आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे....मेगाब्लॉक....
तुम्हालाच सोडवायला लागेल कावेरि (किंवा नवीन गाणी येणार्‍या दुसर्‍या कुणाला). माझे नवीन गाण्यात फार डोके नाही चालत.
नाहीतर स्निग्धा येईपर्यन्त हे तसेच ठेवून पुढचे कोडे घेता / देता येईल. त्यांनी क्ल्यू दिले की हे सोडवू.

@च्रप्स, दशक दिले आहे स्निग्धांनी.

अरेच्या नाही सोडवता आलं Uhoh सॉरी, श आणि र मी येत नाही

क्ल्यु : २०१० नंतरचा सिनेमा
चित्रपटचे नावं - एका प्रसिध्द जुन्या गाण्याची ओळ

५९०:
किसी को सपना लगे तू, किसी को बहती हवा
किसी को बस बातों में, करे पल में यहाँ-वहाँ
किसी के सौ झूठ सुन ले, किसी का सच भी गुनाह
किसी की बस यादों में, करे हलचल सारा जहां
ती आमो मी ती आमो
तू छाँव है, तू धूप है
ती आमो मी ती आमो
तेरे हजारों रूप है

चित्रपट : दम मारो दम

कुछ कम रोशनी है रोशनी
कुछ कम गीली है बारीशे
कुछ कम लहराती है हवा
कुछ कम है दिल में ख्वाईशें

क्ल्यू :- कट्यार काळजात घुसलीचा दिग्दर्शक आणि महेश कोठारेंची सून ह्या चित्रपटात नायक नायिका .
डबल सिट चा संगीतकाराने हे गाण गायलय.
गीतकार :- गुरु ठाकूर
एवढ पुरेस आहे ओळखायला

५९२ मराठी
ब म ह ग ग ज न ह
क क स ज अ भ म क क
ह ज न स ह क व
स न ज झ क र
स र स र

बांधते मन हळव्या गाठी, गुंतते जरी नसते हाती
कधी कसे सूर जुळती आणि भावते मग कुठले कोणी
हरवले जग नकळत सारे, हवे हवेसे कुणीतरी वाटे
सांगना जीव झुरतो का रे
साजणा रे साजणा रे

चित्रपट : करार
सुबोध भावे, उर्मिला कानिटकर
गायक : जसराज जोशी, श्रेया घोशाल

५९३
हिंदी (१९९० - २०००)

स त प क क न
य द ब क क न
य म ब त ख म छ त
म ह त ज क न क

सोचेंगे,तुम्हे प्यार...करें के नहीं?
ये दिल बेकरार...करें के नहीं?
यादोंमे बसाया तुमको,ख्वाबोंमे छुपाया तुमको...
मिलोगे हमें तुम जानम...कहींं ना कहीं...

(गाण्यात तिसरी ओळ,‘ख्वाबोंमे छुपाया तुमको,यादोंमे बसाया तुमको' अशी आहे.)

५९४.
हिंदी (गझल) १९९० दरम्यानची

क क ब ह क ब स ह म
फ क अ प ह क क ग म

>>>सिनेमातील आहे का?>>>नाही!
अजुन एक—चांदी जैसा रंग है तेरा...या गझलेच्या गायकाने गायिली आहे!

अता फायनल क्लु...वरच्या प्रतिसादांत मी अल्बमच्या नावाबद्दलही क्लु दिलेला आहे! गुगलून पहा अता!

My Golden Ones या अल्बममधील ते चान्दी...तेरा... ही गजल आहे...
त्यात कुठे आहे तेव्हा...
आता मला हसू येतय... Happy
१फायनल क्लु द्या ना प्लिज...

Pages