला. पण हा आनंद वर्ष दोन वर्षच टिकला. कारण आज बाहुबली क्रमांक २ बघून आलो...
तशी काही ईच्छा आकांक्षा उत्सुकता नव्हतीच. पण गर्लफ्रेंडला बघायचाच असल्याने जाणे भागच होते. तिच्या सांगण्यानुसार "ऋ तू थिएटरात बघ, मगच तुला मजा येईल, पहिला भाग छोट्या स्क्रीनवर बघितलास त्यामुळे तुला मजा आली नाही" या युक्तीवादावर विश्वास नसूनही पर्याय नसल्याने होय महाराजा म्हणत थिएटरला पोहोचलो. असे ऐकून होतो की या चित्रपटासाठी तिकीटांचे भाव वाढवलेत. पण विश्वास ठेवा, त्यापेक्षा जास्त भाव पॉपकॉर्नचे वाढवून ठेवलेत. खरे तर त्याच नुकसानीला मनाला लाऊन घेतल्याने ईतरांना सावध करायला ईथे लिहितोय. अर्थात मी कितीही सावध केले तरी बघणारे बघणारच हे माहीत आहेच ... तरी आपण आपले कर्तव्य बजावायचे.
1) अविश्वसनीय करामती - हिरोच्या पहिल्याच एंट्रीला समजते की चित्रपटात अचाट शक्तीचे अफाट प्रयोग दाखवून लोकांचे मनोरंजन केले जाणार आहे.
ज्या मानवी क्षमतेच्या आवाक्याबाहेर आहेत अश्या कित्येक करामती हिरो करतो, आणि ज्या अचूकतेने करतो ते सारे अगदी टिपिकल सौथेंडियन स्टाईल आहे.
मागे 'नायक' सिनेमात मी अनिल कपूरला दोन बसच्या मधून एक पाय ईकडे तर एक पाय तिकडे असे सरसर वर चढताना पाहिले होते. यात बाहुबली सुसाट धावणारया बैलांवरून उड्या मारायचा खेळ करतो. एकूणच पुर्ण चित्रपटभर ईथून तिथे उड्या असा मारतो जसे बिनजाळीचा स्पायडरमॅनच..
बरं याच्या धनुष्यबाणाचा नेम ईतका अचूक की काय वर्णावे. कॅरममध्ये डबलशॉट खेळावेत तसे हा बाण मारतो. म्हणजे बघा, हा आणि देवसेना एकाच वेळी एकाच डुकराला बाण मारतात. पण याचा बाण आधी देवसेनाच्या ताशी 180 मैल वेगाने सोडलेल्या बाणाला टक्कर देत त्याला बाजूला सारतो, आणि मग तोच बाण आपली दिशा बदलत तितक्याच वेगाने धावणाऱ्या डुकराचा प्राण घेतो. काळ काम वेगाचे हे अचूक गणित जे केवळ रॉकेट सायण्टीस्टच कॉम्युटरच्या साहाय्याने सोडवू शकतात ते हा चुटकीसरशी नुसते सोडवतच नाही तर शंभर टक्के खात्रीने अंमलातही आणतो. ईतकेच नव्हे, तर आपल्या अचूकतेवर ईतका अहंकार की एकाच वेळी तीन तीन बाण असे काही सोडतो की त्यातील एक देवसेनाच्या डोक्यावरून तर उरलेले दोन तिच्या कानांजवळ शिट्टी वाजवत तिच्या मागे असलेल्या तीन शत्रूंचा वेध घेतात.
एक आपला सनी देओल होता जो साधासा हॅन्डपंप उखाडून फुशारक्या मारायचा. एक हा बाहुबली आहे जो पाकिटातून सिगारेट काढावी तसे झाड मुळापासून उखडतो.
