बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 May, 2017 - 12:01

बाष्कळ बालिश बाहुल्यांचा खेळ - बाहुबली !

बाहुबली क्रमांक १ मी घरच्याघरी पाहिल्याने पैसे गेले नव्हते. वेळ गेला. पण आपण भारतीयांना तशीही वेळेची किंमत नसल्याने फारसे वाईट वाटले नव्हते. किंबहुना खरे सांगायचे तर थिएटरला जात पैसे घालवले नाही याचा आनंदच झालेला. पण हा आनंद वर्ष दोन वर्षच टिकला. कारण आज बाहुबली क्रमांक २ बघून आलो...

तशी काही ईच्छा आकांक्षा उत्सुकता नव्हतीच. पण गर्लफ्रेंडला बघायचाच असल्याने जाणे भागच होते. तिच्या सांगण्यानुसार "ऋ तू थिएटरात बघ, मगच तुला मजा येईल, पहिला भाग छोट्या स्क्रीनवर बघितलास त्यामुळे तुला मजा आली नाही" या युक्तीवादावर विश्वास नसूनही पर्याय नसल्याने होय महाराजा म्हणत थिएटरला पोहोचलो. असे ऐकून होतो की या चित्रपटासाठी तिकीटांचे भाव वाढवलेत. पण विश्वास ठेवा, त्यापेक्षा जास्त भाव पॉपकॉर्नचे वाढवून ठेवलेत. खरे तर त्याच नुकसानीला मनाला लाऊन घेतल्याने ईतरांना सावध करायला ईथे लिहितोय. अर्थात मी कितीही सावध केले तरी बघणारे बघणारच हे माहीत आहेच ... तरी आपण आपले कर्तव्य बजावायचे.

1) अविश्वसनीय करामती - हिरोच्या पहिल्याच एंट्रीला समजते की चित्रपटात अचाट शक्तीचे अफाट प्रयोग दाखवून लोकांचे मनोरंजन केले जाणार आहे.
ज्या मानवी क्षमतेच्या आवाक्याबाहेर आहेत अश्या कित्येक करामती हिरो करतो, आणि ज्या अचूकतेने करतो ते सारे अगदी टिपिकल सौथेंडियन स्टाईल आहे.
मागे 'नायक' सिनेमात मी अनिल कपूरला दोन बसच्या मधून एक पाय ईकडे तर एक पाय तिकडे असे सरसर वर चढताना पाहिले होते. यात बाहुबली सुसाट धावणारया बैलांवरून उड्या मारायचा खेळ करतो. एकूणच पुर्ण चित्रपटभर ईथून तिथे उड्या असा मारतो जसे बिनजाळीचा स्पायडरमॅनच..
बरं याच्या धनुष्यबाणाचा नेम ईतका अचूक की काय वर्णावे. कॅरममध्ये डबलशॉट खेळावेत तसे हा बाण मारतो. म्हणजे बघा, हा आणि देवसेना एकाच वेळी एकाच डुकराला बाण मारतात. पण याचा बाण आधी देवसेनाच्या ताशी 180 मैल वेगाने सोडलेल्या बाणाला टक्कर देत त्याला बाजूला सारतो, आणि मग तोच बाण आपली दिशा बदलत तितक्याच वेगाने धावणाऱ्या डुकराचा प्राण घेतो. काळ काम वेगाचे हे अचूक गणित जे केवळ रॉकेट सायण्टीस्टच कॉम्युटरच्या साहाय्याने सोडवू शकतात ते हा चुटकीसरशी नुसते सोडवतच नाही तर शंभर टक्के खात्रीने अंमलातही आणतो. ईतकेच नव्हे, तर आपल्या अचूकतेवर ईतका अहंकार की एकाच वेळी तीन तीन बाण असे काही सोडतो की त्यातील एक देवसेनाच्या डोक्यावरून तर उरलेले दोन तिच्या कानांजवळ शिट्टी वाजवत तिच्या मागे असलेल्या तीन शत्रूंचा वेध घेतात.
एक आपला सनी देओल होता जो साधासा हॅन्डपंप उखाडून फुशारक्या मारायचा. एक हा बाहुबली आहे जो पाकिटातून सिगारेट काढावी तसे झाड मुळापासून उखडतो.
भव्यदिव्यता तर काय म्हणावी, हजारो माणसे चाकू कोयते तलवारी घेऊन राडा करायला बाहुबलीच्या दिशेने धावत येतात पण हा जराही विचलित न होता तलवारीने सपासप कापत त्यातील दोनतीनशे जणांना बघता बघता यमसदनी धाडतो. पिक्चर संपल्यावर जेव्हा मला थिएटर बाहेर पडताना गर्दीला चिरत बाहेर पडणे अवघड जात होते तेव्हा बाहुबली हा काय महान योद्धा होता याचा साक्षात्कार झाला. जेव्हा बाहुबलीला कटप्पा मारतो (का मारतो ते मी नाही हा सांगणार) तेव्हा बाहुबलीसारखा योद्धा मरणे शक्यच नाही या निष्कर्शाप्रत मी आलेलो. त्यामुळे तो मेल्याचा सर्वात मोठा धक्का त्याच्या आई वा पत्नीपेक्षा एक प्रेक्षक म्हणून मला बसला.

