महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????
Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
भा, तू स्तोम माजवण्याचे पण
भा, तू स्तोम माजवण्याचे पण स्तोम माजवून ठेवले आहेस हाहा >> बरोबर!
अरूण
अभिनंदनाला विरुद्धार्थी शब्द
अभिनंदनाला विरुद्धार्थी शब्द सांग बरं ??
>>>>>
तू आधी स्तोम माजवणेला विरुद्धार्थी शब्द सांग. मग ईथल्या लोकांन ते करायला सांगता येईल. जो येईल तो स्तोम माजवत चाल्लाय.
जो येईल तो स्तोम माजवत
जो येईल तो स्तोम माजवत चाल्लाय. >>>>> तू यावर एक नविन बाफ काढ बघू .....
पोल घे.... स्तोम माजवणे
पोल घे.... स्तोम माजवणे चांगले की वाईट यावर!!!
रच्याकने खरच अभिनंदनाचा विरुद्धार्थी शब्द काये?
अभिनंदन x सांत्वन
अभिनंदन x सांत्वन
अभिनंदन म्हणजे केलेल्या
अभिनंदन म्हणजे केलेल्या कामाबद्दल प्रशंसा करणे, असे म्हटले, तर कृतीबद्दल दोष देणे, असे म्हणता येऊ शकते कदाचित. (हा प्रतिसाद विथ स्ट्रेट फेस देतो आहे कसाबसा, रीया एवढी सिरीयस झाली म्हणून. :P)
आणि मी काही ईथला पोल डान्सर
आणि मी काही ईथला पोल डान्सर नाही बघावे तो मला पोल घे पोल घे करत असतो.
सांत्वन जास्त बरोबर वाटतो.
सांत्वन जास्त बरोबर वाटतो.
ऋ, पोल्सचे भलतेच स्तोम माजवले आहे ह्या लोकांनी खरंच.
लग्न झाल्यावर मुलीचे अभिनंदन
लग्न झाल्यावर मुलीचे अभिनंदन केले जाते मुलाचे सांत्वन.
मुले x मुली , म्हणून दॅट्स व्हाय हेन्सफोर्थ देअरफोर.. अभिनंदन x सांत्वन
लग्न झाल्यावर मुलीचे अभिनंदन
लग्न झाल्यावर मुलीचे अभिनंदन केले जाते मुलाचे सांत्वन. >> आता ह्या विधानामुळे कशाचेतरी स्तोम माजेल बहुधा.
नाही भा असे नाही
नाही भा असे नाही होणार.
मायबोली या फुटकळ स्त्री पुरुष वादाच्या फार पलीकडे निघून गेली आहे.
इथे समलिंगी संबंधांना लोक खुलेआम आपले समर्थन देऊ शकतात, ईथे माझ्यासारखे लैंगिकदृष्ट्या असमाधानी पुरुष बिनधास्त सल्ला मागू शकतात, ईथे नरभक्षक जीवांच्या खाद्यपदार्थांची मोठ्या चवीने चर्चा होते, पॉर्न सेक्स वगैरे शब्द तर ईथे चुईंगम चघळ्यासारखे लोकांच्या तोंडात असतात.... मी देखील वरचे वाक्य कुठलीही काडी टाकायला नाही तर व्याकरणदृष्ट्या मॅथेमॅटीकली माझा मुद्दा समजावून द्यायला दिले.
व्याकरणदृष्ट्या मॅथेमॅटीकली
व्याकरणदृष्ट्या मॅथेमॅटीकली >>
भा तुला बिगरीतच पाठवला रे 
"फे फे चे स्तोम माजवू नकोस "
"फे फे चे स्तोम माजवू नकोस " -

ऋन्मेऽऽष, माझे क्रिकेट वरचे ईतके प्रतिसाद वाचून सुद्धा (तरी?) 'तू ने मुझे जाना नही, जाना है तो माना नही, मुझे पहचाना नही' असच म्हणावं लागेल. मी आजतागायत आयपीएल च्या पुण्याच्या टीम च्या समर्थनार्थ एक तरी पोस्ट टाकलेली दाखव आणी ५०० रू. कॅश (एका नोटेत) बक्षिस मिळव अशी योजना मी जाहीर करतोय. (का योजनेचं स्तोम माजवतोय असं म्हणू?