भव्यदिव्यता तर काय म्हणावी, हजारो माणसे चाकू कोयते तलवारी घेऊन राडा करायला बाहुबलीच्या दिशेने धावत येतात पण हा जराही विचलित न होता तलवारीने सपासप कापत त्यातील दोनतीनशे जणांना बघता बघता यमसदनी धाडतो. पिक्चर संपल्यावर जेव्हा मला थिएटर बाहेर पडताना गर्दीला चिरत बाहेर पडणे अवघड जात होते तेव्हा बाहुबली हा काय महान योद्धा होता याचा साक्षात्कार झाला. जेव्हा बाहुबलीला कटप्पा मारतो (का मारतो ते मी नाही हा सांगणार) तेव्हा बाहुबलीसारखा योद्धा मरणे शक्यच नाही या निष्कर्शाप्रत मी आलेलो. त्यामुळे तो मेल्याचा सर्वात मोठा धक्का त्याच्या आई वा पत्नीपेक्षा एक प्रेक्षक म्हणून मला बसला.
2) स्पेशल ईफेक्ट - मला खरे तर या ताण्त्रिक बाबींवर हक्काने कॉमेंट करता यावे ईतका मी तज्ञ नाही. तसेच एक प्रेक्षक म्हणूनही माझ्या हे प्रकार फार आवडीचे नाहीत. बाहुबलीने यात जे काही केलेय ते करायला डमी वा स्टंटमॅन वापरायचा झाल्यास तो रजनीकांतच वापरावा लागेल अन्यथा ते स्पेशल ईफेक्टनेच साध्य होऊ शकते. त्यामुळे हे स्पेशल ईफेक्ट बाहुबली सोबतच पुर्ण चित्रपटभर पसरले आहेत. जेव्हा बाहुबली हिरोईनसोबत नाचत गात बोटीतून तिला आपल्या राज्यात नेत असतो तेव्हा काहीतरी करामत करत तो ती बोट हवेत उडवतो. गाणे संपल्यावर समजते की ते स्वप्न होते. पण पाहताना समजलेही नाही की ते स्वप्न होते. कारण बाहुबली स्पेशल ईफेक्टच्या सहाय्याने काहीही करू शकतो यावर माझा ईतका विश्वास बसला होता.
3) गाणी - या चित्रपटात गाणी तशी दुय्यमच भुमिका निभावणार याची खात्री होती. पण कशी का असेना तो वेळ काढावा लागतोच. तो असह्य व्हावा अशीच गाणी आहेत.
4) विनोद - पूर्वार्धात थोडाफार विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता. सुदैवाने तो प्रयत्न थोडक्यातच आटोपला अन्यथा सौथेण्डियन विनोदाचा अत्याचार जो कधीतरी टीव्हीवर पाचदहा मिनिटांसाठी मनोरंजन करतो तो पडद्यावर सहन करने जीवावर आले असते.
5) अभिनय - चित्रपटाबद्दल चांगले लिहावे असे हे एकच. पण जाऊ दे. आज काही चांगले लिहायचा मूड नाही.
6) दिग्दर्शन - लार्जर दॅन लाईफ भव्यदिव्य दाखवणे यावरच मूल्यमापन होणार असेल तर बॉलीवूडमध्ये करण जोहार बाप ठरेल. पण त्याला नाते संबंधही चांगले दाखवता येतात. ईथे बराच बटबटीतपणा होता. सर्वात कमाल नाते तर सासूसुनेचे होते. स्वाभिमान आणि अहंकार काहीतरी फरक आहे की नाही. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा यातही फरक आहे की नाही. ती देवसेना राजमातेला तिच्या चुकीवर सुनवताना "आपको ईतनी भी बुद्धी नही है क्या" असले टोमणे भरदरबारात मारते. आणि हे एकदा नाही तर दोनतीनदा असे होते. मला खरेच त्या बाहुबलीची दया यायची. आता हा यात कसा सुवर्णमध्य काढतो याची उत्सुकता लागायची. पण शेवटी मेलाच त्यांच्या नादात 
कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..
7) राष्ट्रीय पुरस्कार - देऊन टाका आणखी एक. जर पहिल्याला दिला असेल तर ज्या कारणासाठी दिला ते कारण यात जरा जास्तच आहे. ज्यांना मजा आली पहिला भाग बघायला त्यांना दुसरा बघायला आणखी मजा येईल.