2) स्पेशल ईफेक्ट - मला खरे तर या ताण्त्रिक बाबींवर हक्काने कॉमेंट करता यावे ईतका मी तज्ञ नाही. तसेच एक प्रेक्षक म्हणूनही माझ्या हे प्रकार फार आवडीचे नाहीत. बाहुबलीने यात जे काही केलेय ते करायला डमी वा स्टंटमॅन वापरायचा झाल्यास तो रजनीकांतच वापरावा लागेल अन्यथा ते स्पेशल ईफेक्टनेच साध्य होऊ शकते. त्यामुळे हे स्पेशल ईफेक्ट बाहुबली सोबतच पुर्ण चित्रपटभर पसरले आहेत. जेव्हा बाहुबली हिरोईनसोबत नाचत गात बोटीतून तिला आपल्या राज्यात नेत असतो तेव्हा काहीतरी करामत करत तो ती बोट हवेत उडवतो. गाणे संपल्यावर समजते की ते स्वप्न होते. पण पाहताना समजलेही नाही की ते स्वप्न होते. कारण बाहुबली स्पेशल ईफेक्टच्या सहाय्याने काहीही करू शकतो यावर माझा ईतका विश्वास बसला होता.

3) गाणी - या चित्रपटात गाणी तशी दुय्यमच भुमिका निभावणार याची खात्री होती. पण कशी का असेना तो वेळ काढावा लागतोच. तो असह्य व्हावा अशीच गाणी आहेत.

4) विनोद - पूर्वार्धात थोडाफार विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता. सुदैवाने तो प्रयत्न थोडक्यातच आटोपला अन्यथा सौथेण्डियन विनोदाचा अत्याचार जो कधीतरी टीव्हीवर पाचदहा मिनिटांसाठी मनोरंजन करतो तो पडद्यावर सहन करने जीवावर आले असते.

5) अभिनय - चित्रपटाबद्दल चांगले लिहावे असे हे एकच. पण जाऊ दे. आज काही चांगले लिहायचा मूड नाही.

6) दिग्दर्शन - लार्जर दॅन लाईफ भव्यदिव्य दाखवणे यावरच मूल्यमापन होणार असेल तर बॉलीवूडमध्ये करण जोहार बाप ठरेल. पण त्याला नाते संबंधही चांगले दाखवता येतात. ईथे बराच बटबटीतपणा होता. सर्वात कमाल नाते तर सासूसुनेचे होते. स्वाभिमान आणि अहंकार काहीतरी फरक आहे की नाही. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा यातही फरक आहे की नाही. ती देवसेना राजमातेला तिच्या चुकीवर सुनवताना "आपको ईतनी भी बुद्धी नही है क्या" असले टोमणे भरदरबारात मारते. आणि हे एकदा नाही तर दोनतीनदा असे होते. मला खरेच त्या बाहुबलीची दया यायची. आता हा यात कसा सुवर्णमध्य काढतो याची उत्सुकता लागायची. पण शेवटी मेलाच त्यांच्या नादात Sad
कटप्पाने मारले वगैरे झूठ आहे सारे. त्या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर बाहुबली आज जिवंत असता ..