)
५०० ची नोट मिळतेय का? थोडीशी
५०० ची नोट मिळतेय का?
थोडीशी गैरसोय......
अरे ऋ, तू कशासाठी केलेस हा
अरे ऋ, तू कशासाठी केलेस हा मुद्दा नसून लोकांची त्यावर रिअॅक्शन काय असेल, हा मुद्दा आहे. रिअॅक्शनचे फार स्तोम माजले आहे रे आजकाल मायबोलीवर.
एखादीच नोट मिळत्ये त्याचं आणि
एखादीच नोट मिळत्ये त्याचं आणि / थोड्याश्या गैरसोयीचंही स्तोम माजवू नका
थोड्याश्या गैरसोयीचंही स्तोम
थोड्याश्या गैरसोयीचंही स्तोम माजवू नका >> नाहीतर ते गैरस्तोम ठरेल, असेच ना हर्पेन?
(No subject)
गैरस्तोम
गैरस्तोम
माबो वर स्तोमाबरोबर
माबो वर स्तोमाबरोबर हल्ल्कल्लोळ माजलाय !! वेगवेगळे धागे पळताना पायात पाय अडकून पडत आहेत असं वाटतय
मग झाले/संपले की नाही
मग झाले/संपले की नाही पुण्याचे "स्तोमपुराण" ?
(पुराण शब्द आला म्हणजे हा काहीजणांच्या [काक]दृष्टीने बामणीकावाच अस्तो.....
)
पुरे हं आता माझी मागणी पण
पुरे हं आता
माझी मागणी पण दुर्लक्षित करताय सगळे तुम्ही. ६५ वा सवाई महोत्सव सातार्याला झालाच पाहिजे.
चला आपण सारे मिळून सातार्याचं स्तोम माजवूया.
जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी साधं कराड पेक्षा भारी होता येत नाही ये हो त्याला.
वर्षानुवर्षे म्हणजे गेली अनेक वर्षे तिकडं जाताना बुगडी सांडत्ये ते आणिक वेगळेच.
हो ना बुगडी सांडते ती सांडते
हो ना बुगडी सांडते ती सांडते आणि म्हातार्याला सांगायचे पण नाही म्हणत्यात.
बायदवे, पुणेत्तर लोक म्हणजे
बायदवे, पुणेत्तर लोक म्हणजे कोण?
>>> ६५ वा सवाई महोत्सव
>>> ६५ वा सवाई महोत्सव सातार्याला झालाच पाहिजे. <<<<
हो हो चालेल की.... मग कधी जाताय? चौफुल्याला हो? तमाशा-लावणीच्या सुपार्या द्यायला नगं ?
आता येवढा पासस्टावा सवाई महोत्सव सातार्यात, तर पासस्ट बार्या नाय लावल्या तरी किमान धाबारा बार्या तरी वाजल्यागाजल्याच पायजेल, होय की नाय?
सातारा कराडला धागा आणला आणो
सातारा कराडला धागा आणला आणो थांबला. त्याला पुन्हा पुण्याला न्या.
काल मी पुणे १ ते ४ वर एक मस्त वाक्य वाचले.
पुण्यात एटीएम १ ते ४ बंद ठेवायला पाहिजेत... मग त्यांना समजेल.
काय समजेल ते नाही सांगितले.
पुणेकरांना यातून खरेच काही समजले असेल तर समजवा.
पुणेकरांना यातून खरेच काही
पुणेकरांना यातून खरेच काही समजले असेल तर समजवा. >>> एक मुंबईकर पुणेकरांकडुन काहितरी शिकायला बघतोय. #टडोपामोमेंट
लगे रहो. मी टिळक ट्यांकात
लगे रहो. मी टिळक ट्यांकात पोहायला जाते.
काल मला एक वॉअप आलंय.
काल मला एक वॉअप आलंय. महाराष्ट्राची माहिती. त्यात सर्वाधिक निरक्षर लोक म्हणे पुण्यात आहेत.
अमा टिटॅ दुरुस्तीकरता बंद
अमा टिटॅ दुरुस्तीकरता बंद आहे. बेबी पूल आणि हिरवा पूल चालू आहे फक्त
Pages