सारांश - या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो.
जय हिंद !
चॅम्प कसले उदाहरण हवेय नक्की
चॅम्प कसले उदाहरण हवेय नक्की ?
कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे
कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..>>> हा हा हा
दबाहुबलीचा काळ तर
दबाहुबलीचा काळ तर आजच्यापेक्षाही प्रगत तण्त्रज्ञान असलेला दाखवलाय..
कुठले तंत्रज्ञान आजच्या पेक्षा प्रगत वाटले?
आपण लोक नारळाच्या झाडाचा काय
आपण लोक नारळाच्या झाडाचा काय ऊपयोग करतो, तर ताडी माडी पितो आणि नारळीबागेत बसून गुलूगुलू करतो. पण ते लोकं ईधरका माल ऊधर करायला नारळाच्या झाडाचा वापर करायचे. अगदी माणसेही न खरचटता ईकडची तिकडे जातात.
त्या बल्लाळचा रथ पाहिला ना.. आताची फायटर विमाने झक मारतील त्यासमोर. घरघर फिरणारे चक्र आजकालची लोकं फूड प्रोसेसरमध्ये गाजर आणि काकड्या कापायला वापरतात, तो त्याने सपासप माणसं कापायचा.
आपल्याला मोसंबीच्या आकाराचे लिंबू आणि कलिंगडाच्या आकाराचे संत्र कोणी पिकवले तर त्याचे अमाप कौतुक वाटते. त्या लोकांनी पैदा केलेल्या हत्ती, बैल, सांड यांचा आकार पाहिला का.
थ्री ईडियट्समध्ये फुनसुक वाईंगडूची शाळा बघून तुम्ही कधी हे पाहिलेच नाही असे करता. पण त्यात बाहुबलीने गरीबांच्या वस्तीत त्यांना दिलेले शिक्षण पाहिले ना.. फुल मॅकेनिकल ईंजिनीअरींग दाखवलीय.
त्याची गदा विसरलेत की हयात
त्याची गदा विसरलेत की हयात मेंशन करायला

बजरंगबली आणि ब्रूसली अशी विचित्र कॉम्बो वेपन वाटते ....सुळकन् ते चेन बाहेर येते दांडयातुन तेव्हा
हाहाहा पटलं
हाहाहा पटलं
ऋ, आर यु सिरेस?
ऋ, आर यु सिरेस?

मला तर प्रचंड आवडलाय द बाहुबली. खासकरुन अमरेंद्र बाहुबली.
तुझ्या गफ्रेला पण आवडला असेल नक्कीच.
काल दुसर्यांदा बघितला.
काल दुसर्यांदा बघितला. तितकीच मजा आली.
तुझ्या गफ्रेला पण आवडला असेल
तुझ्या गफ्रेला पण आवडला असेल नक्कीच. Happy
>>
हम्म! आता कळले ऋ ला बाहुबली का नाहि आवडला.
खामोश है मेरा देश
खामोश है मेरा देश
जवानों की मौत पर
भीड़ बहूत है थिएटरों में
बाहुबलि की मौत पर
गावात ते दगड फोडायचे मशिन..
गावात ते दगड फोडायचे मशिन.. कसले प्रगत तंत्रज्ञान दाखवले आहे? एकाच वेळी तीन बाण मारायचे, त्यानंतर एका बाणाला डॅश देऊन आपले लक्ष साधायचे, भात्यातले बाण कधीच संपत नाहीत...
बैलांच्या शिंगांना आग लावून आणले तेव्हा डायरेक्ट शिवाजी महाराजच आठवले.. कात्रजच केला राव त्या पारध्यांचा बाहुबलीने... आणि नारळाच्या झाडांवरून डायरेक्ट पलिकडे जाणे वगैरे तर सर्जी बुबकाला लाजवेल असे होते.. गिनिज बुकातच नाव नोंदवायला पाहिजे.. अश्याप्रकारे आत जाऊन परफेक्ट उभं राहणे वगैरे तर महानच प्रकार होते..
