खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

|| Ambadnya || || HariOm ||

Good Bye.... Year 2016....
Welcome.... Year 2017....

•••• आपल्याला व आपल्या परिवाराला नविन वर्ष २०१७ च्या हार्दिक-मनपूर्वक व अनिरुद्ध शुभेच्छा ••••

# HappyNewYear
# NewYear
# नविनवर्ष
# नविनवर्षाच्याशुभेच्छा

|| Ambadnya || || HariOm ||

अरे ए सस्मित, जीव घेणार का...
कालच टाकायचा होता ना हा फोटो.. तेव्हा आमच्याही समोर सजलेले ताट होते.. आता पुन्हा खावेसे वाटू लागलेय ना Happy

काही शिळंपाकं उरलेलं असेलच ना. ते खा. Lol
मी तर आज लंघनात. इतकं खाल्लं की आज विश्रांती घेणार. खाल्लेच तर एक्दोन फळं खाईन.

सकला कुठली मच्छी? गोड्या पाण्याची का?
मला मासे प्रचंड आवडतात. पण वरचेवर खायचे निवडक - हलवा, पापलेट, रावस, सुरमई आणि कोलंबी प्यामिली Happy

आज मी डब्बा नेला नसल्याने..... अर्थात, बाहेर मी नॉनवेजच खातो.
सुके चिकन, कोलंबी मसाला, तांदळाच्या भाकर्‍या आणि चिकन दमा दम बिर्याणी असे दोघांत हादडले. बिर्याणी समोर आली तेव्हा क्वांटीटीचा अंदाज पार गंंडलाय हे लक्षात आले पण एवढी चवदार होती की पोटाव्यतीरीक्त ईतर कुठे सोडावीशीही वाटली नाही. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर देखील नेहमीसारखे काही खावेसे वाटले नाही ईतके पोट टम्म झालेले Happy

सकला कुठली मच्छी? गोड्या पाण्याची का? >>> माहीत नाही, कारण ही मच्छी ईकडे घोडबंदरलाच पाहीलेय

मलातर ही मच्छी खुप आवडते अगदी ईतर दुसर्या कुठल्याही मास्यांपेक्शा जास्त. पण ही खुप रेअर मिळते आणी आल्या बरोबर लगेच संपते

सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हिच्यात एकही काटा नसतो, फक्त एक जाडसर रील की हड्डी.

सकला मच्छी?? <<<<<हिच्यात एकही काटा नसतो, फक्त एक जाडसर रील की हड्डी.>>>> मूशी किंवा मोरी आहे का?

उपवासाच्या वारी उगाच हा धागा उघडला. Sad

सस्मित, एवढं खाल्लस?????

मानिनी, आता कधी हा मासा आणलास तर कापायच्या आधी अख्ख्या माशाचा फोटो काढ आणि इथे पोस्ट कर. मला पण उत्सुकता लागलीय.

मी आणी मासे आणनार नो वे..

मम्मी आणते आणी तीच करते... हो पण एक माहीतीये की ती मासे वरचे खवले साफ करुन, तुकडे करुन आणते.

आत्ता तीलाच सांगते पुढच्या वेळेला कापायच्या आधी फोटो काढायला

मलाही ते वर्णन ऐकून मोरीचे म्हावरेच आठवले.. मटणाचा मासा Happy
मला फारसे आवडायचे नाही, लहानपणी आज्जीला आवडायचे म्हणून आणले आणि खाल्ले जायचे.
पुढे आज्जी त्या माश्याला सोबतच घेऊन गेली.

मी मोरी माश्याचा रस्सा एक्दाच खाल्ला होता. अजूनही चव आठवतेय, पण माझ्या आईकडे आणत नाही म्हणून पु:न्हा मिळाला नाही. स्वतः आणायलाही जमला नाही कधी.

आमच्याकडे मूशी/मोरी खात नाहीत.>> + 1. मी पण कधीच नाही खाल्लाय. तो मासा बघून खायची इच्छा पण होत नाही माझी.

मुशीचा थोडाफार अंदाजा आहे, पण मोरी कशी दिसते माहीत नाही

पण मुशी चांगली लागते खायला... मुख्य म्हणजे काटे नसतात

नाही....

मम्मीला विचारले मी.. ती बोलली मोरी वेगळी आणी मुशी वेगळी असते

मुशी टेस्टला चांगली लागते, मोरी नाही.

tak jalebi faada.jpg

ताक जलेबी फाफ डा .. डेड ली कॉम्बिनेशन .. पावसाळ्यातले माझे आवडीचे. पहाटे पहाटे खाण्यातील मजाच काही और Happy

Pages