फोडणीचे पोहे - भाज्या घालून

Submitted by योकु on 29 December, 2016 - 10:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दोन ते अडीच वाट्या जाड पोहे
- वाटीभर ताजे मटार दाणे
- पाऊण वाटी फ्लॉवरचे बारीक तुरे
- एक मध्यम बटाटा काचर्‍या करून
- एक मध्यम मोठा कांदा पातळ उभा चिरून
- पौष्टिकपणा हवाच असेल तर बोगातु बारीक चिरून
- थोडे शेंगदाणे
- चार, पाच तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- २०/२५ कढिलिंबाची पानं
- मीठ
- साखर
- लाल तिखट
- तेल
- मोहोरी
- जिरं
- कोथिंबीर
- लिंबू
- ओलं खोबरं/ सुकं खोबरं किसून
- भुजिया शेव

क्रमवार पाककृती: 

- पोहे स्वच्छ निवडून, धूवून मग पाण्यात मिनिटभर भिजत घालावेत. नंतर चाळणीत निथळत ठेवावे.
- सगळ्या भाज्या बारीक चिरून तयार ठेवाव्यात
- जरा जास्त तेलाची फोडणी करावी. तेल चांगलं तापलं की मोहोरी घालावी, ती तडतडली की मग जिरं; त्यावर मिरच्या मग शेंगदाणे घालावेत. दाणे जरा खरपूस झाले की मटारदाणे घालावेत.
- त्यावर कांदा घालून परतावं. कांद्याचा जरा रंग बदलला की बटाट्याच्या काचर्‍या, फ्लॉवरचे तुरे आणि कढीलिंबाची पानं घालावीत (जरा नंतर कढीपत्ता घातल्यानी त्याचा हिरवा रंग टिकतो). हे सगळं नीट परतायचं आहे. यात आता संपूर्ण पोह्यांना पुरेल एवढं मीठ घालून परतावं आणि झाकण घालून एक दणदणीत वाफ आणावी. बटाटा, मटार, फ्लॉवर शिजला की मग हळद, तिखट घालायचं.
- पुन्हा एकदा २ ते ३ मिनिटं परतायचं म्हणजे तिखटाचा, हळदीचा कचवटपणा जाईल.
- यात आता भिजवलेले पोहे घालायचे, चवीला थोडी साखर घालायची मोठं अर्ध लिंबू पिळायचं. सगळं व्यवस्थित हलवून झाकण घालून पुन्हा एक दणदणीत वाफ येऊ द्यायची.
- भरपूर भाज्या घातलेले एकदम चविष्ट पोहे तयार आहेत.
- मस्तपैकी आपल्याकरता प्लेट भरून घ्यायची. त्यावर भरपूर हिरवीगार कोथिंबीर घालायची, ओलं खोबरं किसून घालायचं, बाजूला थोडी भुजिया शेव घ्यायची; लिंबाची एक फोड ठेवायची. आवडतं पुस्तक, नाटक, टिव्ही, गाणी काय हवं ते लावायचं, सोबत घ्यायचं; अंगावर शाल घ्यायची आणि मग हे पोहे गरमागरम चापायचे. अगदी पोटभर. Happy

वाढणी/प्रमाण: 
२/३ लोकांकरता पोटभर
अधिक टिपा: 

- सगळे जिन्नस आपआपल्या आवडीनुसार, चवीनुसार कमी जास्त करता येतील. एखाद दुसरी वस्तू बदलली/ वगळली तरी चालेल. आपल्याकरताच तर करायचेत! Wink
- हळद घालतांना जरा जपून
- लिंबू, कोथिंबीर, ओलं खोबरं यात कंजूषी नको
- तेलही जरा जास्त लागेलच कारण सगळ्या भाज्या तेलावरच शिजवायच्या आहेत. तसंही तेल फार कमी झालं तर पोहे कोरडे वाटतील. तेल, या वापरलेल्या भाज्या, कोथिंबीर वगैरे जिनसांमुळे मस्त मॉईस्ट, वाफभरले पोहे होतात.

माहितीचा स्रोत: 
थोडा फ्लॉवर होता, तो कुठे ढकलायचा या विचारात हे पोहे झालेत.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीया तुला काही काम नाही का ? ३१ डिसेंबरची तयारी कर आणि पोहे बनव पण त्यात सिमला मिरची मात्र नक्की घाल. Lol

नाकं माझं,
कीबोर्ड माझा,
धागा योकुचा... >>> हे भारी होतं . Proud

अरारारा ! इतक्या भाज्या?

पोहे घालून फोडणीच्या भाज्या असे तरी नाव दे. मग माझ्यासारख्या पोहे फॅन्सचा अपेक्षाभंग नाही व्हायचा Wink

हिम्या Rofl

श्री तुच रे तुच.... Lol पण ३१ डिसेंबरला पोहे कोण खातं? Proud

स्मिते तडक्या शिवाय काय मज्जा गं रेसीपीला Wink

योकु, माझ्या विपुतुन कुठे कुठे गेलास सांग खरं खरं Proud

रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने म्हणजे बाय द वे...

