आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........>>>>> Uhoh

कितना अल्बम है उनका,बाबा.....
अल्बमच्या नावाची हिन्त द्या ना...पिलिज..

बरोबर स्निग्धाजी!

रुसणेच गोड आहे,एका सदाफुलीचे...
डोळ्यांतुनी हसावे,ठरलेच नेहमीचे...

असुनी मनात ओढ,का राहतेस दूर...
ऐकून जा अबोली,स्पर्शातली सतार...
छेडीत जा सुगंधी,संगीत पाकळ्यांचे...
रुसणेच गोड आहे...

गीताचे बोल असे आहेत!

स्निग्धा ताई Lol

सत्यजित यान्चा निशेध करते मी... Sad
फुलालाच कितीवेळ घेउन बसलेले...
नेक्ट टाइम मला तुम्ही डायरेक्ट अल्बम च नाव सांगत जा... Happy

मला वाटले कावेरिच्या निळ्या चेहर्‍याला स्निग्धांनी कवितेत गुंफले....>>> मला पन तेच वाटलेलं Lol

नन्तर सत्यजीत यान्नी शब्द लिहिल्यावर कळलं...हे तर उत्तर आहे... जाम हसले आज...

पण सत्यजीत जी बोल खूप सुन्दर आहेत हो... छान... Happy
आम्हाला आलं नाही तो भाग वेगळा...

तशी नवी गाणी ऐकून होत नाहीत फार! अवचित कानावर पडलेल्या चांगल्या ओळी मात्र अपसुक स्मरणात राहतात!

६४१,

जिंदगी में जब तुम्हारे ग़म नहीं थे
इतने तनहा थे के हम भी हम नहीं थे

६४२

सोप्पे हिंदी

ज ह द अ स अ क र
त ह द प अ अ क र

६४२
सोप्पे हिंदी
उत्तर
जो हमने दास्तां अपनी सुनायी, आप क्यों रोये
तबाही तो हमारे दिल पे आयी, आप क्यों रोये

ल ला ल ला ल ला
पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कोणाची मम्मी माझ्या पप्पांची

६४४

गर्द सभोवती रान साजणी
तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी
या यमुनेच्या जळी

६४५

मराठी एकदम सोप्पे

क ब स क ग स
म म व ल क ह ग अ

पुढील अक्षरे नाही दिलीत!

घ्या मीच देतो!
६४६.

राष्ट्रभाषा

अ म ह ज र
म म म म म म
ब ह ब म र
म म म म म म

Pages