पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरीकंद, पाकीटावरची वाचेल पण पुण्याला जी मिळते त्यात काय घालतात आणि त्या बाकरवडीची चव कशी आहे हे दोन्ही अनुभवल्याशिवाय तुलना करू शकणार नाही ना..
ईथे कोणी आहे का ज्याने दोन्ही चाखली आहे?

अरे, तुझे मित्र जी द्रव्ये पितात, त्या द्रव्यांमुळे बाकीच्या द्रव्यांचा परिणाम झाकला जातो. Proud

पुणेकरांनो १ वाजला आता प्रतिसाद बंद करण्याची वेळ झाली. Wink

पुण्याच्या प्रेमात असलेला एक मुंबईकर.

नरेश, मायबोलीवरचे प्रतिसाद तसेही बंद दाराआडून येतात. ईथे तो नियम लागू नाही.

अवांतर - यावरून आठवले. पुणेकरांना पुण्यातच 1 ते 4 नियम पाळणे बंधनकारक असते की जगभरात जिथे जाल तिथे?

बाकरवडीबद्दल ऋ चा प्रश्न मलाही पडलेला. मी घेतले दोन पाकीट पण मला काय इतकीही खास चव वाटली नाही नेहमीच्या माझ्या इथे मिळणार्‍या बाव पेक्षा.

रच्याकने, हे कंठ सुधारक वटी काय आहे. श्री धन्वंतरी पुणे'ज यांचे... आजच वृत्तपत्रासोबत फ्री सॅम्पल मिळाले आहे. पुणेकर मुंबईची बाजारपेठ कबीज करायच्या प्रयत्नात आहेत का? आधी बाकरवड्या खाऊ घालून खोकला द्यायचा आणि मग त्यावर औषध..

ब्लाईंड स्टडी केला पाहिजे. लोकांच्या समोर एका बशीत पुण्यातली बाकरवडी व दुसर्‍या बशीत मुंबईतली बाकरवडी देऊन दोन्हींपैकी कुठली चवदार वाटते, ते सांगायचे. कुठल्या बशीत कुठली बाकरवडी ते फक्त आपल्याला माहीत, टेस्ट करणार्‍याला नाही. Happy

आधी बाकरवड्या खाऊ घालून खोकला द्यायचा आणि मग त्यावर औषध.. >> Lol म्हटलेच आहे "तुम ही ने दिया दर्द, अब तुम ही दो दवा ..."

ऋन्म्या

चितळ्यांची २०-३० भाकर वडी घे. ती खलबत्त्यात घेऊन थोडे बारीक चेच. त्यात कांदा बारीक चिरून टाक. थोडी कोथंबीर पण घे. अर्धा लिंबू पिळून त्यात तळलेली मसाला मिर्ची मिक्स कर. मग परत थोडे चेचून घे. ठेचा असेल तर ते ही टाक ... सगळे एकजीव केल्यानंतर त्यांना एका प्लेट मधे काढून घे. त्यावर टमाटो सॉस वगैरे टाक.

आणि मला खायला आणून दे,

सस्मित दोन पाकिट का घेतले? एकावर एक फ्री होते का? की दोन हजाराची नोट सुट्टी करायची होती? कुठलाही नवीन पदार्थ एकच पाकिट घेऊन बघायचे. भले चितळेंची बाकरवडी का असेना. स्तोम माजवले गेल्याची शक्यता कधीच नाकारायची नाही.

अरे देवा जरा इथे नव्हतो तर आता कंठ सुधारक वटीचं स्तोम माजवून ठेवलंय. Proud

मी उगाच सांगत नाही. माणसं अरभाट आणि चिल्लर

प्रसादक, का नको तपासू.. सांगा ना मला, का नको तपासू.. लोकं माझे र्हस्व दीर्घही तपासतात ईथे.. स्वत: ईंग्लिशचे भारंभार शब्द वापरतात.. पण मी जरा एखादा हिंदीचा शब्द मध्येच वापरला की मला माझ्या मुंबैकर असण्यावरून टोमणे मारतात.. तो एखादा शब्द पकडून पुढचा धागा वाचायची इच्छाच मेली असे बोलतात.. माझ्या भावना कोणी समजून घेतात का.. सांगा ना मी का मग कोणाच्या भावना समजून घेऊ.. तुमच्या भावना समजून घ्यायच्या नादात मी पटकन सॉक्स टाकून तो खाल्ला असता तर केवढ्याला पडले असते ते.. हल्ली तर ब्रांडेड वापरायला सुरुवात केलीय, 250 रुपये जोडी येते.. त्यातला एक पटकन खाऊन टाकला असता तर दुसरा काय टाय बनवून गळ्यात लटकवला असता..

बाकरवडी चाटचे एवढे स्तोम का माजवून ठेवले आहे???? आमच्या मुंबईचं चाट बेस्ट असतं. बाकरवडी चाट तिथपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. Proud

तु जर तसा खाल्ला असता तर मायबोलीकरांनी माझा "शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार" केला असता. ते ही हत्तीवर मिरवणूक वगैरे काढून

प्रसादक, का नको तपासू.. सांगा ना मला, का नको तपासू.. लोकं माझे र्हस्व दीर्घही तपासतात ईथे.. स्वत: ईंग्लिशचे भारंभार शब्द वापरतात.. पण मी जरा एखादा हिंदीचा शब्द मध्येच वापरला की मला माझ्या मुंबैकर असण्यावरून टोमणे मारतात.. तो एखादा शब्द पकडून पुढचा धागा वाचायची इच्छाच मेली असे बोलतात.. माझ्या भावना कोणी समजून घेतात का.. सांगा ना मी का मग कोणाच्या भावना समजून घेऊ.. तुमच्या भावना समजून घ्यायच्या नादात मी पटकन सॉक्स टाकून तो खाल्ला असता तर केवढ्याला पडले असते ते.. हल्ली तर ब्रांडेड वापरायला सुरुवात केलीय, 250 रुपये जोडी येते.. त्यातला एक पटकन खाऊन टाकला असता तर दुसरा काय टाय बनवून गळ्यात लटकवला असता.. >> ऋन्म्याचा इथे शाखा मोड अ‍ॅक्टिव्हेट झाला बहुधा. Lol

पुणे = *फक्त* बाकरवडी आणि फक्त चितळे असा समज होइल कोणा नवख्या माणसाचा. पुण्याचे स्तोम का विचारणारा धागा बरेच तास बाकरवडीवरच स्थिरावला आहे. संपली इतक्यात पुण्याची बुराई ?

शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार
>>>
शनिवारवाडाच का? आमच्या गेट वे ऑफ ईंडियाला नाही का होऊ शकत सत्कार? किंवा झालंच तर शिवाजी पार्कवर? शनिवारवाड्यावर होतो तोच सत्कार का? प्रत्येक गोष्टीत स्तोम माजवा तुम्ही..

अरे सत्कार पुणेकर करणार आहे. मग तो शनिवारवाड्यावरच होईल. मुंबईकर असते तर गेट वे ऑफ इंडीयावर केला असता.

मायबोलीकरांनी माझा "शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार" केला असता. >> अरे सत्कार पुणेकर करणार आहे. >>> मायबोलीकर होते ते पुणेकर कसे झाले? मायबोली काय पुण्याची का? हेच, हेच ते स्तोम माजवणे. प्रत्येक गोष्टीत हेच करा तुम्ही ...

Pages