7) राष्ट्रीय पुरस्कार - देऊन टाका आणखी एक. जर पहिल्याला दिला असेल तर ज्या कारणासाठी दिला ते कारण यात जरा जास्तच आहे. ज्यांना मजा आली पहिला भाग बघायला त्यांना दुसरा बघायला आणखी मजा येईल.

सारांश - या गरीब लोकांच्या श्रीमंत देशात पैश्याचा चुराडा करायचे बरेच मार्ग आहेत. हा चित्रपट त्यातल्याच एका मार्गावर चालतो आणि आपल्यालाही नेतो.
जय हिंद !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही हावोत बरं गरीब. बाहुबली असो वा दंगल, आम्ही हे घरच्या टिव्हीवरच पहाणार, पहातो. उग्गाच कशाला थेट्रात जाऊन हजाराला चूना लावायचा? एकतर पार्किंगसाठी रांगेत उभे रहा, वरतुन चिप्स, पॉपकॉर्न, बर्गर-फुर्गर, कोक-पेप्सी साठी पण ५०० मोजा. सांगीतले कोणी? त्यापेक्षा घरी मस्त चहा-कॉफी, भेळ वगैरे बनवुन मज्जा करायची वर फुल्ल फॅनचा वारा एंजॉय करायचा हेच आपले जीवन.

तुम्हीच जावा त्या गर्दीत.

यात एक राहिले. शेवटचे युद्ध आणि एकंदरीतच तो अर्धा पाऊण तास प्रचंड बोर आहे. बहुतेक सगळ्या नावीन्यपुर्ण युक्त्या क्लृप्त्या शेवटाला जाता जाता संपल्या होत्या...

चूक. मी नुकतेच शाहरूखच्या अश्याच स्पेशल ईफेक्ट रावण सिनेमावर टिका करून आलोय.
मी शाहरूखच्या सिनेमाला नाही तर त्यातील त्याच्या अदाकारीला डोक्यावर घेऊन नाचतो. पिक्चर फ्लॉप जाऊ शकतो. पण शाहरूख एक कलाकार म्हणून मनोरंजन करतोच.

हा बाहुबली त्या अमिताभच्या अजूबा सारखा आहे. तो आपल्या पब्लिकने पाडला होता. याला मार्केटींगमुळे डोक्यावर घेतले गेलेय.

मला तर वाटते ते कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा हे मार्केटींग टीमनेच पसरवले असणार.. आणि आपण चाल्लो बघायला ईतर कोणी बघून सांगायच्या आधीच घाईघाईत बघायला..

हाहा तुलाही पकवणारा व इरिटेट करणारा कोणी असू शकेल असं वाटलं नव्हतं पण बाहुबलीने ते काम केलेलं दिसतंय! आता बघायला पाहिजे!
असो. छान आहे रिव्ह्यू! मी पहिला भागच बघितला नाहीये अजून.

जाऊ दे रे, म्हातार्‍या शारूकची मारामारी बघण्यापेक्षा ह्यात प्रभास आणि राणा दग्गुबातीला बघतात लोक, काय करणार आता.