मला आज जुनी माबोकर झाल्या सारखं वाटलं खर्या अर्थाने...

थोडंफार असंबा सारखं पण वाटलं Lol

रच्याकने, या धाग्यावर अवांतर करताना हा ऋचा धागा नाहीये हेच विसरायला होतं कधी कधी Proud

मटार, बटाटा घालुन होतात नेहमी/बर्याचदा. पण पोह्यात फ्लऑवर , नको..शिमला मिर्च चालेल एकवेळ. फोटो टाका.

आदिती, फ्लॉवर बाआआआआआरिक चिरुन घातलास तर समजतही नाही.... मला उलट सिमला मिरची नको वाटतेय Uhoh

खरच करुन बघायला हवी Uhoh
तसं पण ऑफिसात टिमने 'पोहे बना के ले आना या सबका लंच पे करना पडेगा' अशी ताकिद दिलीये Uhoh
एकतर ते तरी परत मागणार नाहीत नाही तर मला तरी चांगलं म्हणतील (योकुचं क्रेडिट ढापता येईल)

रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने
म्हणजे बाय द वे... अरे बापरे Lol मस्तच आहे.

माझी मात्र नव्याची नवलाई मायबोलीवर Happy

रच्याकने थँक्स रीया Lol

पोहे पाकृ वाचूनच गुलगुलीत थंडीतल्या धुकंभरल्या सकाळी खिडकीच्या बाजूला खुर्ची टाकून बाहेर बघत मी असे गरमागरम पोहे खातेय, सोबत टंपरभरून वाफाळता चहा, वाचायला ताजे वर्तमानपत्र (किंवा त्याची पुरवणी), रेडिओसंगीत असे मनोहर दृश्य नजरेसमोर तरळून गेले. फोडणीचे पोहे हा एकतर वीक पॉईंट आहे. त्यात असे सर्वगुणसंपन्न पोहे म्हणजे क्या बात! Happy

येस अकु! यानंतर टंपाळभर चहा पाहीजेच Happy

रिया, म्हणून तर विपौड्या म्हणतात त्याला. एक उडी मारून संपतात का? Wink

पोह्यांसोबत सिमला फार अपीलिंग नाही वाटत. करून पाहिल्याशिवाय नाही समजणार.
फुलकोबीचे बारीक तुरे अजिबात कळत नाहीत; छान मिक्स होतात. फार जाड देठ असतील तर ते नाही घ्यायचे.

राया, आणखी पोह्यांचे बरेच प्रकार 'पोहे फॅन क्लब' मधे दिलेले आहेत.

पोहे पाकृ वाचूनच गुलगुलीत थंडीतल्या धुकंभरल्या सकाळी खिडकीच्या बाजूला खुर्ची टाकून बाहेर बघत मी असे गरमागरम पोहे खातेय, सोबत टंपरभरून वाफाळता चहा, वाचायला ताजे वर्तमानपत्र (किंवा त्याची पुरवणी), रेडिओसंगीत असे मनोहर दृश्य नजरेसमोर तरळून गेले. फोडणीचे पोहे हा एकतर वीक पॉईंट आहे. त्यात असे सर्वगुणसंपन्न पोहे म्हणजे क्या बात! >>>>>>>>> सेम. फक्त चहाच्या ऐवजी कॉफी (वाफाळती) पाहिजे .... Happy

बापरे इथे तर फार घमासान झाले की संध्याकाळी. योकु तुझ्या धाग्याला चांगली टीआरपी मिळाली पण Wink

मला आवडणारे पोहे म्हणजे फक्त कांदा, मिरची, कोथिंबीर आणि भरपूर शेंगदाणे ! वर थोडी शेव आणि लिंबू. हो आणि पोहे झाले की किंवा बरोबरच चहा !!

इतक्या भाज्या घातल्यावर उगीच काहीतरी पौष्टीक खाल्ल्यासारखे वाटते Proud

मला आवडणारे पोहे म्हणजे फक्त कांदा, मिरची, कोथिंबीर आणि भरपूर शेंगदाणे >>>> याला आमच्यात दडपे पोहे म्हणतात .......... Happy

ललिताने सुचवल्याप्रमाणे त्यात ताजे मटार घालून बघ. लाजवाब लागतात.

