खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कुणीतरी अशा सुंदर सजवलेल्या डिश शेजारी रेड वाइन भरलेला ग्लास किंवा बीयर भरलेला मग ठेवून फोटो काढा यार... त्याने रंगत वाढेल्ल आणि पूर्णत्व येइल फोटोंना......

मस्त!!

"बुड्ढा बाबा>>>>>>देवा हा प्रकार मला कळला नाही,
मी भेळेत एक एक आयटम बघत बसले,
शेवटी ग्लास मधील सरबत चे नाव असेल असं वाटलं जसं बुडडी के बाल असते न तसं वाटलं आधी,
नंतर कळलं अंदाज बरोबर होता पण लॉजिक गंडल Lol

गव्हाच्या पीठाचे धिरडे खतरनाक दिसते आहे.>>अगदी.
रविवारी रात्री नऊ वाजता किचनचा लाईट बंद करुन हा धागा वाचणे म्हणजे फारच चक्रम आहोत आपण असा फिल येतोय.

गव्हाच्या पीठाचे धिरडे खतरनाक दिसते आहे.>> थान्कु थान्कु....! सौ माहेरी गेल्यावर काय करुन खावे प्रश्न च पडतो (काय प्यावे हा नाही... Wink ) .
वरचे मासे आणि मन्चुरिअन .... स्लर्प ...! भारी दिसत आहेत. पण दोन्ही हि येत नाहीत बनवता.

सगळे फोटो भारीच !

आज पाव्हणे आले होते त्यांच्या साठी हा खास कोकणी बेत ...

कोंबडी वडे (कोंबडी वगळून ☺), वांगी बटाटा पावट्याचे दाणे भाजी, काळ्या वाटण्याचं सांबरं, वड्यांबरोबर गोड म्हणून केलं जाणारं घाटलं, नारळाची चटणी, लोणी आणि कवडी दही.
फोटोत दिसत नाहीये पण भात होता आणि ज्या शिवाय कोकणी माणसांचे जेवण पूर्ण होत नाही ते ताक.

हा फोटो

IMG_20200206_132259216~2.jpg

ती सुरमई आहे. पापलेट मला अजिबात आवडत नाही(भाज्या असतील तर त्यांच्या तुलनेत बरा वाटतो). आजारी माणसांचा मासा आहे तो. खाल्यावर वाटतं आपण आजारी आहोत. काय चवच नाय लागत.

बोकलत +१
सुरमई रावस करली बारक्या माशात बोंबिल मांदेलीलाही चव आहे. पण पापलेट नुसतं बगबगीत लागतं. Happy

मला आवडते पापलेट. फक्त ते मोठे हवे. अर्थात मग ते महागही असते. पण आवडत्या माश्यांचा क्रम मात्र आधी रावस आणि हलवा मग सुरमई आणि पापलेट. ईतर मासे अध्येमध्ये. हे चार मासे माझे मुख्य खाद्य. कोलंबीला यात मोजू नका. ती तर पाहिजेच.

Pages