मिशन इम्पोसिबल मध्ये तरी काय
मिशन इम्पोसिबल मध्ये तरी काय वेगळे असते.
मिशन इम्पोसिबल मध्ये तरी काय
मिशन इम्पोसिबल मध्ये तरी काय वेगळे असते. >> बरोबर पण त्या मधे हिरो ख्रिश्चन आहे म्हणून चित्रपट बघा असे भक्त आवाहन करत नाही

आजचे भावलेले आणि मनाला
आजचे भावलेले आणि मनाला लागलेले दोन Whatsapp संदेश.
१) सदमे में है तिरंगा भी,
कहता है .....
लहराया कम और कफ़न पर
ज्यादा चढ़ाया जा रहा हूँ..
२) खामोश है मेरा देश
जवानों की मौत पर
भीड़ बहूत है थिएटरों में
बाहुबलि की मौत पर
बाहुबली वा असा कुठल्याही
बाहुबली वा असा कुठल्याही चित्रपटाचा संदर्भ देत दुसरीकडे जवान आणि देशप्रेमाचे दाखले देणे हे त्या जवानांचाच अपमान नाही का वाटत?
अगदी
अगदी
दोन तीन वेळा एकाच चित्रपटावर पैसे उडवणे हे निव्वळ गंड सुखावण्यासाठी आहे त्यापेक्षा ते पैसे विधायक कामामधे लावा गरीबांना अन्न द्या कुणाला शाळेची पुस्तके घेऊन द्या
पण काहींना धर्म वेड लावतो हेच खरे
लग्नाचा सीझन चालू आहे म्हणून
लग्नाचा सीझन चालू आहे म्हणून सांगतो. झगमगीत कपडे घालून लग्नाच्या पंगतीत अमरस पुरी चोपताना, १००० त आहेर करताना सैनिक नाही आठवत, एक पिक्चर बघायला गेले की लगेच पोटात दुखायला लागते.
मला तर या उन्हाळ्यात लग्न
मला तर या उन्हाळ्यात लग्न करणारयांचेच कौतुक वाटते. भले तुमचा हॉल एसी असेल, पण वरात तर उन्हात निघते. एवढा खर्च लग्नात करण्याऐवजी त्यात एक मूल दत्तक घेऊ शकता.
मला तर या उन्हाळ्यात लग्न
मला तर या उन्हाळ्यात लग्न करणारयांचेच कौतुक वाटते.+100..
मला खुप पूर्वीपासूनच उन्हाळ्यात लग्न करणार्यांचे नवल वाटते.. उन्हाळा,त्यात मुंबई.. तुम्ही आणि वहिनी हिवाळाच निवडा नक्की..
बाकी बाहुबलीची एवढी क्रेझ आली आहे, की मार्केटमधे बाहुबली कुर्ते पण आले आहेत. ब्रैंडेड आहेत की नाही तेवढं फ़क्त बघायला हवं.
माणिकमोती, ते ब्रॅन्डेड
माणिकमोती, ते ब्रॅन्डेड माझ्यासाठी होते का
बाकी आम्ही हिवाळाच निवडू. याचा आणखी एक फायदा म्हणजे लग्नानंतर लांबवर फिरायला जायचा खर्च वाचतो. जरा मुंबईबाहेर पडत लोणावळ्यापर्यंत गेले तरी पुरे. बाकी अरेंज मेरेजमध्ये लग्नानंतर लांबवर फिरायला जाणे ही सुद्धा एक उधळपट्टीच असते.
तुला यात उधळपट्टी वाटत असतील
तुला यात उधळपट्टी वाटत असतील तर ऐक अनुभवाचा सल्ला
लग्न करू नकोस इतक्यात, अजून वय व्हायचं आहे तुझं, किंवा मग खूप वर्षापुवीच उलटून गेलंय
बाकी अरेंज मेरेजमध्ये
बाकी अरेंज मेरेजमध्ये लग्नानंतर लांबवर फिरायला जाणे ही सुद्धा एक उधळपट्टीच असते.
