आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७३०.
हिंदी
झ म म म च स ग अ ह
अ म क म प प
य य द ल ग

प्रचंड सोप्पे क्ल्यु ची गरज नाही

झुमता मौसम मस्त महीना
चाँद सी गोरी एक हसिना
आँख में काज़ल मुंह पे पसीना
याल्ला याल्ला दिल ले गयी...

हे तर नव्हे क्रुश्नाजी.. Wink
ते याल्ला याल्ला>>> म्हणजे या अल्लाह या अल्लाह अस आहे का???

बरोबर!!

बघा जुने पण ओळखू येतात क्ल्यु साल न देता देखिल..... Wink

ते याल्ला याल्ला>>> म्हणजे या अल्लाह या अल्लाह अस आहे का???>>> हो असेच असावे ऐकताना याल्ला याल्ला वाटते...

७३१
मराठी
म ह स ख
न ब ध म,
म उ व ग प,
क ह ब क ग....

घ्या पुन्हा सोप्पे...

क्लु:
१ ) संगितकार : भावांची जोडी( विश्वविख्यात)
२ ) गायक : breathless साँग गाणारा

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते

७३१.

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधान वार्‍याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते

क्लू देऊन ठेवतो लागले तर वापरा
गायक : राधा चि सगळी गाणी हाच म्हणतो
संगीत :- मी तुझा हाय रे जबरा होय रे जबरा फॕन झालोया फेम
गीतकार :- मराठीत सध्या हाच जास्त लिहतो

गायक : राधा चि सगळी गाणी हाच म्हणतो>>> स्वप्निल
संगीत :- मी तुझा हाय रे जबरा होय रे जबरा फॕन झालोया फेम>>>> विशाल-शेखर
गीतकार :- मराठीत सध्या हाच जास्त लिहतो>>> गुरु ठाकूर

मुव्ही:गोलमाल
परी म्हणू की सुंदरा तिची तर्‍हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली...

हो बरोबर कृष्णाजी
संगीत अवधूत गुप्ते नेच दिलाय आणि जबर फॅन च मराठी व्हर्जन त्यानेच म्हनलय सो मला वाटलं क्लिक होईल.

कोडे द्यायचे ना...

कोडे क्र. ७३३ (हिन्दि) (१९९५-२००५)
म ज क क ग स म,
क म क छ क ब क,
र क न ज र क न ज,
अ त म म ल र क न ज....

गायिका: हसर्या चेहर्याची...

अजुन काही तरी क्लु द्या ताई >>> Lol
घ्या ताई.... Happy
क्लु:
२) गायक : हसर्या चेहर्याचा
३) सन्गितकार : जगप्रसिद्ध
४) रेकॉर्ड ब्रेक मुव्ही देणारा नायक...

मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले
कभी मुस्काये कभी छेडे कभी बात करे
राधा कैसे ना जले राधा कैसे ना जले

Pages