मी पहिला भागच बघितला नाहीये अजून.>>>+१

पहिला भागात सुरुवातीला ते बाळाला एका हातात वर धरुन पाण्याखालून जाणार्‍या मातेला बघूनच थांबले होते मी. पूर्ण अचाट आणि अतर्क्य चित्रपट बघायची मानसिक तयारी करून बघेन म्हणून हा (आणि आता भाग २ सुद्धा) राखून ठेवला आहे Happy

बघितला . 1ल्या भागापेक्षा हा जास्त आवडला . पण पूर्वार्ध जास्त चांगला आहे. Anushkaa Shetty n Prabhas - both looks so cute together :). Especially , तिरंदाजीच्या वेळी

अश्याच स्पेशल ईफेक्ट रावण सिनेमाव >>>>>>>>>>

कशाची तुलना कशा सोबत होतेय.. त्या रावण मध्ये खुप दुय्यम दर्जाचे स्पेशल ईफेक्ट होते. त्याची तुलना खुप जुन्या व कमी बजेट असेलेल्या शक्तीमान सोबत होइल. त्या मध्ये पण शक्तीमानचे स्पेशल ईफेक्ट सरस ठरतील रावण पेक्षा जर बजेट व काळ गृहीत धरला तर...

बाहुबली चे स्पेशल ईफेक्ट ची तुलना आजुन तरी कोणत्याच भारतीय सिनेमाशी होणार नाही इतक्यात...

कवी कल्पनांमध्ये तर्क शोधणाऱ्यांची मौज वाटते
>>>>
कवी कल्पना एखाद्या हॅरी पॉटर वा क्रिशला बोलू शकतो. यात काहीही सुपरनॅचरल, चमत्कार, जादूटोणा असे नव्हतेच.
आणि या चित्रपटालाही मी अतर्क्य नाही तर अचाट बोलत आहे. तर्क तर फारच बाळबोध का होईना होताच. त्यामुळे तर्काबाबत काही म्हणने नाहीयेच मुळात.

त्या रावण मध्ये खुप दुय्यम दर्जाचे स्पेशल ईफेक्ट होते. 
>>>>
मान्य आहे.
रावणच्या स्पेशल ईफेक्टशी तुलना नाहीयेच. कोणीतरी माझ्या शाहरूखप्रेमावरून मला पार्शिअल ठरवले त्याला उत्तर म्हणून रावणचा उल्लेख आला.

पहिला भागात सुरुवातीला ते बाळाला एका हातात वर धरुन पाण्याखालून जाणार्‍या मातेला बघूनच थांबले होते 
>>>>>

हो, हे जरा अतर्क्य होते. महाभारतातल्या कृष्णाची कॉपी होती ती. पण बाहुबलीचे सामर्थ्य पाहता राजमातेतही श्वास रोखण्याचे अलौकीक कसब असावे असे समजण्यास हरकत नाही. अश्या अदभूत आणि अचाट गोष्टी नसतील तर स्पेशल ईफेक्ट वापरणार तरी कुठे हा देखील प्रश्न आहेच.

आज मी यु ट्युब वर बाहुबली १ बघितला आणि कंटाळा आला. ते स्पेशल इफेक्ट्स इतके अचाट आणि खोटे वाटत होते . कुठल्याही पिक्चर चा उदो उदो होतो हेच खरं . फेसबुक वर काही फ्रेंडच्या प्राईम लाईन वर बघितलं तर काही जण चिडले आहेत एकाने तर सांगितलंच आहे " च्यायला आता जर का मला कोणी कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा "म्हणून मेसेज पाठवला तर मी त्याला फेसबुक फ्रेंड लिस्ट मधूनच कटापच करीन.दुसरा म्हणतो मी पहिलाही भाग बघितला नव्हता आणि दुसरा तर अजिबातच बघणार नाही पण मला जर का कोणी मेसेज केले तर घरी येऊन धु धु धुवीन Lol

ऋन्मेष, छान लिहीलयस! मी पहिला भाग पहायचा प्रयत्न अर्ध्या तासात सोडला होता. दुसरा पहायचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीये. सगळच अतर्क्य, अचाट असं बघणं, अपने बस की बात नही.