असहमत ... travel madhe kasali udhalpatti... lagn zale aso wa naso...
आधी एकमेकांच्या सहवासात
आधी एकमेकांच्या सहवासात एकमेकांना समजून घ्यावे मगच लांबवर प्रवासाला जावे जेणेकरून अवघडलेल्या नात्यातच तो प्रवास संपू नये आणि एवढा लांबवर जाण्याचा राहण्याचा खर्च केला असेल तो वाया जाऊ नये.
मला ते एक दोन वर्षांच्या मुलांच्या वाढदिवसाला केलेले खर्चही व्यर्थ वाटतात. मुलाला कळायला लागले की त्या वयात खर्च केले तर तो त्याचा आनंद घेऊ शकतो तसेच त्याच्या आठवणीतही राहू शकते.
आधी एकमेकांच्या सहवासात
आधी एकमेकांच्या सहवासात एकमेकांना समजून घ्यावे मगच लांबवर प्रवासाला जावे जेणेकरून अवघडलेल्या नात्यातच तो प्रवास संपू नये आणि एवढा लांबवर जाण्याचा राहण्याचा खर्च केला असेल तो वाया जाऊ नये.
भौ, तुझे लग्नाचे वय व्हायचे आहे आणि अजून तुला बराच अनुभव घेणे बाकी आहे. इथवरच थांबतो. यापुढे काही लिहून त्यावर तुझी मुक्ताफळे सहन करणे अशक्य आहे. शक्य झाल्यास लग्नपूर्व एखादे सेमीनार, कोर्स करता आला पहा. बरेच बेसीक झोल आहेत मनात तुझ्या. असे तुझ्या पोस्टीवरून वाटते. प्रत्यक्षात नसतीलही, इथे उगा आम्हा उचकवून धाग्याचा टीआरपी वाढवायलाही लिहीत असशील. तुझा काय भरवसा.
पण खरेच तुला असे वाटत असेल की मधुचंद्राचा खर्च व्यर्थ आहे, सिरीयसली मग
जबरा लिहलंत. मनातले मुद्दे
जबरा लिहलंत. मनातले मुद्दे मांडलेत. हजार रुपये खर्च करून थियेटरात पाहण्याच्या लायकीचा हा सिनेमा नाही हे माझं वैयक्तिक मत. नशीब, माझी गफ्रे हालीवूडची (आणि तिच्या बंगाली चित्रपटांची) पंखा आहे नाहीतर तुमच्यासारखा बाँका प्रसंग माझ्यावरही गुदरला असता
थियेटरात का पहावा बरे हा सिनेमा :
स्पेशल इफ्फेक्ट साठी ?
: हॉलीवूडचे चित्रपट बाजूला ठेवू, अमेरिका बाजूला ठेवू. इंग्लडच्या (BBC channel) Doctor Who या मालिकेत यापेक्षा जास्त चांगले आणि विश्वासनीय special effects आहेत. Legends of tomorrow, flash वगैरे तर अजून भारी. ते पाहून डोळे निवतात. या मालिकांचं special effects चं budget तर चित्रपटांपेक्षा भरपूर कमी असतं. थोडंफार जे बरे effects असतील तीपण हॉलिवुडची कृपा ( तिकडचेच लोक आणलेत बरेच)
२. अभिनय :
याबाबत आनंदी आनंदच आहे. अभिनय असावा तर मराठी कलाकारांसारखा.
३. युद्धदृश्य :
पहिल्या भागातील युद्धकल्पना, योद्ध्यांचे पोशाख Lord of the rings वगैरे चित्रपटांवरून चोरलेल्या
४. दिग्दर्शन :
अनावश्यक ठिकाणी घेतलेले trolly shots, crane shots, हास्यास्पद zoom outs - zoom ins, विचित्र editing वगैरे वगैरे दुर्गुण राजमौलीला सुद्धा चिटकलेत.
