खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मागच्या आठवडा भरात अति प्रचंड स्वयंपाक केलाय.. आणि येणार्‍या वीकेण्डला पण करेन असं दिसतंय Proud

इतका स्वयंपाक केल्याबद्दल मला स्वतःचंच कौतुक वाटतंय Proud

तर शुक्रवार पासून सांगते -
आम्ही दर शुक्रवारी लंचला बाहेर जातो ... तो मेन्यु जाऊ द्यात

शुक्रवारी रात्री -
भात, रस्सम , तोंडल्याच्या काचर्‍या, पापड

शनिवारी-
ब्रेफा : डोसा आणि चटणी
लंच : कढी भात, गोभी मंच्युरिअन, शेवयाची खीर
डिनर : चकोल्या/वरणफळ/,,, खीर

रविवार :
ब्रेफा : सगळ्या भाज्या घालून मॅगी
लंच : भरलं वांग, भात, शीरा
डिनर : टॉमॅटो सूप, पालक पनीर, जीरा राईस, काकडी कोशिंबीर

सोमवारी :
ब्रेफा : इडली चटणी
लंच : आलू पराठे, गाजर हलवा
डिनर : सांबार भात

मंगळवारी :
ब्रेफा : मिल्कशेक आणि पोहे
लंच साखि
डिनर : टॉमॅटॉ राईस

बुधवारी :
ब्रेफा : डोसे
लंच : मंगळवारचा टॉमॅटॉ राईस
डिनर : बाहेर खाल्लं

गुरुवार :
ब्रेफा : पोहे
लंच : फायर बॉल मधे फ्राईड राईस आणि स्प्रिंग रोल्स
डिनर : साठी फ्राईड राईस पॅक केलाय

आता या वीकेंडचं प्लॅनिंग Proud

शुक्रवार :
ब्रेफा : इडली
लंच : बाहेर खाणार Proud
डिनर : जर भुक असेल तर वरण भात लिंबु तुप लोणचं पापड Proud

शनिवार :
ब्रेफा : शेवयांचं उपिट
लंच : मिसळ
डिनर : उरलेली मिसळ Proud

रविवार :
ब्रेफा : स्किप
लंच : पाव भाजी
डिनर : उरलेली पाभा

सोमवारी :
ब्रेफा : ऑम्लेट भुर्जी पाव
लंच : मिक्स व्हेज
डिनर : तेच परत

पोस्ट लिहिताना जाणवलं की लैच खाणं झालंय / होतंय त्यामुळे मंगळवार पासून व्यवस्थीत डाएट....!

निधी, खरच 'भारी' आहेत.... वजनकाटा पळणारेय या आठवड्यात पुढे पुढे Proud

ऋन्मेष् ३१ डिसेंबरचा प्लॅन काय?

बहुतेक सगळा वॉर्ड्रोब बहिणीला मिळणार तुझा.. Proud Proud
कोणाचे काय तर कोणाच काय... अरे बायकांनो, खाण्याच्या धाग्यावर वजनाची चिंता करू नका

अगं मला पोळ्या करता येत नाहीत..... आल्यापासून भातच खातेय..

माझा वॉड्रॉब तिला नाही पण तिचा नक्कीच मला मिळणाऱ्य...
९ महिन्यात १० किलो वजन कमी झालंय Wink

आदिती, एवढा स्वयंपाक केलाय की काय बिशाद आहे विसरण्याची Lol

या वीकेण्डला बाहेर जातेय फिरायला त्यामुळे नो स्वयंपाक Proud

बदक पण खातात माहीत नव्हतं

@रीया आठवड्याचा मेनू जबरदस्त Lol

मी आता कारल्याची भाजी खाल्ली तोंड कडू पडलं हां रात्री मात्र मस्तपैकी मटण आणि भाकरी खाल्ली अगदी दोन महिन्यांनी नॉनव्हेज खाल्लं

2016-12-30 15.15.30.jpg

हे cheese sauté mushroom माझ्या १० वर्षाच्या मुलाने केले आहेत, youtube वरची रेसिपी. धुणे, स्वच्छ करणे, चिरणे पासून प्रत्येक गोष्ट.

व्हेज ब्रेफा साठी डोकावले तर
इथे काही उपयोग होत नाही.
नॉन व्हेज स्पे झालाय धागा.
नाश्त्याला काय करू? Lol

धागाकर्ता प्युअर नॉनव्हेजिटेरियन असल्याने कदाचित Lol

सपना ताई तुम्ही फोडणीचे पोहे ट्राय करू शकता. Happy

राजसी ताई खूप छान आहे फोटो . तुमच्या मुलाला शाबासकीची थाप Happy

Rajasi wow... Looking good

सपना, कोणत्या तरी धाग्यावर (बहुदा ब्रेकफास्टला काय करू ) मंजुडीने फार मस्त सविस्तर मेन्यु दिलाय ब्रेफाचा आठवड्यानुसार...

मोबाईलवरुन टाईपतेय नाहीतर शोधुन दिला असता

.

.

.

Pages