आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीच देतो....१. हे गाणं मराठीतल्या चाॅकलेट हिरोवर आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रीत झालं आहे.

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

कोडे क्रं ६३० हिन्दि नविन २००७-१७
स म ह क त इ थ ख
क त स च ज
र ब व उ भ
र ब व उ भ ह

सुन मेरे हुमसफ़र क्या तुझे इतनी सी भी खबर
कि तेरी सॉंसें चलती जिधर
रहूंगा बस वहीं उम्र भर
रहूंगा बस वहीं उम्र भर, हाये

चित्रपट : बद्रीनाथ की दुल्हनिया
(पण हे गाणं आलिया भट्ट्ने गायलेलं नाही)

६३१
हिंदी (१९७०-८०)

द म क क प क ज ह द
द क अ स भ य ब क

(पण हे गाणं आलिया भट्ट्ने गायलेलं नाही)>>>> या गान्याचे दोन version आहेत. एक अखिल सचदेव आनि दुसरे आलिया

कावेरिजि किथ्थे हो?>>>> हम इथ्थे है.... Happy
सुन मेरे हमसफर वालं गाणे छान आहे... मस्त कोडे दिलेले...

कोडे क्र.६३२(हिन्दी)(हरहुन्नरी गायिका)
ल च क म घ ग ग क म न म प,
ख ख ह क क प ख न म ज,
म इ क म ह य प क अ क ब म द द ,
ढ र म ए द थ प थ स......

दशक ?

१९९०-१९९९
(साल पाहुन क्रुश्नाजी पळून जातात ना ताई म्हणून नव्हत दिलं,गायिका सगळ्यान्च्या ओळखीची आहे)

साल पाहुन क्रुश्नाजी पळून जातात ना ताई म्हणून नव्हत दिलं,गायिका सगळ्यान्च्या ओळखीची आहे>>>

मी आजकाल कावेरि ने दिलयं किंवा खास कावेरिसाठी दिलयं असे कुणी म्हटले तरी पळून जातो! Wink

कवेरि>>> चिप्स यान्च्याकडे त्युशन लावलेली दिसतेय तुम्ही.... Wink

मी आजकाल कवेरि ने दिलयं किंवा खास कावेरिसाठी दिलयं असे कुणी म्हटले तरी पळून जातो! >>>>काय हो क्रुश्नाजी ,मी नेहमी १ जुन १ नविन अस कोडे देते...तुमचा विचार करुन तरी Sad

खास कावेरिसाठी दिलयं असे कुणी म्हटले तरी पळून जातो>>>माझ्या साठी कोण खास देतयं???? Happy

माझ्या साठी कोण खास देतयं???? Happy >>>> दिल तर तुम्ही येत नाही किंवा तुम्हालाही नवीन असुन ही गाण माहित नसत Sad Light 1

क्लु:
२)नायिका ही आपला होणारा जोडीदार कसा असावा ,हे या गाण्यात सान्गते...

लुक-चुप के मैं घुमी गली-गली

कहीं मिला नहीं मेरा पिया...
खिल-खिल के हंसदी कली कली
पर खिला नहीं मेरा जिया...

Pages