पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे एक मंदीर व एक वस्तुसंग्रहालय आहे. >> आणि पेन्शनरांचे स्तोम माजलेले असते त्याचे काय?

>>> सिंजी चा उद्देश सफल झाला - आता ते पुढच्या काडीच्या शोधात असतील <<<<
त्या काड्या शोधायलादेखिल पुण्यातच्च याव लागेल... Proud

हे पहा, हा धागा पुण्याबद्दल आहे, इथे मुंबईचे इतके स्तोम माजवणे चांगले नाही, ते पण दुपारी १ ते ४ या वेळात. तुम्ही इथे येऊन दंगा करता, मग ट्रॅफीक जॅम होते, त्यामुळे पुण्याबाहेरच्या लोकांना सांस्कृतीक कार्यक्रमाला जाईपर्यत उशीर होतो.

पुण्यात वेगळ्या वस्तुसंग्रहालयाची गरज काय? >>> मुंबईत राणीबागेची आहे तेवढीच. Proud

आज हॉलिडे घेतलास काय?
>>>
सस्मित तुम्हाला एकदिवसीय सवेतन निवृत्ती म्हणायचे आहे का? हॉलिडे वगैरे ईंग्रजी शब्द वापरू नका ईथे.

लिंबाजीपंत आले खिंड लढवायला. काड्यांचे स्तोम माजवून ठेवले आहे. मिपावर १२३ प्रितीसाद आले.
मी तुळशीबागेपत्तोर जाउन येते.

पुण्यात वेगळ्या वस्तुसंग्रहालयाची गरज काय?>>> Happy

रुन्म्या, जोरात

पुण्यात वेगळ्या वस्तुसंग्रहालयाची गरज काय? >>> मुंबईत राणीबागेची आहे तेवढीच. फिदीफिदी

अशक्य हसतोय ☺☺☺☺

वाह गिरीकंद राणीबाग, काय नाव घेतलेत. वाघ सिंह हत्ती घोडे पाणघोडे गेंडे आम्ही बगलेत पाळतो पण कधी त्याचा मोठेपणा आहे का बघा..

वाघ सिंह हत्ती घोडे पाणघोडे गेंडे आम्ही बगलेत पाळतो पण कधी त्याचा मोठेपणा आहे का बघा..

बगलेचा मोठेपणा खराच असणार इतके प्राणी पाळायचे म्हण्जे Wink

बगलेचा मोठेपणा खराच असणार इतके प्राणी पाळायचे म्हण्जे >> Lol हर्पेन, तुम्ही मुद्द्याला बगल देऊन बगलेचे स्तोम माजवता आहात. Proud

भा Proud

हर्पेन मी मुंबईच्या बगलेबद्दल बोलत होतो. माझे म्हणाल तर बगलेत एक जंगल आहे. चार प्राणी तिथेही गुण्यागोविण्दाने नांदू शकतात.

पुण्यात वेगळ्या वस्तुसंग्रहालयाची गरज काय? >>> मुंबईत राणीबागेची आहे तेवढीच. >> Rofl

लिंटींच्या हातभर लांब स्वगतांचे न वाचताच फार स्तोम माजवून ठेवलंय माबोकरांनी>>> ह्या आणी अश्याच " स्तोम " वाल्या सगळ्या पोस्टीनी मी Rofl
धागाकर्त्यांनी एवढ्या निखळ प्रतिसादाची अपेक्षा नसेल केली Proud

चार प्राणी तिथेही गुण्यागोविण्दाने नांदू शकतात.>>> तु मायबोलीवरची लिस्ट काढ मी त्यांना पाठवण्याची व्यवस्था करतो. Happy

एक वैयक्तिक प्रश्न आहे. धाग्यावर आलेले जाणकारांचे प्रतिसाद पाहता विचारायची हिंमत करतोय.

मी लैंगिकदृष्ट्या असमाधानी आहे हे काही आता माबोकरांपासून लपलेले नाही. मुंबईने मला सर्वकाही दिले पण हे सुख समाधान देण्यात कमी पडली.

तर या समाधानाच्या शोधात पुण्यात आलो तर काही फायदा होईल का?

प्रश्न सिरीअस आहे, तशीच उत्तरे अपेक्षित. टिंगलटवाळ्या नकोत. ते मला आवडतही नाही आणि माझा तो स्वभावही नाही.

>>> तर या समाधानाच्या शोधात पुण्यात आलो तर काही फायदा होईल का? <<< नाही.
पुण्यात पराकोटीची स्पर्धा असते सर्वच क्षेत्रात. त्यामुळे जिथे आहात तिथेच स्पर्धेत उतरुन यश मिळवा.

पुण्यातील लोकं फारच रिझर्व्हड अस्तात, अन या क्षेत्रात तुमच्या त्या "बाकीच्या रिझर्वेशनचा" तसा उपयोगही नाही... Proud

Pages