थोड कळु बोला..........

Submitted by वि.शो.बि. on 3 February, 2017 - 04:58

द हिंदु चा लेख वाचला न मनात आल कि, आपले विचार मांडु. म्हणुच थोड कळु बोलतोय...... परंतु सत्य..........
३/२/२०१७ द हिंदु वरुन सुचल........
आपल्या भारताला गरज आहे. सत्य व निर्मळ निसर्गाची. नविन नविन पक्षि येतात न सुंदर असे आपल मन मोहक रुप आपल्या दर्शनाला घेवुन येतात. कोणताहि कर मागत नाहि कि, वाद करत नाहि. असे आकाशात एका ठिकानाहुन दुसरि कडे भ्रमन सतत सुरुच.....
भारतात 'चिमणि' हा पक्षि सुद्धा तसाच.....
परंतु कुठे हरवला आहे तेच समजत नाहिये.
त्याचि चिवचिव कणावर पडलि, का मन कस तृप्त झाल्या सारखच वाटत. सध्या हा आवाज नाहिसा होत आहे. नाहि का?
लाज वाटते हे अस बोलुन कि "सध्या नाहिस होत आहे"?
कोन आहे या चिमुकल्या चिव ला नाहिसे करनारा.....
मि, तुम्हि,आपन सर्व.......
हो आपन सर्व ,आपन त्या निसर्गाकडे पाठ करुन फक्त सेल्फिइइइइइइइइ काडनारे!
थोड कळु वाटत असेल परंतु हेच सत्य आहे.
त्या चिव ला कोनिच मिस करत नाहि. तिच खरट तोडुन तिथे सेल्फिइइ काडतोय हा मुर्ख मानव.....
निसर्गाचि वाट लाउन कसले आलेत सेल्फिइइइइ न कसले आले देखावा......
खुप काहि सहन करनार्या त्या पक्षि , ते प्राणि तो निसर्ग.......
याची आपन किति काळजी घेत आहोत ते दिसतय.. आपल्याला म्हणुन मि दररोज पनवेल च्या एका कोपरयात जाउन एका ठिकानि थोडा खाउ व थोडसे पानि ठेवत आहे. न उद्द्या परत जाउन ते साफ करुन नविन खाउ ठेवत आहे.
हे करन खुप सोप आहे कारन मला माझ्या चिव सोबत एक मस्त सेल्फिइइइइ घ्यायचि आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कडे १३७ डास, ५७ झुऱळे, ७ पाली, २३ कोळी, ६ कुंड्यात रोपे आहेत. असंख मुंग्या आहेत.

मला एक प्रश्न पडलाय हा लेख वाहत्या पानात का आहे???म्हणजे जे कोणी निसर्गाचे संवर्धन करतं त्यांच्या प्रतिसादाचे पण संवर्धन झाले पाहिजे ना??

लिखाणाचा हेतू चांगला आहे. फक्त वाचताना मधे मधे संदर्भ तुटतो. पण सरावाने त्यात सुधारणा होईल.
थोडक्यात आमच्याकडील पक्षीवैभव.

विशोबि... तुंम्हाला काय म्हणायचे ते कळले.. अन हेतु खरच चांगलाय.. मुंबईतील/ इतर शहरातील काँक्रीटीकरणामुळे चिमण्या गायबच झाल्यात.. गॅलरीत एखादि चिमणी आली तरी आता अप्रुप वाटतय.
आमच्या बिल्डिंगच्या मधोमध एक कडुलिंबाचे मोठ्ठे झाड होते.. त्याच्या सावलीत रविवारच्या दुपारी मोठी मुलं कॅरम खेळत बसत. अन होळीच्या दिवशी जेव्हा होळी पेटायची तेव्हा त्या धगाने बर्‍याचश्या चिमण्या अन कावळे उडायचे एकदम एकाच वेळेस. आता ते झाड हि नाहि अन चिमण्याहि... Happy
जागु खुप छान फोटो Happy

खुप काहि परिवर्तन होउ शकत. हे काहि लोकांच्या प्रतिसादा वरुन मला समजले.
धन्यवाद राया......
धन्यवाद भावना गोवेकर.....

जागूंनी टाकलेला फोटो मज पामरासी का दिसत नाहीय? Uhoh
दीपस्त यांचा दिसतोय पण जागूंचा नाही.

दीपस्त यांचा दिसतोय पण जागूंचा नाही.>>> मलाही कॉम्प्युटरवर दिसला नाही, पण दोनच मिनिटांनी मोबाईलवर पाहिले तर लगेच दिसले. सगळी गंमतच आहे, नाही?!!!! Biggrin

तुम्हीही मोबाईलवर पहा बरे, दिसतोय का ते!?

मोबाअीलवर (iOS) किंsssssssचितशी अींप्रुव्हमेंट आहे.
सात चौकोन दिसताहेत फक्त, रिकामे.

लय पाप केलंय वाट्टं म्या! Sad

हो मग, मानवानी केलेल्या पापांमुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे.
नाहीतर चिमण्या नाहीश्या होण्याचे कारणच काय Happy

जागूंनी टाकलेला फोटो मज पामरासी का दिसत नाहीय? >>>>>>>> हे मनुष्य धराकरा, गुगल क्रोमला शरण जा! लगेच फोटो दिसतील. Proud

शोभा Proud

मी पापक्षालनास तीर्थयात्रेस व गंगास्नानास जाण्याची तयारी करुन इथे जाउन येतो सांगायला म्हणुन आलो आणि शोभा१ यांची पोस्ट पाहिली.
तेव्हा क्रोम इन्स्टॉल करुन बघताच अचानक ते फोटो दिसु लागले.

धन्यवाद शोभा!

मस्त फोटो जागू.

तीर्थयात्रेस व गंगास्नानास जाण्याची तयारी करुन इथे जाउन येतो सांगायला म्हणुन आलो आणि शोभा१ यांची पोस्ट पाहिली.
तेव्हा क्रोम इन्स्टॉल करुन बघताच अचानक ते फोटो दिसु लागले.>>>>>>>>>.अरेरे! केवढ मोठ्ठ पापं केलं मी? Sad Proud

आमच्या शहरात अजुनही चिमण्याच्या चिवचिवाटानेच एक प्रसन्न सकाळची सुरुवात होते.....!!! कारण आमच्या कडुन अजुन तरी काही पाप झालेले नाहीये....!!! Biggrin