फोटो हवा होता.
मी मुलगी नसल्याने मला स्वयंपाकाची आवड नसल्याने आणि मुलगा असल्याने तो करायचा नसल्याने पाककृती वाचणे आणि ती वाचून डोळ्यासमोर पदार्थ उभा करणे होत नाही Happy

आणि त्यातही यात भाज्या.. Happy
म्हणजे निव्वळ पोहे कधीपण केव्हापण फेव्हरेटच.. पण भाज्या?
याचा असा पोहे पुलाव करण्यापेक्षा थोडेसे चवीला उकडलेले अंडे बारीक तुकडे करून टाकता येईल का?

अरूण्राव फोडणी चे पोहे ओ !! दडपे पोहे वेगळे असतात Lol

मटार घालून केलेले आहेत बर्‍याचदा. रूममेट्स ना आवडायचे. पण माझी आवड नो मटार , नो नो टोमॅटो अगदी Lol पसंद अपनी अपनी शेवटी Wink

रुन्मेश, उकडलेल्या अंड्याऐवजी अंडा फ्राय करून (भूर्जी सारखा) त्यात पोहे टाकले की मस्त अंडा पोहे होतात. बीजे मेडीकल च्या होस्टेल च्या कँटिन ला मस्त मिळायचा हा प्रकार. तसा मी पण काही पोहे उरलेच तर करून पाहिलेला आहे. आणि जाम भारी लागतो त्यामुळे तुझी शिळासप्तमी करण्याकरता उत्तम Wink

अरूण्राव फोडणी चे पोहे ओ !! दडपे पोहे वेगळे असतात >>>> हो रे. तसे पोह्यांचे असंख्य प्रकार आहेत. पोहे भुर्जी किंवा मग पोहे उपमा मिक्स पण चांगले लागतात .... Happy

धनि धन्यवाद, अश्या एखाद्या खाद्यप्रकाराची मी स्वतः वगळता समोरून कोणी ग्यारंटी घेत असेल तर करून बघायला हरकत नाही. पोह्यामध्ये मी अंड्याचे कालवण आणि त्यात शिजलेले अंडे चेचून घालायचा प्रयोग केलाय. वाटल्यास थोडासा तिखट टमाट्याचा सॉस. एकंदरीत ते चांगले लागलेले.

तसेच लहानपणी आजी कोंबडीचा काढा बनवायची. तो सुद्धा नुसता प्यायला किंवा पोह्यात टाकून खायला आवडायचे. पण आजी त्या काढ्याची रेसिपी आपल्यासोबतच घेऊन गेली. बाकी घरच्या चिकन मटणचा रस्सा टाकून अध्येमध्ये ट्राय करतो पण त्याला आजीच्या त्या काढ्याची सर नाही. दोनतीन वाट्या काढ्यात अख्ख्या कोंबडीचा अर्क निघायचा.

येनीवेज, भाजी घालून पोहे केलेल्या धाग्यात मांसाहार आणल्याबद्दल क्षमस्व.

पोह्यांना एवढा टीआरपी कस्काय म्हणून धागा उघडला तर एकदम नाकातोंडात धूर गेला. Proud

तर.. योकु, पोहे रेसिपी एकदम मस्त. फोटो हवे. आम्हीही हिवाळ्यात असे पोहे करतो. आपल्या त्या तिकडल्या सगळ्यांकडेच करतात की काय कुणास ठाऊक!

हायला पोह्यांना एवढे प्रतिसाद बघून बाफ ओपन केला तर माळ्याचा मका आणि कोल्ह्यांची भांडणचा प्रयोग पाहायला मिळाला . Lol

तर योकोबा , पन्नाशीनिमित्त हार्दिक अभिनंदन . Proud

चिकनचा रस्सा नाही घालून पाहिला, पण पोहे - सांबार - शेव हा आवडता पदार्थ होता कॉलेजला असताना. कर्वे रोडच्या जवळ एक स्विकार म्हणून टपरी आहे. तिथे जाम मस्त मिळायचे. आणि शुक्रवार पेठेत मंडई च्या मागे एक पुणेरी म्हणून आण्णांचे उपहारगृह होते तिथे तर मस्तच असायचे एकदम.

स्विकार म्हणून टपरी आहे >>>> टपरी????? चांगलं हॉटेल आहे की रे ते. महाराष्ट्रियन थाली चांगली मिळते तिथे. खासकरून अळूची भाजी. शनिवार / रविवारी, पार्सल नेणार्‍यांची बरीच गर्दी असते तिथे.

अरूण्राव वेगळे स्विकार आहे अहो ते !! Lol तुम्ही म्हणत आहात ते नळस्टॉप जवळ आहे. मी म्हणतो आहे ते तिकडे मयुर कॉलनी जवळ आहे Wink

हे आहे आमचे स्विकार

https://foursquare.com/v/sweekar/4b9a60ebf964a5203bb035e3

अरे उलट टीआरपी वाढतीये धाग्याची, सतत चर्चेत राहिल्याने सतत वरती राहतो धागा आणि ५० च्या वर प्रतिसाद म्हणजे क्या केहेने. Proud

Pages