वाह ऋ बाळा, आपले विचार कधी जुळतील असे वाटले नव्हते पण इथे तू माझ्या भावनांना शब्दाचे रूप दिले आहेस.
अतिशय हाईप केलेला साधारण अतिशयोक्त चित्रपट आहे.
मला तर इंटर्व्हल ला धडकीच भरली, अजून अमरेंद्र बहुबलीच सुरू आहे, आता तो मरणार कधी, पुढचा सूड बीड प्रकार होणार कधी, हा चित्रपट संपणार तरी कधी?
त्या भलाल च जीव पोपटात आहे का काय अशी शंका पण मनाला चाटून गेली.

पोपटात जीव ! उडता गालिचा ! हे सगळे जुने झाले
Proud

नारळाचे झाड दोरीने वाकवून लोक आत फेकली जातात.

त्या नारळाच्या झाडाची उंची , महालापासुनचे अंतर आणि महालाची उंची ... हे ट्रिगोनोमेट्रीत बसवायला सांगितलं तर साक्षात भाकराचार्यही नतमस्तक होतील !

Proud

परवापर्यंत मला बाहुबली नावाचा पिच्चर आहे असे सामान्यज्ञान होते. आज त्यात थोडी भर पडली आहे. धन्यवाद.
एक शंका- बोअर होण्यापेक्षा बाहुबली पाहिलेला काय वाईट? अ‍ॅट व्हाट कॉस्ट हा प्रश्न इथे महत्वाचा नाही

अप्रतिम सुंदर!!!

मी तरी निदान अजुन एकदातरी बघणार अन तेही थेयटरात हे नक्की. तसेही पडद्यावर जे दाखवतात त्यातले किती रिअल लाईफ मध्ये घडते. किमान त्या शारुखच्या पिचरपेक्षा तरी कैक पटीने छान आहे.

एक शंका- बोअर होण्यापेक्षा बाहुबली पाहिलेला काय वाईट? अ‍ॅट व्हाट कॉस्ट हा प्रश्न इथे महत्वाचा नाही >>> मला नाही वाटत की कोणी बोअर होऊ शकतं हा जर तुम्हाला हिरो-हिरोईनने हातात हात खालुन नाचने, रोमान्स आवडत असेल तर गोष्ट वेगळी.

किमान त्या शारुखच्या पिचरपेक्षा तरी कैक पटीने छान आहे.
>>>>
बाहुबलीशी तुलना करायला शाहरूखचे चित्रपट आठवावेत यातच त्याच्या स्टारडमचे रहस्य लपले आहे Happy

तसेही पडद्यावर जे दाखवतात त्यातले किती रिअल लाईफ मध्ये घडते.
>>>>
घडतं की.. जे अचाट अतर्क्य नसते ते सारे घडते. गरज नाही की प्रत्येकाच्या आयुष्यात सारेच घडेल. पण काही जणांच्या आयुष्यात नक्की घडते. प्रेमात पडणे ही काही दुर्मिळ घटना नाहीये..

इथे उगाच कारण नसताना शारूखला का बर आणल जातय ?
त्याने आधीही शाहरूखच्या सिनेमाना नाव ठेवली आहेतच ना ? आणि जरे ते फालतू असले म्हणून हा वाईट असला तर चालतो हे जस्टीफिकेशन ?

बाहुबली आपण मेंढर आहोत हे दाखवतो. मला भेटलेले कितीतरी जण स्पेशल इफेक्ट बकवास होते , सासू सून स्टोरी होती हे मान्य करतात पण फेसबुक वर "What an Epic Saga" लिहितात. कारण बाकेच्याना आवडलाय आता मी नाही आवडला म्ह्टल तर मलाच काही कळत नाही म्हणतील का ? Happy

बाहुबलीशी तुलना करायला शाहरूखचे चित्रपट आठवावेत यातच त्याच्या स्टारडमचे रहस्य लपले आहे Happy >>> ओह प्लिज शारुक प्रभासच्या करंगळी ईतकाही वाटला नाही मला (अभिनय शरीरयष्टी, देखणेपण अगदी सर्वच बाबतीत) सो ती तुलना होऊच शकत नाही.
मी त्याच ऊदाहरण तीथे लिहीलेय कारण तुला फक्त तोच दिसतो

Pages