एक south चित्रपट बघण्यापेक्षा Tax free असलेले दोन चित्रपट बघावेत या मताचा
- अॅस्ट्रोनाट पाटील
जबरा लिहलंत. मनातले मुद्दे
जबरा लिहलंत. मनातले मुद्दे मांडलेत. हजार रुपये खर्च करून थियेटरात पाहण्याच्या लायकीचा हा सिनेमा नाही हे माझं वैयक्तिक मत. नशीब, माझी गफ्रे हालीवूडची (आणि तिच्या बंगाली चित्रपटांची) पंखा आहे नाहीतर तुमच्यासारखा बाँका प्रसंग माझ्यावरही गुदरला असता
थियेटरात का पहावा बरे हा सिनेमा :
स्पेशल इफ्फेक्ट साठी ?
: हॉलीवूडचे चित्रपट बाजूला ठेवू, अमेरिका बाजूला ठेवू. इंग्लडच्या (BBC channel) Doctor Who या मालिकेत यापेक्षा जास्त चांगले आणि विश्वासनीय special effects आहेत. Legends of tomorrow, flash वगैरे तर अजून भारी. ते पाहून डोळे निवतात. या मालिकांचं special effects चं budget तर चित्रपटांपेक्षा भरपूर कमी असतं. थोडंफार जे बरे effects असतील तीपण हॉलिवुडची कृपा ( तिकडचेच लोक आणलेत बरेच)
२. अभिनय :
याबाबत आनंदी आनंदच आहे. अभिनय असावा तर मराठी कलाकारांसारखा.
३. युद्धदृश्य :
पहिल्या भागातील युद्धकल्पना, योद्ध्यांचे पोशाख Lord of the rings वगैरे चित्रपटांवरून चोरलेल्या
४. दिग्दर्शन :
अनावश्यक ठिकाणी घेतलेले trolly shots, crane shots, हास्यास्पद zoom outs - zoom ins, विचित्र editing वगैरे वगैरे दुर्गुण राजमौलीला सुद्धा चिटकलेत.
एक south चित्रपट बघण्यापेक्षा Tax free असलेले दोन मराठी चित्रपट/ एक नाटक बघावं या मताचा
- अॅस्ट्रोनाट बोलपाटील
धागालेखकाचं खरं नाव अमित भिडे
धागालेखकाचं खरं नाव अमित भिडे आहे की काय अशी शंका येऊ लागलीय.
http://zeenews.india.com/marathi/news/bloggers-park/it-is-easy-to-fool-t...
आशूचॅम्प नंतर वेगळा धागा
आशूचॅम्प नंतर वेगळा धागा काढतो जर ईथे अवांतर होत असेल तर..
(No subject)
>>>. झगमगीत कपडे घालून
>>>. झगमगीत कपडे घालून लग्नाच्या पंगतीत अमरस पुरी चोपताना, १००० त आहेर करताना सैनिक नाही आठवत, एक पिक्चर बघायला गेले की लगेच पोटात दुखायला लागते. <<<< हे पटते...
इकडे देशात काही(ही) होऊ शकते.....
पण कायेना, दुर्दैवाने, परिस्थिती अशी आहे की....
उद्या जर कुणी लग्न करुन हनिमुनला गेले, तर त्यांच्या हॉटॅलरुमबाहेर उभे राहुन पिकेटिंग करीत (निदर्शने करित ?) त्या हनिमुनला गेलेल्या जोडप्याचे ब्रेनवॉशिंग करायलाही ढिगाने (बहुधा एन्जीओजची भाडोत्री) माणसे उभी रहातिल, की "हनिमुन कस्ले साजरे करताय?? जरा जगाच्या वाढलेल्या लोकसंख्येची काळजी करा........ "
यापुढे बाहुबली सिनेमा , लग्नाच्या जेवणावळी वगैरे फुटकळ बाबी....
तरी यंदाचेवर्षी मे महिना निम्मा होत आला तरी माबोवर "पाणीटंचाईवरुन बौद्धिके घेणे" सुरु झालेले दिसत नाहि.....
Pages